“अश्रू”
मंडळी,
मला धबधबा नेहमीच आकर्षित करत आला आहे. त्यात एक विलक्षण आत्मसमर्पण आणि स्वतःला झोकून द्यायची वृत्ती असते. एक प्रकारचं फेसाळणारं तेज आणि त्या खळाळणाऱ्या पाण्याच्या आवाजात एक बेदरकारपणा दडलेला असतो.
कुठलीही चाकोरी न मानणारा आणि बच्चनचा “हम जहा खडे होते है, लाईन वही से शुरू होती है” हा डायलॉग ज्याला चपखल बसतो, तो म्हणजे धबधबा.
मग तो भारतातला दूधसागर फॉल असो, जोग फॉल असो किंवा अमेरिकेतला नायगारा फॉल असो, देश बदलला तरी वृत्ती तीच.
प्रसिद्ध कॅनडियन चित्रकार टॉम थॉमसन याने १९१६ मध्ये काढलेलं “द वुडलैंड वॉटरफॉल” नावाचे चित्र जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला हेच सर्व जाणवलं. किंबहुना जेव्हा धबधब्यासारख्या वृत्तीला चाकोरीत बांधून त्याच्याकडून नदीसारख्या अपेक्षा ठेवल्या तर काय चमत्कारिक वृत्तीचे दर्शन घडेल अशा विचारांनी प्रेरित ही कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800