नमस्कार मंडळी.
“वाचक लिहितात” या सदरात आपलं हार्दिक स्वागत आहे.
सध्या नवरात्र चालू असल्याने नवरात्रीची माहिती देणाऱ्या आणि अमेरिकेतील नवदुर्गा लेख माला पोर्टल वर प्रसिद्ध होत असून त्यांना वाचकांचा छान प्रतिसाद मिळत आहे.या बद्दल लेखिका अनुक्रमे पौर्णिमा शेंडे आणि चित्रा मेहेंदळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. गेल्या आठवड्यात प्राप्त झालेली वाचकांची पत्रे पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
पूर्णिमा शेंडे यांचा थोडक्यात पण महत्वाची माहिती देणारा *दुर्गेचं पहिलं रूप – शैलपुत्री माता* छान आहे .👍🙏
— सुनील चिटणीस. पनवेल
२
पूर्णिमाताईंनी सांगितलेली ..शैलपुत्री माता…माहिती छान आहे.
चित्राजींनी वर्णिलेली वसुंधराताई खूप कौतुकास्पद. अगदी खरे, आजच्या काळातील हीच नवदुर्गा… अष्टावधानी.. या वयात अमेरिकेत राहून ही सर्वांना जोडून ठेवणे, चॅनेल सुरू करणे, अभिवाचन करणे किती स्तुत्य आहे. अभिवादन ..धन्यवाद चित्राजी.
— स्वाती वर्तक. मुंबई
३
अमेरिकेतील नवदुर्गा – १
भारतात आणि भौगोलिक सीमा पार करून भारताबाहेरही सातत्याने विविध प्रकारे कार्यरत असणाऱ्या, समस्त महिलांना
‘बोलतं करून’ मैत्र जुळवून देणारया वसुंधराताईंचं व्यक्तिमत्व खरंच प्रेरणादायी असं !
‘वसुंधरा’ नावाला साजेसं व्यापक कर्तृत्व असणारया ह्या नवदुर्गेला
सादर वंदन ! 👏👏
चित्रा, अतिशय सुरेख अशा ह्या परिचय-लेखाबद्दल मनापासून धन्यवाद !
— अनुजा बर्वे. मुंबई
४
अमेरिकेतील नवदुर्गा वसुंधरा पर्वते – अमेरिकेत राहून सुद्धा ताईंनी अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केले. सध्या मन स्थिर होण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे. ताईंचा संपर्क क्रमांक मिळाल्यास नक्की द्यावा🙏
— संगीता मालकर. कोपरगाव
५
चित्रा मेहेंदळे यांनी त्यांना अमेरिकेत भेटलेल्या स्त्रिया, समाजासाठी काही ना काही चांगले बहुमोल योगदान देणाऱ्या भेटल्या. माझ्या मते ती सगळी दुर्गेची रूपं असावीत. वसुंधरा ताई झालेल्या पर्वते बाई आदर्शवत काम करीत आहेत, त्या राबवत असलेले उपक्रम वाचून माझा उर भरून आला. इतक्या दूर जाऊनसुद्धा आपल्या माणसांसाठी सुंदर उपक्रम राबवत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या उपक्रमांना माझा सलाम 🙏 त्यांच्या उपक्रमांना माझे स्वामी उदंड आयुः देवोत व अंगी बळ ही प्रार्थना.
— सुनील शरद चिटणीस. पनवेल – रायगड
६
अमेरिकेतील नवदुर्गा या सदरात “वसुंधरा पर्वते” यांचा परिचय वाचला.
त्या माझ्या मामी आहेत. तडफदार व्यक्तिमत्त्व, मनमिळाऊ स्वभाव, प्रचंड उत्साह म्हणजे माझ्या मामी. वसुंधरा पर्वते… या लेखनातील प्राची गुर्जर यांचा परिचय नुकताच “देणे समाजाचे” या कार्यक्रमात झाला होता.
— विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
माधुरी ताम्हणे यांच्या ‘माध्यम पन्नाशी’, भाग ९ वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
माधुरी ताईंचा लेख खूपच भावला. त्यांना मावस बहिणीची असूया वाटली पण गम्मत म्हणजे आज मला त्यांची वाटते की चक्क गो .नी त्यांना भेटतात .. लिहितात.. कथनशैली चांगली आहे. शब्द पुरेसे उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी अडावे थबकावे लागत नाही. मात्र या कथनशैलीला, शब्दसंपत्तीला आशय चांगला लाभला, तर याहून अधिक उजवी कथा लिहिली जाऊ शकते. विषयासाठी कुण्या देखण्या स्त्रीच्या आणि पुरुषाच्या प्रेमभंगाची किंवा विरहाची वाट पाहायची गरज नाही. किती किती नित्य नवे आणि मनास स्पर्शून जाणारे विषय भंवताली आपली वाट पाहत असतात. माय — लेकरांतले संबंध, धरित्री आकाशातलें नाते, चिरवैरिणी क्षुधा, नित्य नूतन निसर्ग, ऊन्ह आणि पाऊस, कोवळे दवबिंदू —- सांगावे तरी किती ? केवळ दृष्टी सदैव मोकळी ठेवायला हवी. मोकळी आणि अकल्पिताच्या स्वागतासाठी सिद्ध. तेवढे ते स्वागत करणे साधले, तर मग सारें साहित्य क्षेत्र नव्याच्या सत्कारासाठी सिद्ध आहे !
आप्पा दाण्डेकर १८.१२.७४ किती सुंदर..खरा आशीर्वाद मिळाला आहे त्यांना..
खूप कौतुक वाटले. आवडला लेख.
— स्वाती वर्तक. मुंबई
२
खूप छान शब्दांकन. गो नी दांडेकर यांच्याकडून कौतुक होणं म्हणजे अभिमानास्पद गोष्ट. 👍👍
— अजित महाडकर. ठाणे
३
लिहायची शैली छान आहे. आपण तिथेच हजर असल्यासारखे वाटते.
— विभा देशपांडे.
४
डझनभर वेळा कथा साभार परतीच्या शिक्कामोर्तबासह अस्विकृत होणे, खचितच नैराश्यजनक बाब. पण, “प्रयत्न करता वाळूचेही तेल गळे.. किंवा प्रयत्नांती परमेश्वर..!!” ह्या एका आशेपायी धीर न सोडता सातत्याने आपलं कार्य सुरू ठेवलेत.शेवटी देव आदरणीय गो.नी.दांच्या रुपात भेटला. खुपच प्रेरणादायक. अशाच आपल्या संयमी स्वभावातून आपली लेखणी बहरत गेली, हे निश्चित. त्यानंतर सुध्दा विविध क्षेत्रात आपलं लिलया भ्रमण हेच मोठं साध्य म्हणावं..
असेच लेखिका, मुलाखतकार व निवेदिका म्हणून आपल्याला यश लाभो.
— मो. र. अंजारीया. कळवा – ठाणे
५
“माध्यम पन्नाशी” ची घोडदौड छानच चालू आहे 👍👌👏
या लेखनमाले द्वारे तू एक pandora ‘s box उघडला आहेस.
— रश्मी मुल्हेरकर. जर्मनी
माझी जडणघडण भाग १८ अभिप्राय…..
१.
‘आजोळ’ शब्द कोणत्या वातावरणात घेऊन जातो, त्याच्या विरोधाभासातलं खरं आजोळ ‘पत्त्यासकट’ आणि स्वत:चा मुक्काम पोस्ट सांगून वातावरणातली तफावत आपल्या नेहमीच्या सहजसुंदर शैलीत राधिकाताईंनी मांडली आहे. नात्याचे नाजुक रेशमी बंध त्यांना आजोबांच्या शिस्तीतही जाणवले पण नंदा आणि गुरख्याच्या बायकोशी सलगी हा बालमनाने अव्यक्त दबावमुक्तिसाठी शोधलेला मार्ग होता असं वाटतं आणि घरी येऊन जिजीला मारलेली मिठी हे त्या अंतस्थ तणावमुक्तीवर शिक्कामोर्तबच म्हणायचं. पण नीर-क्षीर विवेक असल्यामुळे भोवतालच्या परिस्थितीतून शिकून राधिकाताई आपलं व्यक्तिमत्त्व घडवत गेल्या ज्याची छाप त्यांच्या लिखाणात दिसते.
— साधना नाचणे. ठाणे
२
जुन्या आठवणी जाग्या होतात, मजा येते
— डॉ. शुभदा कुलकर्णी. जळगाव
३
Radhika Tai tum chya aathavanincha sangrah wachun majhech man agdi बाbharaun gelya. Tumch aajol etak sunder aani likhan khoopch chhan.👌👌
— मीनाताई वाघमारे. अमसावती
४
राधिका ताई, तुझ्या लिहिलेल्या आठवणी वाचताना मी गुंग होऊन जाते ! माझंही आजोळ आणि वडिलांच्या कडील घर अगदी भिन्न होते ! आमचे बेळगाव ला आजोळी जाणे नेहमी चे असे. ते एक सांस्कृतिक, अध्यात्मिक ठिकाण होते. गोंदवलेकर महाराजांच्या पादुका घरात आहेत. त्यामुळे पूजा अर्चा जास्त ! आजीचे वास्तव्य होते.
वडिलांचे घर वेगळे होते. पाकिस्तान सोडून आलेली निर्वासित म्हणून आजी आजोबांचे कुटुंब कठीण परिस्थितीत रहात होते. दोन विरूद्ध प्रकारचे जीवन वडिलांच्या फॅमिली ने अनुभवले होते.
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
५
अतिशय सुरेख !
मला तर वाचताना खूप हसू येत होतं. सगळं चित्र कसं डोळ्यासमोर तरळत होतं.
— अरुणा मुल्हेरकर. मिशीगन
६
अप्रतीम !
— आरती नचनानी. ठाणे
७
खूप छान आठवणी… एकदम बोलक्या…👌👏
— नीलिमा खरे. पुणे
८
आजोबांचे घर
त्यांची तीन तत्वे
ट्राम, मऊ डांबरी रस्ते
असं सगळं वाचलं की
मुंबई तत्कालीन किती छान होती
आता …. ?
एकुणात जडणघडण खूप छान ….
— अरुण पुराणिक. पुणे
९
राधिका..
तुझ्याबरोबर तुझ्या आजोळची सफर करून आले.. नेहमीसारखे अतिशय योग्य शब्दात तू तुझे आजोळ डोळ्यासमोर उभे केले आहेस!! मला असे वाटते की बहुतेक एखाद्या दिवाळी अंकामध्ये तू यावर लिहिले होतेस का? ते मला वाचल्यासारखे वाटते आहे ..तर माझं काही चुकीचे इम्प्रेशन आहे हे मला आठवत नाही..
तू खरोखरच तुला लाभलेल्या या सांस्कृतिक, साहित्यिक अशा श्रीमंत वारशा बाबतीत भाग्यवान आहेस आणि या सर्वांचा तू तुझ्या आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आहेस .. कारण ते वातावरण त्या त्या वेळेला तू तुझ्या मध्ये सामावून घेतले आहेस असे मला वाटते ..तुझे ते आजोळ माझ्या खूप डोळ्यासमोर आले ..मला कुठल्याच बाजूचे आजोळ नव्हते.. पुणे सोडून सुद्धा मी कुठल्या कधी खेडेगावांमध्ये गेलेले नव्हते.. त्यामुळे मला सर्वच गोष्टींचे खूप अप्रूप वाटते. तुझी सर्व कथन करण्याची शैली फार सुंदर आणि मनाला भिडणारी आहे हे निश्चितच!!! तुझं जडणघडण वाचताना सुद्धा नकळत माझ्या लहानपणच्या जडणघडणीचा मी धांडोळा घेत राहते..
— सुचेता खेर. पुणे
१०
माझे आजोळ … अतिशय सुंदर पुन्हा एकदा भूतकाळात नेऊन ठेवणारा लेख…या लेखातून त्या काळाच्या मुंबईचे वर्णन वाचून खूप छान वाटलं … कारण असं कधी मुंबई ऐकण्यात आलेलेच नाही.. आजोळ आणि आजोळ्यच्या गमती जमती.. आमचं सुद्धा व्हेकेशन म्हणजे आजोळच असायचं… महिना महिना तिथेच अगदी तुमच्यासारखंच… पण आमचा प्रवास खूप मोठा असायचा.. आणि मजेशीरही ..त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यासमोर आल्या ..खूप सुंदर लेख …तुमचे प्रत्येक भाग वाचायला खूप मजा येते.. डोळ्यातून अश्रु आमच्याही ओघळतात..
लहानपण आणि मोठेपण यातलं अंतर …खूप छान तुम्ही व्यक्त झालात.. खूप सुंदर लेख.. माझे आजोळ
— मानसी म्हसकर. अहमदाबाद
११
आजोळच्या किती आठवणी आपल्या मनात घर करुन राहतात.
तुझ्या आजोबांचं व्यक्तिमत्व खूप छान रंगवलं आहेस. त्यांची शिस्त,
वक्तशीरपणा, वस्तू जागच्या जागी ठेवणं. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील असेच शिस्तप्रिय होते आणि आईची आई (माझी आजी) पण.
मुंबई, नाना चौक, शेट्टीची भेळ —
मी पण त्या भागात काही दिवस राहिले, फिरले आहे. खूप छान वर्णन केलं आहेस.
आता आपण आजी झालो आहोत. आपली नातवंडे अशाच आजोळच्या आठवणी मनात जपतील, नाही का ? आपली जबाबदारी कमी होण्याऐवजी वाढली आहे असं वाटू लागलंय. खूप छान ! 😊🌹💕
— अनुपमा आबर्डेकर. मुंबई
१२
खूपच छान “आजोळ” आठवणीने सर्व लिहिले आहे.
छान लिहिले आहे राधिकाताई. 👌
— छायाताई मठकर. पुणे
१३
खूप सुंदर वर्णन.
— सुमेधा काळे. चेंबूर
१४
आपल्या या जडण घडणात ज्येष्ठांचा व जवळच्या नातेवाईकांचा इतका मोठा वाटा आहे .जो आजच्या काळात फार दुर्मिळ आहे. आपण खरच भाग्यवान कि आपल्याला खूप कांही शिकायला व अनुभवायला मिळाले .तुझ्या या लेख शृंखलामुळे जुन्या पिढीला भुतकाळातील रम्य व मजेशीर आठवणीचा आनंद तर नव्या पिढीला कांही तरी बोध घेण्याची संधी मिळत आहे. असेच लिहीत राहा. अनेक शुभेच्छा !
— रेखा राव. विलेपार्ले
१५
आजोळचं वर्णन वाचून तिथलं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. त्यामुळेच लेख वाचनीय होतो. खूप छान.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे
अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
मुलींनी मोबाईल मधून बाहेर पडावे हा विचार आवडला.खरोखर स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची गरज आहे. अंतःस्फूर्ती पाहिजे. मो.मधून डोके बाहेर काढून आजू बाजूच्या यशस्वी
लोकांकडे पाहायला पाहिजे.
— सुलभा गुप्ते. इजिप्त
२
देवैंद्रजी, मला वाटतं “वाचक लिहितात” या विषयावर एक चांगले पुस्तक आपण कुशलतेने प्रकाशित करू शकाल! इतके विविध विस्तृत प्रतिक्रिया त्यात दिसतात. संपादन करतांना मात्र एकेकाचे एकत्रितपणे आपण चतुरस्तपणे लेख देऊ शकाल. फक्त या संदर्भात आपले प्रदीर्घ मनोगत पुस्तकात आवश्यक आहे..हे आगळेवेगळे पुस्तक तयार होईल असे सुचवावेसे वाटते..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
३
रेषांमधली भाषा अतिशय बोलकी आहे .अभिनंदन श्री शैलेशजी. मन सुन्न होते अशी कविता वाचताना. शब्द मुके होतात. धोरण..कुठवर आलं गं बाई…चे शीर्षकच अत्यंत बोचरे सत्य आहे. असे धोरण आखणारे प्रथम राज्य पण..एखादे धोरण कितीही उत्तम असले तरी सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती, प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सहभाग यातूनच त्याचे अपेक्षित परिणाम घडवून येऊ शकतात ..हे अगदी खरे आहे. तोरणेजींना धन्यवाद. चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल.
अरे पेन्शन पेन्शन खूपच आशावादी कविता. बहिणाबाईंच्या ओव्यांचा सुंदर उपयोग.. फक्त एक ओवी जशी च्या तशी ठेवली..का ? मेजर चव्हाणजीची आवडली कविता.
— स्वाती वर्तक. मुंबई.
४
भुजबळजी, ध्येयनिष्ठ मुलींना मोलाचा सल्ला दिला आहात आपण, जो मुलींनीचं नाही तर मुलांनाही मनःपूर्वक जपला पाहिजे. आजकालची युवापिढी मोबाईलच्या इतकी आहारी गेली आहे की त्यामुळे अनेक संकटेही ओढवून घेत आहेत. उत्तम सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद. 👍
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई
६
‘अरे पेन्शन पेन्शन’ विडंबन काव्य रचना खुप छान.
रेषांमधली भाषा ज्ञातांपासून अज्ञांतापर्यंत खूप वास्तववादी रचना. काहीतरी आगळेवेगळे.
— अरुणा गर्जे. नांदेड
७
तुमचा अनुताई वाघ यांच्यावरचा लेख खूप आवडला.
— सौ सुलोचना गवांदे.
कॅन्सर संशोधक, अमेरिका.
८
आपला मराठी अभिजात दर्जा मिळाला .पुढे काय ? खरोखर विचार करण्यासारखाच लेख आहे धन्यवाद. पूर्णिमा शेंडे यांचा ब्रह्मचारिणी माता बद्दल लिहिलेला लेख उपयुक्त. छान माहिती यंत्र वगैरे सह. पूर्णिमा कऱ्हाडे निःसंशय वंदनीय आहेत. या वयात वेगवेगळे उपक्रम करणे… soul food च्या नावे प्रसिद्धीस पावणे ..तेथील स्थानिक लोकांनी ही त्यांच्या समस्या ओळखून मदत करणे सारेच कौतुकास्पद.. खरीच नवदुर्गा शोधली आहे चित्रा ताईंनी…धन्यवाद.
श्री ओकजींचा भाग ८ असाच वाचनीय आहे .. छायाची बुद्धिमत्ता, आजोबांचे नाटक, कॉलेज मधील ..तरुण तुर्क सारे डोळ्यासमोर उभे राहते. साधे सोपे रसाळ वर्णन. अभिजात मराठी वरील कविता आवडल्यात. श्री खोपडे, शर्मा, म्हात्रे आणि आठवले साऱ्यांचे अभिनंदन.
अर्चनाजी आणि किरण केंद्रे यांचे लेख साजेसे…कालच रात्री श्री रंगनाथ पठारेजींची मुलाखत बघितली..हा दर्जा मिळाल्या नंतर काय फरक पडेल यांचे उत्तम उत्तर …जो पर्यंत सारेच त्या साठी प्रयत्न करीत नाही कठीण आहे .आपल्यालाच आपल्या भाषेचे सोयर सुतक नाही त्यामुळे खालावतो दर्जा…शाळा बंद पडतात..आता आम्हा सामान्य नागरिकांचे ही कर्तव्य आहे ते टिकवून ठेवण्याचे.
चित्राताईंचे हे वाक्य १००% खरे आहे. “मुख्य असते जीवनाशी नाळ जोडली जाणे. इथे राहायचे तर त्याची समज असली पाहिजे. त्यांचे व्यवहार, समाजात वावरताना भाषा, पद्धती खूप वेगळ्या. इथे सगळ्या देशातले सगळे लोक, आपल्या त्यांचे खानपान, बोलण्यावागण्याच्या पद्धती याचा परिणाम शहरांवर, गावांवर असतो.हे लोक आपल्याशी संवाद साधताना विचारतात, तुमचे काय असते हो विशेष ? तुमची भाषा, संस्कार, तत्व काय ? मग आपल्या भारतीय धर्म आणि संस्कृती चा वारसा सांगणे आणि पाळणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले…”
ते सर्व सांभाळून असे योगदान देणे खचितच अभिमानास्पद.. धन्यवाद चित्रा ताई…खऱ्या दुर्गा शोधण्यासाठी.
चंद्रघंटा..हे तिसरे रूपही छान.. पूर्णिमाजी
अनिसा आपांची कविता खूप सुंदर आहे ..अभिनंदन.. मी ही व्हाट्सएपवर अग्रेषित करु शकते का ? अर्थात त्यांच्या नावासह.
— स्वाती वर्तक. मुंबई.
९
“माहिती”तील आठवणी — २८
“अभिजात दर्जासाठी माहिती खात्याचे योगदान”
हा किरण केंद्रे आणि अर्चना शंभरकर यांनी लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800