Friday, March 28, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या कविता, लेख, वृत्तान्त या वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

हरिभाऊ विश्वनाथ : वस्तुस्थिती.. या विषयी प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया :

१. संगीताच्या पवित्र क्षेत्रात अशी चुकीची माहिती पसरविणे ही एक बदमाशी आहे.
माझ्याकडे अजूनही दादर येथील दुकानातून विकत घेतलेली संवादिनी मजबूत आणि गोड स्वरांची आहे, हे एक विश्वास पात्र दुकान आहे. हरिभाऊ विश्वनाथ कंपनीला माझ्या शुभेच्छा.
— प्रकाश कथले. वादक तथा पत्रकार, वर्धा

२. संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल यांनी संगीतासाठी अनेक वेळा मदत, करून अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.
— विलास प्रधान. मुंबई

३. हरिभाऊ विश्वनाथ बद्दलच्या अफवा ऐकून अतिशय दुःख झाले.

अशा मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्तींचे आपण काय करू शकतो हा एक गहन प्रश्नच आहे. आजकाल सहज साध्य असलेल्या सोशल मिडिया मूळेही लोकांची अशी विकृती वाढतेय असे वाटते.
तोरणेजींचे परीक्षण वाचनवेड्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अगदी संग्रहणीय म्हणावें असे .. बऱ्याच पुस्तकांची माहिती एका हाती मिळते.
प्रीती रोडे यांचा लेख हळुवार, अलवार एखाद्या काव्यासारखा छान आहे.
शीतलताईंची कविता आजच्या काळातील कटू सत्य आहे. आवडली
— स्वाती वर्तक. मुंबई.

४. हरिभाऊ विश्वनाथ…

सुंदर लेख भुजबळ साहेब. खूप छान माहिती मिळाली.
— नरसिंग पोतकंठी.
निवृत्त दूरदर्शन कॅमेरामन, मुंबई.

५. “हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स” … ह्या नावाला असलेले प्रसिद्धीचे आणि आपुलकीचे वलय इतके मोठे आहे की ह्या परिघाला छेदून त्यांचे शत्रुत्व पत्करण्याचे निंदनीय कार्य केवळ नतद्रष्ट व्यक्तीच करू शकतात. दादर परिसरात जन्म आणि संगोपन झालेली माझ्यासारखी संगीत ह्या विषयाच्या जवळपास सुद्धा जाऊ न शकणारी व्यक्ती जर “हरिभाऊ विश्वनाथ” कंपनीवर इतके प्रेम व आदर करत असेल, तर विचार करा की केवळ दादरच नव्हे, तर मुंबईतील प्रत्येक संगीतप्रेमी आणि वाद्यप्रेमी व्यक्तीला ही खोडसाळ बातमी ऐकून, वाचून किती दु:ख झाले असेल ? आपण लेखात वर्णन केलेल्या काही मोजक्याच व्यक्ती म्हणजे माझी बालपणापासूनची शालेय मैत्रीण श्रुती सडोलीकर, शालेयबंधू अप्पा वढावकर, मुकुंद मराठे, वगैरेंकडून ह्या बातमीचा तीव्र निषेध झाल्याचे वाचून मनाला दिलासा मिळाला.
मी संगीतज्ञ नाही, पण संगीताची आवड रक्तात भिनलेली असल्याने ह्या दुकानाविषयी मला लहानपणापासून खास आपुलकी आहे. दादर जवळच माटुंगा रोड रेल्वे स्टेशनसमोर, सेनापती बापट मार्गावरच माझे निवासस्थान होते, त्यामुळे आम्हा कुटुंबीयांची दादरला रानडे रोडवर खरेदीला जाण्यासाठी भेटण्याची एकमेव जागा म्हणजे ह्या दोन्ही रस्त्यांना जोडणारे काॅर्नरवरचे “हरिभाऊ विश्वनाथ कंपनी” हे दुकान. आमच्यावर, विशेषतः माझ्यावर, कुटुंबातील इतर माणसे पोहोचेपर्यंत वाट पाहण्याची व कंटाळा येण्याची वेळ कधीच आली नाही, कारण ह्या दुकानाच्या बाहेर उभे राहून आतली दर्शनी भागातील वाद्ये न्याहाळत बसणे हा माझा छंद होता. कधीकधी दुकानात आलेल्या गिऱ्हाईकाला वाद्य दाखवताना त्यातून निर्माण होणारे वाद्यझंकार ऐकण्यासाठी मी तिथे तासभर सुद्धा आनंदाने उभी राहात असे. शिवाय इतक्या सुरक्षित जागेवर मुलगी उभी असल्याची भावना आई, बहिणी किंवा इतर कोणीही भेटायला येणार असतील, त्यांनाही विश्वास देत असे की आपण पाचदहा मिनिटे उशिराने पोहोचलो, तरी हरकत नाही, चिंता करण्याचे कारण नाही. एकदा, अगदी एकदाच, असेही घडले की दुकानाच्या मालकांनी आत बोलवून, बाहेर खूप वेळापासून का उभी आहेस, अशी चौकशी केली आणि आत बसायला खुर्ची देऊ केली; पण तशी वेळ आलीच नाही. माझी आई ठाण्याहून दादरचा प्रवास करत, तिथे उशिरा पोहोचली, आणि मला आत बोलावून घेणाऱ्या मालकांना आभार मानून त्यांचा आम्ही निरोप घेतला. दुकानाच्या आत पाय ठेवण्याची तशी वेळ पुन्हा कधीच आली नाही.
पण ह्या कुटुंबातील महिलांची माझ्या तरुणपणात अचानकच गाठ पडली आणि काही काळ स्नेहसंबंध जुळले. १९७८ साली मे महिन्यात आम्ही तीन फडणीस बहिणी “हिमालयन ट्रॅव्हल्स” ह्या व्यावसायिक टुरिस्ट कंपनीबरोबर काश्मीर ट्रिपला जाण्याचे निश्चित केले. तीन तरुण मुलींना एकट्यांना पाठवताना साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी सहलीत इतर कोण कोण आहेत, ह्याची चौकशी केल्यावर समजले की दादरच्या सुप्रसिद्ध “हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स” कंपनीतील तीन सुना ह्या सहलीला जाणार आहेत. त्यांच्या बरोबर कुटुंबातील इतर कोणीच नाही. आमच्या कुटुंबीयांनी निश्चिंत होऊन आम्हाला ट्रीपला पाठवले. सहलीच्या प्रारंभीच दादर स्टेशनवर आम्हाला सोडायला आलेल्या आई-वडील, काका वगैरे मंडळींना नऊवारी साड्या परिधान करून काश्मीर सहलीला निघालेल्या ह्या माझ्या आई, काकू वगैरेंच्या वयाच्या महिलांनी निक्षून सांगितले की “आजपासून पुढचे पंधरा दिवस ह्या आमच्या मुली आहेत असे समजून निश्चिंत राहा, मुलींची काळजी करू नका.”
नऊवारी लुगडी नेसणाऱ्या, पण विचारांनी अतिशय प्रगत आणि सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाच्या ह्या तीन जावा-जावा हा त्याकाळात माझ्यासारख्या शिक्षण पूर्ण करून नुकत्याच नोकरीला लागलेल्या तरुणीसाठी मोठाच आदर्श होता. मोबाईल्स नसलेल्या त्या काळात पुढे काही वर्षे हे स्नेहसंबंध टिकले, मग हळूहळू काळाच्या ओघात मागे पडले; पण माझ्या डोळ्यांना ह्या म्हाताऱ्या वयातही दादरला गेल्यावर त्या दुकानाच्या काचेआड डोकावून आपल्याला “लेक” मानणाऱ्या त्या माऊलींपैकी कोणी दिसतेय का, ह्याची उत्सुकता असते; किमान एकदातरी दुकानाच्या आत शिरून त्यांच्यापैकी कोण कोण आणि कुठे आह, ह्याची चौकशी करण्याची इच्छा मनात दाटून येते. आता ते दुकानच तिथून हटणार, म्हणजे हे सर्व विचार मनातच राहणार, हे खरे आहे. पण आज भुजबळ सरांच्या लेखामुळे हे मनातले विचार कागदावर, नव्हे मोबाईलवर उतरले आणि मनाला व्यक्त होण्याची एक संधी मिळाली, ह्यासाठी भुजबळ सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि “हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स” कंपनीला हार्दिक शुभेच्छा. तुमचा शतकमहोत्सव दणक्यात साजरा होऊ देत आणि पुढच्या पिढीतही हा संगीताचा वारसा जपत, तुमचे कुटुंबीय शतकोत्तर वाटचाल आनंदाने करत राहू देत. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि अंतःकरणापासून शुभेच्छा.
— सौ.मृदुला राजे, जमशेदपूर

आपल्या पोर्टल च्या नवोदित कवयित्री सौ.शितल अहेर खोपोली यांनी लिहीलेल्या “मी एक झाड” ह्या कवितेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया :

१. सौ.शितल अहेर खोपोली यांनी लिहीलेली “मी एक झाड” ह्या कवितेतून झाडाची करूण कहाणी वाचली. कवितेची रचना खूप सुंदर, सोप्या भाषेत आणि वाचल्यानंतर मन हेलावून टाकणारी आहे.मी वर्गात मुलांना वाचून दाखवली. तेव्हा मुलांना सुद्धा झाडाचे दु:ख कळले आणि म्हणाले आम्ही आता झाडे लावू पण तोडणार नाही, अशी शपथ घेतली. झाडे आहे म्हणून आपण आहो त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही.
शितल खूप सुंदर कविता लिहीली तु.
— रेखा मुने.

२. भौगोलिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती वर मार्मिकभाष्य करणारी “झाड” या कवितेतुन सौ शितल अहेर या भगिनींने पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. योग्य शब्दरचनेची सांगड घालुन समाजापुढे एक आदर्श संदेश प्रस्तुत केला आहे. असेच साहित्याची उधळण होवो ही मनःपूर्वक सदिच्छा 
— संजय श्रीनिवास पवार. खोपोली

३. सध्या होत असलेल्या global warming ला कारणीभुत असलेलं महत्वाचं कारण म्हणजे वृक्षतोड, त्याबाबत जागरूकता निर्माण करणारी कविता. अप्रतिम लिहिलय.
—  डॉ. सई खेर्डेकर. योग शिक्षिका, खोपोली

४. खुप छान शब्दाची मांडणी केली ग मावशी तु. झाडावर कविता खुप वाचल्यात पण तुझी कविता त्यात खुपच वेगळी आणि तुझे खुप खुप अभिनंदन.
— रुचि प्रशांत पांडे.
  ए्स टी वाहक नेर आगार, जि. यवतमाळ

५. खूप छान लिहिले आहे, समर्थक वाक्यरचना, योग्य विषय आणि आता पर्यावरणावर लिहायची गरज आहे…. खूप छान… congratulations 🎉….keep it up 👍
— सौ. सोनाली परदेशी. खोपोली

६. शितल कविता खूप छान आहे विषय पण चांगला निवडला आहे तुझे मनःपूर्वक अभिनंदन अशीच लिहित जा.
— सौ उज्वला दिघे.
कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा, खोपोली

७. छान, संकल्पना सुंदर आहे.अभिनंदन आणि शुभेच्छा.💐

— उल्हासराव देशमुख. वीरेश्वर कलामंच, खोपोली

८. प्रथम तुझं खुप खुप अभिनंदन, एका झाडाचं आत्मवृत्त..

छोट्या रोपट्यापासुन ते त्याच्यावर वार करेपर्यंतच कथन, त्यास होणारा आनंद त्याच आनंदाच  दुःखात होणारं रुपातंर अतिशय सुंदर पद्धतीने काव्यात गुंफलेस.
खुप छान शब्दाकंन.👌👌

— सौ. जयश्री पोळ. लेखिका, कवयित्री, खोपोली.

९. आता सतत होत असलेली वृक्ष तोड यावर अगदी साजेशी कविता निसर्गाचे संरक्षण करा याबाबत अप्रतिम कविता आणि संदेश पण, छान लिहिलंय
— सौ.जयश्री बावस्कर. खोपोली

१०. Mi aek zad. hi kavita chanch lihili aahes. Ptula nehmich chan chan suchate..  sdhyachya paristhitivr Chan vastav mandale aahe… tuze khup khup abhinandan Shital. 💐💐💐💐
  — सौ. प्रज्ञा कांबळे. खोपोली

१२. सुंदर कविता शितल .. अभिनंदन तुझं ☺💐💐

— सौ वैशाली लांडगे. खोपोली

१३. समाजाचे कटू सत्य, अति सुंदर व सोप्या भाषेत कवितेत मांडले आहे.
— सौ.अश्लेषा गान. सातारा.

१४. सुंदर कविता झाड, 👌🏿अभिनंदन व शुभेच्छा 💐

— संतोष वाघ. कवी, खोपोली

१५. तुमची कविता खूप छान आहे आणि आजच्या समाजाला चांगला संदेश देते.
— आयुष अहेर. (खोपोली)

१६. Shital tai Khup mst lihli ahe kavita 👌🏻👌🏻🙏

— निखिल खोपटकर. अभिनेता, खोपोली.

१७. कविता खूपच सुंदर आहे  आत्या अभिनंदन 🌹👍🏻

— सौ. प्रांजली आष्टीकर. नेर, यवतमाळ

जडणघडण भाग : ९  प्रतिक्रिया :

१. राधिका कितीsssss छान लिहीलेआहेस ! संपूच नये असे वाटत होते.
— आरती नचनानी. ठाणे

२. खूप छान आणि खरे खरे.

— अरुणा मुल्हेरकर. मिशीगन अमेरिका

३. *कुमुदताई* हे व्यक्ती चित्रण वाचले. चव्हाणकाका व कुमुदताई हे नवविवाहित जोडपे आहे. कोणत्याही अडचणी काळी त्या आपल्या आईंची…. मालती…. मदत त्या घेत असत.एक विचार यातून मला नक्कीच मिळाला की, *जीवनात आपल्याला आपल्या या कोणीतरी मार्गदर्शक हवाच*….वाचावे असे व्यक्तीचित्रण आहे….
राधिकाताई  या सर्वोत्कृष्ट लेखिका आहेत. त्यांचे लेखनास अनंत शुभेच्छा….
— अरुण पुराणिक… पुणे.

४. तुझ्या आठवणी वाचताना नकळत मनातल्या मनात स्वतःचं बालपण आठवतं. तुझ्यासारखे कागदावर  उतरवायला जमत नसलं तरी आपल्या लहानपणचे  तसलेच रस्त्यावरचे खेळ, चाळीतल्या आणि आसपासच्या लोकांची शेजारपाजारच्या लोकांविषयीची  विचारसरणी वगैरे आठवतात. ह्याचा अर्थ तुझं लिखाण नक्कीच परिणामकारक आहे. खूप छान.
— प्रमोद श्रुंगारपुरे. पुणे

५. खूप छान लिहिले आहे व्यक्ती चित्रण! आयुष्यात अशी वेगवेगळी माणसे आपण पाहतो, अनुभवतो. पण लिहून ते व्यक्त करणं हे तुमचं कसब !
— उज्ज्वला सहस्रबुद्धे.  पुणे

८. कुमुद ताई चटका लावून गेली.

— सुलभा गुप्ते. इजीप्त

९. Sunder.

— सुवर्णा वाघमोडे. विलेपार्ले

१०. सगळं डोळ्यासमोर हजर राहतंय जसच्या तसं. फार सुंदर लेखन.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

११. अप्रतिम लेख.

— अस्मिता पंडीत. पालघर

अन्य  प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. अनुजा बर्वे ह्यांचे लेखन नेहमीच खुसखुशीत, हलकं फुलकं आणि तरीही दर्जेदार असते. “साडीचे Carryत्व” वाचताना मन रंगून गेले, मनापासून आनंद मिळाला. लेखिकेचे कौतुक आणि असे सुंदर हलके फुलके सदर चालविल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन.
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर.

२. असामान्य लोकमान्य टिळक व थोर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. मनापासून आवडले. धन्यवाद.
— विलास प्रधान. मुंबई.

३. सर्वच लेख वाचनीय आहेत. लोकमान्यांबद्दलचा आजचा किस्सा तर फारच आवडला. तो फारसा ऐकिवात का नाही ? याचंच आश्चर्य वाटतं. अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य जवळजवळ सगळंच वाचलंय. शाळेत फक्त दिडदिवस गेलेल्या या अवलियाने नंतर किती कमाल केली हे आश्चर्य कारकच आहे. दोघांनाही शतशः नमन.
— प्रा सौ सुनीता पाठक. छ. संभाजीनगर

४. आशा कुलकर्णी ह्यांनी लोकमान्य टिळक ह्यांना अर्पण केलेली आदरांजली अतिशय सुंदर आहे. लोकमान्यांची महती विशद करताना त्यांनी महारवाड्यातील एका प्रसंगाचे अतिशय हृद्य व भावपूर्ण वर्णन करून लोक त्यांना “लोकमान्य” का मानत होते, त्याचे खूप सुंदर, बोलके उदाहरण दिले आहे. लोकमान्य आणि गांधी, लोकमान्य आणि विनोबा अशा महान व्यक्तिमत्त्वांमधले परस्परसंबंध अतिशय उत्तम रीतीने उकलले आहेत, ज्यामुळे दोघांमधील कोणाही एकाची तुलना करताना तरतमभाव निर्माण होणारच नाही, उलट दोन्ही विभूतींविषयी आदरभाव वाढेल. लेखिका आशा कुलकर्णी ह्यांच्या लेखनाचे हे वैशिष्ट्य त्यांच्या ह्या लेखाचे महत्त्व अधिकच वाढवते आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन.

५. अरुणा ताई, माझ्या एका साहित्यिक समूहातील मैत्रीण असल्याने मी त्यांच्या प्रत्येक रचनेला तेथे दाद देत असतेच, पण आपल्याच माणसांना बाहेर फुलताना, बहरताना पाहण्यात जो आनंद आहे, तो इथेच, ह्याच पोर्टलवर मिळतो. म्हणूनच “चहा” पीत पीत नाही (कारण तो मी कधीच पीत नाही), पण त्यांच्या ‘चहा’ वरच्या काव्य रचना वाचताना अतिशय आनंद झाला. “हरदिन चहा”, “मैत्रीचा चहा” आणि “जोडी चहा-खारीची” सर्वच लाजवाब! अरुणाताई, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

६. दिलीपजी, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केले त्याचे फोटोज आणि वृत्त निवेदन खूपच छान. तुमचे सर्वच उत्साही ज्येष्ठ नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.
— मृदुला राजे. जमशेदपूर

७. बायको माझी गुरू… खूप छान सुंदर कविता.
— नागेश शेवाळकर. पुणे

माझी आई…स्मृती लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया:

१. खूप सुंदर लिहिले आई बद्दल वाचून प्रत्येकाला आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही…
— सौ.सरिता परसोडकर.

२. अरुणा तू अशीच आहेस. आईसारखी…

— अंजना कर्णिक. मुंबई.

३. आईबद्दल छान भावना व्यक्त केल्यास…

— सौ.विभा कोमावार. मुंबई

४. Like mother like daughter

— लेखिका नयना कुळकर्णी. मुंबई

५. खूपच छान. वाचून खूप समाधान वाटले. आईवर खरंच लिहावं तितके कमीच आहे.
— सौ.नीलिमा सिध्दम. गोरेगाव, मुंबई

६. अरुणाताई, आईचे व्यक्तिचित्र किती सुंदर शब्दात डोळ्यासमोर साकार केले आहेत तुम्ही ! तुमच्या आईचा प्रेमळ, लाघवी स्वभाव तुमच्याही व्यक्तिमत्त्वात पुरेपूर उतरला आहे. त्यांना विनम्र अभिवादन आणि तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
सुनीलजी, तुमचे सर्वच लेखन छान दर्जेदार व माहितीपूर्ण असते. श्रीवर्धन ह्या स्थानाविषयी तुमच्या मनात असलेले प्रेम आणि तेथील वाचनालयाविषयी वाटणारी आत्मीयता तुमच्या लेखात छान व्यक्त झालेली आहे. तिथे होणारे कार्यक्रम, त्यांमधील तुमचा व नातीचा सहभाग वगैरे गोष्टी खूप आनंददायक व कौतुकास्पद आहेत. तुमच्या वाचनालयाचे कार्य अविरत चालत राहावे आणि लवकरच त्याने द्विशतक महोत्सव साजरा करावा, ह्यासाठी तुम्हाला व सर्वच सदस्यांना, तसेच संचालकांना हार्दिक शुभेच्छा देते. 🙏💐
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर.

७. अरुणा ताईंचा लेख वाचून माईंचीच आठवण झाली.

— सौ प्रीती प्रवीण रोडे. अकोला.

८. ठाणे येथील शुभदा डावरे,चिंधडे यांच्या लघू कविता वाचताना’ “कळत नकळत माझ्यातच मी दंग असतांनाच…. ‘नुसत्या आठवांनी शहारले अंग’ ही बाब वास्तववादी – खरी आहे, याचा नकळत साक्षात्कार झाला.. त्यांच्या ऋण, मुरली, आठव आणि अलंकार या साऱ्या सरस लघु कविता मनस्वी आवडल्या. शुभदांजींचे व त्या सुरेख रीतीने सादर केल्याबद्दल देवेंद्रजींचे मन:पुर्वक अभिनंदन..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.

९. ‘प्रिय आई’, अरुणा दुद्दलवार यांचे लिखाण खूप भावस्पर्शी.
‘आमची वानरसेना’ आश्लेषा गान यांनी फारच छान लिहिले.
लहानपण डोळ्यापुढे उभे राहिले.
अगदी मनातले लिहिले असे वाटले आणि नकळतपणे हसायला आले. मस्तच.
— अरुणा गर्जे. नांदेड

१०. आश्लेशा गान  यांचा आमची वानरसेना  हा लेख वाचताना बालपणात रमले मी. खुप छान.
अरूणा दुद्दलवार यांनी आईचे व्यक्तीमत्व सुंदर रेखाटले आहे.
— कवयित्री शुभदा चिंधडे डावरे. ठाणे

“श्रीवर्धनचे सार्वजनिक वाचनालय” या  श्री सुनील चिटणीस यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

१. श्री सुनील चिटणीस साहेब,
आपण श्रीवर्धनच्या सार्वजनिक वाचनालयाची आपल्या लेखाद्वारे करून दिलेली ओळख फारच छान आणि सुंदर आहे. १३२ वर्षांच्या या वाचनालयाची सर्वच माहिती आणि वर्णन माझ्याच डोळ्यांना या वाचनालयाची सफर घडवून आणते, खूप मस्त
— शरद ग. अत्रे.
निवृत्त आयकर अधिकारी, कवी – लेखक, पुणे.

२. सुनीलजी,
काय लिहावे, वर्णन करावे ! आजच्या काळात काल बांधलेली इमारत उद्या दिसत नाही अन ही वाचनालयाची वास्तु १३२ वर्ष उभी आहे हेच मुळात कौतुकास्पद आहे. अनेक लेखक, कवी, वाचक, देणगीदार यांची अमुल्य आठवण आहे, आणि तुम्ही त्याचे साक्षिदार आहात.
मी एक वाचक प्रेमी आहे हे तुम्हांला माहितीच आहे. या वाचनालयाला तुमच्या या लेखामुळे जरूर भेट देण्याची इच्छा आहे .मी नक्कीच भेट देईन. लेख नेहमीप्रमाणे अप्रतिम आहे.
— सूर्यकांत धारिया, दापोली
  माजी संचालक, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली जि रत्नागिरी

३. तुमचा वाचनालयावरील लेख छानच आहे. वाचनालय नबाबानी बांधण्यास पुढाकार घेतला हे वाचून सुखद धक्काच बसला, मला हे माहित नव्हते, असो.
— रत्नकांत मोरे. श्रीवर्धन – रायगड, सध्या अमेरिका.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments