ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा लातूर आयोजित तिसरे राज्यस्तरीय फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथे नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सुप्रसिध्द साहित्यिक लेखिका मलेका महेबूब शेख – सय्यद या अध्यक्षपदी होत्या. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द विचारवंत, माजी प्राचार्य नागोराव कुंभार यांनी वृक्षाला जलदान देऊन केले. हे संमेलन सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीण भारतातील पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते.

या एकदिवसीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मोईजभाई शेख,माजी महापौर विक्रांतजी गोजमगुंडे, ज्येष्ठ साहित्यिक फ.म. शहाजिंदे, अँड. हाशम पटेल, प्रा. मैनोद्दीन मुल्ला, संस्थापक कवी शेख शफी बोल्डेकर, पहिल्या संमेलनाध्यक्षा कवयित्री अनिसा सिकंदर शेख, कवी खाजाभाई बागवान, डाॅ.इ.जा.तांबोळी, अफसर शेख, डाॅ.एहसानुल्ला कादरी, विजय वडेराव, जाफरसाहाब शेख आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी “स्पंदन” या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाध्यक्षा मलेका शेख – सय्यद लिखीत “अक्षर अक्षर शिकूया” या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी “वर्तमानातील मुस्लिम मराठी साहित्याची भूमिका” ह्या विषयावर डाॅ. जयद्रथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यात रामराजे आत्राम, नसीम जमादार, मुतवल्ली मैजोद्दीन एम., नौशाद उस्मान यांनी आपले विचार मांडले.

उद्घाटन सत्रात स्व.ॲड. सिकंदर शेख यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा युगस्त्री फातिमाबी शेख समाजसेवा पुरस्कार ॲड.फरहिन खान पटेल उमरगा यांना प्रदान करण्यात आला व फातिमाबी शेख साहित्य रत्न पुरस्कार कवयित्री नूरजहाँ शेख आणि स्व. हुसेनसाब बागवान यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक व लेखक गौसपाशा शेख यांना देण्यात आला.
पुणे येथील ज्येष्ठ कवी बा. ह. मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली शंभर कवींनी कवीसंमेलनात सहभाग नोंदवला. उद्घाटनाचे सुत्र संचालन नसीम जमादार यांनी तर कवीसंमेलनाचे सुत्रसंचलन उमाकांत अदमाने यांनी केले.

फातिमाबी शेखला न्याय मिळवून देण्यासाठी ज्याला जमेल तसे सर्वांनी प्रयत्न करावे. त्यांची ही जयंती पुण्यतिथी साजरी व्हावी आणि त्यांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे असे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे सहसचिव यांनी सांगितले.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष इस्माईल शेख, लातूर जिल्हाच्या अध्यक्षा तहेसिन सय्यद, कार्याध्यक्ष नदिम कादरी, उपाध्यक्ष ॲड.एकबाल शेख, सचिव ॲड.सिमा पटेल, रमेश हनमंते, कासार रशिद, रसुल पठाण, कलिम शेख, अशफाख शेख, खालेद शेख, सत्तार शेख, मतिन अब्बासी, नजिर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800