नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…या सदरात आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून सर्व जण वाट बघत आहे, ते “कौन बनेगा मुख्यमंत्री ?” याची. असो.
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया..
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
मृदुलाताईंचा लेख सद्य स्थिती, प्रसंगानुरूपच आहे … आपल्या मुलांना इंटरनेशनल शाळेत शिकविणारी, मुलांना शिकवूच न शिकणारी .. ही तफावत ….बालदिन हा बालदीन वाटू नये अशी परिस्थिती लवकर यावी ….छान लिहिलेय.
राधिकाताईंच्या जडण घडणीचा २५ वा संगीत विषयक भाग नेहमीप्रमाणे वाचनीय.., फडके बाईंची स्नेहल मृदू वागणूक, कठीण वाटणारे संगीत भावनिक शब्दात मांडली आहे ..
— स्वाती वर्तक. मुंबई
२
श्रेयसचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन.
मतदारांना जागरूक करणं हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. ते सुजाणपणे श्रेयसने पार पाडलं हे निश्चितच स्तुत्य आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
३
“ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक”..
अतिशय सुंदर माहिती आहे. हो. नक्कीच..ग्रंथालयांनी बदललं पाहिजे 👍🏻यालाच आम्ही संदर्भ सेवा देणे असे म्हणतो. धन्यवाद.
— ऋतुजा केळकर
ग्रंथपाल, नाथ पै सेवांगण संचालीत सानेगुरुजी वाचन मंदिर, हे मालवण.
४
ग्रंथालयांनी बदलणे आवश्यक 👌…
— गणेश डांगरे. नगर
माझी जडणघडण भाग २५ अभिप्राय….
१
छान लिहिलंय ! माझा चित्रकला विषयाबाबतचा अनुभवही असाच
आहे ! कधी एकदा दहावी संपेल आणि चित्रकला हा विषय जाईल याची मी अगदी वाट पहात होते ! बाकी सर्व विषय चांगले होते, पण ड्राॅइंग विषय एक मात्र त्रासदायक वाटे..
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
२
खूपच टचिंग
असं स्वतातली कमतरता सांगायलाही खूप धैर्य लागतं, मनाचा प्रमाणिकपणा लागतो.
आपल्या गुरूबद्दल अपार आदर बाळगणारी आपली पिढी. आणि तसेच विद्यार्थाबद्दल आत्मीयता असणारे गुरू.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
३
आजचा संगीतावरील जडणघडणीचा भाग अतिशय सुरेख !
तुझ्यातील प्रामाणिकता, गुरूविषयीचा आदर या लेखात भरभरून ओसंडत असल्याचे दिसले.
संगीताने तुला जीवनात खूप काही शिकविले आणि दिले हा भाग विशेष पटला. तुझ्यातील विनोदी अंगही लेखात उमटलेले दिसले.
खूप छान !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
४
राधिकाताईंच्या जडण घडणीचा २५ वा संगीत विषयक भाग नेहमीप्रमाणे वाचनीय.., फडके बाईंची स्नेहल मृदू वागणूक, कठीण वाटणारे संगीत भावनिक शब्दात मांडली आहे ..
— स्वाती वर्तक. मुंबई
५
राधिका,
तुझ्या लिखाणामुळे एक जाणवले की आपल्या आयूष्यात कितीतरी व्यक्ती येतात, त्यावेळी जाणवत नाही पण त्यांचे आपल्यावर संस्कार
होत राहतात.
— आरती नचनानी. ठाणे
६
अतिशय सुंदर लेख.. संगीत हे माझेही क्षेत्र नाही.. चित्रही माझे तसे क्षेत्र नाही.. प्रयत्न करते.. हत्ती बनवायला सांगितले असताना उंदीर होतो.. परंतु तुम्ही जे काही सालंकृत संगीत विषयी लिहिले आहे ते खरोखर सुंदर अप्रतिम.. काही काही शब्द खरंच पहिल्यांदाच ऐकले…
एक अतिशय सुंदर विषय तुम्ही हाताळला आहे… सखोल वर्णन अप्रतिमच.. प्रश्नच नाही रागचा मला सुद्धा खूप राग येतो … कारण त्यातले काहीच कळत नाही..पण अतिशय उत्तम लेख.. खूप मजा आली वाचायला.
