तांडव
मंडळी,
मुंबईतल्या विलेपार्ले येथे अनेक हरहुन्नरी कलाकार राहतात. कीर्ती भावे ही यापैकीच एक. आम्ही दोघेही पार्ले टिळक मध्ये एकत्र शिकलो आहोत. मधुबनी पेंटिंग्स हा तिचा आवडता चित्र प्रकार आणि मधुबनी चित्र काढण्यात तिचा हातखंड आहे.
तिच्या चित्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे Indian Folk Art Exhibition मध्ये २३ ते २६ मार्च २०२५ मध्ये भरणार आहे, तुम्हाला जमलं तर त्याला जरूर भेट द्या.

तिने काढलेल्या अनेक मधुबनी चित्रांपैकी “बजबजपुरी” हे मुंबईच्या लाईफ लाईन वर काढलेले चित्र मला खूप भावलं. ह्या चित्रात दिसणारा तो डबेवाला, तो बसवाला, पोलीस, रिक्षा टॅक्सीवाले हे म्हणजे खरंतर युद्धातले वीरच… मग तो २६/११ चा आतंकवादी हल्ला असो वा ७/११ चा पूर असो वा मग कोविडविरुद्धचं युद्ध. या वीरांनीच अनेक वेळेला मुंबईला वाचवले आहे. बहुतांशी प्रमाणात हे वीर अज्ञातच राहतात पण अशा या वीरांसाठी त्यांनी केलेल्या कामाचे प्रतिबिंब या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे. 👇
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे.
रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
तांडव ही रेषांची भाषा या यूट्यूब वरची १० वी कविता अतिशय उत्कृष्ट कवी शैलेश देशपांडे सरांची
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
शैलेश देशपांडे यांचा परिचय नुकत्याच पार पडलेल्या तिसर्या विश्व मराठी साहित्य संमेलन या झाला. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि नव्या दृष्टीने विचार करून जीवनातील रंग संगती शोधणारे अमेरिकन मराठी माणूस… त्यांचा हा लेख आवडला.