पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मुखेड, महाराष्ट्र यांच्या वतीने समाजसेवक नारायण काळबा गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील विविध गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक/कवी मा.चंद्रकांत दादा पाटील(पुणे) हे होते तर प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे होते.
सदर कार्यक्रमात जेष्ठ गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे, बदलापूर (जि.ठाणे) यांना त्यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या उत्कृष्ट रचनांसाठी “महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार-२०२३” देवून गौरविण्यात आले. आतापर्यंत त्यांना ७ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर झालेल्या कवी संमेलनात त्यांनी सादर केलेली “असाही बाप” ही गझल फारच भाव खाऊन गेली.
ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचलन जेष्ठ कवी गुलाबराजा फुलमाळी यांनी केले.
ह्या संस्थेच्या अध्यक्षा सौ.पंचवटी गोंडाळे व सचिव श्री संभाजी गोंडाळे यांचे आयोजन/नियोजन अगदी शिस्तबध्द व सूत्रबध्द होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800