Friday, November 8, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या काही प्रतिक्रिया.
देवेंद्र भुजबळ (संपादक)

बऱ्याच दिवसांच्या अंतराने गेल्या शनिवारी आपण “माहिती”तील आठवणी” हे सदर प्रसिद्ध केले.या सदरात जेष्ठ माहिती अधिकारी श्री रणजित चंदेल यांनी त्यांच्या सेवा काळात आलेले भले बुरे अनुभव कथन केले आहेत. वाचू या वाचकांच्या प्रतिक्रिया…

१. यवतमाळचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून श्री.रणजितसिंह चंदेल यांची माहिती वाचून काही क्षणी आनंद झाला परंतु त्यांना एका दिव्यातून जावे लागले याचे वाईट वाटले. ते अशासाठी की मी मुंबईत प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी पदी असतांनाच तेथून माझी बदली जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यावेळेचे माननीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जिल्ह्यात यवतमाळ येथे करण्यात आली. मी त्यावेळचे लोकप्रिय अधिकारी वसंतराव चौधरी साहेबांकडून कार्यभार स्वीकारला. मी नासिक जिल्ह्यातील असल्याने विदर्भ संस्कृतीची माहिती फारशी नव्हती. बोलीभाषा वगेरे. परंतु त्यावेळी रिकाम्या वेळात माननीय जवाहरलालजी दर्डा यांचे मध्यवर्ती कार्यालयात बराच वेळ काढून त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. त्यांचे त्यावेळी लोकमत हे साप्ताहिक होते. त्यामुळे वैदर्भीय संस्कृती व बोलीभाषेचा चांगला अभ्यास झाला. त्यावेळी जिमाका कार्यालय एका शाळेत होते. सर्व पत्रकारांशी चांगला स्नेह होता. यवतमाळचे मराठी गझल सम्राट भाऊसाहेब पाटणकर यांची जिव्हाळ्याची मैत्री झाली. एक कवी संमेलन आपल्या कार्यालयात आयोजित केले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांचा सर्व कुटुंबियांशी स्नेह संपादन केला. सुधाकरराव नाईकांशी मैत्रीपूर्ण संबंध आला. त्यावेळचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री देवराव पाटील यांनी शेतकऱ्यांचे माहितीसाठी पुस्तक लिहिले आणि पुस्तकाची  प्रस्तावना मलाच लिहायला सांगितली. ती माझ्या नावे हुद्यासहित प्रसिद्धही केली. मुख्यमंत्र्यांचे हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यांची सुखद आठवण आपला लेख वाचून झाली. यवतमाळ जिल्ह्यातील शेती, रस्ते, शिक्षण वगेरे विषयांवर प्रगतीच्या अनेक बातम्या त्यावेळी मा. मंत्र्यांचे दौरे नसतांनाही देत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनाही चांगले वाटले. परंतू एकदा जांबुवंतराव धोटे यांनी कार्यालयात येऊन नाराजी व्यक्त केली. एकदा पुसद मध्ये माझी वास्तपुस करतांना मुख्यमंत्र्यांना मी अगदी ओघवतेत् सांगितले की सर नाशिकला आमच्या घरी भावाची पत्नी शिक्षिका आहे व तीन लहान मुले शिक्षण घेत आहे. आमचे एकत्र कुटुंब आहे परंतु माझ्या वडील भावाची नेमणूक कोकणात गुहागर येथे तहसीलदार म्हणून आहे आणि मी आपल्या विदर्भात ! त्यामुळे कुटुंबियांची खुप अडचण होते. एवढेच प्रामाणिकपणे सांगितले. आश्चर्य हे की दुसऱ्यांच आठवड्यात भावाची नाशिकला तहसीलदारपदी बदली झाली. याची मला सहज आठवण झाली. असो. त्यावेळी बजाज स्कुटरला नंबर लावावे लागत होते पण मुख्यमंत्र्यांचा कोटा होता. त्यावेळी मला स्कूटर मंजूर झाल्याचे कळले. ३३००रु. इतकी किंमत होती. पण तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते. खुप उशीरा मग मी ती तीन चार वर्षांनी घेतली. एकदा शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांचा दौरा होता. औपचारिक वार्तालापात त्यांनी यांना जळगावाला द्या असे मुख्यमंत्र्यांना सांगितले की काय! कालांतराने माझी बदली जळगावला झाली आणि मी यवतमाळचा चार्ज प्रभाकरराव शांडिल्य यांना दिला. यवतमाळ येथे असतांनाच माझे मालेगाव येथील एका मुलीच्या प्रेमात  प्रिती विवाह मालेगावात संपन्न झाला.यवतमाळ येथे आझाद मैदानासमोर निवृत्त न्यायाधीश वसंतराव रुईकर यांच्या रिक्विझिशन बंगल्यात आमचा संसार सुरू झाला. आपल्या आठवणींमुळे माझ्या  यवतमाळच्या सुखद आठवण जाग्या झाल्या. धन्यवाद.
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
.

