Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यरेशीमबंध

रेशीमबंध

काही नाती मनामनाची, टिकती ती किती ?
कोणते हे रेशीमबंध, काय वर्णू महती ?
सुखदु:खात सदैव सोबत, आधार वाटतो,
स्नेहाचा हा चिवट धागा, टिकून राहतो,

संवादाने इथे थाटल्या, कितीतरी ह्या बागा,
हास्यफुले अन भावना वेलींवर, सुगंधाची शोभा,
तुझे नी माझे नाते जपता, वीण घट्ट होते,
कुटुंबच जणू नवीन झाले, धन्यता दाटते,

कलागुणांना बहर येतसे, विविध प्रयोग होती,
चवीचवीचे किती चोचले, नव्या नवीन रिती,
सहप्रवास अन यात्रा सोबत, आठवणी जागल्या,
तृप्त मनाने, श्रद्धेसाठी, नवजागर झाला,

सणासुदीला बहार येते, उत्साहास उधाण,
नटणे, सजणे, मिरवण्याचा, सगळ्यांना मान,
गुणानुसार संघटन करूनी, संधी सगळ्यांना,
नवे नवे जे पदाधिकारी, पाठींबा त्यांना,

आठवणी, किस्से अन फोटो, हजारोंनी झाले,
आनंद मनातून, ह्रदयी प्रेमाचे, ते भरते आले,
अनेक वर्षे सोबत ज्यांची, प्रेम, ममता, माया,
एक नवा विक्रम करूनी, साधली ही किमया…!!!

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. बहोत खूब. अभिनंदन. या प्लॅटफॉर्म वर पाहून आनंद झाला. हेमंत भिडे हे सहज, सुंदर, भावपूर्ण, अभिव्यक्ती, यांनी ओत, प्रोत भारलेले, चैतन्याने सळसळणारी व्यक्ती आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.💐🌷🏵️💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८