नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
दिवसेंदिवस उन्ह वाढत चालले आहे. फारच आवश्यकता नसल्यास कृपया उन्हाचे घराबाहेर पडू नका. काळजी घ्या.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ. (संपादक)
१
“भ्रष्टाचारामुळे समाज धोक्यात” या अतिशय ज्वलंत विषयावरील न्या. पुखराज बोरा यांनी सभागृहात मांडलेले विचार निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत.
सेवानिवृत्त जिल्हाधिकारी श्री बी जी वाघ यांनी घटनात्मक मूल्यांच्या संदर्भात सखोल ऊहापोह आपल्या पुस्तकात केला आहे, असे दिसते. त्यातील त्यांनी मांडलेली खालील भूमिका विचार करण्याजोगी आहे ती अशी…..
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींजिंची भूमिका एकमेकाला पुरकच होती.राज्यघटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेu आहे. परंतु राजकीय व्यवस्थेला स्वतःचा धर्म नाही. ती धर्मनिरपेक्ष आहे.
सद्ध्या अवतीभोवती राज्यघटनेतील मूल्यांची होत असलेल्या पडझड बघून वाघ सरानी लेखणी उचललेली आहे.
देवेंद्र सर एका अभ्यासपूर्ण कार्यक्रमाचे वृत्तान्त घरबसल्या वाचायला आणि विचार करण्यासाठी उद्युक्त करणारा लेख उपलब्ध करून दिला .
धन्यवाद.
— प्रकाश पळशीकर. पुणे
२
सर नमस्कार,
प्रा.डाॅ.विजय पांढरीपांडे याचा लेख खरोखरच वैचारिक आहे. एखादी घटना वा एखादा प्रसंग घडतो आणि मधमाश्यांचे मोहोळ उठावे तसे चोहोबाजूंनी चर्चा घडू लागतात, अनेक दृष्टीकोनांतून तिचे चर्वितचर्वण होते. पण कोणताही अंतिम निष्कर्ष वा निर्णय न होता त्या प्रश्नाचे वा समस्येचे भिजत घोंगडे तसेच पडून राहते. शेवटी विजयजीनी लिहिल्याप्रमाणे आपल्याला प्रश्न पडतो की खरंच समस्या सोडवायच्या आहेत की फक्त चिघळवत ठेवायच्या आहेत. विजयजीनी नेमके वास्तवावर बोट ठेवले आहे.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
३
भीमराव पांचाळे खरोखरच अद्भुत रसायन आहे.. त्यांचे व्यक्तिमत्त्व तुम्ही खूप छान उलगडून दाखविले आहे … त्यांचे शेर, कविता, गायन मला आवडते ..ते नेमके मांडले आहे तुम्ही..
भारती ताईंचा लेख उत्तम.. गुढी बद्दलची माहिती, अपेक्षा, कर्तव्य … काव्यात सुद्धा सांगितले आहे.. आनंद झाला.
— स्वाती वर्तक. मुंबई
४
दिलीपजी, व.पु.काळे म्हणजे मराठी वाचकांच्या मनातले मुकुटमणी! त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीचा अतिशय उत्तम परिचय करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐
— मृदुला राजे. जमशेदपूर
माझी जडणघडण भाग ४२ अभिप्राय….
१
राधिका ताई, एकेक व्यक्तीमत्व तुम्ही इतक्या सहजतेने उलगडून दाखवता की वाचताना गुंग होऊन जाते.आणि विशेष म्हणजे
त्या काळात घरोघरी अशी काही सांभाळलेली नाती असायचीच..
माझ्या माहेरच्या घरी ही एक बालविधवा माहेरी परत आलेली आत्या होती. तिचे असेच वैशिष्ट्य पूर्ण व्यक्तिमत्व मला आठवले.