२. यवतमाळ चे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री रणजित चंदेल यांची माहिती खूपच प्रेरणादायी आहे.
मी सन 2000 साली यवतमाळ येथे जिल्हा माहिती अधिकारी होतो. पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत माझी पुण्याला बदली झाल्यावर यवतमाळच्या पत्रकारांनी निरोप समारंभ दिला होता.
— विजय पवार.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक.

३. माहितीतील आठवणी सुंदर लेख. — गणेश मुळे. माहिती उपसंचालक, नवी मुंबई.

४. चंदेल साहेबांबद्दलची माहिती अत्यंत मार्मिक आहे. चंदेल साहेब अत्यंत प्रेमळ उत्कृष्ट मार्गदर्शक आणि चांगली माणसं जोडणारे एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लिहिलेल्या माहितीतील आठवणी अत्यंत प्रेरणादायी, कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असावा व जबाबदार व्यक्ती कसा असावा याची माहिती मिळून प्रेरणा मिळते.
— हरिश्चंद्र राठोड. यवतमाळ

५. श्री चंदेलजींच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रयत्न केला, चिकाटी असली तर अगदी नवख्या विभागात ही आपण शिकून सवरून यशस्वी होऊ शकतो तसेच a good turn is never lost .. हे ही कळते.
नात्याचे शिवधनुष्य ..हा लेख अतिशय महत्त्वाचा. आज घरोघरी हेच चित्र दिसतेय.. अहं ..सर्वात मोठा. अगदी बालकाच्या मनात देखील ठासून भरलेला. आमच्या काळी असे नव्हते … हे वाक्य तर निश्चितपणे काळाच्या ओघात गडप करावेच लागेल.. विज्ञानाची उडी देखील त्यास नक्कीच कारणीभूत.. ज्ञानाचा हा स्फोट मागील पिढीसाठी शिवधनुष्य पेक्षा अधिक आव्हानात्मक आहे असे वाटते… त्यामुळे ते तिसऱ्या पिढीपासून फार दुरावत चालले आहेत.
शेवटी विजय जी म्हणतात….”आजच्या काळात प्रत्येक नात्याचे शिव धनुष्य पेलणे हे फार मोठे आव्हान होऊन बसलेय प्रत्येकांसाठीच. ही तारेवरची कसरत काळाच्या ओघात दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. अन् ह्या समस्येची प्रश्न पत्रिका ज्याची त्यालाच सोडवावी लागणार आहे. त्यासाठी गाईड उपलब्ध नाही !” हे अगदी खरे आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

६. अति सुंदर  शब्दांकन.. — श्रीमती गडकरी. अमरावती

७. Inspirational story..I can say…Tumchya jiwancha sampurna aalekh aahe yat.
Definitely like first statment tumhi vaychye Shambhari Purna karal.. asech energetic rahal… Mala watte tumhi punha thode likhan suru karwae.. so people will get knowledge what u know saheb.
— Dr Vedant Lakhe. Urosurgeon

८. सविस्तर लिहिले आहे.  शेतकर्‍यांच्या आत्महत्या संदर्भात मा.मनिषा पाटणकर यांनी आखलेला अभ्यास दौरा महत्वाचा आहे. त्याचाही उल्लेख होणे आवश्यक होते. पण खूपच छान लिहिलं अभिनंदन.
— अनिल ठाकरे.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर
.