— मानसी म्हसकर. बडोदा
७
व्यावसयिक प्रशिक्षणाच्या बाबतीत विषय-निवडीबाबत राधिकाताईंच्या आणि माझ्या समस्या सारख्याच असल्यामुळे विषय सुरवातीला विनोदी वाटला. त्यांची न घेतलेल्या विषयांबद्दलची कारण-मिमांसा पण आमची तंतोतंत सारखी स्थिती असल्यामुळे सच्चेपणाची ग्वाही देणारी आणि विनोदी वाटली. पण जेव्हा त्यांनी
‘संगीत विषय’ आणि वरून ‘साधारण’ व्यक्तिमत्वाच्या फडकेबाईंच्या ‘ख-या’ व्यक्तिमत्वाला हात घातला तेव्हा त्यांची संवेदनशीलता बरंच काही बोलून गेली.फडकेबाईंचं बाह्यरूप आणि त्यांचं संगीताच्या संगतीतलं सौंदर्य, त्यांचा पातळ आवाज पण सफाईदारपणे एकेक सूर उचलणं, लयदार, गो-या बोटांचं सौंदर्य टिपणं खूपच भावलं. लेखात स्वत:कडे कमीपणा घेतला असला तरी जुजबी का होईना संगीताचं ‘ज्ञान’ आणि आनंददायी ‘कान’ आणि आयुष्याला मिळालेली ‘सुरमयी दिशा’ ही फार मोठी कमाई आहे.संगीताची आयुष्याशी घातलेली सांगड विशेष उल्लेखनीय. गुरुशिष्याचा ‘वारसा’ राखणं मग ‘क्षेत्र’ कोणतंही असो, अवघड असलं तरी पण ‘मान राखणं’ हा ‘सुसंस्कृतपणा’ आहे.हे सुसंस्कृत आणि संवेदनशील असणं हाच राधिकाताईंच्या सहज-सुंदर, परिणामकारक लेखनशैलीचा गाभा आहे.
— साधना नाचणे. ठाणे
८
राधिका ताई तुमची स्मरणशक्ती दांडगी आहेच पण तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी लिहिता तेव्हा ती व्यक्ती डोळयांसमोर उभी राहते. 👍👍
— अजित महाडकर. ठाणे
९.
नमस्कार राधिकाताई, अप्रतिम सुंदर !
व्वा ताई .. लेख असावा तर असा.
अगदी मनाला भुरळ घातली आपण.
जसजसा लेख वाचत गेले तसतशी अगदी आपणासोबतच मी ही त्यात समरस झाले.
एका निर्णयाने आपल्याला जीवनाचे संगीत उमगले .. व्वा काय सुंदर दृष्टिकोन !
आपला जीवनाकडे बघण्याची दृष्टीच अगदी निराळी आहे.
आपण केलेले वर्णन खूपच चपखल असं आलेलं आहे. म्हणजे क्लास मधलं वातावरण .. मी सुद्धा हे अनुभवलय.. मी ११ वीला असताना संगीत हा विषय घेतला होता. पण माझ्या घाबरटपणामुळे तो सोडला. आता हसू येतं.
रॅपीड फायर टेस्ट – मस्त!
टोटल फ्लॉप -😆😆
सारे सूर माझ्याभोवती गोंधळ -🤩
पण आपल्या जीवनातले संगीताचे अपार महत्त्व आपण खूपच सुंदर शब्दांत व्यक्त केलं आहे की हा लेख संग्रही ठेवण्याजोगा झालाय.
सुरमयी जीवन -🌹
आणि शेवट तर पूर्णपणे अनपेक्षित पण सुंदर असा झालाय.
— माधुरी वानखडे.
१०
बिंबा
बघता बघता तुझ्या जडणघडण लेख मालेचं पाव शतक पूर्ण झालं. नंतर पुस्तक नक्की काढ.
आपल्याला कल्पना नसते आपल्या जडणघडणीत किती जणांचा छोटा मोठा वाटा असतो ते ? तुझ्या स्मरणशक्तीची कमाल वाटते मला. बारीकसारीक तपशीलही तू सुंदर मांडले आहेत.
संगीत ह्या मथळ्याखाली तू माझ्याही त्या तिन विषय निवडींना उजाळा दिलास. आम्ही सर्वसाधारण मुली आपल्या राजेबाईंच्या हाताखाली चहाचं आधण उकळवायचो. पोह्यासाठी खसाखसा नव्हेतर कसाबसा कांदा चिरायचो. तुम्ही सगळ्या हुशार मुलींनी गाणं घेतलं होतं. आता प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही🤷♀️ तुझा आवाज जरासा घोगरा आणि ठसठशीत ….तर आम्ही म्हणायचो …बिंबानी गाणं कसं घेतलं ? आवाज कुठे मंजूळ आहे तिचा ? पण हा लेख वाचल्यावर कळतंय तुला संगिताची किती जाणं होती ते 👍🏼 त्यावेळी नांवं ठेवण्याबद्दल आज sorry हं बिंबा. 🙅🏻♀️
फडके बाई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. हुबेहूब वर्णन केलंयस.
तुझा प्रत्येक लेख वाचला जातोच असं नाही ग. सवडीनुसार वाचते. रागवू नकोस हं.
— अलका वढावकर. ठाणे
मी तीन ही अंक वाचलेत
माधुरी ताम्हणे यांचा लेख उत्कृष्ट..सुहासिनीं मुळगावकर खरेच अद्वितीय स्त्री!
रश्मीताईंनी सागितलेली निकिटाची कथा प्रेरणादायी आहे
नयनाजींची कविता उत्तम.
शिल्पा यांची कथा वाचून नतमस्तक व्हायला झाले..अदम्य चिकाटी, आत्मविश्वास याचे बोलके उदाहरण.
करदकर काकूंची कथा ही तशीच या सर्व कार्यमग्न असणाऱ्या व्यक्ति यांच्या कडून खरेच शिकण्यासारखेच आहे.. मनीषा पाटील धन्यवाद.
प्रा पांढरी पांडे यांनी हाडाचा शिक्षक वाचून भारावल्यासारखे झाले. मी आतल्या आत रडायला शिकलो आहे
जयंत ओक वाचून माहीत होते पण त्यांची कथा त्यांच्या कलागुणांबद्दल सांगून दिपवून टाकते या खऱ्या हर हुन्नरी कलाकाराला आमच्या ही ७५ च्या शुभेच्छा.
द इंडियन्स या बृहदग्रंथाचा धावता आढावा वाचनीय आहे ..संग्रही ठेवावे असे पुस्तक.
अरुण जींची गझल अतिशय सुंदर आहे.
कसा मी, मलाच नीट समजले नाही
यथार्थ आहे ..कोहम चा शोध.
— स्वाती वर्तक. मुंबई.
जयंत ओक ह्या हरहुन्नरी कलाकाराविषयी इतकी सविस्तर माहिती वाचून आनंद झाला. त्यांना ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार. 🙏💐
जयंत सर, आपल्या पत्नीचे निधन ही कितीही दु:खद घटना असली, तरीही त्याला तुमच्या कलाप्रवासातला अडसर बनून देऊ नका, उलट पत्नीची इच्छा समजून तुमचा जीवनप्रवाह पुढे चालत राहू देत. तुमचे पुढचे आयुष्य सोपे आणि सुखद करण्याचा तोच मार्ग आहे. जीवेत् शरदः शतम्! 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर.
Very happy birthday dear Jayant ji.
— Ranjit Chandel.
Sp.Corrospondant, Lokmat, Yavatmal
🙏नमस्कार, मनिषा पाटील, तुम्ही ज्यांच्याबद्द्ल इतके सुंदर लिहिले आहे ती माझी मावशी असून मी बऱ्याच सुट्टीत तिच्याकडे राहिले आहे. त्यामूळे आमच्यावरही नकळत हे उत्तम संस्कार झाले. दरवेळेस काहीतरी नवीन शिकून मी जात असे योग्य वयात हे मिळाल्याने संसारात व समाजात वावरताना मला खूप उपयोगी पडले. हे मावशीचे व्यक्तिमत्व जसेच्या तसे समाजापुढे खूप छान मांडले आहे. त्याबद्दल तुमचेही मनापासून अभिनंदन 💐
— राणी नाकील.
मावशी खूप खूप सुंदर शब्दात मांडले आहे..
तुझा जीवन प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला ..
तुझ्याकडून खूप काही शिकत आलो आहोत आणि अजूनही शिकत आहोत..
चैतन्याचा झरा ही उपमा अगदी साजेशी आहे…❤️
— दिपाली सिडगिद्दी.
ताईसाहेब,
तुझ्या संपुर्ण जीवनाचेच पुस्तक मनिषा पाटील यांनी लिहिले आहे असे वाचतांना जाणवले.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा आलेख सुंदररित्या शब्दांकित झाला आहे. यामध्ये तुझ्या विविध गुणांचा, स्वभाव, छंद, पर्यटन, निसर्ग, साहित्य, कला, संगीत, आरोग्य याविषयीचा आढावा आलेला आहे.
मनिषा पाटील यांचे लेखन सुंदरच झाले आहे आणि भुजबळ दांपत्य यांनीही योग्य व्यक्तिंची निवड केली आहे असे वाटते. आता तुझ्यासारख्या व्यक्ती शोधुन त्यांच्या जीवनावर अभ्यास करणे, छानसे शब्दांकन करणे म्हणजेच पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याचे काम आहे, यालाच समाजनिर्मीतीचे काम म्हणु यात आणि यामध्ये सौ.कुमुदिनी कदरकर या समाजासाठी आयडॉल आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझे एका एका गुणांचे कौतुक करायला शब्द कधीतरी कमी पडतात.
ताईसाहेब, तु अशीच आनंदी,स्वछंदी, निरोगी रहा….
तुला खुप खुप शुभेच्छा आहेत………..!
— संजय मेहेरकर. पाथर्डी
मी आता हा लेख वाचला खूप छान लिहिलाय. मला खुप आनंद वाटतो आहे.
कारण खूप दिवसापासून मला वाटायचे ताई व भाऊजींवर चांगले लेखन करावे.
आज मनिषा पाटील यांना मनापासून धन्यवाद.🙏त्यांनी ताई तुमच्या मधील सर्व गुण वर्णन सुंदर रेखाटले आहे.तरुणांना प्रेरणा मिळेल असे लेखन आहे. ताई खरोखर तुम्ही आहातच चैतन्यमय झरा.
छान फोटो लेखात टाकले त्यामुळे वेटेज आले आहे.
मला खूप आवडले.
अभिनंदन🌹🌹व पाटील ताईंना धन्यवाद.🙏
— वंदन कळसकर.
ताई, मी आत्ताच लेख वाचला. मनिषा पाटील यांनी अत्यंत सुंदर लेखन केले आहे. तुझे अष्टपैलू व्यक्तिमत्व, तुझा संपूर्ण जीवनप्रवास खूप सुंदर शब्दांत उलगडून दाखवला आहे. फोटोज, व्हिडिओ मुळे अजून रंगत आली आहे.
या वयातही जीवनातील आनंद तु घेतेस त्यामुळे चैतन्याचा झरा हे शीर्षक योग्यच आहे. अनेक छंद तु जोपासले आहेत. स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना ही तो आनंद वाटत असते.
मी घडले ते तुझ्यामुळेच. लहानपणापासूनच तुझा Impact माझ्यावर आहे. नकळतच तुझे चांगले संस्कार आम्हा बहिण भावांवर झाले आहेत.
समाजासाठी तु एक आदर्श व्यक्तीमत्व आहेस याचा मला खूप
अभिमान आहे. माझ्या आदर्श, मोठ्या बहिणीची निवड मनिषा पाटील व अलका भुजबळ यांनी केली. Proud of you !!! 👏👏
तुझ्या बद्दल लिहायला खूप आहे. शब्द अपुरे पडतील खरंच !
ताई, अशीच उत्साही, हसरी, आनंदी, निरोगी रहा.
तुला खूप खूप शुभेच्छा !!!
🥰🥰👏👏🥰🥰💐
— मनीषा मेहेरकर.
माधुरी ताम्हणे यांच्या माध्यम पन्नाशी वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….
१
माधुरी अशीच लिहीत रहा, पाठवत जा, त्यामुळे मी सुध्दा अनुभव संपन्न होते.
— केतकी कर्वे. ठाणे
२
सुहासिनी मुळगावकर म्हटले की तो मोठा आंबाडा आणि त्यावरचे ते सुंदर गुलाबाचे फूल, इतके अतुट डोक्यात बसले आहे ना, खरेच फारच गुणी व्यक्ती होत्या. खुप छान झालाय लेख.
माझ्या ग्रुप मध्ये शोभाताई म्हणून आहेत, त्या तुझे लिखाण आवर्जून वाचतात, त्यांचा काल कॉल आला होता, त्या म्हणाल्या, माधुरी ताईने काय काय केले आहे, ते वाचताना मला असे वाटले, आपण आयुष्यात काहीच केले नाही.
