Saturday, October 5, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक

“दूरदर्शनची पासष्टी” या मालिके अंतर्गत दूरदर्शनचे निवृत्त संचालक, जेष्ठ निर्माते श्री अशोक डुंबरे सरांवर मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या जीवन लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

“आमची माती, आमची माणसं” या दूरदर्शनवरील कृषिप्रधान कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात अशोक डुंबरे सरांचा सिंहाचा वाटा होता हे सर्वमान्य सत्य असलं तरी त्यामागची त्यांची अपार मेहनत, अनंत अडचणींवर मात करून मिळवलेलं हे यश भुजबळांनी सविस्तरपणे, चित्रपटासारखं डोळ्यासमोर उभं केलं, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. 👍👍
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जन संपर्क अधिकारी, मुंबई.

वीणाताई यांच्या मताशी मी शंभर टक्के सहमत. अशोकरावांचे कार्य मी उपसंचालक वृत्त व संचालक असतांनाच प्रत्यक्ष बघितले आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. देवेंद्रजींच्या कुशल लेखन-संपादना बद्दल काय म्हणावे तितके थोडेच !
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक.

‘दूरदर्शनची पासष्टी’
खूप छान माहितीपूर्ण लेख. ‘आमची माती आमची माणसं’ हे वाचताच जुने दिवस आठवले. फार सुंदर कार्यक्रम असायचे तेव्हा. आजही आठवतात. 🙏💐
‘माझ्या पोटात झाड उगवलंच नाही.!’ मस्तच.
— अरुणा गर्जे. नांदेड.

“दूरदर्शनची पासष्टी” ….
खूप माहितपूर्ण लेख आहे. खरंच कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम “टीम वर्कची” गरज असते.
“आमची माती, आमची माणसं” हा कार्यक्रम मला आठवतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक शेतकरी हाती नांगर घेतलेले चित्र असायचं..
— आश्लेषा गान. सातारा

Very intresting of Dumbre Saheb.
— Surendra Modi. Journalist. Mumbai

राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण भाग १७” वर प्राप्त अभिप्राय….

कित्ती छान, खरं खरं विश्लेशण आहे..
मस्त.
— प्रा.सुमतीताई पवार. नाशिक

सुंदर शब्दांकन 👌🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

छान आठवणी ! बालपणी च्या आठवणी मनात कायमचं रुतून बसतात… इतकी वर्ष झाली तरी मला भावांबरोबर ची भांडणं, खेळ जसं च्या तसं आठवतं.. आम्ही तीनच भावंडं, दोन भाऊ आणि मी एकटी, धाकटी… त्यामुळे आई वडिलांची जास्त च लाडकी !
मला तुमचं लिखाण वाचताना माझेही बालपण आठवते.
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

सौ. राधिका भांडारकर लिखित माझी जडणघडण भाग १७ वाचनात आला. बहिणीमधील प्रेम आहे त्यात हे नक्की, पण,
१) बिंबा ( मी ) मला मुळीच आवडत नाही.
२) तिचा प्रचंड राग येतो.
३) सतत आम्हला रागावते.
४) तिची दादागिरी आम्ही का सहन करायची ?
ह्या चार ओळी वाचून धक्का बसणं साहजिकच आहे.
पण, यात केवळ सात्विक संताप असावा असं वाटतं .
वाचनीय लेख आहे….
— अरुण पुराणिक ….

नेहमीप्रमाणे अप्रतिम👌👌
— सुमन श्रृंगारपुर. पुणे

Today I read your tya char ओळी. I liked it so much.please keep on writing.❤️
— संध्या जंगले जुहु, मुंबई

लहानपण, प्रत्यक्ष धाकटेपणा छानच लिहिले आहे. अगदी सूक्ष्म निरीक्षण. व्वा, राधिकाताई.
— छायाताई मठकर. पुणे

