Wednesday, April 23, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात…सदरात आपले स्वागत आहे. पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

“माध्यम भूषण वासंती वर्तक”
या मी (देवेंद्र भुजबळ यांनी) लिहिलेल्या यश कथेवर पुढील प्रमाणे प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

आदरणीय सरजी,
नमस्कार.
वासंतीताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी व सुंदर दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आपण किती सुंदर शुभेच्छा दिल्या! त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन असे केले आहे की, सर्व घटना डोळ्यासमोर जशास तशा उभ्या राहत होत्या. लेखन सौंदर्य ही तुमची खरी शक्ती आहे हे क्षणोक्षणी जाणवत होते. आपल्या सारख्या साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती च्या सहवासात आहोत ही भावना स्वत:चाच अभिमान वाटायला लावते आणि हे सत्य आहे.
वासंती मॅडम ज्या टिव्ही मध्ये दिसत होत्या कधी तरी योग आल्यावर भेट झाली तर खरच खूप आनंद वाटेल.
— सौ सीता राजपूत. अंबेजोगाई

वासंतीताईंवरचा लेख फार छान !👌🏻त्यांच्या मुलीला मी पाहीलेले आहे.
— शिल्पा कुलकर्णी. अमेरिका

भुजबळसाहेब, वासंती वर्तक (पटवर्धन) माझ्या पुण्यातील स.प.काॅलेज मधील क्लासमेट होत्या. त्यांच्यावरील लेख आवडला. खूप छान.
— डॉ भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन, मुंबई.

वासंती वर्तक यांच्या वरील लेख खूप आवडला.
— परवीन कौसर. बंगलोर.

सर नमस्कार,
कालच्या पोर्टल मधील आपली ‘माध्यम भूषण’ वासंती वर्तक यांच्यावरील यशकथा वाचली. त्यांचे महाविद्यालयात शिकविणे, भाषांतर करणे व निवेदिका म्हणून काम करणे अशा तीन-तीन गोष्टी एकावेळी करणे यावरून बहुआयामी व्यक्तीमत्व दिसून येतेच, पण त्यांची छोटी मुलगी पलंगावरून पडल्याचा ऐनवेळी फोन येऊनही त्यांनी दूरदर्शनवर बातम्या वाचून कामाप्रती प्रचंड निष्ठा आणि प्रामाणिकता ही तितकीच आहे हेही दर्शवून दिले. ग्लॅमरच्या जगतात सुद्धा समतोल जीवन जगता येते हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले आहे. त्यांना माझा सविनय प्रणाम. अशा सुसंस्कारी, आदरणीय वासंतीताईंचा चतुरस्र परिचय आपण करून दिल्याबद्दल आपणासही खूप मनःपूर्वक धन्यवाद.

श्री. नितीन पखाले यांनी, श्री.संदीप व नंदिनी शिंदे या दाम्पत्याने संत गाडगेबाबा यांच्या विचारांची कास धरून मनोरुग्णांसाठी उभे केलेल्या नंदादीप फाऊंडेशन या संस्थेची खडतर वाटचाल कशी पार पाडली याबाबत फार सुंदर माहिती दिली आहे. त्यामुळे नंदादीप चे कार्य कळले.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली.

वासंती वर्तक यांच्या बद्दल अतिशय हृद्य लिहिले आहे. त्यांच्या आयुष्यात एवढे चढ उतार आले होते तरीही त्यांनी इतक्या संकटांचा धैर्याने सामना केला आणि सामाजिक भान ठेवून स्त्रीसाठी कार्यक्रम ही केलेत. तुमचा असा सर्वस्पर्शी लेख मनाला हेलावून गेला.
— स्वाती वर्तक. मुंबई

नमस्कार.
प्रख्यात दूरदर्शनच्या निवेदिका वासंती वर्तक यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई

राधिका भांडारकर यांच्या, माझी जडणघडण भाग ४१ प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

सुंदर लेख!पूर्णपणे सकारात्मक उर्जा देणारा !
— आरती नचनानी.

व्यक्तीमत्वाची जडण घडण होत असताना माणसाच्या आयुष्यात काही क्षुल्लक वाटणार्‍या बाबींचाही किती मोठा भाग असतो हे राधिकाताईंच्या आजच्या लेखावरून फार चांगले स्पष्ट होते. एक साधा रस्त्यावरच्या कामाचा मजूर “हम हमारे दिलके मालिक है!” हे एकच वाक्य बोलून जातो आणि तेच वाक्य राधिकाताईंना किती काय सांगून जाते. आपण अनेक सुविचार वाचतो, विसरूनही जातो, परंतु असे एखादे वाक्य माणसाच्या मनावर राज्य करते हे राधिकाताई तुमच्या लेखातून तुमच्या उत्तम लेखनशैलीत वाचकांना पटवून दिले आहे. फारच छान !
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

” ते एक वाक्य”
छानच सांगितले आहे, राधिकाताई.
अशी वाक्ये ऐकतच असतो. एवढे छान सविस्तर सांगितले आहे राधिकाताई.
— छायाताई मठकर. पुणे

आता अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचू या….

जर्मन विश्व मधील, बोरिस बेकार वर लिहिलेला लेख खूप आवडला. माझ्या मुलाचे बालपण आठवले, किती भक्त होता तो त्या खेळाडूचा ! त्याचीच चित्रे काढायचा.
बंजारा संमेलन ….लेख माहितीपूर्ण आहे.
अनिसाजींची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

अरुणा गर्जे ह्यांच्या अलक रचना एकापेक्षा एक सुंदर आहेत. सामाजिक विषमतेचे वास्तव दर्शन घडवणा-या आहेत. 👍👍
— मृदुला राजे. जमशेदपूर

जात निहाय संमेलन…..
Very nicely written. Its very much expected that every community should have a dias to reflect their literary feelings. Hence there is nothing wrong to shape the Banjara’s literary meet though the idea of multy community literary meet shouldnt not be averted.
Along with the author’s welcome efforts to express himself on the topic, editor Devendra Bhujbal sir and madam Alka Bhujbal who uphold his views are equally welcomed.
— Ranjit Chandel. Yavatmal.

गझल सम्राट श्री. यशवंत पगारेजी यांचे अभिनंदन आणि खरंच त्यांची गझल खूपच सुंदर आहे.
श्री.संजय फडतरे यांची ‘सुंदर हात ‘ कथा अप्रतिमच ! कष्टाचे हातच खरे सुंदर हात असतात हा संदेश किती सुंदर रीतीने मिळतो.
— सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे

संजय फडतरे लिखित सुंदर हात कथा फारच सुंदर.
— अरुणा गर्जे. नांदेड

Sandeep and Nandini Shinde ‘s dedication towards the rehabilitation of mentally deranged people is highly admirable. They are the most neglected lot of the society. Even their family members abandon them. There is all spreading darkness and dejection in their lives. Shinde couple with their dedication, have enlightened many such people. They gave them a new ray of hope and humanly teatment that enabled them to rejoin their families. The husband and wife duo justified their names as Sandeep means light while Nandini means happiness. I bow my head to their devotion for the cause such people. Sr journo and author of the story Nitin Pakhale have had always given exposure to social issues through his writings and I have always praised his work. Our editor Devendra Bhujbal sir and Alka Bhujbal madam equally deserve admiration for publishing the story with regard to Nanddeep on their portal.

“सुंदर हात” ही कथा खूप छान आहे. कष्टकरी हाताचे महत्त्व पटवून देणारी अतिशय सुंदर, भावपूर्ण कथा 🙏💐
श्री. यशवंत पगारे ह्यांचे हार्दिक अभिनंदन. गझल रचना खूप छान आहे. 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर

सर,
आपण खरच नशीबवान आहात, आपल्याला अंदमान ला जायला मिळाले.
अंदमान म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाच्या अतिशय खडतर प्रवास होता.
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला……
भारताचा इतिहास महापुरुषांच्या त्यागामुळे पावण झाला आहे.
— सौ सीता राजपूत. अंबेजोगाई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर आणि वाचनिय रचना आहेत. आपल्या कवितेला वेगळाच गंध आहे 💐💐💐💐💐💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता