दूरदर्शन मधील आमची सहकारी, निर्माती मीना गोखले हिचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने तिला खूप खूप शुभेच्छा. मीनाचे वैशिष्ट्य म्हणजे ४० वर्षांपूर्वी तिचा स्वभाव जसा होता, तसाच तो आज ही आहे. तिला इतके मान मरातब, पुरस्कार मिळाले. इतकी प्रसिद्धी मिळाली तरी तिचा स्वभाव, साधेपणा, हसतमुखपणा, हळुच काही तरी मिश्किल बोलणे आज ही तसेच आहे.

दूरदर्शन मधून ती रितसर निवृत्त झाली असली तरी कार्यक्रम/मालिका निर्मितीत आजही सक्रिय आहे. प्रसिध्द लेखिका, निर्मात्या, दिग्दर्शक सई परांजपे यांच्या जीवनावरील “कथा सईची” या ३० भागांच्या मालिकेची निर्मिती, दिग्दर्शक मीनाच असून या मालिकेचा २८ वा भाग उद्या, रविवारी प्रसारित होत आहे.

असे असले तरी मीनाचं मला खूप कौतुक गेल्या वर्षी वाटले, जेव्हा तिने आणि आमची दुसरी सहकारी श्रीकला हट्टंगडी या दोघींनी मिळून त्यांचे दूरदर्शन मधील गुरू, ज्येष्ठ निर्माते दिवंगत विनायक चासकर यांच्यावर आधारित पुस्तक लिहिले.

खरं म्हणजे कुठल्याही नोकरीत माणूस एकदा पाय उतार झाला की कुणी शक्यतो त्यास ओळख सुद्धा देत नाही. पण या दोघींनी श्री चासकर यांच्या विषयी सुंदर पुस्तक लिहून एक आगळी वेगळी गुरू दक्षिणा दिली.
मीना, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.

— देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मान.देवेंद्रजी मीनाताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून
आपण त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा अतिशय सुंदर लेख
लिहून त्यांचा वाढदिवस अगदी स्पेशल केला.
वाचून खूप आनंद झाला.
मीनाताईंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.
त्यांना उत्तम आरोग्यासह आनंदाचं सुखासमाधानाचं दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई 🙏
मी कामानिमित्त दुरदर्शन ला जात असे तेव्हा मिनाजी चे परिश्रम, कामातील त्यांचे डेडीकेशन जवळून पाहता आले. खूप शुभेच्छा
नमस्कार मीनाताई ..!!
आपल्याला गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आगामी काळासाठी अभीष्टचिंतन ..!!
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007