९. सर.. या लेखाद्वारे तुमच्या संघर्षपूर्ण जीवनाची माहिती मिळाली. प्रामाणिकता आणि चांगुलपणा ठेवला तर कोणतेही संकट आले तरी आपण त्या संकटातून बाहेर पडू शकतो.. हे या लेखाच्या माध्यमातून कळाले आहे.. आतापर्यंत आपल्याबद्दल आदर होता.. तो आता द्विगुणित झाला आहे..
— वैभव टप्पे. यवतमाळ

१०. सन्मा. श्री रणजीत चंदेल साहेब, नमस्कार, आपण सर्वंकषपणे लिहिलेल्या “माहितीतील आठवणींचा” २७.. चा लेखाजोखा म्हणजे आपल्या शासकीय सेवा काळातील संघर्षपूर्ण कार्यकर्तृत्वाच्या  अनेक आठवणी जाग्या झाल्या व त्या आपल्या सकस लेखणीतून उत्तमपणे मांडल्या ही आपल्याबद्दल अतिशय मौलिक कामगिरी वाटते.
आपल्या माहिती अधिकारी म्हणून केलेल्या सेवाकाळात विविध ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुकाबरोबरच आपणांस काही अधिकाऱ्यांकडून रोष ओढवून घेण्याचे प्रसंग आल्यावरही त्या दोन्ही विपर्यास घडणाऱ्या घटनांतून – प्रसंगातून सहिसलामत बाहेर पडले, ते केवळ आपल्या चांगल्या कामाची दखल वा पावती मिळाली म्हणूनच !!
श्री चंदेल साहेब, लक्षात ठेवा, आपण वयाच्या दृष्टीने माझ्यासाठी खूप जेष्ठ आहात. परंतु जे लोक दीन – दुःखी – दुबळ्यांच्या वेदना मांडण्याची मनोवृत्ती ठेवता, त्या समजून घेतात, त्यांच्या वाट्याला जीवनात आनंदाचे क्षण असतातच. जे लोक दुसऱ्याला फुले देतात, त्यांच्या हाताला सुगंध शिल्लक राहतो.
आपण सर्वोत्तम कामगिरी केली, त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला शुभेच्छूक,
— राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, मंत्रालय

११. मा. सर, खूप सुंदर शब्दांत प्रामाणिकपणे मनोगत व्यक्त केले आहे. मला मिळालेल्या एका पुरस्काराचा प्रस्ताव पाठवण्यासाठी तुम्ही केलेले सहकार्य व आग्रह कायम आठवणीत आहे.
— निशिकांत राऊत.
मुख्य जनसंपर्क अधिकारी, एम एस ई डी डी एल, पुणे
.

१२. अभिनंदन ! शुभेच्छा ! सादर वंदन ! तुमच्या बद्दल माहिती नसलेल्या गोष्टी, पूर्व इतिहास कळला आणि तुमच्या बद्दलचा आदर अधिक वाढला.
एका दक्ष माहिती अधिकाऱ्यामुळे अनेकांना शिस्तीत वागण्याचा वचक बसू शकतो, हे सुद्धा स्पष्ट दिसून येते. तुमच्या कर्तव्यदक्ष कर्तृत्वामुळे यवतमाळला घडवणाऱ्या, दिशा देणाऱ्या कर्तबगार व्यक्तींमध्ये तुमचे नाव घेतल्या गेले पाहिजे.
तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
— अमित सरोदे.

१३. आम्ही काय अभिनंदन करणार, आपले अभिनंदन वेळोवेळी एवढया मोठया  लोककडुन झालेले आहेत, तरी आम्ही लहान असुन तरी आमच्याकडून सुद्धा मनपूर्वक अभिनंदन.
— प्रा डॉ आर पी चव्हाण.

१३. आठवणी छान आहेत. कटू आठवणी सुद्धा लिहील्यात, हे धाडस आहे.
— वर्षा शेडगे.
निवृत्त माहिती उपसंचालक, पुणे

१४. सर,आप और हम पुराने केवळ मित्र नही बलकी, वर्गमित्र है लडझगडकर स्वयं की प्रगती के लिये संघर्ष करते करते आप और मै वर्तमान मे अब कही स्थिरस्थावर हुये है ! ईश्वर की यह बडी कृपा है !
अब पत्रकारिता का पुराना दौर नही रहा है। और पत्रकारिता के सिद्धांत भी बदल गये है। लेकिन निवृत्ती के जीवन मे मै बहुत बहुत खुश हु।
यह खुशहाली आप के लिये और मेरे लिये ऐसेही निरंतर बनी रहे !यही ईश्वर को प्रार्थना है !
— जेष्ठ पत्रकार, पद्माकर मलकापूरे.

१५. सन्माननीय, रणजितसिंहजी चंदेल साहाब, आप सामान्य परिस्थितीसे उभरकर अच्छे स्थितीमे स्थीरस्थावर हुए है। इस के पीछे आपका सर्वसमावेशक स्वभाव, परिश्रम और आपकी पढ़ाई रंग लाई है। शिक्षित तो बहुत लोग रहते है लेकिन सभी जीवन मे सफल नही होते. आप जो सफल हुये है। उसकी वजह यही है के, आप मे जो अच्छे त्रिगुणोका संगम है यह बात बहुत महत्वपूर्ण है। आप और मेरे तो पारिवारिक स्नेही संबंध है। साथमे हम दोनो ने एक-दूसरे का संघर्ष काफी नजदीक से देखा है। आप ने मेरे पत्रकारिता के प्रारंभिक दिनो मे जो मार्गदर्शन और सहयोग किया था, उसी वजहसे मै आज पत्रकारिता मे अच्छा नाम कमा सकता  हूँ  । भलेही मैने पैसा नही कमाया लेकिन इमानदार पत्रकार के रूप मे जो स्थान प्राप्त कर सका हूँ, यही मेरी सही कमाई है। खैर, आपने जो मुझे प्रारंभ मे मार्गदर्शन और सहयोग किये थे उसे मै कभी भूल नही सकता. आपके समस्त कार्यकाल का जो इस  लेख मे वर्णन किए है वह बहुत ही सही है । आपको भविष्य मे अच्छे-सुदृढ स्वास्थ्य एवं दीर्घायु की परमात्मा के पास कामनां करते है।
आपका शुभचिंतक :
— रघुवीरसिंह चौहान.
जिल्हा प्रतिनिधी, महासागर, यवतमाळ

१६. सर लेख वाचला अतिशय प्रांजळ आणि ओघवतेपणे लिहिला आहे अजूनही मोठा होऊ शकला असता परंतु जो ही लिहिला आहे तो मस्तच जमला आहे.
— ललितकुमार वऱ्हाडे.
उपजिल्हाधिकारी. नांदेड

१७. विवंचना, जिद्द, उत्साह, सामाजिकदायित्व, कर्तव्यपूर्तीची उर्मी, चित्तथरारक अनुभव घेवुन “निर्भयपणे कर्म करा, फळ मीळतेच” हा गीतेतील महत्वाचा, मोलाचा आणि प्रेमाचा संदेश देवून, 1973 ते 2008 या 35 वर्षाचा दीर्घ कौटुंबिक व कर्तव्य सफल प्रकल्प पूर्ण करून, आजही समाजात तत्वनिष्ठ विचारांची प्रेरणा रुजविण्यात अग्रगण्य आहात. याचा सार्थ अभिमान मला हृदयापासून वाटतो. अभिनंदन ! अभिनंदन ! अभिनंदन !
— ऍड.हिम्मतराव खंदार. यवतमाळ