आता म्हणू नकोस, जास्तीच कौतुक करते मी. 😀
— अंजली चौबळ. पुणे
४
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आपला कार्यकालाचा आलेख कसा उंचावत नेला त्याचे छान आरेखन आपल्या लेखातून दिसते. आपली सुरुवातीची धडपड नवीन लोकांसाठी एक आदर्श ठरते. आपण आपले लेख किमान माहेर सारख्या नामांकित मासिकातून छापून यावेत, ह्या एका आशेपायी सरळ बेहरे साहेबां सारख्या संपादक महोदयांच्या कार्यालयात थेट धडकने व माहेर सारख्या नामांकित मासिकाच्या सदरात लेखमाला लिहायचे काम पदरात पाडून घेणे हे खूपच प्रेरणादायी असणार. सहाजिकच लेखमाला सादर करण्यासाठीची सुरुवातीची घालमेल व दूरदर्शनच्या दिव्याने दाखवलेली दिशा सर्वोपरी यशस्वी वाटचालीचं निमित्त ठरली.
आपण वापरलेला “संयत जरब” शब्द खुप भावला. आमच्या सुरूवातीच्या काळात भेटलेल्या वरिष्ठ साहेबांविषयी “आदरायुक्त दरारा” असा शब्द वापरायचो. परंतु, ती जरब वा दरारा आपल्या कारकीर्दीला एक शिस्त व वळण लावून जाते. ह्याचा पूर्ण अनुभव घेतला आहे. “जमवल की सगळं जमतं” किती आस्वास्तव सल्ला..!
आमच्या एका सहका-याची बदली वरिष्ठ कार्यालयात झाली. तेथे माझं कसं होईल ह्या दबावाखाली आला, तेव्हा आमच्यापैकी अनुभवी सहका-याने एकाच वाक्यात सल्ला दिला, “जात्यावर बसले की, ओवी आपोआप सुचते..”
अशा लहान सहान गोष्टी आयुष्यात खूप काही शिकावून जातात.
आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व ईतर सामान्यांच्या मुलाखतीतून बरेच विविध प्रकारच्या लोकांचे प्रत्यक्ष अनुभव घेतले असतील. त्यातील गमतीजमती कधी तरी लिहाव्यात. मला सुप्रसिद्ध लेखक रमेश मंत्री ह्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखतींवर दिवाळी अंकातील एक लेख आठवला. नोकरीसाठीची मुलाखत, राजकीय व्यक्ती, नटनट्या वगैरेंच्या मुलाखतीतून घडलेल्या गमतीजमती मस्त मांडल्या होत्या. एका प्रसिद्ध नटीला शेवटी सद्य घडामोडींवर प्रश्न विचारला, “बांगलादेश बाबत काय सांगाल..” तेव्हा बांगलादेश नुकताच उदयास आला होता. नटीने पाजळलेल ज्ञान फारच. गमतीशीर होते. म्हणे, “हो बाई, मी बांगलादेशच वापरते..” असो.
आपल्या लिखाणातून खुप काही मेजवानी मिळत असते, हे नक्की.
— मो.र. अंजारिया. कळवा
५
हे सर्व छान, व्यवस्थित आणि योग्य अस लिहिलं आहे
— शशी कुलकर्णी. ठाणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
भुजबळ सर, प्रत्येक अंकातील प्रत्येक लेख वाचनीय असतोच, पण कधी वेळेच्या अभावी, तर कधी इतर काही कारणांनी त्यावर प्रतिसाद देणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ राधिका ताई भांडारकर ह्यांचे लेखन अप्रतिम सुंदर आणि मन गुंतवून ठेवणारे असते. सुरवातीच्या काही लेखांवर प्रतिक्रिया दिल्यावर जाणवले, की हे सर्वच सुंदर आहे, त्यावर प्रत्येक वेळेस “वाह सुंदर, खूप छान!” , अशा जुजबी प्रतिक्रिया लिहिणे, हा त्या लेखनाचा अवमान होईल, म्हणून पुढे पुढे प्रतिक्रिया लिहिणे बंद केले. पण आज “वाचक लिहितात…” ह्या सदरातील सर्वच प्रतिक्रिया वाचून असे जाणवले, की आपले सर्वच वाचक, जे खरंतर स्वतः उत्तम लेखकही आहेत, ते किती जिव्हाळ्याने न्यूज स्टोरीचा प्रत्येक अंक वाचतात आणि त्यावर भरभरून लिहितात ! आजचे हे सदर तर खरोखरच वाचनानंद देऊन गेले.त्यासाठी मूळ लेखिका राधिका ताई भांडारकर, माधुरीताई ताम्हणे, मनीषा पाटील वगैरे सर्वच लेखक-लेखिकांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या बरोबरीने अभिप्राय लेखन करणाऱ्या प्रत्येक लेखकाचे अभिनंदन आणि आभार. 🙏💐
माझीही प्रतिक्रिया इथे छापल्याबद्दल माननीय भुजबळ सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