नमस्कार मंडळी.
काल जागतिक मैत्री दिन होता. पण रविवारी आपले पोर्टल बंद असल्याने या कविता काल प्रसिद्ध करता आल्या नाहीत म्हणून त्या आज प्रसिद्ध करीत आहे. मैत्री दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
१. गप्पा
नको चहा, नको खारी
बसून मारू गप्पा भारी…
हलक्या फुलक्या गप्पा
मनमोकळ्या गप्पा…
विश्वासाच्या गप्पा
आपुलकीच्या गप्पा…
पोट भरून हसाव्या
अश्या मनमोहक गप्पा…
आरोग्याचं टाॅनीक
आहे या गप्पा…
गप्पा गप्पा गप्पा…
आठवणीत रमणाऱ्या गप्पा
विचारपूस करणाऱ्या गप्पा…
कुणाशी मारू शकतो गप्पा..?
आपल्या अगदी खास
सखीशीच माराव्या गप्पा…
मग बघा बरं… कक्क्कसा
ह्रदयाचा भरून जातो कप्पा…
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
सतत आनंदी आणि हसतमुख
असाव्या….माझ्या सख्या…
या मनापासून सदिच्छा
या मनापासून सदिच्छा.
— पूर्णिमानंद. मुंबई.
२. मित्र-मैत्रिणींशी कराव्यात गप्पा
जाणावा नात्यातला गोडवा
मनास पडलेला प्रश्न सोडवा
कोणावर नका देऊ उगा ठप्पा
मित्र-मैत्रिणींशी कराव्यात गप्पा…
चुकीने चविष्ट पदार्थ व्हावा खारट
यावे अगांतुक दुःखाचे सावट
पार करण्या कठीण काळाचा टप्पा
मित्र-मैत्रिणींशी कराव्यात गप्पा…
पाऊस-वारा खुलवी मोरपिसारा
वाहत्या पाण्या सावरी किनारा
उघडण्या मनाचा बंद कप्पा
मित्र-मैत्रिणींशी कराव्यात गप्पा…
धाग्याधाग्याने गुंफण्या सुंदर वीण
घालविण्या मरगळ नि सारा शीण
गवसावी ऐसी चीज शोधता चप्पा-चप्पा
मित्र-मैत्रिणींशी कराव्यात गप्पा…
— विजया केळकर. हैद्राबाद
३. नात मैत्रीच
नात्यापलीकडील नात मैत्रीचं
समोरच्याचच होऊन जाण्याच्या खात्रीचं
खांद्यावरल्या हातांच्या समाधानाचं
अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेल्या आनंदाचं
विचारांच्या पलीकडच नशिबाच्या दानाचं
नक्कीच सुखावणारं लुभावणार
नात मैत्रीचं अत्तराच्या कुपीचं
— मीरा जोशी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुदंर कविता, मैत्री म्हणजेच आयुष्य जगण्याचं एक रामबाण आरोग्यमय
टाॅनिक. धन्यवाद अलका.
मैत्रीण आपल्याला तरूण ठेवतं
ताजंतवान ठेवतं,आनंदी ठेवतं.
मैत्री दिनाच्या सुंदर कविता लेखन साहित्यिक भगिनीचे
अभिनंदन
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
👌👌👌👌 तीनही कविता छान आहेत
पूर्णिमा शेंडे आणि मीरा जोशी यांच्या कविता भावल्या,गप्पा करायला नवीन सख्या मिळाल्या,