Tuesday, July 23, 2024
Homeपर्यटनमेरा जूता है जपानी.. : १४

मेरा जूता है जपानी.. : १४

जपानी शौचालय

नमस्कार मंडळी.
“मेरा जूता है जपानी”
ही लेखमाला आपल्याला आवडत आहे,याचा आनंद होतोय. पण आजच्या भागात आपण अशा बाबी विषयी वाचणार आहोत, ज्याचा आपण सहसा कधी उल्लेख करीत नाही, ती बाब म्हणजे शौचालय !

पण आमच्या सह प्रवासी, लेखिका – कवयित्री सौ पूर्णिमा शेंडे यांनी मात्र जपानी शौचालयाचा चांगला अभ्यास करून लेख लिहिलाय, तो आज आपण वाचू या. आणि खरं म्हणजे, हे अत्याधुनिक जपानी शौचालय नीट वापरता न आल्याने मी तरी ते वापरण्याच्या फंदात न पडता सरळ आपली पाण्याची बाटलीच वापरत आलो. इतर काय करायचे, काय माहित ! असो…
– देवेंद्र भुजबळ

आम्ही जपानला फ्लाईटनी उतरलो. इमिग्रेशन झालं, लगेज घेतलं. सर्व सोपस्कार करून आम्ही जपानच्या भूमीवर पाय ठेवले. लहानपणी स्वप्नातही कधी पाऊल ठेऊ, असे वाटले नव्हते. ते प्रत्यक्षात साकारत होते. आम्हाला हॉटेलमध्ये न्यायला मिनी बस (१२ सिटर ची) यायला थोडा वेळ होता. आणि आम्हाला हॉटेल वर पोहोचायला दिड तास लागणार असे आम्हाला घ्यायला आलेले जपान च्या हॉटेल एजेंट ने सांगितले. म्हणून आम्ही सर्वांनी एअरपोर्ट वर जपानी कॉफी, आणि थोड स्नॅक्स खाऊन, नेहमी प्रमाणे आपण ‘जाऊन येऊ’ एक एक जण वॉश् रूम ला जाऊन आले. आम्ही बायका एकमेकींना जपानी टॉयलेट च्या बद्दल माहिती दिली तरीही काहीना नीट समजले तर काहींना अगदी प्रत्यक्ष दाखवले. बस आली आणि आम्ही जपानचे सौंदर्य न्याहाळत होतो.

व्वा ! आधुनिक जपान बद्दल कितीतरी ऐकलं होतं. आता आजूबाजूला ते पाहत होतो. सुस्थितीत सर्वाना सोयीचे असे रस्ते, सर्व इमारतींना बाल्कनी असलेले उंच उंच आधुनिक इमारती. सहज विचारपूस म्हणून आम्ही आमच्या ड्रायव्हरला अर्थात इंग्लिश मध्ये बोलायला सुरवात केली तर तो व्यवस्थित हिन्दीत बोलत होता. आम्हांला हायसे वाटले.

आमच्यातील एकीने त्याला विचारलं. इथे जपान मध्ये भारतात घेऊन जाण्यासारखे असं काय खास आहे, असं तुम्हांला वाटते ? आमचा साधा प्रश्न !
त्यानी एकाही मिनिटाचा अवकाश न घेता म्हणाला, ‘जपानचे टाॅयलेट सीटस’ ते खुप अत्याधुनिक आहेत.

आम्ही सर्वजण एकमेकांकडे आश्चर्यकारक नजरेने पाहातच बसलो. हे उत्तर जराही अपेक्षीत नव्हते. दोन तीन तासांनी आम्ही हाॅटेल मध्ये आलो. रूमची चावी देईपर्यंत आजुबाजुला हाॅटेलचे इंटेरियर बघत प्रथम मोकळं होण्यासाठी अर्थात टॉयलेटलाच गेलो.

नेहमी प्रमाणे विधीवत झाल्यावर थोडा गोंधळातच कुठे फ्लश, कुठे काही बाही, बारीकसारीक बटणं बघत ठीकठाक होत बाहेर आलो.
रूमची चावी मिळाल्यावर निवांत होत टाॅयलेटची अत्याधुनिकता नजरेत भरली,
हाय टेक्नॉलॉजीच्याही कल्पनेच्या पलीकडे असलेले हे टाॅयलेट. प्रथम बाथरूम मध्ये शौचालयाची सोय नाही तर त्यासाठी वेगळी रूम असते. बाथरूम म्हणजे बाथ साठी वेगळी खास खोली आणि शौचालय वेगळे.

जपानी टॉयलेटमध्ये बटणे असतात. जी तुम्ही विविध कार्ये सक्रिय करण्यासाठी दाबू शकता. काही ब्रँडची नियंत्रणे टॉयलेट बाऊलच्या बाजूला असलेल्या पॅनेलवर असतात, तर काहींची ती भिंतीवर जोडलेली असतात. प्रत्येक बटण जपानी भाषेत लेबल केलेले असते आणि ते काय करते याचे एक लहान चिन्ह, चित्रण किंवा रेखाचित्र असते. कधीकधी, इंग्रजीत भाषांतरीत केलेले असते

जपानी टॉयलेटमध्ये आढळणारी सामान्य बटणे अशी आहेत :

फ्लश करण्यासाठी बटण
वॉटर जेट सक्रिय करण्यासाठी बटण
वॉटर जेट थांबवण्यासाठी बटण
बिडेट फंक्शनसाठी बटण
पाण्याच्या दाबासाठी बटण
पाण्याचा दाब वाढवण्यासाठी बटण
पाण्याचा दाब कमी करण्यासाठी बटण

आपल्याला जपानी भाषा समजत नाही पण तिथे इंग्लिश शब्दातही लिहिलेले असते शिवाय चिन्ह ही असतात.
थोडं विचार करून समजून घेतले तर त्या आधुनिक टाॅयलेटचा व्यवस्थित वापर करू शकतो.

काही जपानी शौचालये अतिरिक्त बटणे देतात जी विशेष कार्ये सक्रिय करतात. त्यापैकी दोन सर्वात मनोरंजक आहेत “फ्लशिंग साउंड” बटण किंवा “वॉटर साउंड” बटण.
जे मोठ्याने वाजते, बनावट फ्लशिंग किंवा पाण्याचे आवाज जे काही आवाज इतरांना ऐकू आल्यास तुम्हाला लाज वाटेल ती ऐकु न येण्यासाठी आणि “डिओडोरायझेशन” बटण, जे दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी एक छान सुगंध सोडते.

‘टाॅयलेट सीट’ रुम टेंपरेचरला वाॅर्म असते. विशिष्ट बटण दाबल्यावर टाॅयलेटचे झाकण उघड झाक ऑटोमॅटिक होते. सेन्सरनी खुप कामं आपोआप होतात.

जेव्हा आपण प्रथमच जपानी शौचालय पाहतो तेव्हा सहाजिकच गोंधळून जातो. ते आपल्या देशामधील इतर कोणत्याही शौचालयासारखेच कमोड आहे, पण ते अधिक सुविधांसह आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये लोक दिवसभर ये-जा करतात, सर्व शौचालये चोवीस तास पूर्णपणे स्वच्छ असतात. जंतू, घाण आणि इतर हानिकारक सूक्ष्मजंतूंपासून मुक्त होण्यासाठी टॉयलेट बाऊलजवळ ठेवलेल्या टॉयलेट सीट क्लिनरचा चांगला वापर होत असतो.

जपानमध्ये टॉयलेट फ्लश वेगवेगळ्या प्रकारात होतात. काही जे भिंतीवर सेन्सरसमोर हात ठेवून किंवा काही फक्त उभे राहून सक्रिय होतात. पाण्याच्या टाकीच्या बाजूला लीव्हर असलेले देखील आहेत.

सर्वात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे इंटिग्रेटेड बिडेट, पेन्सिलच्या आकाराचे ‘नोजल’ जे टॉयलेट सीटच्या खालून बाहेर येते आणि पाणी सोडते. यात दोन सेटिंग्ज आहेत: एक गुद्द्वार धुण्यासाठी 
आणि एक बिडेट फॅक्शनसाठी.’नोजल’ वापरकर्त्याच्या शरीराला स्पर्श करत नाही.

अशी अत्याधुनिक टाॅयलेट सीटस आपल्याकडे पण काही वर्षांनतंर येऊ शकतात. पण वापरकर्तानी ते व्यवस्थित वापरले पाहिजे. मुख्य म्हणजे स्वच्छतेबाबत जागृत होणे महत्वाचे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाताना व्यवस्थित सिंगल लाईन असते. कुठेही धावपळ, गडबड नाही. टाॅयलेटस सुद्धा भरपुर, भरभर लाईन सरकते. कुठेही धावपळ, गडबड वगैरे तर नाहीच पण जराही दुर्गंधी नाही.

जपानला गेलेले बरेच लोक तेथील सुंदर नैसर्गिक दृश्ये, अप्रतिम प्राचीन किल्ले, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे, उत्तम चवदार खाद्यपदार्थ आणि समृद्ध आणि आकर्षक संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त करतात. असेही काही आहेत, जे अतिशय अनोख्या जपानी टॉयलेटच्या प्रेमात पडले आहेत ज्यांनी बाथरूमचा संपूर्ण अनुभव एका नवीन स्तरावर नेला आहे.
क्रमशः

पूर्णिमा शेंडे.

— लेखन : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. हटके लेख..! जपानचे स्वच्छतेबद्दलचे धोरण अतिशय उत्तमरित्या अवलोकन केले आहे..!

  2. आपल्याकडे जो विषय अतिशय दुय्यम महत्त्वाचा किंवा कदाचित अतिशय दुर्लक्षितच आहे तो म्हणजे शौचालय ज्याला खरेतर प्राधान्य दिले पाहिजे, विशेषतः सार्वजनिक शौचालये. जपान मध्ये शौचालयांची बांधणी खरंच खूप छान आहे. public toilet सुद्धा खूप स्वच्छ होते, कुठेही दुर्गंधी नाही.अशी शौचालये आपल्याकडे कधी येणार माहीत नाही. पुर्णिमा तू या लेखाद्वारे हा विचार आमच्या मनात जागा केलास त्याबद्दल तुझे खरंच खूप आभार

  3. Very good article this wil help to traveller’s going to Japan.. this subject is very important for cleanliness and health. Hope this system wil come to India.

  4. अप्रतिम,
    टॉयलेटची इतकी डिटेल माहिती पिक्चर सहित देणारी पहिलीच लेखिका.नव्याने जाणाऱ्यांना उपयुक्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः