नमस्कार मंडळी,
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
माझी जडणघडण भाग ३२ वर प्राप्त झालेले अभिप्राय….
१
वाचनाचा प्रवास खूप मस्त लिहिला आहेस. समवयीन असल्याने माझ्यावरही वाचनाचे असेच संस्कार झाले. त्याचा आपल्या जडण – घडणीत मोलाचा वाटा असतो.
‘चांदोबा, चांदोबा भागलास का’
‘देवा तुझे किती सुंदर आकाश,
सुंदर प्रकाश सूर्य देतो’
ह्या बालपणीच्या कविता, गाणी ते संत साहित्य, आत्मचरित्र ही आपल्याला भुरळ घालून गेली. हा प्रवास झराझरा डोळ्यापुढून सरकला. तरी अजून खूप काही राहून गेलंय ही हुरहूर असतेच.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई (भाग ३०)
२
तुझ्या आजीचं व्यक्तिमत्व खूप छान रेखाटलं आहेस. हो रेखाटणे हा शब्द मला योग्य वाटत आहे. कारण जसं वाचत जावं तशी आजी डोळ्यासमोर उभी राहात जाते.
परंपरीक चालीरिती आणि सुधारणावादी विचारांची उत्तम सांगड आजींनी घातलेली दिसते.स्पष्टवक्तेपणा, कणखरपणाला हळुवारतेची झालर त्यांचं व्यक्तिमत्व उजळवून टाकते. तुमच्या सर्व
कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद कायम साथीला आणि त्यांच्या आठवणी
मनात असतील,
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
३
अतिशय सुंदर, सहज सोप्या भाषेत रेखाटलेल शब्द चित्र मनाला भावल. आजी, तिच्या लकबींसह डोळ्यासमोर उभी राहिली. तिची परंपरा अजूनही नातवंड, पतवंड जपत आहेत, याचे कौतुक वाटले. अशी खंबीर आजी घरात असल्याने कुटुंबाला आधार वाटतो आणि शिस्त लागते.
— सुमन शृंगारपुरे. पुणे
४
आजचा हा लेख पुन्हा बालपणात घेऊन गेला .. तुमचं ओघवतं लिखाण.. असं वाटतं की वाचतच राहावं.. तुमच्या आणि माझ्या बालपणात तसं थोडं साम्य आहेच आणि त्यामुळे हे सगळं माझ्यासोबत घडतंय माझ्यासमोर घडतय असं मला वाटतं ..इतकं प्रभावी साधं सोपं लिखाण.. खूप छान लिहितात तुम्ही ताई.. समोरच्याच्या हृदयात अगदी आरपार उतरून जातं तुमचं लिखाण.
— मानसी म्हसकर. वडोदरा
५
तुझ्या जडणघडण मालिकेतली “तिची परंपरा” हा लेख वाचतांना तुझी आजी (जीजी) डोळ्यासमोर आली. खरंच इतकी करारी अन् खमकी बाई! आपल्या धोबीआळीत प्रेमळ धाक होता तिचा. व्रत वैकल्याचे तिचे विचार त्या काळातही तात्विक होते. परंपरेचं जोखड नव्हतं कधीही. किती गोड आजीच्या छायेत वाढलात ग तुम्ही पंचकन्या. असो…
काही म्हण धोबी आळीत “ढगे” नावाचा दबदबा होता हे मात्र खरं.
— अलका वढावकर. ठाणे
६
आज्जी न् परंपरा खूपच छान सांगितले आहे राधिकाताई.
— छाया मठकर. पुणे
७
रुढी परंपरांचे अवडंबर न करता चांगलं ते घ्यावं, मनाचा आनंद मोठा, उगाच खोलात शिरायचे नाही… त्या काळातही किती समृद्ध विचारसरणी होती आजींची
— अस्मिता पंडीत. पालघर
८
नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख. जिजीविषयी वाचताना आता या क्षणी मी जिजी सोबतच आहे असेच वाटते.
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे
९
परंपरा सांभाळण्यासाठीच असतात. त्यात संस्कृतीचा वारसा असतो. त्या पुढे नेण्यात आपल्या पूर्वजांच्या स्मृती असतात. संस्कृती ही कालातीत असते, परंपरेमुळे त्याचे जतन होते .एक वाचनीय लेख आहे…
— अरुण पुराणिक. पुणे.
“युवा पिढी – दुसरी बाजू” लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
१
खूप छान लेख.
— सौ ज्योती कासार. सातारा
२
रश्मी ताई तुम्ही परिस्थिती ची जाणीव असणारे युवा पिढी चे खूप छान समर्थन केले आहे. पण काही युवक व युवती त्याला अपवाद आहेत खूप छान लेख आहे .
— गीता विवेक सगरे. कराड
३
१००%
— सौ राणी प्रकाश मांजरकर. सातारा
४
खूप सुंदर लेख.
— नंदा कुंदप. सातारा
५
रश्मी हेडे यांचा युवा पिढी-दुसरी बाजू हा लेख वाचला. युवा पिढीच्या संघर्षांचे पूर्ण वास्तव त्यांनी दाखवून दिले आहे. सुंदर लेख.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
६
युवा पिढीसाठी सकारात्मक लेख
रश्मीताई, आजचा आपला लेख युवा पिढी साठी अतिशय सुंदर आणि पॉझिटिव्ह आहे.
प्रत्येक मुद्दा आपण स्पष्ट केलेला आहे, जी मुले बाहेर गावी शिक्षण घेत आहेत. माझा मुलगा सातारा येथे Eng चे शिक्षण घेत आहे. आपला हा लेख पुर्णपणे माझ्या मुलाला मार्गदर्शन ठरेल आणि त्याच्या हॉस्टेल च्या सर्व मुलांना ही. धन्यवाद 🙏
आपला हा लेख मला खुप खुप आवडला. कुटुंब पासुन लांब राहणे, अपेक्षा चे ओझे सर्व मुद्दे मनाला खुप खुप भावले.
— मनिषा चंद्रकांत पाटील. पनवेल
७
अतिशय सुंदर लेख.
— शीतल विजय धडवई.
‘जर्मन विश्व’ भाग २ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….
१
झकास लिहिले आहेस.
— डॉ. प्रसाद आंबिकर
२
खरोखरच खूपच सुंदर लेख आहे….
आणि मला माहीत नव्हतं की ती सरगम गर्मन ची आहे म्हणून, तुमच्या ह्या लेखनामुळे मला काही तरी वेगळं असं वाचन करता आलं आणि नवीन लेख मुळात संगीत विषयावर असल्यामुळे मला शिकायला भेटले. thank you
— वरदलक्ष्मी. गोवा
३
Mast.. me vachla atta. Chaan lihilay.
-Dr. Minal Borkar, Gurgaon
४
आत्ताच लेख वाचला.
छान आहे. 👌🏻
— सौ. माधवी आंबिकर.
५
Masta !
— Sonal Ramdasi. USA
६
After many days I read something in complete shudha Marathi ☺️
I have been to Germany recently during our road trip to Austria and what ever you mentioned dose match very well with the country
— Vallabh Ratnakar. फिनलंड
७
खुप छान माहिती देतेय.
— कुलश्री कुलकर्णी. जळगाव
इतर प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
“पद्मश्री डॉ प्रेमा धनराज”
अतिशय प्रेरक आणि दीर्घकाळ स्मरणात राहील अशी यशकथा 🙏.
— प्रल्हाद जाधव.
नाटककार, लेखक, निवृत माहिती संचालक, मुंबई.
२
पद्मश्री डाॅ. प्रेमा धनराज यांना सलाम.
सलाम.. सलाम 💐💐💐💐🙏💐💐
— राजीव रसाळ. निवृत्त तहसीलदार, नेवासा
३
“आधुनिक सत्यवान” अप्रतिमच !
— प्रकाश कथले. जेष्ठ पत्रकार, वर्धा
४
“आधुनिक सत्यवान” लेख भावस्पर्शी आहे.
— मीना गोखले. निवृत दूरदर्शन निर्माती, मुंबई.
५
विजयराव यांची कविता पोटतिडकिने प्रसवली आहे. या आधी सुद्धा त्यांनी NST च्या माध्यमातून देशातील सद्य स्थितीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व तरूणाईतील नैराश्य व इतर अनेक विषयांवर लेख लिहिले आहेत त्यांचं वाचनही मी केलय.
त्यांनी आजच्या समाज दिवसागणिक अधिक अधिक दुबळा होत आहे याचे मनस्वी दुःख व्यक्त काव्यात मांडल आहे.
आपल पोर्टल ही जमेल तसे वाचकांना जागरूक राहणे आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपल्या पोर्टलचे सदस्य देशात तसेच ८० पेक्षा अधिक विदेशात विखुरले आहेतनआणि ते सक्रियही आहेत.
डॉ विजयराव पांढरीपांडे समाजातील दुबळेपणा खर तर शेकडो वर्षांपासून भिनलेला आहे एकमेकांशी संपर्क साधण्याची संधी सुलभ होते आहे कदाचीत आपल्या पिढीची मानसिकता बदलणे शक्य नाही पण येणारी पिढी नक्कीच असा अनागोंदी कारभार पाहण्यासाठी जन्माला आली नाही ती सामाजिक उठाव करेल आणि अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू देवेन्द्रजी मनापासून धन्यवाद
— प्रकाश पळशीकर. पुणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
सहज सोप्या भाषेत अनुभवलेले विचार मनात घर करून राहतात नशिबाने मिळालेले करारी पण तितकेच प्रेमळ वडील, आजी आणि ढगे कुटुंबीयात माहेर श्रीमंत असूनही सहजपणे सामावून गेलेली आई मोकळ्या मनाची सगळी माणसं, घरात असलेलं अभय आणि अंधश्रद्धा न ठेवता मिळालेल्या उचित संस्काराचा पगडा आयुष्यात खूप काही शिकवून जातो हे तुमच्या लेखणीतून उमगत. साक्षात व्यक्तीसमोर उभी राहते इतकं रेखाटन सुरेख. पंचकन्यांची एकमेकीला सांभाळून घेऊन चांगल्या गुणांचे कौतुक करण्याची वृत्ती ही फार कमी ठिकाणी बघायला मिळते ती तुमच्याकडे आहे ही खूप मोठी शिदोरी आहे. अशाच लिहित्या रहा .आम्हाला तुमचा अभिमान आहे
Very nice News portal. It’s update new and old one. Great Bhujbal sir and Madam