१८. सर नमस्कार. संपूर्ण लेख निवांत वाचला. त्यातून मला आज नवीनच चंदेल सर कळले. हा लेख आपल्या रिपोर्टर्सच्या ग्रुपवर शेअर केला.
— अविनाश सबापुरे. वरिष्ठ पत्रकार

१९. तुमच्याच काळात उमरखेड उपमाहिती केंद्र चालू झाले छान लिहिले आहे. छोटे व सुटसुटीत.
— ॲड विवेक देशमुख

२०. प्रिय चंदेल साहेब… खूप सुंदर आठवणी…
खूप सुंदर शब्दांकन…
खरंच तुमच्या कार्याला सलाम !!!
— अनंत पांडे. क्रीडा प्रशिक्षक

२१. सरजी जबरदस्त — राहुल वासनिक. पत्रकार

२२. आपल्या कार्याला सलाम — सुहास पुरी. आर्किटेक्ट

२३. खूप छान माहिती आहे. — उषाताई भावे. मुंबई

२४. वा एकदम बहोत बढ़िया. — संपादक, साप्ताहिक पुलगाव टाइम्स

माझी  जडणघडण भाग : १० प्राप्त  प्रतिक्रिया…

१. सोमवार कधी उजाडतो आणि आज जडणघडणमध्य काय वाचावयास मिळते असे मला होत असते हल्ली. मला तर हे वाचताना पुन्हा लहान झाल्यासारखे वाटते. खूप सुंदर लेखन.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका, मिशिगन

२. राधिका खूप छान  वाटलं वाचून तुझा लेख आणि तुझ्या लेखनाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाबद्दल.  खूप शुभेच्छा.
— वंदना जोशी. पुणे

३. मी वाट बघते की पुढच्या लेखात तू कुणाबद्दल लिहीणार, तो हरवण्याचा प्रसंग वाचताना मला अंगावर अजूनही काटा येतो. अजूनही मला मी हरवले आहे अशी स्वप्नं पडतात.
आम्ही विहीर बघायला गेलो होतो. अंधार पटकन् झाला, कळलच नाही. खूप घाबरलो होतो, पण एकमेकांचे हात सोडले नाहीत.
– छुंदा.. या लेखातील लेखिकेची बहीण.
(आताची..अंजोर चाफेकर. गोरेगाव)

४. प्रिय राधिकाताई , तुमची *माझी जडणघडण* ही लेखमाला मी अगदी न चुकता वाचते. तुमचं आत्मचरित्र तुम्ही या सदरातून मांडत आहात.. अगदी खरं सांगू, तुमचा लेख वाचल्यानंतर प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी येतं आणि कुठे ना कुठे असं वाटत राहतं की अरे..!! ही माझी च कथा आहे… आम्हा तिघी बहिणींची कथा आहे …हे आमच्या सोबतही घडलं होतं असंच.. आम्ही पण तिघी बहिणीच.. आणि जसं तुम्ही म्हणत आहात छुंदा चे बॉयकट केस होते …घरातून हरवलेल्या.. त्रिकूट …सेम असाच किस्सा माझा पण होता… मला शोधायला सुद्धा सगळे निघाले होते ..फक्त तेव्हा मी एकटी होते ते तिघे मित्र निघाले होते ..पण मी एकटीच होते…पण लहानपणापासून मी माझ्या आई-वडिलांचा मुलगा म्हणून होते.. मला लहानपणापासून त्या दोघांनी तसेच ट्रीट केले.. तिन्ही मुलींमध्ये मी मधली .. टॉम बॉय टाईपच होती थोडी… त्यामुळे त्यांनी मला मुलासारखंच वाढवलं.. आज हा संपूर्ण प्रसंग वाचताना मला माझा तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला .. जेव्हा मी अशीच रस्ता विसरून पुढे निघून गेले होते… आणि मला कोणीतरी घेऊन आलं होतं.. कोण ते पण आता मला आठवत नाही.. एकदा असाच प्रसंग माझ्या धाकट्या बहिणी बरोबर पण झालेला… घरातच लपली होती ती आणि कोणाला कळलंच नाही की ती लपून बसलेली आहे ..घरभर सोसायटीभर सगळे शोधत बसले होते.. तो प्रसंग आठवला… तुमचे हे  सगळे जे प्रसंगं तुम्ही लिहिता त्या सगळ्यांमध्ये मी स्वतःला कुठेतरी बघते.. माझं पण बालपण मी बघते आणि जगते.. पुन्हा जगते तुमच्या या सगळ्या लेखातून.. खूप सुंदर लिहिता ताई तुम्ही .. अक्षरशः डोळे पाणावतात वाचत असले की.. तुम्ही भावूक होतात आणि वाचक ही तितकाच भावुक होतो…. तो सुद्धा तुमच्याबरोबर त्या प्रसंगात स्वतःला बघतो… किती सुंदर लिहिता तुम्ही.. खूप सुंदर जडणघडण.. आई पप्पांची मलाही खूप आठवण आली हो …..गेले ते दिवस.. आणखीन काय लिहू …पण तुम्ही लिहीत राहा.. खूप सुंदर लिहिता …सगळं बालपण डोळ्यासमोर परत येतं.. अशाच लिहित रहा.
— मानसी म्हसकर. अहमदाबाद

