केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण खोपटे येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात काही वर्षात सायबर सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि SBI सायबर सुरक्षा विभागात स्पेशल अधिकारी पदावर निवड झाल्यामुळे श्री रोशन ठाकूर ह्यांना सौ.चारुशीला घरत (माजी उपमहापौर पनवेल) ह्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
मागच्या काही वर्षात सायबर सुरक्षा मार्गदर्शन, वेगवेगळ्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा सेमिनार आयोजन, महिला सायबर विषयक केसेस निराकरण, सोशल मीडिया ह्याकिंग चे निराकरण आणि मार्गदर्शन अशी समाजसेवा आणि कामगिरी केल्या बद्दल श्री ठाकूर यांना गौरवण्यात आले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800