एक डेरेदार वृक्ष
मंडळी, पॉईंटीलिझम किंवा डॉट पेंटिंग, अर्थात मराठीमध्ये ज्याला आपण बिंदूचित्र म्हणतो हा चित्रप्रकार फार अद्भुत आणि विलक्षणीय आहे.
हा चित्र प्रकार १८८६ च्या सुमारास रूढ झाला. प्रसिद्ध चित्रकार जॉर्ज सुराट आणि पॉल सीनॅक यांनी या चित्र प्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे छोटे छोटे बिंदू एकत्र करून या चित्र प्रकारांमध्ये वेगवेगळ्या आकृत्या किंवा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न चित्रकार करत असतो.
रिचमंड वर्जिनिया येथे राहणाऱ्या चित्रकार पल्लवी सडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले “द सर्कल ऑफ ब्लॉसम” नावाचे हे बिंदू चित्र. हे चित्र बघून त्यामध्ये दिसणारा तो डेरेदार वृक्ष, त्याचं ते ढोलीवजा दिसणारं खोड, शिशिर ऋतू मुळे बदलणारे पानांचे रंग आणि मागे गोलाकार दिसणाऱ्या आकाशाच्या आणि ढगांच्या छटा बघून माझ्या मनात आलेले विचार माझ्या या
कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.
या कवितेची व्हिडीओ ची लिंक पुढे देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन; रचना : शैलेश देशपांडे. अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
बिंदुचित्र अफलातून कल्पना.