ज्ञानज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था टाकळी भान समुहाच्या विद्यमाने नुकताच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक व गुणवंत व्यक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात श्रीरामपूर येथील कवी,गझलकार तथा जीवन गौरव शैक्षणिक मासिकाचे सहसंपादक रज्जाक शेख यांना साहित्यिक योगदान, मराठी अध्यापन यासाठी साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक रेखा भंडारे, आमदार हेमंत ओगले, संमेलनाध्यक्ष डॉ.केशव देशमुख, कवि संमेलनाध्यक्ष सुनिता वाळुंज, डॉ.वंदना मुरकुटे,आयोजक अर्जुन राऊत,डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाश कुलथे,संगीता फासाटे, कल्पना निंबोकर,विजय पांचाळ,सुनिता कपाले,आनंदा साळवे, चंद्रकांत कर्डक
आदी उपस्थित होते.
अल्प परिचय
रज्जाक शेख यांनी विविध राज्यस्तरीय संमेलनात आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली आहेत. जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचन,लेखन चळवळीत ते सक्रिय काम करीत आहेत. त्यांच्या अठराशे पेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना आनंद दिला आहे.
शिक्षक असलेल्या रज्जाक शेख यांच्या कार्याची दखल घेऊन आता पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता, लेख, हायकू, अभंग, प्रेमकविता, गझल, काव्यांजली,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात ते लेखन करीत असतात. त्यांची व्याख्याने, कlविता,मुलाखती प्रवरा कम्युनिटी रेडिओवर प्रसारित झाल्या आहेत. युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी चॅनेलवरही त्यांच्या कविता, कार्यक्रमांचे सादरीकरण झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात, अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,अखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कविता सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.शिरूर येथील राज्यस्तरीय कविसंमेलन , श्रीरामपूर , छत्रपती संभाजीनगर,पिपंरी कोलंदर, देवगड,नेवासा,येथील कविसंमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
श्री रज्जाक शेख यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800