जोहान्स गटेनबर्ग याने २४ फेब्रुवारी १४४० रोजी मुद्रण यंत्राचा शोध लावला. म्हणून या दिवशी जागतिक मुद्रणदिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वाचू या एक कविता “लेखणी मुद्रण“.
मुद्रणदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
— संपादक
लेखणी दावी अंतरंग अद्भूत
भाव प्रकटतात लेखणींतून ।। धृ।।
कधी शोध कधी असते बोधप्रद
कधी रडवते अन् कधी हसविते
तलवार होते घुसते काळजात ।।1।।
कधी कोमल जहाल करी प्रहार
कधी येते अंगावर कधी गहिवर
वाटे आधार घेऊन जाते स्वप्नांत ।।2।।
एकेक ठिपक्यांचे बनते अक्षर
अक्षरांचा समूह बनतो शब्द
मूक सुचवते बोलण्या पल्याड ।।3।।
लेखन संस्कृती आहे कला विज्ञान
लिहिताना टाळावे कटू अपशब्द
पारदर्शकता करी अंतर्मुख मन ।।4।।
लिहिणाऱ्याला असते मुक्ती स्वातंत्र्य
लिहावयास लागतो पाया सुस्थित
विचारांची मांडणी उतरते शब्दांत ।।5।।
नाही माघार लेखणीला ओघ स्त्रोत
पुरावा राहतो लिहिल्यान शाबूत
लेखन मुद्रण आहे अलौकिक नातं ।।6।।
झाले विकसीत मुद्रण तंत्रज्ञान
कमाल केली टंखलेखन यंत्रानं
मुद्रित होते साहित्य पुस्तक कागद II7II

— रचना : अरुण गांगल. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800