नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….या सदरात आपले स्वागत आहे. गेला आठवडा खूपच गडबडीचा गेला, हे आपल्या पोर्टलवरील विविध बातम्या, वृत्तांत वाचून आपल्या लक्षात आले असेलच. आपले प्रेम असेच कायम असू द्या.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….
धन्यवाद.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
ग.दि.कुलथे अनंतात विलीन I had intimate relations with Kulthe saheb. I had an opportunity to work with him n also to share stage with him while i was working in languages as was voice president of Mantralaya and alied officecs staff Association then. His dedication to empoyees cause was unparalleled. My heartfelt condolences to the departed leader
— Ranjitsinh Chandel. Yavatmal.
२
आदरणीय भीमराव पांचाळे ह्यांचे आणि इतर सर्वच सन्माननीय पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
सविस्तर बातमी दिल्याबद्दल न्यूजस्टोरी टुडे च्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद .🙏🌹
— मृदुला राजे. जमशेदपूर
३
नमस्कार,
श्री भीमराव पांचाळे यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
त्यांच्यासह समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई
४
भीमराव,
अभिनंदन ! अभिनंदन अभिनंदन !
हयातभराच्या तपस्येचे हे फळ आहे.
— राम खाकाळ. निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे
५
🕉️🍿🌹🍿🕉️Cसुप्रभातम्. सौ.अलकाजी भुजबळ वहिनी यासी नमस्कार. आज आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन . आपल्या समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदा तसेच धन्वंतरी कडे मनापासून प्रार्थना.मा.देवेंद्रजी व आपल्या लेक, परिजन यांच्या सह सर्वांनाच शुभेच्छा.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई
६
सौ. अलकाताई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्यपूर्ण, सुखी, आनंदी दीर्घायुषी व्हा हीच मनःपूर्वक सदिच्छा.
कर्करूपी कंटकमय आयुष्य ईश्वरकृपेने आणि तुमच्या दृढ निश्चय अन् विश्वासाने निःकंटक होऊन तुम्हाला पुनर्जन्म मिळाला. “ईश्वरेच्छा बलियसी,”, “जाको राखे साईंया, मार सके ना कोएं” हेच खरं. या नवीन जीवनात “आरोग्यदूत” बनून तुम्ही पिडितांची जीवनबाग फुलवण्याचं जे व्रत घेतलं आहे, त्यात तुम्ही नेहमी यशस्वी राहून ते सुफलसंपन्न होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा .💐
— वीणा गावडे. मुंबई
७
अलकाताईंचा आगळावेगळा वाढदिवस! त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🌹
देवेंद्रजी! गुडघ्यांवर बसून अलकाताईंना गुलाबाचे फूल किती प्रेमभावे दिलेत ! क्या बात है !
उभयतांमधले हे प्रेम सदैव वृद्धींगत होवो.
संजय फडतरे यांची कोकरु ही भावपूर्ण कथा (लघुतम) खूप आवडली.
— राधिका भांडारकर. पुणे
८
आदरणीय सौ. अलका मॅडमजी नमस्कार🙏आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सर्व प्रकारचा जीवनातील आनंद, सुख समाधान मिळो. आपण नेहमी समाज कार्यासाठी तत्पर असतात म्हणून आपला अभिमान वाटतो.
आपणास पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎊.
— सौ सीता राजपूत. अंबेजोगाई
९
सौ. अलकाताई,
आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा
🌹🎂🎂🍿🍿🌹
आज आगळा वेगळा पद्धतीने वाढदिवस साजरी केला सकाळच्या हास्यक्लब निमंत्रण स्वीकारून हजेरी लावली आणि सर्वांना हसत आणि आनंदाने जगण्याचा संदेश दिला सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवून आनंदाचे वातावरण निर्माण केले.तसे आपले जीवन संघर्षमय आहे अनेक संकटावर मात करून सुखी आणि समृद्ध जीवन कसे जगावे हे आपणा कडून शिकावे. न्युज स्टोरी टुडे संपादक आदरणीय देवेंद्रजी भुजबळ साहेब व आपण न्यूज स्टोरी टूडे या पोर्टलवरन जनसंपर्कातून जनजागृतीचे कार्य अखंडपणे चालू आहे नवनवीन विचार नवनवीन संकल्पना, नवनवीन उपक्रम आपल्या पोर्टलवरून अवगत होत असतात. आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतानाच आपले पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे निरोगी दीर्घायुषी जावो हीच आम्हा सर्वांची स्वामी चरणी प्रार्थना.
🌹🎂🎂🍿🍿🌹
— दीपक जवकर व परिवार, डोंबिवली
१०
सौ.अलकाताई भुजबळ यांस
सस्नेह नमस्कार,
आपल्यातील स्नेहबंध हे आत्मीयता आणि आपुलकीचे तर आहेतच पण त्या पलिकडे या नात्याला आहे निस्सीम आदराचा गहिरा अर्थ!!
आयुष्याच्या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच उंच भरारी घेऊ दे !!!
मनात आमच्या एकच इच्छा, आपणांस उदंड आयुष्य लाभू दे !!
*वाढ दिवसाच्या शुभेच्छा*
शुभेच्छूक
— सुरेश गोपाळे. दहिसर
११
खूप छान छान लेख व लेखक तुमच्यामुळे वाचायला, मिळतात. देवेन्द्रजी खूप खूप धन्यवाद. तुमचा सन्मान झाल्याचे समजले.खूप आनंद वाटला.. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या मते एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. आम्हा दोघांतर्फे तुमचे खास हृदयातून अभिनंदन..
खूप खुप धन्यवाद.
— पं. शंकरराव वैरागकर. नाशिक
१२
नमस्कार सर.
चंद्रशेखर ठाकूर यांचा “रिंग मास्टर दामू धोत्रे” हा लेख वाचला. फारच सुंदर. सर्कसमधील कलाकारांची कलाकारी म्हणजे साहस तर असतेच पण डोक्यावर मृत्यूची टांगती तलवारही असते. दामू धोत्रे यांच्यावरील जीवघेणा प्रसंग वाचून त्यातील गांभीर्य अंतःकरणास भिडते. माझ्या लहानपणी आम्ही बच्चेकंपनी अनेकदा सर्कस पाहायला जायचो. सर्कसमधले चित्तथरारक खेळ पाहताना अंगात वीरश्री संचरायची. आता फक्त आठवणीच राहिल्या. सर्कस कधीच बंद झाली. लेखामुळे जुने दिवस आठवले.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
राधिका भंडारकर यांच्या माझी जडणघडण भाग ४४
वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया……
१
“आई “
डोळे पाणावले, राधिकाताई कित्ती अर्थपुर्ण लिहिले राधिकाताई तुम्ही सर्व आई, उत्तम संस्कार करतात, तुम्ही फारच छान व्यक्त लिहिले आहे
— छाया मठकर. पुणे
२
नमस्कार राधिका ताई,
खूप दिवसांनी तुमचा जडणघडण लेख वाचायला मिळाला ..आणि तोही आईवर.. प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असणाऱ्या आईवर चा हा लेख तीनदा वाचला पण तरीही डोळ्यातलं पाणी काही कमी होत नाहीये.. खरंच आपण किती गृहीत धरतो ना आपल्या आईला.. तुमच्यासारखीच आमच्याकडे तीच परिस्थिती.. कोवळ्या वयात विधवा झालेल्या आजींनी अशा मुलांना मोठं केलं ज्याने त्याच्या वडिलांना कधी पाहिलंच नव्हतं आणि ह्याची जाणीव माझ्या आईला सुद्धा तितकीच होती. त्यामुळे दोघींमध्ये जीवाभावाचं प्रेम होतं आम्ही सुद्धा आई पेक्षा आजीच्या प्रभावाखाली जास्ती राहिलो आणि मोठे झालो.. आज आईची खूप आठवण आली ..आणि अगदी खरं म्हणतात तुम्ही आईचं महत्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण आई होतो.. खूपदा वाटतं कसं तिने सांभाळलं असेल आम्हा तिघी बहिणींना …वडील कायम फिरतीच्या नोकरीवर .. घरात पाचही बायका.. कसं सगळं सांभाळलं असेल तिने नोकरी करून आणि तरीही कुठलीही कधी कोणाकडे तक्रार केली नाही ..जे तिच्या नशिबी आलं ते सगळं तिने व्यवस्थित सांभाळलं.
जीजींनी सांगितलेलं गुढ वाक्य आणि ते खरं होणं खरंच किती योगानुयोग.. डोळ्यात पाणी आणणारा हा लेख ..पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
— मानसी म्हसकर. बडोदा
३
राधिका…
आईचं व्यक्तिचित्र फार सुंदर रंगवलं आहेस.. हुबेहूब तुझी आई माझ्या डोळ्यासमोर आली!! तिच्या सर्व गुणांच्या आणि स्वभावाच्या पैलूंसकट, कंगोर्यासकट.. दिसायला सुद्धा ती किती सुरेख होती,!! स्वतंत्रपणे छापायला हरकत नाही असे हे व्यक्तीचित्र आहे….
— सुचेता खेर. पुणे
४
आईवर लिहिलेला लेख कोणाला आवडणार नाही.आमच्याही आईविषयीच्या आठवणी उजळून आल्या आणि डोळे अश्रूंनी डबडबले. अतिशय ह्रदयंगम लेख!
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे
५
खूप छान लेख आहेत. मार्गदर्शक आहेत. भाऊ, वासंतीचे पुढे काय झाले याचीही उत्सुकता आहे.
— प्रज्ञा मिरासदार. पुणे
६
खूप छान लिहिले आहेस. आईची महती थोडी उशीराच कळते आपण आई झाल्यावर त्याची जास्त जाणीव होते हे मनोमन पटल. मोठ्या झाडाखाली वाढणार झाड, अगदी खर! आपण लहान असताना बाबांबद्दल जास्त आदर आणि दरारा वाटत असे. आपल्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा होता याची फार उशिरा जाणीव होते.
खूप सहज, सुंदर ओघवत्या शैलीत छान लिहिले आहे. वाचकाला आपली आई आणि तिची महती याचे स्मरण झाल्याशिवाय रहात नाही, नकळत तिच्या आठवणीने डोळे पाणावले.
— सुमन शृंगारपुरे. पुणे
७
खूप छान लिहिले आहे. आई, आजी ही सारी नाती आपल्यासाठी फार मोलाची असतात.. आयुष्यभर आठवणीत रहातात..🙏
— उज्ज्वला सहस्त्रबुद्घे. पुणे
८
सुं द र !!
आपली आई सर्वगुणपन्न होती.तिने तिच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या गुणांचे दर्शन आपल्याला घडवले. आणि आपल्यालाही घडवले!
— आरती नचनानी. ठाणे
९
👍👍 आई ती आईच असते
— पूनम मानुधने. जळगाव
१०
खुप छान आई. कस जिजींनी सांगितलं असेल तिच्या ११ वर्षाच्या जगण्या विषयी !🙏
— संध्या जंगले. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800