Wednesday, April 23, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात… या सदरात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)


सर्वद .. सामाजिक संस्थेचे कौतुक वाटते .. अशा संस्थांना मदत करायला पाहिजे.

भ्रष्टाचाराचे रूप अक्राळविक्राळ होत चालले आहे ते रोखणे आवाक्याबाहेर गेले आहे असे दिसते.. सुनीलजींनी जी दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे त्यात आपल्याला यश मिळो हीच एक इच्छा आहे… अटलजींच्या काळातील उत्तर अजून ही भेडसावतेच आहे.

मराठी ला नोबेल मिळावे..
वा…खरेच ..उत्तम आशा…आपली स्वप्ने संकुचित नसली पाहिजे… मराठीला नोबेल मिळावे .. छान

पद्मश्री डॉ परशुराम यांची माहिती देऊन नीलाताईंनी चांगले कार्य केले आहे.. छान वाटले .. अशी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत का ?

मृत्युपत्र पुस्तक सर्वच ज्येष्ठांनी सध्या वाचून समजून घेतले पाहिजे.. ही काळाची गरज आहे.. धन्यवाद परिचय करून दिल्याबद्दल.
— स्वाती वर्तक. मुंबई

देवेंद्र जी हार्दिक अभिनंदन !
‘मराठीस नोबेल पुरस्कार मिळावा’ हे तुमचे विचार फार चांगले आहेत.
एक दिवस ते घडेल. मराठीत जितक्या प्रकारचे साहित्य आहे. तसे इतर कुठल्याही भाषेत नाही.
साहित्याचा दर्जा ही किती तरी उच्च आहे.
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका.

मृत्युपत्र हा अत्यावश्यक, तरीही अजूनही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित विषय असल्याने, त्यासंबंधात मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ लेखक श्री.अरुण गोडबोले ह्यांचे आणि ह्या पुस्तकाचे महत्त्व ओळखून त्याची योग्य दिवशी दखल घेणारा,त्याचा परिचय करून देणारा लेख लिहिल्याबद्दल श्री. दिलीप गडकरी ह्यांचेही मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.
_ मृदुला राजे. जमशेदपूर.

श्रेयाचे श्रेय” या युवा आर्किटेक्ट श्रेया अतुल पोफळे हिच्यावर देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या यश कथेवर पुढील प्रमाणे वाचकांच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.


Glad to note the achievements of Shreya Pophale resident of Yevala and  owner of Eleganza Design Studio.
I heartily Congratulate Shreya Atulji Phophale for getting Architecture and Interior Design Award, 2025. I may say that ladies and girls are doing extremely well in their career. Kindly convey my good wishes to her. Thanks.
— Pro Dr D V Kasar. Pune. 💐🌹👍🙏

श्रेयाचे श्रेय हा तुमचा (देवेंद्र भुजबळ यांचा) माहितीपूर्ण लेख खूप आवडला ..खरेच या वयात एवढी उत्तुंग उडी बघून अभिमान वाटतो या लेकींचा .. हार्दिक अभिनंदन.
माझ्या परिचित ,या वयातील त्यांना आवर्जून पाठविला कारण त्या देखील स्थापत्यकार आहेत.
त्यांना देखील खूप आवडला.
— स्वाती वर्तक. मुंबई

Great and excellent achievement by Shreya Phopale  for nomination of highest award in architecture, innovation, and interior designing.
Is the firm is in Pune, or Yewale ?
— D L Thorat.
Retd Jt Secretary, Govt. of  Maharashtra.


साळी समाजाच्या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माध्यमकर्मी श्री देवेंद्रजी भुजबळ यांनी व्यक्त केलेल्या अत्यंत परखड विचारांवर आपण सर्वांनी खरोखरच अंतर्मुख होऊन  गांभीर्याने विचार करावा अस मला वाटत.
जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी मिळणारा नोबेल पुरस्कार मराठी साहित्यिकास मिळण्याची आपली आकांक्षा का नसावी . आपल ही ते स्वप्न असायला हवं.
मराठी भाषेतील साहित्याच्या निरनिराळ्या दालनात मग ती कादंबरी असो महाकाव्य, ऐतिहासिक बखर असो रंगपट गाजवून गेलेल नाट्य अहो किती किती म्हणून प्रकार.
सार्थ ज्ञानेश्र्वरी लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या *गीता रहस्याची* पारायणे होत आहेत श्री विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं *माझी जन्मठेप* किती किती म्हणून नाव लिहू
दर वर्षी जवळजवळ चाळीस ते पन्नास साहित्य संमेलनात मग ती जाती निहाय असो प्रदेश निहाय वा विविध विचारसरणीनुसार भरू दे ही अतिशय महत्त्वाची ठरतात.
समाजातील विविध घटकांना व्यक्त होण्यासाठी या माध्यमांचा अतिशय मोलाचा उपयोग होत आहे समाजात, साहित्य क्षेत्रात नित्याने नवनवे हुंकार उमटत आहेत त्यांना दाबून न ठेवता समाजासमोर आले पाहिजेत.
दिवसागणिक बदलत जाणाऱ्या नव्या नव्या तंत्रज्ञान आत्मसात  करण्याबरोबरच आपल्या शेकडो वर्षांच्या परंपरेची वैशिष्ट्याची जपणूक ही केली पाहिजे हे मत नोंदवून भाषणाचा शेवट केला
रसिकहो, नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्याचा सोहोळ्याला जर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये मानाचे स्थान मिळाले तर मग माझ्या नुकत्याच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेतल्या साहित्य क्षेत्रात निरनिराळ्या दालनात प्रसिद्ध झालेल्या कलाकृतीस नोबेल पुरस्कार का मिळू नये.
देवेन्द्रजी आपण जर या प्रकरणात लक्ष केंद्रित केले तर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या अनेक दिग्गजांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्याला सहकार्य केले पाहिजे.
विशेष म्हणजे ज्यांची मातृभाषा मराठी नाही तरी त्यांचे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे आणि मराठी भाषेचा ते दैनंदिन जीवनात वावर करतात.
देवेन्द्रजी या अभिनव वारीची पताका / ध्वज तुम्ही खांद्यावर घेतला आहे मला खात्री आहे की नजदीकच्या भविष्यात मराठी भाषेतल्या साहित्य कलाकृतीस नोबेल पुरस्कार प्रदान होईलच.
होय हे माझं वैश्विक स्वप्नच आहे म्हणाना

टाईप करताना काही चुका टाळायचा प्रयत्न केला तरी सुद्धा काही आढळल्यास वाचक क्षमा करतील याची खात्री आहे
— प्रकाश पळशीकर.

भुजबळ सर,मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झालेला असल्याने, तुम्ही पाच-सहा वर्षांपूर्वी संमेलनात केलेली “मराठी भाषेला नोबेल पुरस्कार मिळालाच पाहिजे” ही मागणी आता अधिकच रास्त ठरते, वास्तव वाटते. “अब दिल्ली दूर नहीं !”, तसेच आता नोबेल पुरस्कार दूर राहू नये ! काळजी वाटते ती एवढीच की सोशल मिडियावर बोकाळलेले मराठी साहित्य आपला दर्जा सुधारवण्याऐवजी काही वेळा अर्थशून्य, गुणशून्य होत चालले आहे. अनेक लेखक सवंग लोकप्रियतेसाठी लिहिताना दिसतात, त्यांच्या अतिउत्साहाला लगाम घालून, उत्तम दर्जाचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचेल अशी खबरदारी तुमच्यासारख्या समाजमाध्यमांनी घ्यायला हवी, तरच आमच्यासारख्या रसिक वाचकांना दर्जेदार साहित्य वाचायला उपलब्ध होईल आणि त्या साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार मिळवण्याची क्षमता असेल.  तुमचे हार्दिक अभिनंदन.
— मृदुला राजे. जमशेदपूर

प्रा. आशी नाईक ह्यांचे लेख अत्यंत अभ्यासपूर्ण,वाचनीय असतात. मॅडम चे आणि देवेन्द्रजी दोघांचे अभिनंदन. तुम्ही समुद्रातून मोती वेचून काढता👌
— सुलभा गुप्ते. पुणे

आदरणीय सरजी नमस्कार.
मराठीस नोबेल पुरस्कार मिळावा असे, आपण व्यक्त केलेले मत म्हणजे मराठी माणसाच्या हृदयातील गोष्ट बोलली आहे. निश्चितच मराठी साहित्य हे जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे आहे. यात दुमत नाही.
मराठी ही स्वयंभू भाषा आहे आणि किती तरी संत साहित्य, लेखक कवीच्या लिखाणाने समृद्ध झालेली संस्कृती आहे. आपण या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पद भूषविले खूप खूप आनंद झाला. कारण योग्य मार्गदर्शन व एक नवीन दिशा कार्यक्रमास लाभली हे सत्य आहे.
— सौ. सीता विशाल राजपूत. आंबाजोगाई.

