अष्टाक्षरी काव्य रचना
संत वचन शिकवी
वृक्ष पूजन संस्कृती
नारी होतसे तल्लीन
प्राणवायू देई स्मृती
वट वदे मनोमनी
पती पत्नी आनंदात
जल पंचामृत खाद्य
अहो भाग्य लाभे त्यात
मधुमय फळे येती
भाव समर्पण करी
धागा बांधोनीया मज
जन्म भोग न्यावे हरी
गळाभेट घेती नारी
नाद ब्रम्हांडात जाई
आरतीच्या श्रवणाने
फांद्या गातसे अंगाई
सत्यवान सावित्रीची
बाळगती परंपरा
सप्तजन्म स्वीकारते
क्रोध दोघांचा निस्तरा
आधुनिक पती पत्नी
येतो तुझ्या दर्शनास
नाते टिकण्या शिकव
घटस्फोटी व्हावा ऱ्हास
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800