मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा सभागृहात नुकतेच शब्दशिल्प कलाविष्कार संघ, गिरिजा महिला मंच (महाराष्ट्), नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय संमेलन थाटात संपन्न झाले.
या संमेलनात राज्यभरातून एकूण १८० साहित्यप्रेमी उपस्थित होते. ग्रंथदिंडी, मान्यवर सत्कार व मार्गदर्शन, परिसंवाद, पुरस्कार सोहळे, पुस्तक प्रकाशन, काव्य सादरीकरण इत्यादी कार्यक्रम आदरणीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
या संमेलनाला संमेलनाध्यक्ष मा. एकनाथ आव्हाड. (साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त लेखक), स्वागताध्यक्षा हिरकणी गीतांजली वाणी (शब्दशिल्प कलाविष्कार संघ कार्याध्यक्ष), उद्घाटक सचिन गोखले (टिव्ही मालिका, चित्रपट दिग्दर्शक) लाभले होते. त्याचबरोबर प्रमुख अतिथी ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार मा. रवींद्र यशवंतराव देशमुख, मा.अश्विनी बोरस्ते (महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच अध्यक्षा), मा. सुरेश पवार (गिरजा गौरव प्रतिष्ठान, अध्यक्ष), मा. प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी ऑफ बांद्रा, कार्यवाह) होते.
तर संमेलनाचे उदघाटक अतिथी आयपीएस अधिकारी मा. डॉ.रवींद्र शिसवे, मा. पत्रकार पंकज दळवी (परिसंवाद वक्ता), महासंयोजिका मा. सोनाली जगताप (परिसंवाद वक्ता), विशेष अतिथी डॉ. हिंदुराव वायदंडे, युनिव्हर्सिटी लायब्ररीयन – हेड ऑफ dlis इन्स्टिटयूट सोमाया विद्याविहार युनिव्हर्सिटी, डॉ. सुभाष चव्हाण डायरेक्टर नॉलेज रिसोर्स सेन्टर एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय चर्चगेट मुंबई, अखील भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेशाध्यक्षा मा. हिरकणी राजश्री बोहरा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे अध्यक्षा हिरकणी अनिता गुजर, साहित्य संपदा प्रकाशक संस्थापक मा. वैभव धनावडे, सामाजिक कार्यकर्ते श्री. जयंतजी वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून ऐन पावसाळ्यातही वेगवेगळ्या क्षेत्रातील रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली होती. तर संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीही अथक परिश्रम घेत होती. त्यात प्रामुख्याने मा. मयूर पालकर, मा. चंदन तरवडे, मा. सपना भामरे, मा. मिनल बधान, मा. प्रियंका कोठावदे, मा. अर्चना नावरकर यांनी अत्यन्त ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांना सगळ्यांनी साथ दिली.
कुंदन कुंज -शुभा पाणसरे लिखित काव्यसंग्रह,
फुलपाखरू – योगिता जाधव लिखित काव्यसंग्रह,
This is how it goes..phase of love . लेखिका पूजा अमृतकर लिखित इंग्रजी पुस्तक,
ओंजळ – प्रियंका कोठावदे लिखित अलक संग्रह ह्या चार पुस्तकांचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष एकनाथजी आव्हाड म्हणाले, “साहित्य माणुसकी जोपासते… माणसाला माणसाशी जोडते…” सभागृहात असणाऱ्या विविध दिग्गज साहित्यिकांना पाहून आनंद व्यक्त करताना त्यांनी हे उद्गार काढले. उदघाटन टेलिव्हिजन फिल्म, मालिका दिग्दर्शक सचिनजी गोखले यांच्यामतानुसार, “साहित्यिक जितके चांगले कंटेंट तयार करतील तेवढा सिनेसृष्टीचा दर्जा उंचावेल.”
पुढारी न्यूज सुप्रसिद्ध पत्रकार पंकज दळवी व साहित्यिका- आरेखनकार सोनाली जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक अर्थशास्त्र ह्या विषयावर उत्कृष्ट परिसंवाद साधला. सजावट मा. आशा अमृतकर यांनी केली होती, तसेच शस्तवन सौ. सुनिता कोठावदे व स्वागत गीत सौ. स्वरा अमृतकर यांनी सादर केले. सामाजिक कार्य, साहित्यिक क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्र, कला क्षेत्र, ग्रंथालय क्षेत्र अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव, उद्योग रत्न, साहित्य भूषण, काव्य भूषण, समाज भूषण, साहित्य रत्न, शिक्षक रत्न, साहित्याप्रभा असे उच्चस्तरीय पुरस्कार देण्यात आले तसेच गेल्या वर्षातून प्रकाशित निवडक पुस्तकांना देखील शांता शेळके शब्दशिल्प काव्यसंग्रह पुरस्कार, विंदा कारंदीकत शब्दाहील्प काव्यसंग्रह पुरस्कार, पु. ल. देशपांडे शब्दशिल्प कथा संग्रह पुरस्कार, डॉ. आनंद यादव साहित्य साधना पुरस्कार असे पुरस्कार देऊन नवं निर्मित साहित्याचा गौरव करण्यात आला.
शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे संमेलन स्वागतध्यक्षा हिरकणी मा. गीतांजली वाणी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना नॅशनल लायब्ररी बांद्रा व गिरजा मंच यांच्या वतीने बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार देण्यात आला.
गिरजा महिला मंच महाराष्ट्र अध्यक्षा मा. अश्विनी ताई बोरस्ते यांना पदमश्री सिंधुताई सपकाळ लोक सेवा पुरस्कार देण्यात आला.
गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सुरेश पवार यांना यशवंतराव चव्हाण ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात आला.
इंजिनिअर मा. रमेश पाटील यांना जगन्नाथ शंकर शेठ उद्योगमित्र पुरस्कार देण्यात आला आणि प्रा. शिवाजीराव कोल्हे यांना रवींद्रनाथ टागोर शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला. एकूण ५० पुरस्कारांचे यशस्वीरित्या वितरण झाले.
गिरीजा महिला मंच बागलाण तालुका अध्यक्षा वैशाली सोनावणे, सटाणा सहारा अध्यक्षा पूजा दांडगवाळ यांचा सत्कार करण्यात आला. त्या काही गिरजा मंच सदस्यांसहित उपस्थित होत्या. विविध विषयावर कवी आणि कवयित्रीच्या बहारदार कविता सादर झाल्या.
आभार प्रदर्शन शब्दशिल्प संयोजिक मा. चंदन तरवडे यांनी केले. राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता झाली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800