Saturday, April 13, 2024
Homeसेवावस्तीतील मुले : स्तुत्य उपक्रम.

वस्तीतील मुले : स्तुत्य उपक्रम.

कचरा वेचणाऱ्यांची मुले पुन्हा कचऱ्याच्या कामात पडू नयेत म्हणून त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टने विडा उचलला आहे.

कचरा वेचकांची मुले शाळेला जाऊ लागली खरी पण त्यांचं शिकणं होत नव्हतं. यासाठी स्त्री मुक्ती संघटनेनं या मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरू केले. संध्याकाळी दोन तास या विद्यार्थ्यांच्या अभ्यास वर्गाला बळकटी देण्यासाठी श्रीराम ट्रस्ट पुढे आला. या मुलांची फी भरणे, अभ्यासवर्गात दिवापाण्याची सुविधा देणे, एवढेच नव्हे तर त्यांच्या क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांना सर्व पाठबळ पुरवण्याचं काम श्री राधाकृष्णन आणि ललिता मॅडम या जोडीने मनावर घेतलं. त्या दृष्टीने विष्णुदास भावे येथे अत्यंत गुणवत्तापूर्ण असा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. अभ्यास वर्गाच्या मुलांनी भारतीय संस्कृती, भारतीय एकात्मता व परंपरा, अभिजात नृत्य इत्यादी चा अविष्कार केला जो थक्क करणारा होता. सद्यस्थिती वरील समस्याचा आढावा घेणारी नाटिकाही सादर करण्यात आली. यासाठी शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले.

ट्रस्टचे अध्यक्ष श्री राधाकृष्णन व ललिताजी आपल्या प्रस्तावनेत म्हणाल्या की, शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम या संस्थेकडून अविरत चालू राहील.

स्त्री मुक्ती संघटनेच्या वृषाली मगदूम यांनी श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट व स्त्रीमुक्ती संघटने चा समन्वय कायमस्वरूपी राहावा व झोपडपट्टीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांचे भविष्य सुकर व्हावे असा आशावाद प्रकट केला.

याप्रसंगी ब्रिगेडियर धरमप्रकाश, अनिल कर्ता, के आर गणेश, एस राघवन, राजेश ग्रोवर आदी विश्वस्त मंडळी उपस्थित होती. ठाणे, कळवा, दिघा, रबाळे, बेलापूर बोनसरी, खांदेश्वर, पनवेल इत्यादी वस्त्यांवरील ४२५ मुले, त्यांचे पालक उपस्थित होते.

संगीता साबळे व अजित खताळ यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.

जयश्री वर्पे, कविता, अमोल, प्रियांका, सिमरन, राहुल पवार, सुप्रिया, सारिका आदी शिक्षकांनी कार्यक्रम उत्कृष्ट होण्यासाठी मेहनत घेतली.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

 1. नमस्कार सर उपक्रमास हार्दिक शुभेच्छा

  माझ्या कचरा वेचणाऱ्या मुली ही पुरस्कार प्राप्त कविता आहे या साठी पोस्टर कविता तयार करण्यासाठी मला आयोजक हवे आहेत.या समाज सेवी संस्थेचा
  मोबाईल नंबर मला मिळेल का साहेब

  धन्यवाद

  गोविंद पाटील सर जळगाव
  ८७८८३३४८८२

  • अतिशय स्तुत्य उपक्रम 👌👌पुढील कार्यास खूप शुभेच्छा👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments