रमजान विशेषांक इखलासचे प्रकाशन प्रसिद्ध गझलकार प्रफुल्ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच थाटात संपन्न झाले
यावेळी बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले की, मला अतिशय आनंद होतोय की रमजान अंकाच्या प्रकाशन समारंभाचा मी अध्यक्ष आहे. ते पुढे म्हणाले की, अश्या अंकाची आज समाजाला गरज आहे कारण इस्लाम धर्माची ओळख जेव्हा मराठीमधून होईल तेव्हा लोकांना कळेल खरी गोष्ट काय आहे. त्यावर विचार मंथन होईल. समाजातील बांधिलकी वाढण्यास मदत होईल. ह्या अंकात रमजान विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रोजा व रमजान ह्या समीकरणा पुढील रमजानची माहिती मराठी मधून मिळण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचा हा पहिलाच अंक संपादक अनिसा सिकंदर, उपसंपादक खाजाभाई बागवान, कार्यकारी संपादक मंडळ सदस्य तहेसीन सय्यद, दिलशाद सय्यद, निलोफर फनिबंद, नसीम जमादार व प्रकाशक इंतेखाब फराश यांच्या प्रयत्नातून साकार झाला.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्यसंस्थेचे अध्यक्ष ॲड. हाशम पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष इख़्लास अंकाचे, सहसंपादक खाजाभाई बागवान, प्रसिद्ध रंगकर्मी सतीश इंदापूरकर, प्रकाशिका ॲड.राजश्री बोर्डीकर, प्रकाशिका पत्रकार रूपाली अवचारे, पुणे जिल्हा अध्यक्ष बा .ह मगदूम, सचिव मेहमूदा शेख, केंद्रीय सहसचिव इख्लास अंकाचे संपादिका अनिसा शेख, कवयित्री मिनाज शेख, समाज सेवक बिंधास्त जिंदगीचे अमित चव्हाण, शाहिन अकॅडमीचे बशीर काझी, कार्यकारी संपादक तहेसीन सय्यद, उमाकांत आदमाने हे यावेळी उपस्थित होते.
या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष बा.ह मगदूम लातूर जिल्हा अध्यक्ष तहेसीन सय्यद पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.उमाकांत आदमाने सचिव मेहमूदा शेख सहसचिव वाय .के शेख यांना सन्मानपूर्वक निवडपत्र प्रदान करण्यात आले.
सोशल कॉलेजचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, कासिदचे संपादक अय्युब नल्लामंदू, संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर, पानगलच्या प्राचार्य डॉ. सुरैय्या जहागीरदार यांच्या ह्या कार्यक्रमासाठी शब्दरुपी विशेष शुभेच्छा लाभल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंग्रजी लेखक सलीम शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेरी स्कूलच्या मुख्याध्यापिका परविन फराश यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कवी संमेलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ॲड. उमाकांत आदमाने यांच्या सुंदर संचालनाने कविता व गझल भरून गेल्या.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
।। मनःपूर्वक शुभेच्छा।
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र.