Saturday, July 27, 2024
Homeलेखरूडॅाल्फ ..

रूडॅाल्फ ..

ख्रिसमस सण जवळ आला कि तुम्हाला हे नांव ऐकायला मिळतं, त्याचं गाणं ऐकायला मिळतं, सर्व ठिकाणी वेगवेगळ्या आकारात, हा लाल नाक वाला रेनडिअर ,तुम्हाला पहायला मिळतो. कोण आहे हा रूडॅाल्फ ? कधी आला तो ?

1812 मध्ये एका कवीनी आपल्या कवितेत सॅन्ता झाडावर उतरतो असा उल्लेख केला होता. त्यानंतर 1820 मध्ये एका कवीने सॅन्ता रेनडिअरच्या गाडीतून येतो असा उल्लेख केला . त्यानंतर २ वर्षांनी प्रोफेसर Clement Clarke Moore ह्यांनी आपल्या कवितेत ८ रेनडिअरच्या गाडीतून सॅन्ता येतो अशी कल्पना केली. त्यांची जर्मन नांवही त्यानी त्या कवितेत लिहीली.

रेनडिअर हा स्नो मधला प्राणी आहे. त्याच्या मोठ्या शिंगांमुळे तो प्रसिध्द आहे. (फिमेल रेनडिअरला पण शिंग असतात.) सॅन्ताची गाडी ओढण्याइतका तो सशक्त असावा अशा कल्पनेतून तो सॅन्ता बरोबर जोडला गेला असावा.
पण तेव्हा रूडोल्फ नव्हता . १९३९ मध्ये शिकागो मधील डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या Robert L. May ह्या लेखकांनी हा रूडॅाल्फ प्रथम जगाला भेट दिला.दर ख्रिसमसला छोट्या मुलांसाठी रंगवण्यासाठी एखाद गोष्टीचं पुस्तक देत असत. त्या साठी May ला गोष्ट लिहायची होती.
May च्या बायकोचे त्यावर्षीच कॅन्सरने निधन झाले होते. त्याला लहान मुलगी होती. ती उदास असायची.तिला तो नेहमी वेगवेगळ्या प्रेरणादायी गोष्टी सांगायचा. एकदा डिसेंबर मध्ये खिडकीतून बाहेर पहात असतांना त्याला बाहेरचे धुके पाहून ही गोष्ट सुचली. तो पर्यंत सॅन्ताच्या गाडीला ८ रेनडिअर होते. सॅन्ता अंधारात, ह्या धुक्यातून गाडीतून मुलांना गिफ्ट देण्यासाठी येत असे ,हीच गोष्ट प्रसिध्द झाली होती. May नी लाल , दिव्याप्रमाणे चमकणाऱ्या नाकाचे आणखी एक रेनडिअर ह्या सॅन्ताच्या गाडीला असले तर ?असा विचार करून ही नवी गोष्ट लिहीली. त्याचे नांव R पासून असावे म्हणून आधी Rodney, Roderick, Reggie, Rollo अशी नांव सुचली पण शेवटी Rudolph ..हे नांव ठरले आणि Rudolph the red nosed reindeer हे पात्र प्रसिध्दिस आले. त्या वर्षी त्या पुस्तकाच्या २.५ मिलीयन कॅापिज फुकट वाटल्या होत्या.ते पुस्तक सर्वांना खूपच आवडले.

रूडॅाल्फ हा प्रतिक किंवा आदर्श वाटला. कशाचा ? तर He was beacon of acceptance, teaching youngsters that tolerance and perseverance could overcome adversity.

May च्या लहानपणी त्याला bulling चा त्रास झाला होता , तसाच लाल , चमकणाऱ्या वेगळ्या नाकामुळे Rudolph लाही त्रास झाला होता, त्याला खेळायला घ्यायचे नाहीत कोणी.त्याला चिडवायचे , हसायचे असे गोष्टीत लिहीले आहे. पण सॅन्ताला तो दिसल्यावर “माझ्या गाडीला रस्ता दाखवायला तू येशील का “असं विचारल्यावर रूडॅाल्फ खूष झाला. तोपर्यंत त्याला असे मान देणारे, प्रेमानी कोणीच काही विचारले नव्हते.आणि त्यानी होकार दिल्यावर ,हा नववा रेनडिअर म्हणून अजरामर झाला.
त्यानंतर १० वर्षांनी फेमस झालेले गाणे आले, ज्यामुळे तो घराघरांत पोहोचला. नंतर पपेटच्या रूपात, अॅनिमेशनच्या रूपात टिव्हीवर, कार्टूनमध्ये , पिक्चर बनून मोठ्या स्क्रिनवर येऊन तो सामान्यांच्या मनात रूजला. आणि सान्ताक्लॅाज आणि रूडॅाल्फ हे समीकरण बनून ख्रिसमसचा एक अविभाज्य घटक बनला.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८