५. अत्यंत ह्रदयस्पर्शी आठवणीनां उजाळा देणारा तुमचा हा लेख, राधिकाताई 👌👌💖
— सुवर्णा वाघमोडे.  विलेपार्ले

६. प्रसंग आणि व्यक्ती जशी च्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी तुझी लेखनशैली  विलक्षण आहे. त्यामुळे तुझे लेख वाचावेसे वाटतात. भाषा साधी, सरळ, ओघवती ! मनाला भावणारी ! असेच सुंदर लेख लिहीत रहा. तुला शुभेच्छा आणि धन्यवाद! 🌹
— सुमन शृंगारपुरे. पुणे

७. लक्षात रहावे असे प्रसंग सगळ्यांच्याच बालपणी, तरूणपणी घडतच असतात. पण सगळ्यांकडे ‘त्या’ प्रसंगाकडे बघण्याची तुझ्यासारखी ‘दृष्टी’ नसते. प्रसंग घडला तसा तपशीलवार आठवणारे बरेच लोक असतात. पण तुझ्यातली ‘उपजत लेखिका’ त्याला जे आगळं,वेगळं परिमाण(dimension) देते,  उदा.पप्पांकडून मिळालेल्या मोठ्या डोळ्यांच्या वारशाबरोबर मिळालेल्या गुणांचा सहज-सुंदर उल्लेख, त्याबद्दल वाटणारी कृतज्ञता, ‘या डोळ्यांची दोन पाखरे…’ अशी भावनिक,नाट्यमय अभिव्यक्ती हरवलेली बहीण सापडल्याचा प्रसंग खूपच परिणामकारक करते.
— साधना नाचणे. ठाणे

८. Enjoyed the story. Really I all r born with huge luminous eyes. I wait for Monday to read your stories. They r so true to life.
— संध्या जंगले. सांताक्रुझ

९. किती सुरेख — अस्मिता पंडीत. पालघर

१०. जडणघडण जेव्हा उलगडत जाते, तेव्हा परंपरागत असणाऱ्या सर्व घटना समजतात. वंशपरंपरा ठेव म्हणून डोळे खूप काही सांगतात.
या सगळ्या गोष्टीची आठवण म्हणून….
या डोळ्यांची दोन पाखरे
फिरतील तुमच्या भोवती…..
खूप छान वाटतं वाचताना…. 🙏🌹🙏
— अरुण पुराणिक. पुणे

११. आठवणी सांगताना सुद्धा त्या अगदी नुकत्याच घडलेले प्रसंग सांगावेत इतक्या सहजपणे बारकाव्यांचं वर्णन केलं आहे. लेखन शैली खूप छान‌ आहे.‌
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

१२. नमस्कार राधिकाताई. आपलं लेखन म्हणजे एकदा वाचायला घेतलं की थेट संपेपर्यंत वाचत राहावं असं वाटतं.
वाचनात पुष्कळ काही येतं असतं, पण काही चार ओळीतच वाचन कंटाळवाण होवून जात.
परंतु सतत खेळवून ठेवणारी आपली कथा, लेख, कविता कोणत्याही साहित्याचा प्रकार असो हे आपले वैशिष्ट्य आहे.
ही कथा वाचत असताना, मला माझ्या बालपणात आणून सोडले. तसं म्हटलं तर आयुष्य हे फार छोटं असतं, पण त्या आयुष्यात बालपण आपल्याला शेवटपर्यंत जगवत असतं. म्हणून हे म्हणजेच बालपण मला मोठं वाटतं.
माझ्या आयुष्यातील काहीश्या सारखंच घटना याच्यात आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी हरवण असतं, हे लक्षात आलं आहे. पण मी इथे एक गोष्ट मात्र नक्कीच नमूद करेल. ते असे के ईश्वर जेही आपल्याला देतो ते आपल्या भल्यासाठी असतं. मग ते शरीर असो व परिवार असो निसर्ग असो का हे संपूर्ण चराचर सृष्टी असो.
आज डोळ्यांनी केवढं मोठं काम केलं क्या बात है…
भाग १० आत्ता वाचला. सहज सोप्या भाषेत तुम्ही तो काळ आणि मुलांच्या खेळविश्वाचा आढावा शब्दांकित केला आहे तो खूप मनोज्ञ आहे. लेखन अत्यंत प्रवाही झालेय. त्यातच त्या तिघांविषयी वाचताना ती पात्रे डोळ्यासमोर उभी राहतात. हा भाग वाचताना मला बार्शीत काही काळ घालवलेले बालपण आठवले आणि हेच उत्तम लेखनाचे वैशिष्ट्य असते की वाचकाला मजकुराशी नकळत तादात्म्यता येते. तुमची लेखणी ‘सराईत’ झाली आहे.
अशाच लिहित राहा.
शुभेच्छा !
— पुरुषोत्तम रामदासी. मुंबई

१३. या ठिकाणी असं म्हणायला काही हरकत नाही, ऐसा भी होता है ?…. जी बिल्कुल ऐसा भी होता है….
तुमचे हे सुंदर सुंदर अनुभव गोष्टी रुपात तुम्ही सादर करतात ते खरोखर मनास भावतात आणि आयुष्याच्या तसेच निसर्गाच्या अगदी जवळ नेऊन ठेवतात. आपल्या लेखणीला सुद्धा हृदय आहे. ते भरून येत असताना काय वेदना होत असेल याची मला पुर्ण जाणीव आहे.
असंच लिहित रहा. वाचकांच्या हृदयात एक विशेष स्थान सन्माननीय राधिकाताई भांडारकर यांनी मिळवले आहे यात काही शंकाच नाही.
— सौ सोनाली जगताप. वांद्रे, मुंबई.

१४. *डोळे*  लेख आवडला.  तुझ्या छुंदाला बघितले नाही, पण तुझ्या लेखनातून कळली.
— सुषमा पालकर. पुणे

अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

मृदुला चिटणीस यांचा घरोघरी नागपंचमी लेख छान आहे. बत्तीस शिराळ्याचा नागपंचमी पूजनाचा सोहळा मी पाहिला आहे. आठवणी ताज्या झाल्या.
— सुनील चिटणीस. पनवेल.

भाषा ही गतिमान व परिवर्तनशील असल्यानं ती वेगवेगळ्या साच्यांमध्ये स्वतःला सामावून घेते. तिचा विकास काळानुरूप होत जातो. हेच भाषेचं प्रमुख वैशिष्ट्य होय. काळाच्या प्रवाहात इतर भाषांमधून मराठी भाषेत समाविष्ट झालेल्या शब्दावलीमुळे तिचं शुद्ध स्वरूप काहीसं नष्ट झालं खरं पण मुळातंच लवचिक असलेल्या मराठी भाषेनं तिच्या अस्तित्वाला तडा जाऊ दिला नाही. सोबत मराठी भाषिक मंडळींनी मराठी अस्मितेचा दीप प्रज्वलित ठेवला. नुकताच प्रा. डाॅ. विजय पांढरीपांडे सर यांचा ‘भाषेची लवचिकता’ हा लेख वाचनात आला. मराठी भाषेतील शब्द चुकीच्या पद्धतीनं लिहिणं, उच्चारणं, मराठी वृत्तवाहिन्यांवरती इंग्रजी शब्दांचा वाढता वापर, मराठी भाषेत इतर भाषांमधून आलेले प्रचलित शब्द, अशा अनेक मुद्द्यांवरती मा. पांढरीपांडे सर यांनी या लेखातून टाकलेला प्रकाश वाचकांचं लक्ष वेधून घेतो; तसेच चिंतन करायला भाग पाडतो. प्रबोधक विधानांतून मांडलेले त्यांचे भाषाविषयक विचार अत्यंत समर्पक आहेत. आगामी लेखनकार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा

आशाताईंचा लेख खूपच छान आहे. आवडला.. त्यांनी सांगितलेली खंत माझ्याही मनात आहे. शोभनाताईंचे उत्तुंग कार्य बघता त्यांची शासनाने योग्य दखल घेतली नाही. पण त्यांच्यासारखे कार्यकर्ते मूकपणे आपला तो.. स्वधर्म.. जाणून सेवा करीत राहतात.. हीच त्यांची थोरवी. माझे ही नमन त्यांना.
जीवनाचे.. क्षणकाल पडलेले स्वप्न कसे कधी विरून जाते.. हे पद्य शैलीत छान तरल गद्य आहे. आवडले प्रितीजी.
संगीताजींनी गौरी देशपांडे यांच्या लेखनाचा उत्तम। आढावा घेतला आहे. त्यांचे लेखनाचे विविध पैलू अलवारपणे उलगडले आहे. पैसा.. कविता अतिशय हृदयस्पर्शी आहे. अभिनंदन मंगेशजी.
— स्वाती वर्तक. मुंबई

शोभनाताईंचं चरित्र फारच inspiring आहे. त्याकाळात अतिशय सुशिक्षित घराणं आणि प्रखर देशभक्ती, आधुनिक विचार हे सगळं त्यांच्या जीवनात दिसून येतं. आताच्या तरुणांना हे पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं.
— प्रा सुनीता पाठक. छ्. संभाजीनगर

सर्व साहित्य छान.
जीवन म्हणजे काय… उत्कृष्ट
— अरुणा दुद्दलवार. दिग्रस

किशोरकुमार ने तीन मराठी गाणी गायली आहेत हे ऐकून बरे वाटले. बघू या आणखी आठवली तर ! राधिकाताईंचे स्मरण रंजन  खूपच रंजक होते. आजच्या आठवणी भावुक आहेत. डोळ्यांवरून ओळखले म्हणजे खरेच वैशिष्ट्यच !
घेतला वसा टाकू नये.. अशी जुन्या ढंगात नव्या शब्दांत, नव्या समस्यांना सामावून घेणारं ..हलकं फुलकं.. आवडले.
मीरा जोशी यांची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

“आधुनिक कथुली” खूप आवडली. कारण माझ्या उणिवांशी निगडित आहे. “भाषेची लवचीकता” हा लेख अभ्यासू आहे.
— सुषमा देशपांडे. नाशिक.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on मतदान करा हो मतदान…..
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण भाग : २२
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” – १२
माधुरी ताम्हणे on अनुकरणीय “आडे”बाजी !
माधुरी ताम्हणे on
माधुरी ताम्हणे on
विजया केळकर on
Manisha Shekhar Tamhane on
Shrikant Pattalwar on