अहिराणी बोलीतील कविता
माय मनी अहिराणी लागे भलतीज गोड
रसदार चवदार जशी अमृतनी फोड
लाल लालेलाल लाल टरबूजनी ती खाप
लाडकोडनी मयानी देवबा रे दिन्ह माप…
जसा काकवीना घडा व्हटवर तो ठरेना
तिन कौतिक करता मनं मनबी भरेना
उभी ऊसनी ती मेर खडीसाखरनी गोडी
आभायम्हा व्हता येल लयनूत आम्ही तोडी
चंद्रसुर्यना तो लया माय आभाये चांदनी
गोरगरीबना घर माय सुखम्हा नांदनी
अजूनबी अभिमान व्हट व्हट चावयसं
व्हटवर येता माय मनी वयख पटस…
तिनी गोडीले कानती नही नही हो उपमा
हिरामोतीनी परात मोती पयरस गावम्हा
व्हटवर येता माय समोरना तो खुलस
त्याले पटस वयख त्यानं कमय उलस…
कितलीबी चावयसू मनी रसना थकेना
मनी मायनाबिगर मनं पानंबी हालेना
मना माहेरना वारा माले सांगस गुपित
तुना मायमाहेरना समदा सेतस खुशित …

— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
फारच अप्रतिम