छत्रपती संभाजीनगर येथील शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करून बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व समजून करीत असलेल्या कामाची दखल घेऊन मिर्झा मरियम या बालिकेला नवी दिल्ली येथे 19, 20 व 21 जुलै रोजी आयोजित तीन दिवसीय दुसऱ्या महिला अधिवेशनाच्या उदघाटनीय (19 जुलै) कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सचिव उज्मा पारेख हुडा रावल यांनी कळवले आहे. या दुसऱ्या महिला अधिवेशनाचे उद्दिष्ट समाजातील बदल आणि परिवर्तनासाठी सक्षम महिलांना एकत्र आणणे आहे हे आहे.
नवी दिल्लीतील लोधी रोडवरील IICC सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात चॅम्पियन्स ऑफ चेंज उपस्थित राहतील आणि त्यांच्या सर्वोत्तम पद्धती सामायिक करतील. या परिषदेस भारतभरातून ३०० हून अधिक महिला प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी माहिती माहिती मिर्झा मरियमचे वडील मिर्झा कय्यूम नदवी यांनी दिली.
मिर्झा मरियमचे न्युज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन.
तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
अभिनंदन मिर्झा मॅम शुभेच्छा
धन्यवाद
शुक्रिया जनाब बहुत शुक्रिया