बहिणी बहिणींचे नाते छान वर्णन केलेत राधिका ताई
— सुलभा गुप्ते. इजीप्त

राधिकाजींच्या आजच्या भागात एक वाक्य खूप आवडले,
“एक धडा मी शिकले की एकच मात्रा सर्वांना लागू होत नाही हेच खरे आणि आपल्या बोलण्याचा परिणाम हा “चांगला ते अत्यंत वाईट” या रेंजमध्ये कसाही होऊ शकतो. तिथे आपले अंदाज चुकतात. मुळातच कुणाला गृहित धरणं हेच चुकीचं.”
त्यांची लेखमाला मी आवडीने वाचते. धन्यवाद
— स्वाती वर्तक. मुंबई
१०
तुम्हाला बघितले की मला आमच्या बहिणीचा विचार येतो व बालपण आठवते.
— सुषमा पालकर. पुणे
११
राधिकाताईंकडे साध्यात साध्या प्रसंगातून मोठ्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची हातोटी आहे. शिवाय ते निष्कर्षसुद्धा घरच्याच पात्र-प्रसंगांच्या मदतीने एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव सांगावा इतके सहज असतात. धाकट्या बहीणींचं आपल्याबद्दलचं मत त्या प्रामाणिकपणे कसलाही आडपडदा न ठेवता मैत्रीच्या नात्याने सांगतात. उषाचं मत वाचल्यावर ‘माझं मोठेपण हरलं’ हे शब्द अत्यंत कमी शब्दात आत्मपरीक्षण करणारे तसेच दुखावलेल्या ताईची व्यथा सांगणारे आहेत. ‘वाढे भांडून ममता’ हे सत्य रक्ताच्या नात्यांसाठी चपखल बसणारं आहे.बहीणींच्या फोटोंनी लेखाची परिणामकारकता वाढली आहे.
— साधना नाचणे. ठाणे
१२
माझी जडणघडण भाग १७ खूप आवडला. चार बहिणी. आम्ही पण चार बहिणी होतो.
— मीनाक्षी सरदेसाई.
१३
राधिका तुझा जडणघडण लेख वाचला. कांही प्रसंग मनाला चटका लावून गेले. मला वाटतं बालपणातील अशा अनेक घटना व प्रसंग कळत नकळत मनावर संस्कार करतात. याची जाणीव मोठेपणी होते. ह्या आठवणींचा गोफ तू इतका सुरेख गुंफलायस कि मनोरंजन तर होतेच पण बोधही मिळतो.
तुझ्या घड्याळाचा किस्सा वाचून मला माझ्या लहानपणीचा किस्सा आठवला. धारवाडच्या आमच्या बंगल्यात चावीचे मोठे घड्याळ समोरच्या भितींवर होते. वडिलांची नोकरी महाराष्टात असल्यानुळे बंगल्याचा मुख्यभाग भाड्याने दिला होता. बाजूच्या चार खोल्या आमच्यासाठी ठेवल्या होत्या. सुट्टीत आम्ही धारवाडला जायचो. भाडेकरू बदलत असायचे. एका सुट्टीत गेलो तर घड्याळ गायब. आजोबाच्या काळातले घड्याळ नाहीसे झालेले पाहून सगळ्याना खूप वाईट् वाटले.वडिलांनी पत्र लिहून विचारले. पण ऊत्तर दिले नाहीं. तेव्हा फोन नव्हते. आजही तो प्रसंग काळजाला चटका देवून जातो. अशा अनेक जुन्या वस्तू असतात त्यात भावना गुंतलेल्या असतात .तुझ्या या लेखामुळे विस्मृीत गेलेल्या अनेक आठवणी जाग्या झाल्या तुझ्याकडून असेस विविध साहित्य लिहीले जावो. अनेक शुभेच्छा !
— रेखा राव. मुंबई
१४
‘माझी जडणघडण’ वाचतांना लहानपण डोळ्यासमोर येते. थोड्या फार फरकाने लहान बहिण भावंडांचे प्रेम, रुसवेफुगवे असेच
असतात.
मला आठवले आमचे वडील (दादा म्हणत होतो आम्ही) घरी यायची वेळ झाली की आम्ही असेच त्यांची वाट बघत असायचे. सायकलच्या घंटीचा आवाज आला की’ दादा आले दादा आले’ म्हणून धावत जायचे. त्यांच्या हातातील सामान घ्यायला. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी आमच्या दादांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते आम्हाला सोडून गेले. पण किती तरी दिवस कुणाच्याही सायकलच्या घंटीचा आवाज आला तरी आम्ही नकळत धावत बाहेर जात होतो. आठवणी पुसून टाकणे फार कठीण असतात हेच खरे.
लेख वाचला आणि आठवणी जाग्या झाल्या. खूप सुंदर लिखाण असते राधिकाताईंचे.असेच छान वाचायला मिळू देत. मनःपूर्वक शुभेच्छा!
— अरुणा गर्जे. नांदेड

