महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ दिनानिमित्त नुकतेच परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कारांचे वितरण पुणे येथे करण्यात आले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री. माधव कौशिक यांच्या शुभहस्ते सुमारे ५२ साहित्य पुरस्कार, मराठी साहित्यिकांना प्रदान करण्यात आले.
या पुरस्कारांमध्ये दृश्यकला क्षेत्रासाठी नवी मुंबईतील एस्.व्ही.एस्. कला प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या “रंगसभा” या ४०० पृष्ठांच्या रंगीत ग्रंथाला म.सा.प. चे “नी.स.गोखले पारितोषिक” मिळाले आहे.
या दृश्यकला ग्रंथात महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रा बाहेरील कांही निवडक दृश्य कलाकारांच्या कलाकृतींच्या तंत्र व शैली यावरील अत्यंत महत्त्वाचे, उपयुक्त आणि सूलभ शब्दांत कला रसग्रहण केलेले आहे. डॉ.गजानन शेपाळ सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय, मुंबईचे ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेली ३० वर्षे महाराष्ट्रातील आणि भारतातील दृश्य कलाकारांच्या कलाकृतींवर अत्यंत सोप्या पद्धतीने रसग्रहण केलेले आहे. आजही ते सातत्याने लिखाण करीत असतात. त्यांच्या दृश्यकला विषयांवरील लेखांची वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेली आहे. त्यांच्या या लेखांपैकी निवडक १०० लेखांचा रंगसभा हा ग्रंथ म.सा.प.च्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. म.सा.प.चा अशा प्रकारचा मानाचा पुरस्कार दृश्य कला क्षेत्रातील कदाचित “रंगसभा” या ग्रंथास मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
या निमित्ताने डॉ.गजानन शेपाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800