या लेख मालेत आपण काल जपान मधील अत्याधुनिक शौचालय याविषयी लेखिका कवयित्री सौ पूर्णिमा शेंडे यांनी सविस्तर, साध्या सोप्या भाषेत दिलेली सचित्र माहिती वाचली.
आज आपण पुन्हा आपले पर्यटन सुरू करू या.
जपान मधील आमचे शेवटचे पर्यटन स्थळ होते, ते म्हणजे माउंट फुजी. माउंट फुजी हा जपान मधील सर्वात उंच म्हणजे ३,७७६.२४ मीटर उंचीचा पर्वत आहे. तो टोकियो पासून १०० किलोमीटर अंतरावर होन्शू ह्या मुख्य बेटावर आहे. हे जपान मधील सर्वात सुंदर ठिकाण आहे.

इथे जागृत ज्वालामुखी आहे. त्याचा १७०८ साली उद्रेक झाला होता. माउंट फुजी ला युनेस्को ने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे. हिवाळ्यात हा सर्व पर्वत, परिसर बर्फाच्छादित असतो.
या माउंट फुजी ला लागूनच एक मंदिर आहे. या मंदिराविषयी सर्वांची अशी श्रद्धा आहे की, इथे आपण आपल्या मनातील ईच्छा लिहून ठेवल्यास ती पूर्ण होते. त्या प्रमाणे आपण बघाल, तिथे हजारो लोकांनी आपल्या मनातील ईच्छा लिहून ठेवल्या आहेत. मी ही माझ्या मनातील ईच्छा तिथे लिहून ठेवली. आशा आहे की, ती पूर्ण होईल !

तर अशा प्रकारे आमचे जपान चे पर्यटन खरोखरच अविस्मरणीय झाले. दुसऱ्या दिवशी भारतात परत निघायचे याची हुरहूर लागली होती. त्या प्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो. पण मी तरी मनात निश्चय केला की, अवघ्या १२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपान ने दुसऱ्या महायुद्धाची झळ सोसून इतकी प्रगती केली आहे, तर आपल्या जगातील एक नंबर ची लोकसंख्या असलेल्या देशाने लोकसंख्येचा बाऊ न करता भारत एक महासत्ता होईल यासाठी आपल्या कडून होतील तितके प्रयत्न केले पाहिजे. असो….
आशा आहे की, आपणास ही संपूर्ण लेख माला आवडली असेल. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
सायोनारा, सायोनारा…..

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800
वाचनीय लेखमाला.प्रेरणादायक अनुभव.
ही संपूर्ण लेख मला आवडली
सायोनारा, सायोनारा…..
एकंदरीतच जपान टूर बद्दल मी खरंतर साशंक होते कारण जपान बद्दल खूप काही ऐकून होते पण प्रत्यक्ष जपान टूर मध्ये खूपचं छान अनुभव आला. अर्थात मी काही लेखिका नाही त्यामुळे भुजबळ सर तुमच्या लेखांमधून खूप काही शिकायला मिळाले.एकतर तुम्ही फिरताना फक्त एक पर्यटक म्हणून नव्हे तर एक लेखक म्हणून पण जपान फिरलात. तुमच्या लेखनाद्वारे आम्ही पाहिलेला जपान आणि तुम्ही पाहिलेला जपान जरी एकच असला तरी दृष्टिकोन किती वेगळा आहे हे लक्षात येते
संपूर्ण लेखमाला वाचनीय, तुमच्या लेखाने पुर्ण जपानची टुर पुन्हा अनुभवली. शेवटचा दिवस माॅऊट फुजी,आपल्याला वाटले होते जमेल का एवढ्या उंचावर, वातावरण कसे, किती थंड असेल? पण निसर्गाची कमाल उन, पाऊस, वारा कुठलाही त्रास नाही. ग्लेशिअरचे, ढगाळ आकाशाचे,खाली आलेली धुकं,हलके सोनेरी ऊन,संपूर्ण परीसर फोटोजनिक होता.
निघताना पाय जड होत ‘सायोनारा’ ‘सायोनारा’ करत निघालो.