अल्बर्ट श्वाइट्झर लेख खूप माहितीपूर्ण.. छान
सासरची लेक … एका आई मुलीचे बंध सांगणारे प्रेमळ नाते  भारतीताईंनी चांगले सांगितले आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

नमस्कार देवेंद्र जी,
तुमचा ‘मधु कांबळे : पत्रकारितेतील आदर्श’ हा लेख वाचला. छान सविस्तर लिहिले आहे. खूपच भावला.
अभिनंदन !
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका.
१०
मधू कांबळे यांच्या वरचा लेख एकदम उत्तम आहे.
_ सुमेध वडावाला, मुंबई.
११
देवेन्द्रजी, जेष्ठ श्रेष्ठ पत्रकार मधू कांबळे यांचा जीवनपट उलगडून सांगतांना त्यांची पत्रकारितेतील सच्चाई, मेहनत, सत्याची कास धरून मिळवलेली माहिती आणि प्रलोभनांपासून दूर राहून निःस्वार्थीपणे दिलेली पत्रकारितेला प्रतिष्ठा हे त्यांचे सद् गुण  वि. सं, अ. या नात्याने मला अनेकदा अनुभवता आले. माझ्या सुदैवाने मधू कांबळे हे माझ्या स्नेही पत्रकारांपैकी एक होते हे मी माझं सद् भाग्य समजते. माझ्या शासकीय बातम्यांना मधू कांबळे यांनी नेहमीच न्याय दिला याबद्दल मी त्यांना नेहमीच धन्यवाद देत असे.
वरूणराज भिडे, केदार दामले आणि मधू कांबळे हे जेष्ठ, गुणी पत्रकार खरंच निःस्वार्थी होते हे मी अनेक वर्षे अनुभवलं आहे. विशेषतः दिवाळीला मंत्रीमहोदय दिवाळी गिफ्ट विभागीय संपर्क अधिकाऱ्यांमार्फत  पत्रकारांना देत असत.
परंतु हे तिनही पत्रकार त्या गिफ्ट घेण्यास नेहमीच नम्रतापूर्वक नकार देत असत, हे मी कधीही विसरू शकत नाही.
तुम्ही या चतुरंगी गुणवान पत्रकाराचे गुणविशेष अधोरेखित केल्याबद्दल देवेन्द्रजी तुम्हाला धन्यवाद.
— वीणा गावडे.
मा. मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.
१२
सरळ साध व्यक्तिमत्व परंतु उंची आभाळाएवढी. सुरांचा जादूगर, गजलीचा बादशहा भीमराव पांचाळे यांच्या बद्दल बरंच काही सांगता येतं.
त्यांचे तीन कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत. तसेच आमच्या मित्रमंडळी समावेत त्यांच्याशी गप्पांचा देखील ओघ आला.

सदर आपल्या लेखातून त्यांच्या अनेक व्यक्तिमत्त्वाचे पैलू दिसून आले आहेत. फारच सुंदर मार्मिक भीमराव पांचाळबद्दल आपण लेखन केलेले आहे.
लेख मनापासून आवडला.
— सुधीर थोरवे. नवी मुंबई
१३
न्यूज स्टोरी टुडे  २.४. २०२५ च्या प्रकाशनात जर्मन विश्व : मालिकेतील १३ वे पुष्प प्रा आशी नाईक यांनी गुंफले आहे
प्रस्तुत लेख प्रदीर्घ तर आहेच पण एका अष्टपैलू अवलियाच्या जीवनाची रोमहर्षक कहाणी आहे वाचकांनी वेळात वेळ काढून अवश्य वाचावी
मला श्री अल्बर्ट श्वाईझर यांनी त्यांनी “जीवनाबद्दल अनासक्त प्रेम” (Ehrfurcht vor dem Leben) प्रसिद्ध निबंधात त्यांनी मांडलेले तत्वज्ञान मी त्यांची क्षमा मागून NST च्या अभ्यासू वाचकांना उपलब्ध करुन देत आहे.
ते म्हणतात “पाश्चिमात्य जगातील सकारत्मकता लोप पावत चालली आहे.”
बघा हं अल्बर्ट यांचे साल १९६५ मध्ये वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले.
आज २०२५ मध्ये तर जगाच्या कानाकोपऱ्यात काही वेगळी स्थिती आहे अस मला नाही वाटतय एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम, जिव्हाळा दिवसागणिक घटतच जाताना दिसून येतो.

अल्बर्ट यांच्या मते “मी जीवन आहे आणि मी जीवनाच्या मध्यभागी अस्तित्वात आहे जो जगण्याची इच्छा बाळगतो.”
निसर्ग नियमात जीवनाचे एक रूप नेहमी दुसऱ्या रूपाला बळी पडते. तथापि मानवी चेतनेत नेहमी इतर प्राण्यांच्या इच्छेबद्दल जागरूकता आणि सहानुभूती असते. नैतिक मनुष्य या विरोधाभासातून शक्य तितकं सुटण्याचा प्रयत्न करतो. जरी आपण परिपूर्णतेने प्रयत्न करू शकत नसलो, तरी आपण त्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. जगण्याची इच्छा सतत स्वतःला पुनरुज्जीवित करते कारण ती एक उत्क्रांतीची आवश्यकता आणि आध्यात्मिक घटना असे दोन्ही आहे. जीवन आणि प्रेम याच तत्वात विश्वाशी वैयक्तिक अध्यात्मिक संबंधात रुजलेले आहे. नैतिकता स्वतः प्रमाणे इतर प्राण्यांच्या अस्तित्वाच्या इच्छेचा आदर करण्याच्या गरजेतून पुढे जाते.
असे अत्यंत उत्कृष्ट किंतु कठीण तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले.
खरं सांगू एकदा वाचून माझ्या डोक्यावरून गेले. मग विचार केला हा छोटेखानी लेख लिहिण्यामागे लेखिकेचा आणि तो NST च्या पोर्टल वर प्रसिद्ध करण्यामागे नक्कीच काही तरी हेतू असला पाहिजे.
अल्बर्ट यांना नेमके काय म्हणायचे आहे त्यांना भविष्यात माणूस कसा बदलत जाईल याची जाणीव होत गेली की काय? होय म्हणूनच हा निबंध लिहिला आहे.
“निसर्ग नियमात जीवनाचे एक रूप नेहमी दुसऱ्या रूपाला बळी पडते मानवी चेतनेत इतर प्राण्यांच्या जगण्याच्या इच्छेबद्दल जागरूकता आणि सहानुभूती असते. कारण मानवाला भूक भागवण्यासाठी निसर्गाने अन्न धान्य, फळफळावर याची सोय केली आहे काही प्राण्यांच्या बाबतीतही झाडपाला फळ खाऊन ते जगू शकतात.”
बरच काही लिहिण होईल पुढील वाक्य मनाला स्पर्श करून गेलय.
नैतिकता स्वतःप्रमाणे इतर प्राण्यांच्या अस्तित्वाच्या इच्छेचा आदर करण्याच्या गरजेतून पुढे जाते.
हाच प्रश्न सोडवला पाहिजे इतरही माझ्या सोबत आनंदाने जगू शकतात हे एकदा मनाने स्वीकारले तर पृथ्वी वरील सारीच सृष्टी बहरून येईल
वाचकहो वेळात एक काढून हा लेख तर वाचाच पण अल्बर्ट श्वाईझर यांनी लिहिलेले साहित्यही वाचा असो…
प्रा आशी नाईक यांचे मनापासून आभार.
— प्रकाश पळशीकर. पुणे
१४
खूप छान ..रोटरी पुरस्काराचे मानकरी. हार्दिक अभिनंदन
रायकरजींचा लेख अप्रतिम आहे .. किशोरीताईंचे नेमके गुण वर्णन चांगल्या शब्दात… मी हा अग्रेषित करीत आहे.

फडतरे चा जंबू….. प्लासीबो इफेक्ट्स ची आठवण करून देतो .. साधी माणसं खरेच किती श्रद्धावान असतात…
अनुपमाताईंच्या कविता आवडल्या.
राधिका ताईंची अंजु रडवून गेली आम्हाला पण……
अतिशय हृद्य लिहिले आहे …
— स्वाती वर्तक. मुंबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ.सँड्रा देसा सूझा
सुरेश काचावार, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी on चला, कास पठार पाहू या !
शितल अहेर on काही अ ल क
शितल अहेर on काही कविता