— अस्मिता पंडीत. पालघर
२
आत्याचे चित्रण फार सुरेख प्रकारे रंगविलेले आहे राधिकाताई तुम्ही. नऊवारी पांढर्या फुलाफुलांच्या लुगड्यातली आत्या, मण्यांचे बटवे विणणारी आत्या, स्वयंपाक घरातील मोठी सुग्रण आणि टापटीप आत्या अगदी नजरेसमोर उभी राहिली.
“आत्यासारखे न चमकलेले तारे कधी कधी आपल्या घरातच असतात. त्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक दुर्बीणीची गरज नसते. मनाच्या दुर्बीणीतून ते तारे पाहता येतात.” हा लेखाचा शेवट अतिशय भावला.
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे
३
“आत्या”, वाचल्यावर एक प्रचंड व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर उभे राहिले. “चालतं बोलतं कुटीरोद्दोग” आणि “न चमकणारे तारे” या दोनही उपमा इतक्या मनाला भावल्या !!
अप्रतिम !!
— आरती नचनानी. ठाणे
युवा कवी मंगेश सावंत, यांच्या काळया मातीतील कसदार कवितांवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
बाबा, शेतकरी यावरील अप्रतिम कविता सादर केल्यात आपण. खूप सुंदर. पहिल्या कवितेत सांगितले आहे की बाबा तुझ्या डोईवरचे ओझे मला दे, माझे सारे आयुष्य तुला घे. खरच आपल्यासाठी वडिलांनी किती कष्ट केले आहेत ! आपल्या शिक्षणासाठी जिवाचे रान करतो आहे आपला बाप म्हणून खरच आपल हे बाल वय आहे ते खरच बापाला दिलं पाहिजे. त्यांच्या डोक्यावरचं ओझं आपण कमी केलं पाहिजे. ही खूपच सुंदर कविता आहे, सर..
पेरणी कविता ही खूप छान, अप्रतिम कविता आहे.
सूर्याला किती छान शब्दात सांगितलं की शेतामध्ये बाप राब राब राबतो आहे,तू एवढा तापू नकोस. माझ्या शेतकरी बापाला काम करू दे.
खरच खूप छान अप्रतिम कविता आहे आहेत सर. तुमच्या खरच मला फार फार आवडल्या मनापासून आपणाला शुभेच्छा.
— सौ.वैजयंती विकास गहूकर. चंद्रपूर (योग शिक्षिका)
२
खूप छान कविता आहे.
एका शेतकऱ्याची व्यथा शेतकरी पुत्राला माहिती आहे. सर्वच कविता खूप छान आहे.
अशा छान छान कविता तुम्ही लिहीत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मंगेश सर.
— सौ. शोभा वसंत आव्हाड. सिन्नर
३
मंगेश सर,
खूप अर्थपूर्ण व अप्रतिम कविता आहेत. आपले मनपूर्वक अभिनंदन.
— सौ.सीता विशाल राजपूत. अंबेजोगाई.
४
जग आणि घराचा पोशिंदा बाप आहे पण हा बाप कोणी समजून घेणे कठीण आहे.
आमचे कवी मित्र यांनी या बापाला कवितेत मांडला आहे.
आई वर कविता खूप आहेत पण बापावर कविता कोण शक्यतो करित नाही.
मांडणी केली आहे ती खुप छान आहे. यात विषयाचा विपर्यास झालेला नाही. आनंद वाटतो कविता वाचून.
— कवी पियुष शाम काळे. आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
५
एक एक कविता जणु
व्यथा परिस्थितीची मांडते,
कवी मंगेश सरांचा कविता
वाचतांना डोळ्यांत अश्रू दाटते.
— कवयित्री सौ.वैशाली मुन.
६
आपली कविता म्हणजे मुक्या भावनांना बोलकं करते. सगळ्या स्तरातील घटकावर आपली कविता वेगळी आणि आशयपूर्ण असते. आई, वडील, शेतकरी, महापुरुष त्याचप्रमाणे समाजातील अनिष्ट चाली रीती यांच्या विरोधात आवाज उठवणारी कविता असते तुमची. कमी वयात एवढे सामाजिक भान असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते.
— रमेश महादेव मोटे लाडझरीकर.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800