Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यमैत्री

मैत्री

ओढ ओढ्यास नदीची
जलतत्व सांभाळी शिताफीने
पर्वा नाही दगड-गोट्यांची
समव्यसने जपे मैत्र कसोशीने ….

ऊनपावसाच्या खेळात
हिव भरते हिवाळ्यास
चिवट धागा मैत्रीचा
उद्युक्त मागे-मागे धावण्यास….

घरा-घरात नांदती मित्र
बाल्य-तरुणाई-वृद्धत्व
सहवासे ताठमान राही
भूषविते प्रत्येकाचे कर्तृत्व….

घरकुलाची भिंत देते निवारा
दगड-विंटांना प्रेमे जोडे गारा
वैरभावाचा निकामी हतोडा
जुळून राहता हृदयींच्या तारा…..

भाव-भावनांचे भरले बाजार
मोलभाव करतांना ना लाज
विसरले मित्रता सुसंस्कारांशी
परीक्षेच्यावेळी मित्रा धाव आज …..

— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