माधुरी ताम्हणे लिहीत असलेल्या “माध्यम पन्नाशी” च्या आठव्या भागावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

माधुरीताई मी तुमचे सगळे लेख खूप आवर्जून वाचते… मला खूप आवडतात.. मला तुमच्यासोबत रेकॉर्डिंगला असल्या सारखं वाटतं. आजच्या लेखात सांगितलेल्या तुमच्या कोळी बांधवांच्या अनुभवावरून एक अनुभव मलाही सांगावासा वाटतो, तो म्हणजे मी नागपूरला एका वृत्तपत्रात काम करताना सुनामी ची खूप मोठी बातमी वरिष्ठाकडून सुटली होती. त्यानंतर इंटरनेटवरून किंवा वृत्तवाहिन्यांवरून मुख्य अपडेट्स काढून त्याची लिस्ट तयार करून वरिष्ठांना सुपूर्त करण्याचे अजून एक काम मला देण्यात आले होत. एका पत्रकाराने किंवा उपसंपादकाने सदैव जागृत राहणे खूप गरजेचं असतं हा नवा पाठ मी माझ्या पत्रकारितेत गिरवला .
— आश्लेषा गान. सातारा

लेख अतिशय उत्कृष्ट आहे. मस्त जमलाय एकदम. एकदम सटीक आणि जबरदस्त पकड आहे.
मला एक शब्द नव्याने कळला “साक्षेपीपणे” !
— शौनक विजय ताम्हणे. पुणे

माझी धाकटी बहिण मंजिरी मराठे दूरदर्शन वर ३२ वर्षे वृत्त निवेदिका होती.
त्यामुळे या बद्दल माहिती आहे. ते दृश्य माध्यम असल्याने त्या दिवसाच्या घडामोडीनुसार साडीचा रंग ऐनवेळी बदलायला लागायचा. आधी बातम्यांबद्दल माहिती घ्यावी लागायची.
— विदुला सहस्रबुद्धे.

जबरदस्त स्मरणशक्ती.
— नीलिमा पाणसरे. दादर

रोज आपण काहीं न काही तरी शिकत असतो, हेच तुमच्या लेखातून कळते.
— प्रशांत देशपांडे. मुंबई.

माधुरीताई अप्रतिम अनुभव कथन.👌🏼👌🏼
आजच्या सशक्त माध्यमांचा अतिरेक पाहून, आकाशवाणीचे दिवसच किती छान होते असं वाटतं नाही ! 😊
मी आधीचे ही लेख वाचले आहेत.
— डॉक्टर वैशाली वावीकर. ठाणे

नमस्कार.
डॉ. पांढरीपांडे सरांनी तळमळीने लिहिलेला “कुलगुरू पदाची अवनती” हा लेख सरकारच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. डॉ. रानडे यांना पायउतार करताना दिलेले कारण शिक्षण क्षेत्रातील कुणालाच पटणारे नाही, हे मात्र खरे.
— उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर


प्रा डॉ विजय पांढरीपांडे जी
माजी कुलगुरू,
सस्नेह नमस्कार.
आपण महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत येत असलेली पूर्वाश्रमीची “गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ॲंड रिसर्च संस्था पुणे, सध्या स्वायत्त विद्यापीठाचे प्रशासकीय कारभाराचा नमुनेदार उदाहरण म्हणून आपण “कुलगुरू पदाची अवनती” या विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या अजब-गजब निर्णयाचा अर्थात ज्या प्राधिकरणाच्या प्राधिका-यांच्या अधिकारीतेतून या स्वायत्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर नियुक्त करण्यात आलेले डॉ अजित रानडे यांना काही कारणास्तव पायउतार व्हावे लागले. ही अत्यंत शर्मनाक बाब आहे आणि आपल्या मताशी मी सहमत आहे. जर डॉ रानडे सारख्या अर्थतज्ज्ञ व्यक्तीला अशा पद्धतीने पाय उतार करायचे होते तर त्यांची कुलगुरू पदावर नियुक्ती का करण्यात आली हा एक लाख मोलाचा प्रश्न आहे असे मला वाटते.
आपल्या सर्वंकषपणे लिहिलेल्या लेखातून आपण जी भुमिका मांडली त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!!
— राजाराम गो. जाधव. सहसचिव (सेनि), नवी मुंबई

जेष्ठ पत्रकार, चित्रकार, लेखक श्री प्रकाश बाळ जोशी यांच्या वर मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या “एक व्यक्ती, तीन रूपं” या व्यक्ती चित्रणावर पुढील प्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री. प्रकाश बाळ जोशी यांच्या विषयीचा लेख. श्री. प्रकाश बाळ जोशी हे Times of India या वृत्तसमूहाच्या इंग्रजी वृत्तपत्राचे प्रतिथयश पत्रकार व संपादक होते. मराठी माध्यमात शिकलेले श्री.जोशी Times of India चे पत्रकार व संपादक होतात ही आजच्या इंग्रजी माध्यमाच्या बाजारीकरणाला एक चपराक नक्कीच आहे. मातृभाषेचे शिक्षण नक्कीच श्रेष्ठ आहे. मा.श्री. प्रकाश जोशी हे प्रेरणादायी आहे.
— अविनाश कुलकर्णी, महात्मा गांधी हायस्कूल ईगतपुरी

इगतपुरीला शाळेत मला श्री प्रकाशचे आई,बाबा शिक्षक होते.माझी आई देखील त्याच शाळेत असल्याने एक बाँड तयार झालेला होता. त्यावेळी देखील श्री प्रकाशची एकूणच देहबोली,हा कुणीतरी मोठाच होणार हे व्यक्त करणारीच होती व ते त्याने खरे करून दाखविले. अश्या महनीय व्यक्ती आपल्या ग्रुप मध्ये आहेत है खरे तर आपले भाग्यच आहे. मी श्री प्रकाशला अजून उत्तुंग यश मिळो व त्याचा आमचे सर्वांशी असाच आनंददायी संपर्क राहो अशी नम्र प्रार्थना ईश्वरचरणी करतो.
— शशी देशपांडे. नाशिक

“एक व्यक्ती, तीन रूपं” या लेखात जोशी सरांचा पत्रकार, चित्रकार, साहित्यकार हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे…
— आश्लेषा गान. सातारा


देवेंद्रजी, जेष्ठ, श्रेष्ठ, व्यासंगी पत्रकार प्रकाश जोशी यांची स्फूर्तिदायक जीवनकहाणी वाचून त्यांच्या बहुविध गुणांची अधिकची माहिती आपण लेखाच्या माध्यमातून व्यक्त केलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
प्रकाश जोशी हे त्यांच्या नावाप्रमाणेच पत्रकारितेतील काही अडथळ्यांवर, पत्रकारांच्या विविध चुकीच्या गोष्टींवर, अनिष्ट प्रकारांवर नेहमीचं आपल्या आदर्शवत वागण्याने प्रकाशझोत टाकत आले. कधी समजावून सांगून तर कधी आपलं कर्तव्य म्हणून समजावून सांगत. आपल्या शांत, संयमी स्वभावाने त्यांनी सर्वांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलंचं आहे. ते उत्तम चित्रकार असल्याचं ही प्रसिध्दी माध्यमातून कळलं होतं.
आता त्यांची प्रकाशित पुस्तकांची माहिती कळली आणि या बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दलचा आदर द्विगुणीत झाला.
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

श्री प्रकाश बाळ जोशी आणि श्री अशोक डुंबरे यांच्या वर आपण लेख लिहून एक ऐतिहासिक दस्तऐवज तयार केला आहे. भावी पिढी जेव्हा या इतिहासातील मागोवा घेईल तेव्हा अशा व्यक्तीचे योगदान किती मोठे होते हे कळेल. कारण प्रतिकूल परिस्तितीवर मात करून आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन ह्या लोकांनी इतिहास घडवला. त्यामुळे अशी माणसं ह्या चळवलीत एक पात्र म्हणून शोभातात. अश्या शोभानीय व्यक्तीची आपण विलोभनीय माहिती प्रसारित केली याबद्दल भुजबळ साहेब आपणास धन्यवाद. कारण यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडते. असेच स्वाती नक्षत्रातील मोती निवडून आपण ती प्रकाशात आणव्यात ही विनंती
— विलास कट्यारे. नाशिक
“अनुताईंच्या आठवणी” या मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

अनुताईंच्या आठवणी वाचताना माझ्याही दूरदर्शन च्या आठवणींना उजाळा मिळाला. सुधीर पाटणकरने कष्टपूर्वक ‘तुफानातले दिवे’तून अनेक मोठ्या व्यक्तींचं कार्यकर्तृत्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं.
हा लेख उत्तम झालाय….👏
— डॉ किरण चित्रे. मुंबई. ह मु.अमेरिका

अनुताईंच्या आठवणी वाचून मी भारावून गेले .आधीच मी खूप वाचले होते त्यांच्याबद्दल. त्यांना भेटावेसे वाटत होते. आपल्या लेखामुळे खूप आनंद झाला. मुले शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांपर्यंत जावे ..थोर ..सादर प्रणाम.
विंग कमांडर यांच्या लेखमालेतील नाटकाची आठवण छान वाटली .
मेहरा आणि दीप्ती यांची दिव्यांग मुलांबद्दलची कळकळ हृद्य आहे .
डॉ पाटील यांची कविता आवडली..आईची महती हळुवार शब्दात सांगणारी.
— स्वाती वर्तक. मुंबई

“अनुताईंच्या आठवणी…”
श्री.भुजबळ साहेब आजच्या पिढीला अज्ञात असणाऱ्या महनीय व्यक्तींचे कार्य आपण उजेडात आणत आहात, खरंच कौतुकास्पद आहे.
— गोविंद देशपांडे. निवृत्त माहिती अधिकारी, पुणे

सौ आश्लेषा गान यांनी लिहिलेल्या “माझ्या पोटात झाड उगवलंच नाही!!” या गमतीशीर आठवणींवर आधारीत लेखावर मिळालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

संपूर्ण बालपणीची निरागसता, थोडीशी भीती, बालिशपणा आठवला.
पोटात झाड उगवणार आता कसं होणार..? खुपच छान लिहिलय.
— पूर्णिमा आनंद शिंदे.

खूप छान आणि गमतीशीर अनुभव. झाड पोटात नाही डोक्यात उगवलं आणि तेही ज्ञानाचं.
— श्रीकांत पत्तालवार.

फारच सुंदर वर्णन केले आहे.. मला सुध्दा लहान असताना हा प्रश्न पडायचा पण कालांतराने वयानुसार जशी समज आली. तसे यावर मला माझ्या लहान कोवळ्या मनाचे प्रश्नाचे उत्तर मिळायचे..
— अंशुमन गान. सातारा

अरे वाह.. हा पोटातून झाड येण्याचा अनुभव बहुधा सगळ्यानाच आला असेल..मलाही आला होता.. आणि ते तू छान शब्दबद्ध केलेस.. पुन्हा ती बालपणीची धम्माल डोळ्यासमोर आली..खूप मस्त आश्लेषा..खूप खूप शुभेच्छा
— आसवारी नितीन. अभिनेत्री पुणे

तु झाड झाली असती तर मला खूप आवडले असते. कारण मला झाडाप्रती खूप प्रेम आहे 😂😂 लहान पणीच्या गोष्टी आठवून भारी हसायला येत नाही. आणि ते आठवून शब्दात मांडता येणं, हे तूझ्या सारख्या लेखिकेला छान जमतं. छान वाटला लेख.
— सौ.शितल अहेर. खोपोली

खुप सुंदर शब्द रचना मजेशीर किस्सा मन एकदम प्रसन्न 😀
— सौ. प्रणिता टाकसाळे. वनी

‘माझ्या पोटात झाड उगवलंच नाही.!’ मस्तच.
— अरुणा गर्जे. नांदेड.

शब्दांकन सुंदर 👌👌👌
— सौ. प्रतिभा मंजुळे. पुणे

शितल अहेर यांची ‘श्राद्धचा वार’ खूप भावस्पर्शी आणि वास्तववादी रचना.
— अरुणा गर्जे. नांदेड

सौ.शितल! कवितेची रचना खूप सुंदर केली. आई कडील जीवंत आहे तोपर्यंतच त्यांची काळजी घ्यावी सेवा करावी. तेच खरे श्राद्ध. 👌🏻🌹
— सौ.रेखा पांडे. पुसद

अत्यंत भावुक आणि मार्मिक कविता आहे…कविता वाचताना चित्र डोळयांपुढे उभे राहत आणि आपसूकच डोळ्यात पाणी येतं.
— सौ. आश्लेषा गान. सातारा

वाड वडिलांना सुंदर शब्दात आदरांजली. चपखल शब्द रचनेची योग्य मांडणी.
— श्री. संजय पवार. खोपोली

शितल कविता खूप छान लिहिलंय आणि भावपूर्ण
— सौ. उज्वला दीले. अध्यक्ष कोमसाप

छान रचना व अर्थ
— सौ. जयश्री पोळ. लेखिका

शितल ताई छान हृद्यस्पर्शी कविता 👌
— प्रकाश राजोपाध्ये (कवी)

कविता खूप छान.
— डॉ. कटकदौंड (खोपोली)
— सौ. सुधा इतराज.

अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

जुन्नर पर्यटन क्षेत्र म्हणून नक्कीच चांगले आहे. मी स्वतः जुन्नर चा असल्यामुळे तेथील स्थानिक आणि भौगोलिक क्षेत्रातील बरीच माहिती आहे. जुन्नरची आणखीन एक खासियत म्हणजे महाबळेश्वर सारखे तापमान तिथे सुद्धा असते. अगदी उन्हाळ्यात सुद्धा दुपारचा वेळ सोडल्यास सकाळ आणि संध्याकाळ नेहमीच गारवा जाणवतो.
लेखामध्ये अतिशय सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
वनविभागाचा पाचशे पानांचा सविस्तर जुन्नर वरील इतिहास व पर्यटना बाबतीतील पुस्तक वाचण्यास नक्कीच आवडेल.
— सुधीर थोरवे. नवी मुंबई.

कवयित्री अरुणा गर्जे, यांची काक स्पर्श कविता मनाला स्पर्श करून जाते. कित्येक जणांचे आई वडील वृद्ध आश्रमात खितपत पडलेले आहेत. कोणासाठी आईवडील काबाडकष्ट करतात? सुशिक्षित लोकचं दिखाऊपणा करतात. जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा.
— कवी अशोक घोडके. पनवेल

🙏🌹🤎 भारतरत्न कैलासवासी लता मंगेशकर यांच्या घरी कै दिवाकर गंधे साहेबांबरोबर लता मंगेशकरांचे फोटो काढण्याचा मला योग आला. बराच वेळा गंधे साहेब मला फोटो काढण्यासाठी बरोबर घेऊन जात असत. गंधे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌹
— गिरीश देशमुख. निवृत्त शासकीय छायाचित्रकार, मुंबई.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९