ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत !! भाग २ – निबंध
मंडळी, तुम्ही कधी एका चित्राचं विडंबन म्हणून काढलेलं दुसरं चित्र पाहिलंय का ? बऱ्याच वेळेला आपण एखाद्या गीताचं किंवा कवितेचे विडंबन म्हणून आचार्य अत्र्यांनी किंवा तत्सम कवी मंडळींनी रचलेली विडंबन कविता वाचली असेल पण चित्राचं विडंबन मी तरी पहिल्यांदाच अनुभवलं. १९०५ साली प्रसिद्ध चित्रकार हेन्री मेटीस ह्यानी “Bonheur de vivre” या नावाचं चित्र काढलं. अतिशय शांतीपूर्ण आणि सरळ अशा वातावरणामध्ये वावरणाऱ्या आणि आनंदोत्सव साजरा करणाऱ्या काही स्त्रियांबाबत ते चित्र होतं. १९४६ साली पाबलो पिकासो याने या चित्रावर “joie de vivre” नावाचं एक विडंबन चित्र काढलं. हेन्री मटीसने आपल्या चित्रातून जो आनंदोत्सव साजरा केला होता, त्याचा जणू विभत्सोत्सव पाबलो पिकासोने त्याच्या चित्रातून व्यक्त केला. या चित्रात त्याने तुताऱ्या, पुंग्या, व्यंगप्राणी अशी बरीच विडंबनात्मक पात्र वापरून मटीसच्या चित्राचे एक वेगळेच रूप आपल्यासमोर सादर केले.
मला हे चित्र बघितल्यावर महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक प्रसंगाबद्दल वाईट वाटून त्याबद्दल एखादी विडंबरात्मक कविता करावी असं वाटलं. महाराष्ट्र मध्ये आजकाल लोक गाड्या भरधाव चालवतात अपघात होतात तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही किंवा स्त्रियांवर झालेल्या अत्याचारांवर सुद्धा कारण नसताना राजकारण केलं जातं. माझ्या मनात त्याबाबतीत आलेल्या भावना मी या कवितेतून मांडल्या आहेत.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे. मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800