Wednesday, April 23, 2025
Homeसाहित्यरंगभूमी दिन : काही कविता

रंगभूमी दिन : काही कविता

आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त काही कविता सादर करीत आहे. सर्व रंगकर्मींना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

१. रंगभूभी : काल आज आणि उद्या

जनक मराठी रंगभूमीचे
विष्णुदास नामाचा महिमा
अठरा दशके सुरुच आहे
परंपरेचा नाट्य- करिश्मा

प्रारंभीचे सीता-स्वयंवर
आठवणी त्या मनात ताज्या
हाऊस फुल्लचे बोर्ड आजही
नाट्यगृही नित गाजावाजा

रसिकजनांचे मन रिझवाया
रंग फासती चेहऱ्यावरती
रंगभूमीच्या मंचावरती
लावुनी मुखवटे वावरती

अस्तित्वाला देत झुगारुन
प्रवास असतो परकायेचा
रोज नव्याने तसाच अभिनय,
तीच भूमिका जगावयाचा

टेक आणखी रिटेक नसती
जिवंत अभिनय प्रत्येकाचा
अभिनेत्यांची रोज कसोटी
प्रतिसाद मिळाया रसिकांचा

उत्तम अभिनय ,संवादाने
नाटक उतरे प्रेक्षक-हृदयी
रंगकर्मी अन् रसिकजनांना
जोडत जाते रंगभुमी ही

हे नटसम्राटा नमन तुला
रंगभुमीची सेवा करशी
भूक स्वास्थ अन् तहान विसरुन
भुमिकेमधे समरस होशी

भावे आणिक शेक्सपिअर
अमीट अजरामर कलाकृती
जतन करु या आपण सगळे
रंगभुमीची शान संस्कृती

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे

२. मुखवटा

मुखवटा पांघरुन आम्ही
रोज जगतो खोट्याने
मुखवटा बदलुन आम्ही
रोजच वागतो खोट्याने ॥१॥

कधिच न कळले आम्हां
हा मुखवटा माझा
रंगिल्या या दुनियेत
बदलतो मुखवटा माझा ॥२॥

खोट्याचा बाजार भरतो ईथे
सत्य रोज विकते मुकाट्याने
चकाट्या पिटताना आम्ही
मुखवटे रोज बदलतो मुकाट्याने ॥३॥

मुखवटे बदलणे हा आजार
जडला जरी आम्हांस
कोणी म्हणले जरी रंग बदलता
नाही तमा तरी आम्हांस ॥४॥

खर्‍यासह आम्ही वागतो खोटे
खोट्यासह बोलतो रोज खोटे
खरे नाही जगणे आमचे खोटे
मुखवटे बदलुन रोज वागतो खोटे ॥५॥

जीवनाच्या या रंगमंचाला
मुखवट्याचा साज नित्य नवा
द्वेष, राग, प्रेम, वासना, भावनेला
मुखवट्याचा बाज नित्य नवा ॥६॥

— रचना : पंकज काटकर. काटी, जिल्हा धाराशिव

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता