स्पर्धा परीक्षांची गांभीर्याने तयारी करण्यासाठी मुलींनी मोबाईल मधून बाहेर पडून वाचनालायची संगत धरून रोज तीनचार वृत्तपत्रे आणि संबधित विषयांची पुस्तके वाचली पाहिजेत तरच स्पर्धा परीक्षेसाठी त्यांचे ज्ञान वाढविता येईल, असे विचार
न्युज स्टोरी टुडे चे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील एस एन डी टी विद्यापीठाचे महर्षी कर्वे आदर्श महाविद्यालय आणि सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात
“स्पर्धा परीक्षेत मुलींना संधी” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता, आपण प्रतिकूल परिस्थितीवर निर्धाराने कशी मात करू शकतो यासाठी त्यांनी काही यशस्वी महिला अधिकाऱ्यांच्या यश कथा आपल्या मार्गदर्शनात सविस्तरपणे सांगितल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय राणे यांनी या प्रसंगी बोलताना मुलींनी कशा प्रकारे चिकाटीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा हे सांगून आपले महाविद्यालय मुलींना अश्या मार्गदर्शन शिबिरातून चांगल्या प्रकारे नोकरी मिळेल यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. मनोज गोगटे यांनी आपल्या वाचनालयात विविध विषयांवरील जवळपास ३८ हजार पुस्तके असून मुलींना वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा म्हणून वाचनालय योग्य ते सर्व सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर असेल अशी ग्वाही दिली.
याच कार्यक्रमात प्राचार्य डॉ. दत्तात्रय राणे यांनी सह लेखकांसह लिहिलेल्या “द लिगल थिअरी ऑफ ज्युरीस्पृडन्स” या कायदेविषयक इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे कोऑर्डीनेटर डॉ. योगेश लोखंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुमित चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी विविध शाखांच्या मुलीं मोठया संख्येने उपस्थित होत्या.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
विद्यार्थिनींनी स्पर्धा परिक्षांत यशस्वी होऊन स्वत:च्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने मोबाईलचा वापर कमीत कमी करत, वाचनालयांतून अधिकाधिक पुस्तके वाचावीत अशा अर्थाचे मार्गदर्शन भुजबळ सरांनी केले ही म.कर्वे महाविद्यालयातील घटनेचे सुरेख वृत्तांकन.
स्थानिक पदाधिकाऱ्यांचे वाचनालयासाठीचे सहकार्यही अनुकरणीय.
👌👌👌👌 सुंदर मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित केला