Friday, December 6, 2024
Homeलेखराजकवी भा.रा.तांबे

राजकवी भा.रा.तांबे

राजकवी भा.रा.तांबे यांची आज १५० वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा हा जीवन परिचय. राजकवी भा.रा.तांबे यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
   
राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोंबर १८७३ रोजी मध्य भारतातील मुगावली येथे झाला. त्यांचे शिक्षण झांशी आणि देवास येथे झाले. मध्य भारतात युवराज शिक्षक, दिवाण, पोलीस सुपरिटेंडंट , सरकारी वकील, न्यायाधीश ई. नोकऱ्या केल्यानंतर  ते १९३७ साली ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी झाले.

त्यांच्या कवितांचे मुख्य स्वरूप गीतांचे, भावगीतांचे होते. कवितेतून संदेश देण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. त्यांनी नाट्यगीते लिहिली.तांबे यांनी आध्यात्मिकतेचे स्तोम माजविले नाही. त्यांचा पहिला कविता संग्रह १९२० साली, दुसरा १९२७ आणि तिसरा समग्र कविता १९३५ साली प्रकाशित झाला. त्यात २२५ कवितांचा समावेश आहे़. तांबे यांना संगीताचे ज्ञान होते.

भा.रा.तांबे यांच्या  ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ ,  ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ , ‘मधु मागशी माझ्या’  इत्यादी अनेक कवितां अजरामर झाल्या आहेत. काव्य रसिकांच्या मते तांबे हे मराठी काव्यसृष्टीमध्ये फुललेले व रसिकतेला आपल्या हजारो नवकल्पनांच्या पाकळ्यांनी भुरळ पाडणारे विलोभनीय व सप्तरंगी कमळ होते.

७ डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेर येथे राजकवी भा.रा.तांबे यांचे निधन झाले.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड 
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869454800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. तांबे कवींचे इतभूंत माहिती

    गोविंद पाटील सर जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !