Thursday, December 5, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…. या सदरात आपलं स्वागत आहे.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)


“६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सवलती लागू कराव्यात”..ही मा. देवेंद्र भुजबळ यांनी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे आणि शासनाकडून त्यावर त्वरित शिक्कामोर्तब होणे तितकेच आवश्यक आहे.
— राधिका भांडारकर. पुणे

देवेंद्रजी, नमस्कार ! 👏
डॅा. पांढरीपांडे सरांचं “जंगल मंगल…” हे रूपकात्मक लेखन खूप भावलं.
— अनुजा बर्वे. मुंबई

सर्व लेख कविता 👌👌 शशिकांत ओक यांचा लेख ह्रदयस्पर्शी 👍👌👌✍️
— अरुणा दुद्दलवार. डिग्रस

सरदार पटेलांचा पुतळा आणि इतर फोटो ..केवडियाचे वर्णन भावले.. आम्ही देखील बघून असेच भारावलेल्या अवस्थेत परतलो होतो ..माझी सहा वर्षांची नात सुद्धा इतकी भारावली होती की तिने लगेच चित्र काढले… या सर्व आठवणी दाटून आल्यात. आभार स्वाती ताई.
हा वेगवेगळ्या पत्त्यांचा धनी आमच्या मनात घर करून बसलाय हे प्रशांतजींचे वाक्य अतिशय बोलके आहे ..
खरे आहे …पार्किंन्सन झाले असतानाही विनोद बुद्धी कशी तल्लख होती हे माझ्या भावाने ही अनुभवलंय ..त्याच सुमारास तो अरुण दाते यांच्याबरोबर त्यांच्या घरी गेला होता .. त्यांना विचारले होते .. मग, आजकाल काय चालले आहे ?..ते उत्तरले…काही नाही, जरा कत्थक  शिकतोय ..
विंग कमांडरजींचा आजचा भाग अतिशय थरारक आणि भावविव्हळ करणारा आहे ..
आयुष्याला गती कशामुळे आहे .. उंच भरारी का घ्यायचीय असा छानसा संदेश देणारी भिडेजींची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई.

माधुरी ताम्हणे यांच्या “माध्यम पन्नाशी” (भाग तेरा) वरील प्रतिक्रिया …


आजचा हा लेख प्रत्यक्ष अनुभवावर नसला तरी त्यातून जाणवलेल्या मनांत उमटलेल्या भावनेवर असल्याने जरा वेगळा वाटला. अवघडलेपणाची कंपने हा चांगला शब्द आहे आणि आठ रिस्टर चा भूकंपाचा धक्का !
— आरती कदम. संपादिका, चतुरंग पुरवणी लोकसत्ता.

छान लिहिलं आहे. अनुभव टिपणे नंतर स्मरण आणि मांडणी सगळं छान !
— नेहा खरे. प्रमुख निर्माती,
आकाशवाणी मुंबई केंद्र

माधुरीताई तुम्हाला खरच सलाम !
— मीनाताई कुर्लेकर. वंचित विकास संस्था, पुणे

वाचनीय आणि विचार करायला लावणारं लिखाण पाठवल्याबद्दल आभार.
— श्रीरंग सामंत. लंडन

माधुरी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम! मला खरंच नवल वाटतं की फुलपाखरांच्या दिवसात, ऐन तारुण्यात समाजातील वंचित घटकांचे मनोगत  जाणून घेणे, ते लोकांसमोर आणणे आणि त्यांच्या समस्या दूर करण्याचे काम तू केलेस. थोडे थोडके नाही तर गेली ५० वर्ष हे काम सातत्याने करतेस धन्य तुझी. मी लोकसत्ताचे तुझे सगळे लेख वाचलेत. त्यात तू त्यांची किंव कधीच केली नाहीस. तर त्यांना सहाय्य करण्यासाठी जीवाचा आटापिटा केलास. तु ज्या कळकळीने लिखाण केलेस त्यामुळे समाजातील वंचित घटकांना सहाय्य करणारे हात पुढे आले. आमच्यासारख्या सामान्य लोकांचे डोळे उघडलेस. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पुढील आयुष्यात या तुझ्या कार्यात असेच भरभरून यश तुला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
— शामा प्रदीप कुलकर्णी. ठाणे

NAB या अंधशाळेला तुम्हाला आलेला निराळा अनुभव खरोखर मन उजळवून टाकणाराच होता. बाह्य ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील गोरगरीब, वंचित, उपेक्षित व्यक्तींच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे त्यांच्या आयुष्याची तुम्हाला जवळून ओळख झाली. त्यामुळे तुमच्या ऐन उमेदवारीच्या काळात आलेले हे अनुभव आयुष्यभर मानसिक आणि भावनिक धक्के सोसण्यासाठी तुमचं मन सक्षम करीत गेले आणि तुमचा माणुसकीशी सुसंवाद होत गेला हे खूप महत्त्वाचे घडले. हे सगळे अनुभव तुमची पुढची कारकीर्द समृद्ध करीत गेले यात काहीही शंका नाही. तसेच विविध माध्यमांद्वारे कार्यक्रम केल्यानंतर मिळालेल्या मानधनातून आपल्याला शक्य होईल तितकी मदत कोणत्याही सेवाभावी संस्थेला करण्याची आपली कृती स्तुत्य आहे.
— मनीषा ताम्हणे. गोरेगाव

अत्यंत सुंदर उपक्रम
— अशोक मुळे. डिंपल पब्लिकेशन, वसई

खूप प्रेरणादायी लेख
— अनुराधा चौधरी. कोल्हापूर
  ९
फारच हृदयस्पर्शी आणि सरळसोट सत्य मांडल आहे आपण !
— नंदिनी गोरे. ठाणे
१०
खूपच छान अनुभव लिहिले आहेत. महाराष्ट्र सेवा संघ”या संस्थेत पण दृष्टीसेवेची अभ्यासिका आहे. आम्ही ग्रंथालयाचे सभासद ते काम पाहतो. मी खूप आधी त्यांना सायन्स, इंग्लिश, मराठी शिकवत असे. खूप वेगळा अनुभव मिळतो त्यांना शिकवताना !
— मेधा देव (कार्यवाह)
मैत्रेयी विभाग, महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
११
खरंच किती वेगळा अनुभव ! माधुरी तू अगदी मनापासून तळमळीने लिहिले आहेस !
— प्रा. नीला पट्टेकर.
१२
मला तुमचे असे लेख नेहमी पाठवत जा. असं लिखाण वाचायला मला खूप आवडतं.
— मृणाल दीक्षित ठाणे
१३
खूप छान शब्दांत त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली आहे.  
— अजित महाडकर. ठाणे
१४
माध्यमांच्या द्वारे समाजाकडे बघण्याची, अनुभवण्याची आणि समरसून जाण्याची एक नवीन दृष्टीच मिळते. तुमच्या या कार्याला सलाम !
— सुधीर ताम्हणे. पुणे
१५
खूपच छान ! मनाला लेखन भावले.
— आशा शिंदे. पुणे
१६
खूप छान लेखन !
— जयश्री साने. ठाणे
१७
वा छान लिहिलय मस्त !
— सुरेखा देशपांडे. ठाणे
१८
खूप छान लेख !
— सोनाली चिटणीस. ठाणे
१९
बढीया ! खूप सुरेख कलाकृती !
— जयश्री परब. मुंबई
२०
खूप सुंदर अप्रतिम अनुभव
— प्रिया मोहिते. ठाणे
२१
सुंदर लेख !
— श्रीकांत खानोलकर. ठाणे
२२
wonderfully written. Too good!
— प्राची प्रसाद प्रधान. माहीम
२३
very nice contents and presentation. Good work and thinking. All the best for all your future work.
— शामला माळी. ठाणे
२४
very well articulated
  — प्रकाश चव्हाण. मुंबई

‘कॅनडा : एक सौंदर्यानुभूती’ या प्रियांका शिंदे जगताप,कॅनडा यांच्या अभ्यासपूर्ण, ललित लेखावर पडलेला हा अभिप्रायांचा चिंब पाऊस…
यांतील श्री. विनय पारखी सरांचा अभिप्राय अवश्य वाचावा. सविस्तर व हृदयस्पर्शी असा आहे.


मुक्तहस्त लेखिका सौ. प्रियांका शिंदे-जगताप यांना मानाचा मुजरा,
दूर आभाळाच्या देशात पऱ्या राहतात, त्या नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतात आणि त्या तिथे राहून आपलं वेगळेपण जपतात, असं ऐकलं होतं. त्याचा प्रत्यय साहित्यिका सौ. प्रियांका शिंदे जगताप यांचा ‘कॅनडा: एक सौंदर्यानुभूती’ हा लेख वाचताना आला. आपल्या मुक्तहस्तानं त्या मराठी भाषेत इतकं छान लिहितात, हे वाचून खूप खूप आनंद झाला.

तिथे बारमाही बरसणारा कॅनडाचा ‘नायगारा वॉटरफॉल’ असो किंवा कॅनडातील ‘पानगळीचा ऋतु’ असू देत, तिथे आपल्याला जाणवतं ते म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली तेथील रंगांची उधळण. मग मोठाले वृक्षंही त्याला अपवाद कसे असतील ? ते तर निळ्या आकाशाच्या विरोधात रंगीबेरंगी सोनेरी रंगांचे मुकुट परिधान करून जणू आपल्याला सोनेरी शरद ऋतु आल्याची नांदी देतात. अशा देशात त्या राहतात. त्या स्वतः गुणी, अभ्यासू व चतुरस्त्र लेखिका आहेत, याचा प्रत्यय त्यांचा लेख वाचताना आपल्याला जाणवतो.

आपल्या मराठी भाषेचा, आपल्या संस्कृतीचा आधार घेत त्यांनी त्यांच्या शब्दांत मांडलेले पाश्चिमात्य देशाचे एवढे चांगले वर्णन, अर्थात तेथे त्यांना आलेली त्या देशाची सौंदर्यानुभूती याचे इतके चांगले वर्णन दुसऱ्या कोणाला करता आले असते, असे मला वाटत नाही. त्यांनी ऋतुंपासून केलेली सुरूवात शेवटी महिने आणि दिवसांपर्यंत येऊन पोहोचते. तसेच तेथे असलेली भौगोलिक परिस्थिती, तेथे साजरे होणारे धार्मिक, सांस्कृतिक सण-उत्सव, हॅलोविन, थॅंक्सगिव्हिंग सारखे दिवस, ऋतुंप्रमाणे तिथल्या हवामानात होणारे बदल, तिथल्या झाडा-फुलांची माहिती त्याच बरोबर त्यांनी केलेले तिथल्या प्राकृतिक सर्जनशीलतेचं वर्णन मनाला आनंद देऊन जातं. वृक्ष आणि मानव यांच्यात असलेले जीवनचक्रातील साम्य यांची योग्य प्रकारे सांगड घालत त्यांनी केलेलं विधान “माणसाप्रमाणे निसर्गही नियतीचा फेरा चुकवू शकत नाही, परंतु पानझडीमुळे निःष्पर्ण झालेले वृक्ष नवसर्जनाची पालवी पुन्हा अवतरेल, या आशेवरती तसेच तेथे ठाम उभे राहतात ते पुन्हा नव्याने बहरण्यासाठी.” हा त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास मानवाच्या मनाला निश्चितंच उभारी देतो. त्यांना तेथे आलेल्या अनुभवाचे पुनःशोध घेत त्याची लालित्यपूर्ण मांडणी करून केलेलं लिखाण आपल्याला कॅनडाची घरबसल्या फुकट सैर करवतो.

आदरणीय लेखिका प्रियांकाजी यांची लेखनकला अशीच सदैव बहरत राहो; तसेच माता सरस्वतींचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी राहो, हिच सदिच्छा व त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…!
— श्री. विनय पारखी
(साहित्योपासक, सर्जनशील लेखक)

केवळ अद्भुत, अप्रतिम लेखन ! निसर्ग, ऋतु बदलांवर इतके प्रभावी लेखन माझ्यातरी दुसरे वाचनात नाही. छायाचित्रे डोळ्यांचे पारणे फेडतात, तर लेख वाचताना एक विलक्षण आनंद मिळतो. आपण ते सारे अनुभवता म्हणून अभिनंदन ! शब्दरूपाने व छायाचित्रांमार्फत आमच्या पर्यंत पोहोचवता त्याबद्दल आभार.🙏
— श्री. मनमोहन रोगे.
(कवी, लेखक, मुक्त पत्रकार)

खूप छान लेखन. कॅनडातील रंगबेरंगी ऋतुचं जगंच आगळं-वेगळं आहे, जे मनापासून आवडलं. किती सुंदर लेखन केलं आहे. बारकाईने टिपलेलं कॅनडाचं सौदंर्य-वर्णन भावलं. अप्रतिम !
— श्री. रोहिदास बापू होले. दौंड
(कृषक, प्रगल्भ कवी, लेखक, ‘शब्दांच्या गर्भात’ या कवितासंग्रहाचे जनक)

‘ऑटम’ ऋतुबद्दलची सखोल माहिती चित्ररूपाने अधिकच आकर्षक वाटते. तसेच या पानांचा उगम, जडणघडण, अवस्था इ. ची माहिती या लेखातून समजली. कॅनडाला लाभलेल्या सांस्कृतिक वारसाच्याही बऱ्याच गोष्टी ज्ञात झाल्या. संपूर्ण लेख वाचला की नक्कीच कॅनडाच्या विविधांगी निसर्गसौदर्यांचं आपसूकंच दर्शन मनोमन घडतं. खरचं खूप छान माहिती दिली. अत्यंत सखोल, विस्तारीत स्वरूपात लिहलंय ग.🙏
— सौ. संगिता महिरे साळवे, नाशिक
(उपक्रमशील शिक्षिका, कवयित्री, लेखिका)

‘कॅनडा : एक सौंदर्यानुभूती’ या लेखातून विविध प्रकारची खूप छान माहिती मिळाली.
— श्री. नागेश सू. शेवाळकर.
(सेवानिवृत्त मुख्याध्यापक, कादंबरीकार, चरित्रकार, बालसाहित्यिक, विनोदी कथालेखक)

(भ्रमणध्वनी प्रतिसाद)
प्रियांका, खूप सुंदर लेखन केलं आहेस. छायाचित्रे हृदयस्थ भावली. लेख तर वाचनीय झालाच आहे, परंतु सोबत रंगीबेरंगी छायाचित्रांना समाविष्ट केल्यामुळे लेख वाचताना उदंड आनंद मिळतो.
— डाॅ. प्रफुल्लताताई सुखटणकर. कॅनडा
(साहित्यिका, आकाशवाणी कलाकार, नृत्यांगना, सामाजिक कार्यकर्त्या)

प्रियांका ताई खूप सुंदर लालित्यपूर्ण वर्णन!💐
— सौ. शामला पंडित दीक्षित.
‘प्रणाली प्रकाशन’ (शामलाक्षरी काव्यनिर्मितीकार, लेखिका)

खूपंच सुंदर असं वर्णन केलं आहे. अप्रतिम! तुम्ही त्या देशात राहता, किती सुखावह! अलभ्य लाभ मलाही मिळाला.👌
— सौ. अलका जगताप. मुंबई
(कालसुसंगत वाचक, साहित्यप्रेमी)

Wah, Kya baat !
Aptly written and beautiful pictures👌
— सौ. नेहा भागवत. मुलुंड
(वाचक, साहित्यप्रेमी, कलोपासक)
१०
किती सुंदर!👌❤️
— सौ. शुभांगी पानसरे (वाचक, साहित्यप्रेमी)
११
खूप सुंदर फुलांची माहिती
— शुभदा (वाचक, साहित्यप्रेमी)

आजचा अंक अतिशय वाचनीय, भावनिक व सुंदर आहे
सुलभा ताईंच्या मैत्रिणीने सांगितलेली .. रिकामी झोळी ..सत्यकथा ..मातृत्व मिळून ही बाळ बघता न येणे असहनीय परिस्थिती .. चटका लावून जाणारी कथा.
प्रतिभा ताईंनी चुनखडीची गुहा …बद्दल छान माहिती दिली आहे.. विडिओ पण उपयुक्त ..बघितला.. मगरी चा परिच्छेद अंगावर शहारे आणणारा.
डॉ आठल्ये यांची कविता अशीच.. भावना उसळून येणारी… हृदयद्रावक… आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

राधिका भांडारकर यांच्या, माझी जडण घडण भाग २२ अभिप्राय.


छान आठवणी!
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

किती सहज घडाघडा लिहीलं आहेस.
त्यांच्या हातचं लिंबाचं सरबत आणि साखर घातलेली साबूदाण्याची खिचडी मी कधीच विसरणार नाही.
आई नसली तर त्या माझ्या लाबसडक वेण्या घालायच्या अजिबात न दुखवता गुंत काढायच्या.
ही पिढी स्वतःसाठी जगलीच नाही.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

Khupach chhan
— पूनम मानुधने. जळगाव

अप्रतिम
— अस्मिता पंडीत. पालघर

माझी जडणघडण चे  सगळे लेख  मी वाचते. खूप छान व उद्बोधक आहेत.
— प्रज्ञा मिरासदार. पुणे

वहिनींचे व्यक्तीचित्र खूप छान रंगवले आहेस. बेताच्या परिस्थितीत संसार सुखाचा करणाऱ्या समाधानी वृत्तीच्या अन्नपूर्णाच होत्या त्या.
खरंच अशी माणसं हल्लीच्या काळात विरळा. ती पुन्हा पुन्हा जन्मावीत असं वाटतं.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

खूप छान “वहिनी”
लिहिलेले सर्व जिवंत होऊन नजरेसमोर आले. खूपच जिवंत शब्दचित्र.
सर्वांना शब्दाच्या माध्यमातून तुम्ही जिवंत केले आहे, राधिकाताई.
— छायाताई मठकर. पुणे

त्या वहिनी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या, इतकं सुंदर शब्दांकन आहे.
👌👌👌🙏
— अजित महाडकर. ठाणे

बिंबा, (राधिका) “वहिनी”वाचताना अंगावर शहारे येत होते, त्यांचा स्पर्श, त्यांचा चेहरा सारखा आठवत होता. गोतावळा संभाळून त्यांच्या चेहर्‍यावर कधी आठी पाहिलेली आठवत नाही. त्यांची एक शेवटची आठवण सांगते. श्रावणी सोमवार होता, मी त्यांच्याकडे गेले होते. वहिनींना विचारले कशा आहात ? मंदस्या हसल्या. दिलीप म्हणाला, वारकरी विठ्ठल विठ्ठल करतात. आमची आई कुम्ला कुम्ला करते. त्या खूप आजारी होत्या. सारखं कुम्लाकडे अॅडमीट व्हायला लागायचे. शरीर पार वाकले होते, पण त्यादिवशीही त्या बाबासाहेबांसाठी काकडीची पछडी करत होत्या, विळीवर कापताना हात थरथरत होते, पण बाबासाहेबांचा उपास होता म्हणून त्या उठल्या होत्या, दम लागत होता, पण त्यानी केली ती पछडी ! आणि काय सांगू ? अप्रतिम चव होती त्याला ! अशा व्यक्ति परत होणे नाही, संसासात राहून कधीही ऐहिक गोष्टींचे आकर्षण वाटले नाही. खरी संत माणसे ! किती लिहावे ? शब्द अपुरे पडतात ! हा लेखही अप्रतिम !
— आरती नचनानी. ठाणे. (प्रत्यक्ष वहिनींच्या सहवासातील  एक व्यक्ती)
१०
अतिशय सुरेख !
मला तर वहिनी वाचताना भरून आलं अगदी !
त्यांचं नाव होतंच गुलाब.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
११
सातारचे बापूसाहेब ही एक असामी …. साहित्यप्रेमी. त्यांची लाडकी कन्या म्हणजे वहिनी. त्यांचे ही आपल्या पित्यावर निस्सीम प्रेम. सासरी गणगोताच्या गराड्यात नेहमी जुंपलेली. अशी ही वहिनी सुंदर. पण, दिवस आणि रात्रीची टोक सांभाळताना दमछाक झाली, त्या सौंदर्याची. साक्षात अन्नपूर्णा असणारी वहिनी म्हणजे डगमगत्या नौकेतून हसतमुखाने सोबत करणारी नौकेची वल्ही.
सहधर्मचारिणी अशीच असावी.

*वहिनी* वाचताना मला माझ्या सहधर्मचारिणीची आठवण तीव्रतेने झाली.
सुंदर असे, *व्यक्तिमत्व* वाचावयास मिळाले याचे मानसिक समाधान आहे.
— अरुण पुराणिक. पुणे
१२
मस्त वहिनी.
— निलांबरी गानु. राजगुरुनगर
१३
Chan sadhi simple katha Avadli  mala वहिनी.
— जयश्री कोतवाल. पुणे

— टीम एन एस टी.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !