Wednesday, April 23, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात मध्ये आपलं स्वागत आहे. कामाचा वाढता व्याप आणि वाचकांची असंख्य येणारी पत्रे यामुळे गेले दोन आठवडे हे सदर प्रसिद्ध करता आले नाही, या बद्दल मनःपूर्वक दिलगीर आहे. हे सदर नियमितपणे प्रसिद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे.
आता वाचू या वाचकांची निवडक पत्रे.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)


देवेंद्रजी.. शिवजयंती निमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांची युगंधुरंधर पत्रे वरचा लेख मनापासून आवडला तसेच रणवीरसिंह राजपूत यांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत:शिवबा हा लेखही आवडला… उभयतांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
— सुधाकर तोरणे.
निवृत माहिती संचालक, नाशिक

देवेंद्रजी, आज्ञापत्रांच्या संदर्भासह शिवरायांच्या कर्तृत्वाची आपण विशद केलेली  माहिती खूपचं स्फूर्तिदायक वाटली. 👍👍महाराष्ट्राचे दैवत युगंधर शिवछत्रपती महाराजांना मानाचा कुर्निसात.🙏🙏
— वीणा गावडे. मुंबई

जर्मन विश्व मधील वॉल्फगांग मोझार्ट यांच्या वरील अप्रतिम।..श्रवणीय असा लेख
सुंदरच आहे.
असे म्हणतात …हिंदी जुने गाणे ..इतना न मुझसे तू प्यार बढा…. हे मोझार्ट च्या सिम्फनीवर बेतले होते … आजकाल आपल्या ..ए आर रेहमान ला देखील लोक लाडाने मोझर्ट म्हणतात ऐकले आहे.
धन्यवाद आशी ताई.

आपला
“शिवाजी महाराजांची युग धुरंदर पत्रे” हा वेगळाच पैलू उलगडणारा महाराजांविषयीचा लेख खूप बोलका आहे खरोखर जितके त्यांच्याबद्दल वाचावे तेवढे कमीच. पत्रातून देखील त्यांनी केलेला रयतेचा विचार, स्वाभिमान जागृती वगैरे सुरेख माहिती दिली आहे. आभार.

राजपूत सरांचा लेख ही माहितीपूर्ण आहे.
एका दृष्टीक्षेपात त्यांची माहिती देणारा टीम एन एस टी चा लेख खरंच संग्रहणीय आहे.
हरीश जी पाटील यांची रेखाचित्रे, त्यांचे राज्याभिषेकाचे भव्य चित्र..सारे बघून माझे डोळे दिपले ..खूप आनंद झाला हा लेख बघून .. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आपले आभार

स्वातीताई दामले, विलासजी  देवळेकर, हेमंतजी, गांगलजी आणि सुमंतजी सर्वांच्या कविता सुरेख..  गेय देखील आहेत आवडल्या.
हा
— स्वाती वर्तक. मुंबई


देवेन्द्रजी, खूप छान आठवणींना उजाळा दिलात.मा. अटलजींच्या दृढ निश्चयाने आणि तुम्ही विदित केलेल्या सर्व घटनाक्रमांमुळेच  दूरदर्शनवर “माय मराठी” च्या माध्यमातून मराठी कार्यक्रमांना संपन्नता आली.
— वीणा गावडे. मुंबई

सौ रश्मी हेडे लिखित, “न्याय” कथेवर ला मिळालेल्या प्रतिक्रिया….


खूप छान कथा आहे.
— जयश्री भिवरे. कराड

चांगल्या कर्मा ची फळे चांगली मिळतात व वाईट कर्मा ची फळे वाईट मिळतात नियतीचा खेळ आहे खूप सुंदर कथा आहे.
— गीता विवेक सगरे. कराड

नेहमीप्रमाणे खूपच सुंदर व बोधकारक कथा.
— राणी मांजरकर. सातारा

खूप छान बोधपर कथा देवाघरी न्याय आहे.
— स्मिता वेळापुरे

खूप छान कथा.
— उषा सासवडे. सातारा
६.
खूप छान.
— स्मिता.
७.
You reap as u sow.
— Pro Dr Dyandeo Kasar. Pune

*साहित्य संमेलन….विषयक मी*
(देवेंद्र भुजबळ) यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…

अत्यंत रास्त मुद्दा मांडला आहे. साहित्य संमेलनातून आता प्रबोधन होत नाही. लेखक वाचकांचा संवाद होऊ शकत नाही. फक्त समारंभ भपकेबाज करण्याकडेच कल असतो. सरकारचे पैसे वापरून सरकारशी संबंधित व्यक्ती, मंत्री, अधिकारी आपली हाऊस भागवून घेत असतात. त्यातून साहित्याची कोणतीही सेवा होत नाही.

त्यावर वाचक, लेखक, प्रकाशक, साहित्यिकांकडून कायमस्वरूपी निधी संकलित करणे हा एक उत्तम मुद्दा आहे. साहित्य संमेलन एवढ्या प्रचंड भव्य प्रमाणातच साजरे झाले पाहिजे, असे कोणी सांगितले ? खऱ्या अर्थाने साहित्य असा उत्सव अशा संमेलनांमध्ये होणे अपेक्षित असते. एकाही साहित्यिकाला एकही रुपया मानधन किंवा प्रवास खर्च किंवा निवास खर्च यापैकी काहीही द्यायचे नाही, असे ठरवून टाकले पाहिजे. या वार्षिक संमेलना मधूनच विचारांची साहित्याची देवाण-घेवाण होत असते. त्यावरच साहित्यिकाचे साहित्यिक असणे निश्चित होत असते. त्याच्या अस्तित्वासाठीच हा सोहळा होत असल्यामुळे त्याला त्याबद्दल मानधन आणि अन्य खर्च देणे साफ चुकीचे आहे. तो खर्चही मोठा असतो. भटक्या वरचा खर्च आणि अशा साहित्यिकांवर होणारा खर्च टाळला तर साहित्य संमेलन कमी खर्चात आणि दर्जेदार तसेच देखणेही होऊ शकते. पण महामंडळाचे पदाधिकारी ही राजकीय आश्रया खालीच वावरत असल्यामुळे त्यांना अशी कल्पना सुचणे कठीण असते. तेही भपक्याला भुरळतात आणि वारे माफ करताना मुक्त संमती देतात. त्यामुळे तो सोहळा साहित्याचा राहत नाही. यापेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या सोहळ्यांची गरज आहे.

कोणताही राजकीय आश्रय, सरकारचा आश्रय किंवा राजकीय व्यक्तींचा आश्रय आणि मदत न घेताही अनेक साहित्य संमेलने महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा तालुका नागरिक संघ गेले दहा वर्षे भव्य प्रमाणात ग्रामीण साहित्य संमेलन भरवत आहे. दिवसेंदिवस या संमेलनाची उंची वाढत आहे. मुख्य म्हणजे हे संमेलन बिनखुर्चीचे संमेलन म्हणून प्रसिद्ध आहे. खुर्चीच नसल्यामुळे मानपानाचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यापासून कोणालाही धडा घेता येऊ शकेल. पण तो कोणी घेण्याची शक्यता नाही. कारण अशा संमेलनात मिरवून घेण्याची हौस भागवता येणार नसते.
— प्रमोद कोनकर. जेष्ठ पत्रकार, रत्नागिरी.

माननीय भुजबळ साहेबांचे विचार जरी सकारात्मक असले तरी प्रत्यक्षात उतरविणे कठीण आहे.
— निरंजन राऊत. विरार

साहित्य संमेलन लोटांगण घालून स्वाभिमान कसा जपणार… हा मा. देवेंद्र भुजबळ यांचा लेख अप्रतीम आणि वाचनीय आहेत. या लेखातून त्यांनी जे प्रश्न उभे केले आहेत ते अत्यंत सडेतोड आणि खरे आहेत. साहित्य परिषद स्वायत्त होण्यासाठीच्या संभाव्य उपाययोजनाही त्यांनी या लेखातून सुचविलेल्या आहेत आणि त्या पटण्यासारख्या आणि कृतीशील आहेत. खरं म्हणजे  मा. भुजबळांसारखी विचारी मंडळी परिषदेचा भाग असायला हवीत.
— राधिका भांडारकर. पुणे

मा. देवेंद्र भुजबळ सर,
नमस्कार ….
आपला साहित्य संमेलन या विषयावर असणारा लेख वाचनात आला. १०० व्या संमेलनास अजून दोन वर्षे अवकाश आहे. दरम्यानच्या काळात मराठी साहित्य संमेलन हे स्वायत्त व्हावे असे वाटत असेल तर काही विचारपूर्वक आखणी करावी लागेल. सुरवातीला नियोजन करुन ते पूर्णत्वास आणणे हे त्रासदायक होईलही, परंतु एकदा स्थिरस्थावरता आली, तर पुढे सहजता येईल असे वाटते.

  नियोजनात विद्यमान अध्यक्षांच्या सहकार्याने ….
१) प्रत्येक जिल्ह्यात तालुका नुसार  समिती करावी.
२) या समितीतून ठराविक सदस्यांची जिल्हा समिती करावी.
३) जिल्हा समितीतून राज्य स्तरीय समिती करावी.
४) प्रत्येक समिती तील सदस्य हे मासिक वर्गणीदार असावेत.
५) ज्यांना शक्य असेल व शक्य होईल तेव्हढे स्वेच्छा अनुदान द्यावे.
६) भारतातील प्रत्येक राज्यात असणारे मराठी भाषिक कसे सदस्य होऊ शकतील यावर विचार व्हावा 
७) शासनाकडून जर अनुदान घ्यायचे असेल तर ते विना शर्त असावे.
८) संमेलन ज्या ठिकाणी भरले जाईल, त्या तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील सदस्य हे त्या संमेलनापूरते कार्यकारी सदस्य असावेत .
९) राज्यस्तरावर एक लेखापरिक्षक असावा.
१०) त्या त्या वर्षाचे हिशोब समेलनानंतर एक किंवा दोन महिने या कालावधीत प्रसारित व्हावेत.
११) सर्व स्तरावर सदस्य वाढवून क्रियाशीलता आणणे गरजेचे आहे.
१२) महाराष्ट्र राज्यातील कमिटी ही प्रमुख कमिटी असेल. या कमिटी अंतर्गत अन्य राज्यातील कमिटी कार्यरत राहतील.
१३) साहित्यिकांनी स्वाभिमान जपायचा असेल तर , स्वतःच्या हिमतीवरच संमेलन भरवले पाहिजे.
१४) संमेलन किती दिवस असावे हे ठरवून व त्या साठी येणारा अंदाजे खर्च विचारात घेऊन नियोजन केले जावे .
१५) हे सर्व सुरवातीस अवघड असेल, पण कालपरत्वे त्यातील अडचणी कमी होऊन संमेलन नियोजनानुसार पार पडल्याचा आनंद नक्कीच मिळेल.
हे सर्व प्राथमिक विचारसरणीतील मुद्दे आहेत.
मी एक साहित्यात रमलेला आणि कार्यरत राहणारा एक सामान्य साहित्यिक आहे.
मला जे मुद्दे सुचले ते मी विचारपूर्वक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
संमेलने दर्जेदार व्हावीत हीच यातून किमान अपेक्षा….
आपल्या पोर्टल द्वारे आपण काही करु शकलात तर तो एक इतिहास ठरेल. तसा तो व्हावा.
— अरुण पुराणिक. पुणे

नमस्कार सर.
साहित्य संमेलन : लोटांगण घालून….
हा आपला सडेतोड भाषेतील लेख खूप आवडला.
प्रत्येक शासकीय खात्यातील खर्चाचे जसे ऑडिट होते, तसेच सरकारी मदत घेऊन साजऱ्या होणाऱ्या अ. भा.साहित्य संमेलनाच्या खर्चाचे सुद्धा ऑडिट व्हायला हवे, असे मला वाटते. (ते होते की नाही याची मला कल्पना नाही.)
— उद्धव भयवाळ. छत्रपती संभाजीनगर

नवी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाबाबत आपण आपले विचार स्पष्टपणे प्रकट केले, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. कारण आपण म्हणता त्याप्रमाणे नेहमीच साहित्य संमेलन जवळ आले की,  त्याची फार मोठी चर्चा होते. अगदी अध्यक्ष कोण होणार यापासून सुरुवात होते. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होते. त्या ठिकाणची स्वागत समिती असते. या स्वागत समितीच्या हातात जवळजवळ सर्वच आयोजन नियोजन जाते.  कोणत्याही साहित्य संमेलनामध्ये सर्वांचा आर्थिक सहभाग असने गरजेचे आहे. साहित्य संमेलनातील मोठ-मोठी कामे नियमानुसार दिली पाहिजेत जेणेकरून सर्वांचा विश्वास बसेल साहित्य संमेलनाचे आयोजन पदाधिकाऱ्यांच्या विचाराने व्हावे. साहित्य संमेलन हे कोणाच्या हातात जाऊ नये, कारण अशा संमेलना मधून साहित्याची व विचारांची चांगली देवाण-घेवाण होते. आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 98 वर्ष सातत्याने भरत आहे. हे निश्चित अभिमानास्पद आहे आणि येत्या दोन वर्षांनी या संमेलनाचा शतक महोत्सवी सोहळा होईल. त्या दृष्टीने महत्वाचे निर्णय वेळेतच घेतलेले बरे. भुजबळ साहेब आपण मांडलेले विचार निश्चितच साहित्य संमेलनाला पूरक आहेत. त्या दृष्टिकोनातून यापुढे साहित्य संमेलन भरवताना त्याचा विचार झाला पाहिजे.
— मारुती विश्वासराव. नवी मुंबई.

अतिशय परखड मत मांडले आहे. बऱ्याच संमेलनानंतर छोट्या मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी कानावर ऐकू येत असतात परंतु प्रगती शून्य. मराठी साहित्य संमेलना चा भव्य दिव्यपणा इतर भाषिक संमेलनामध्ये कधीच दिसून येत नाही. इतकेच काय हिंदी सोडले तर इतर किती भाषिक संमेलन होतात याची सुद्धा माहिती नसते.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनुदानाशिवाय अतिशय भव्य दिव्य संमेलन होऊ शकते. त्यासाठी सूत्रधार मंडळींनी समस्त साहित्यिकांना विचारात घेणे गरजेचे आहे. सर्व समाविष्ट विचारातूनच एक सुनियोजित आणि साचेबंद कार्यक्रम साकारू शकतो.
आपले विचार आवडले.🙏
— सुधीर थोरवे. नवी मुंबई


माहिती आणि नभोवाणी खात्यातील कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस बंद करण्यात वसंतराव साठे मंत्री, यांचा एकमेव वाटा आहे. म्हणूनच आज लोकांना निवृत्ती पेन्शन मिळत आहे. विनम्र अभिवादन.
— अशोक डुंबरे. निवृत दूरदर्शन संचालक, पुणे

नमस्कार सर,
मारुती विश्वासराव यांचा संपूर्ण जीवनपटच डोळ्यांसमोर तरळला  आणि अजूनही त्यांचे सामाजिक कार्य चालूच आहे. म्हणजेच सामाजिक कार्यात जीव ओतून काम करणे म्हणजे काय याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पतीला उत्तम साथ देणारी पत्नी तसेच उच्च शिक्षित गुणी मुले, आजकाल पाहायलाही दुर्लभ अशी एकत्र कुटुंब पद्धती यामुळे त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ झाले आहे. जसे विचार तशी कृती असणाऱ्या मारुती विश्वासराव यांना ‘जीवेत शरदः शतम्’ या शुभेच्छा.

रेषांमधील भाषातील शैलेश देशपांडे यांची कविता धारावीतील रहिवाशांच्या चुरडलेल्या स्वप्नांचे धारावाहिक व्यक्त करत आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते.

प्रशांत कुलकर्णी यांचा संगीतकार रवी यांच्यावरील लेख सुंदरच !
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

चित्रा मेहेंदळे यांचा डॉ. विद्या देवधर यांच्यावरील लेख प्रेरणादायी  आहे . 🙏👌🏻
— स्नेहा मुसरीफ. पुणे

आदिशक्ती अक्षरशक्ती.. उत्तम विचार.
— निरंजन राऊत. विरार

अतिशय सुंदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे.
— सीता विशाल. अंबेजोगाई

Devendra Bhujbalji, Aadishakti Aksharshskti, Mahiladinianimmitta Utkrusht presentation, Sir appreciated.
— Suresh Gokani.Retd. Producer,
Doordarshan Kendra, Mumbai.

आदिशक्ती अक्षरशक्ती बद्दल लिहून खूपच छान केले. या कार्यक्रमाला मी जाऊ शकले नाही याची खंत वाटत होती वाचून आनंद झाला. नेमके मुद्दे कळले आपल्या लेखनातून.. आभार

श्रद्धाजींचा लेख उत्तम आहे. सविस्तर आढावा घेतल्याबद्दल अभिनंदन

राधिका ताईंचा आजचा लेख अत्यंत तरल, काव्यमय, भावपूर्ण वाटला.. मला देखील या कविता मोहवितात.. वर्ड्सवर्थ च्या डेफोडील्स ओळी मला  प्रिय आहेत

पुष्पाताईंच्या सन्मानाचे कौतुक वाटले ..चित्र अप्रतिम आहे ..त्यांचे पुस्तक मी वाचले होते. गम्मत म्हणजे त्या मूळ ग्वाल्हेरच्या, घराजवळ राहणाऱ्या आनंद झाला.
नयना ची कविता उत्कृष्ट .. आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

“ताजवा” वाचूनच मन ताजेतवाने  झाले .. प्रसन्न वाटले.
“मैत्री अनुबंध” वाचून खरंच आता स्नेहसंमेलने.. गेट टुगेदर ही माणसांची मूलभूत गरज झाली आहे असे जाणवले. त्यानिमित्ताने तरी दररोजच्या चौकटीतून थोडासा आप्तेष्टांचा सहवास मिळून मन फ्रेश होते.
बाकी अंक ही नेहमीप्रमाणे  छान आहेच.
— सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे

सर नमस्कार,
आजचे न्यूज पोर्टल वाचनीय.
ग्युंटर ग्रास’ या जर्मनीतील नोबेल पारितोषिक विजेत्या बहुपेडी बहुआयामी सुप्रसिद्ध लेखकाचे अगदी तपशीलवार व्यक्तिचित्रण फार आवडले.
मी जेव्हा जेव्हा मंडईत जाते तेव्हा तेव्हा फळे, भाज्या आणि फुले पाहून त्यांचा ताजवा अंगांगात भरून घेते. मनात एक अल्लड मुलगी विविधरंगी फुले केसात माळत असते, भाज्यांना नजरेत साठवित असते आणि विविध फळांची चव घेत असते. नुसते वर्णन वाचूनच ताजवा मन ताजे करून गेला.
स्नेह संमेलनातूनच मैत्रीचे अनबंध अधिकच घट्ट होत जातात.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
१०
द्रष्टे विं.दा. हा मा. देवेंद्र भुजबळ यांचा लेख वाचनीय. मराठी साहित्यातले विं.दा. म्हणजे एक खणखणीत नाणे. त्यांच्या कविता वाचत वाचत आमची पिढी घडली. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त  आपण हा लेख लिहून योग्य आदरांजली वाहिलीत.
— राधिका भांडारकर. पुणे
११
विंदांच्या दिव्यत्वाची प्रचिती आणणारा देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला लेख अतिशय उत्तम, उत्कृष्ट ! आज विंदांचे स्मरण करून दिल्या बद्दल देवेंद्र यांना मनापासून धन्यवाद ..
— सुधाकर तोरणे. नाशिक
१२
भुजबळ सर, “द्रष्टे विं दा” हा लेख खूप आवडला. अतिशय रंजक आठवण आपण शेअर केलीत, आपल्याला खरंच हॅट्स ऑफ 🙏
विं दां नी मरणोत्तर देहदान केले होते. आमच्याकडे एका कार्यक्रमाला त्यांचे सुपुत्र उपस्थित होते, त्यांनी मनोगतात सांगितले.
सर, आपल्या खूप मोठमोठ्या व्यक्तींशी परिचय आहे. आपण महाराष्ट्र शासनाला सांगावे की मराठी भाषेला एकवेळ अभिजात दर्जा नाही दिलात तरी चालेल, परंतु ज्या जिल्हापरिषदेच्या हजारोंनी प्राथमिक शाळा बंद करण्याचा सपाटा शासनाने लावलाय तो ताबडतोब थांबवावा. आणि महाराष्ट्रात “One Nation one Education Board and One Nation one Syllabus” यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.
— आशा कुलकर्णी. मुंबई

आता वाचू या, राधिका भांडारकर यांच्या जडण घडण वर भाग निहाय प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….

  *माझी जडणघडण – ३७*

प्रिय राधिकाताई,
आजचा हा भाग वाचून मी खरोखर नि शब्द झाले.. वासंती वाऱ्याची झुळूक यावी असा तुमचा हा लेख *वासंती* आज वाचण्यात आला.. अतिशय सुंदर वर्णनाच्या पलीकडे हा लेख झालेला आहे .. खूप सगळे नवीन शब्द मला त्याच्यातून सापडले.. उपमा तुम्ही ज्या दिल्या आहेत त्या सुद्धा अतिशय सुंदर .. मी जवळजवळ पाच ते सहा वेळा हा लेख वाचला आणि मी हा सेव करून ठेवलेला आहे माझ्यासाठी ..  खूप सगळे नवीन शब्द आहे त्याच्यामध्ये.. वाक्यप्रयोग आहेत.. खूप मजा आली वाचताना…
आजचा लेख , आहाहाहाहाहाहा…
निशब्द
— मानसी म्हसकर. वडोदरा

प्रत्येक स्त्रिची स्वत:ची एक महत्वाकांक्षा, स्वप्न असतं.. त्यामुळे असं होतं… मस्त
— सुमती पवार. नाशिक

खुप सुंदर 🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

“वासंती” अप्रतिम!
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

भाऊ आणि वासंती ह्यांची व्यक्तिमत्व छान रंगवली आहेस.
वासंती खरंच सुंदर दिसत आहे.
त्या दोघांचे स्वभाव, आवडी – निवडी, सुखी जीवनाच्या कल्पना भिन्न असाव्यात म्हणून वासंतीला वैषम्य वाटत असावे. त्यामुळे संसाररथाने अडखळत वाटचाल केली.
असं अनेक जोडप्यात होऊ शकतं ते झालं. इतक्या मोठया कुटुंबाला बरोबर घेऊन संसार करणं सोपं नसतं, सगळ्यांना जमतं असं नाही हे पण तू छान वर्णीले आहेस. ह्या प्रवासात तू पूर्वीच्या काळात नेऊन
आणतेस. जुना काळ डोळ्यसमोर उभा करतेस. वाचायला छान वाटतं.
शेवटी वासंतीला तिला हवं तसं घर मिळालं. भाऊला पण मनातून बरं वाटलं असेल,
— अनुपमा आंबर्डेकर.

आपला वासंती शीर्षक असलेला लेख वाचनात आला. खूप आवडला.
— सौ. भारती सावंत. खारघर, नवी मुंबई

*माझी जडणघडण – ३९*

*परिवर्तन* हा लेखपण नेहमीप्रमाणे सुरेखच !!
माणसाची वृत्ती संकुचित असली की त्यांचे कानही हलके होतात आणि सर्व रामायण घडतं. परिवर्तन होतं, उपरती होते पण पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं असतं.
— आरती नचनानी. ठाणे

राधिकाताई, तुम्ही तुमच्या मोठ्या बहीणीच्या आयुष्यातील  दर्दभरी घटना इतक्या योग्य शब्दांतून वाचकांपुढे मांडली आहेत की अशा प्रवृत्तीच्या माणसांचा राग आल्याशिवाय राहत नाही.
तुमची आजी आणि एकूणच कुटुंबातील सर्व खंबीर माणसे डोळ्यासमोर उभी रहातात.
समाजात विविध प्रकृती आहेत आणि हे अनुभव घेत घेतच आपले व्यक्तीमत्व तयार होत असते हेच खरे.
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

सुरेख शब्दांकन.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर

छान लिहिलेस .
— नंदिनी चांदवले. पुणे

“परिवर्तन” उत्तम लिहिले आहे.
बारीक निरीक्षण, राधिकाताई  तुमचे. त्यावरील विचार, खरोखर विचार करण्यासारखे.
— छाया मठकर. पुणे

बापरे, अरूणा किती मानसिक त्रासातून गेली. I didn’t know any of this. Felt like crying .
— संध्या जंगले. मुंबई

मा.सौ. राधिका भांडारकर लिखित *माझी जडणघडण* या अंतर्गत परिवर्तन ही कथा वाचनात आली .
सारांश  👇
परिवर्तन ही एक विचार सरणीतून तुटता तुटता वाचलेली एक प्रेम कहाणी आहे. जीजी  मुळे हे परिवर्तन घडून येते. विचारांचे परिवर्तन समाज घडवते याचं उत्तम उदाहरण म्हणून *परिवर्तन* ही वाचनीय आणि अनुकरणीय नक्कीच आहे. खरे प्रेम विचार परिवर्तन करते . परिवर्तन वाचताना लोणावळ्याच्या उल्लेख वाचनात आला आणि माझे तेथील दिवस आणि घटना नजरेत आल्या. लोणावळा अजूनही मनातून जात नाही.
— अरुण पुराणिक. पुणे

कित्ती सुंदर लिहीलय. मैत्रिणीने विचारलेल्या प्रश्नाला मनातल्या मनात मनानेच दिलेलं उत्तर कागदावर उतरलवत आणि त्याने आमच्या मनाचा ठाव घेतला.
— अस्मिता पंडीत. पालघर

अतिशय सुंदर लेख ताई.. त्यावेळी अरुणजिजाजी आणि अरुणाताई यांच्या दोघांच्या मनामध्ये चाललेले द्वंद्व, त्यावर तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया, तुम्ही ठामपणे घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाठिंबा देणार तुमचं पूर्ण कुटुंब… खरंच सगळंच कौतुकास्पद… वाचताना सुद्धा डोळ्यातून पाणी आले तर  जेव्हा ही घटना तुमच्या सर्वांसोबत घडली असेल तेव्हा तुमच्या सर्वांच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे मी समजू शकते…

घरात ठाण मांडून बसलेली अमावस्या आणि प्रेमाची पौर्णिमा … काय सुंदर शब्द वापरले ताई तुम्ही ….अतिशय सुंदर… म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही… पुन्हा पुन्हा वाचावा असा हा लेख ..असेही तुमचे सर्व लेख मी पुन्हा पुन्हा वाचतेच.. खूप खूप सुंदर असा हा लेख …सर्वच लेख पुन्हा एकदा एकदम वाचण्याची अतिशय इच्छा आहे ती तुम्ही लवकरच पूर्ण कराल याची खात्री आहे..
— मानसी म्हसकर. वडोदरा
१०
छान लिहिलयस तू. ‘घाव बुजून जाऊ शकतात का ?’ याच उत्तर
चांगलं दिलस. पण हे सगळ  नावानिशी लिहिताना तुला भीती नाही का वाटत ?
— नयना वैद्य. ठाणे
११
Enjoyed reading the real story of Aruna What a agony she has gone thru
— जयश्री कोतवाल. पुणे

*माझी जडणघडण – ३८ अभिप्राय*

वाह ताई खूप सुंदर..
वैवाहिक फुटपट्टी, शिंपी जाती चे केलेले अलंकृत वर्णन अप्रतिम.. आणि जाती वरती तुमचे व तुमच्या घरच्यांचे विचार खरोखर वाचताना मनाला कुठेतरी संभ्रमात टाकून गेले..
ताईंची नंतर ची वैवाहिक परिस्थिती वाचण्यास उत्सुक आहोत
— मानसी म्हसकर. वडोदरा, गुजरात

वासंती आणि जात दोन्ही काळजाला भिडणारे लेख आहेत .वासंती ही आधुनिक सुशिक्षित घरात वाढलेली मुलगी साहजिकच तिला चाळीत जुळवून घेणं कठीण आहे. पण तिची मन: स्थिती केवळ जनाच समजू शकले याचे वर्णन छान लिहीले  आहेस
“जात” हा लेख मनाला भिडणारा आहे.
प्रत्येक लेखात तुझे लेखन कौशल्य ठळकपणे ऊमटलेलं दिसून येते.
— रेखा राव. मुंबई

जात ,जातीचा पगडा, भूतच म्हण ना — जे काही मानेवर बसलं आहे ते दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट हा मराठा, हा वंजारी.
विशिष्ट जातींना शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सवलती, ह्यामुळे लहानपणी ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या कानावर येऊ लागल्या.
मला लग्नाआधी जात वगैरे विशेष समजत नव्हतं. मग हळूहळू
जाती, पोटजाती समजायला लागल्या. आमचं घर सुधारक विचारांचं. त्यामुळे आजीच्या देवघर आणि स्वयंपाक घरापर्यंत तिचं सोवळ, इतर गोष्टी मर्यादित असत.
पण बाकी काहीच नाही. माझ्या आईने एका न्हावी बाईला घरकामाला ठेवलं तर तिला खूप ऐकून घ्यावं लागलं. पुढे त्याच
बाईंना अनेक घरात कामाला ठेवण्यात आलं. त्या काळातील हे एक सामाजिक कार्यच.
माझ्या मैत्रिणी लेवा पाटील, जैन, ब्राम्हण, मराठा सर्व जातीतील होत्या. त्यांचा मुक्त वावर सर्वदूर असायचा. फक्त काहीजणी नॉनव्हेज खात असत आणि मी नाही एवढाच फरक मला जाणवायचा.
आता आंतरजातीयच नाही तर आंतरधर्मीय विवाह होतात तरी मनात कुठे तरी ही भिन्नता घर करुन आहे.
आपल्या कळत्या वयात झालेल्या काही गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वास करतात.
साहित्याच्या जगतात हे सगळं आहे. ते कुठेतरी थांबावं असं वाटतं. आपण गेले अनेक वर्षं बरोबर आहोत. धोबी गल्लीबद्दल वाचल्यावर मनात थोडा गोंधळ झाला हे नक्की. मला आज कळलं, खरं म्हणजे ‘धागा धागा जोडणारा, शिवणारा’ म्हणजे मानवजातीला एकसंध करणारा. भेदाभेद असूच नये असं मला वाटतं. प्रत्येक जातीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, काही चालीरिती जपून इतर न पटणाऱ्या गोष्टीचा ऱ्हास व्हावा ही इच्छा आहे,
— अनुपमा आंबर्डेकर

जात नाही ती जात मॅम.
लोक कधीच सुधारणार नाहीत हेच खरे आहे.
— सुमती पवार. नाशिक

*जडण घडण — ३९*

ताईचा सुरु झालेला सुखाचा संसार. मग अचानक आलेले दुःखाचे प्रसंग. उद्भवलेली विपरीत परिस्थिती ह्याला ताईने खंबीरपणे तोंड दिले.
मुल्हेरकर घरातील काहींचे जुनाट विचार ह्याला कारणीभूत ठरले असावे. अरुण हे दुखण्याने दुर्बल झाल्याने ते असे वागले असावेत.त्यांचं ताईवर मनापासून प्रेम असावं असं दिसतं.
ताईने माहेरी येणं, अरुण आणि ताईचा पुन्हा समेट घडणे ह्या गोष्टी छानच. हल्ली घटस्फोटाचे वाढते प्रमाण बघता सर्वांनीच विचारपूर्वक वागून प्रश्न मिटवावेत असं वाटतं,
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

*माझी जडणघडण – ४०*

छानच.
माझ्याकडे सगळ्या .. बऱ्याच…जुन्या कवितांचं print out आहे
— संजीवनी कुलकर्णी.

जडण घडण मधले सर्वच लेख खूपच छान आहेत. प्रत्येक लेख वाचताना तो लगेच पूर्ण वाचावासा वाटतो. पण दर वेळेस लिहीत नाही कारण मला  रसग्रहण चांगल्या भाषेत मांडणं जमत नाही. 🙂
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

Junya Kavitan chi ujalni karun dilyabddal thanks 👍 Radhika tai kharach aapalya balpanatlya aathvani tajya jhalyat.tumch jevdh kautuk karav tevdh kamich aahe.
— मीना वाघमारे. अमरावती

वाहवा! राधिका, आजची जडण घडण वाचताना मला आज एक वेगळीच राधिका दिसली.
साहित्यातील रत्नांनी तुला बाहेरून तर सजवले आहेच,परंतु तुझ्या नसानसात, रोमरोमात ती घर करून बसली आहेत. तुझ्या प्रत्येक लेखनातून तू अतिशय संवेदनशील स्त्री आहेस हे जाणवतेच,तसा उल्लेखही तुझ्या लेखनाविषयी लिहिताना मी वारंवार केला आहे, करत असते. आजच्या या जडणघडणीतून मात्र तुझी संवेदनक्षमता विशेष जाणवली.
तुझा मराठी, इंग्लीश आणि थोडा थोडा हिंदी साहित्याचाही अभ्यास या लेखाच्या माध्यमातून चांगलाच लक्षात येतो. तू उत्तम वाचक आहेस, मनन केल्यावाचून असे लिहिताच येणार नाही.
असाच तुझा व्यासंग सतत चालू राहो या शुभेच्छा!
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

Excellent! These poems really flash upon my inward eye in the bliss of solitude.
— नयना वैद्य. ठाणे

आपल्या जडण घडणाद्वारे आयूष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर
भेटलेल्या आणि मनात घर करून राहिलेल्या कवितांची मस्त सफर झाली.
कविता मोजक्या शब्दात खूप मोठा आशय सांगून जातात.
आणि गेयता असल्यामुळे लक्षात ठेवायला सोप्या जातात.
साहित्य हे माणसावर किती चांगले संस्कार करू शकते हे छान पटवून दिलेत.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

कवितेनेच आयुष्य व्यापले तुमचे…मस्त
— सुमती पवार. नाशिक

राधिकाताई, जडण—घडण मधील हे ४० वे पर्ण वाचताना तुमचे वाचन किती अगाध आहे हे प्रकर्षाने जाणवते.वयाच्या प्रत्येक टप्यावर प्रत्येक कविता अगदी चपखल बसली आहे. असेच लिहित रहा !
— आरती नचनानी. ठाणे

अप्रतिम शब्दांकन.
— अजित महाडकर. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता