Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
मागच्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
संपादक

१.
प्रभात यात्रा स्थगित न करता प्रत्यक्ष झालेल्या घटनेला सामोरे जात त्यातून विधायक कार्यक्रम करणं ही अत्यंत स्तुत्य बाबा आहे. डॉ प्रशांत यांचं अभिनंदन करावं तितकं थोडंच.🌹🌹

  • प्रा डॉ अजित मगदूम. नवी मुंबई.

२.
डॉ.प्रशांत थोरात
यांचे लेखनात मिळणारा प्रतिसाद हा अशा सामाजिक परिस्थितीत विचारमंथन करणारा आहे.

तरुणांची मने योग्य वेळी लक्षणीय परिवर्तित झाली पाहिजे….
अरुण पुराणिक. पुणे

३.
अंक वाचला, छान आहे.

भा.रा.आमच्या ग्वाल्हेरचेच..माझे वडील त्यांच्याबरोबर बसून कविता ऐकत..रिकोर्ड्स ऐकत..त्यांना गाण्याची खूप समज ..ते कधी कधी म्हणत ..ही चाल बरोबर नाही लागली…असे मी आई कडून ऐकले आहे.

अमेरिकेचा हॅलोविन सण अक्षरशः नुसतं मार्केटिंग आहे वाटते…मी तेथे असताना मोठमोठे शॉप्स फक्त हॅलोविन साठी सजलेले बघून आश्चर्य वाटले. पण देश कुठलाही असो …माणूस सारखाच..प्रत्येकाला परलोकातबद्दल ची एक गूढ, अनामिक भीती, जाणून घेण्याचा ध्यास, शाश्वत सत्य समजून घ्यायची पराकाष्ठा आहेच. पितृपक्ष असो वा हॅलोविन किंवा तत्सम काही.. प्रत्येक आपापल्या श्रद्धेने साजरा करीत आहे. सगळ्याच सणांचे आध्यात्मिक महत्व कमी होऊन बिझिनेस झाला आहे ..चित्राजींनी छान मांडले आहे
मेहमूदा रसूलजींचे अभिनंदन. नयनाताईंची कविता छान.

  • स्वाती वर्तक. मुंबई.

४.
अनुराधा यान्चा लेख मस्त वाटला.
विविध रंगाची, रूपाची, स्वभावाची माणस आपल्याच अवतीभवती असतात.
एक गोष्ट खरी कि कोणताही माणूस हुबेहुब दुसर्या सारखा नसतोच. अनेक स्वरूप असलेली माणस या जगात आहेत. प्रत्येक माणसाचे परिक्षण, निरिक्षण करून आपण तो कसा आहे हे ठरवितो. मात्र आपला अंदाजही चुकतो कधीकधी.
माणूस कितीही विद्वान, रूपवान आणि धनवान असला तरी एक दिवस तो हे सुंदर जग सोडून जातोच…. माणसाला जशी धनसंपत्ती लालसा आहे त्यापेक्षा जास्त जगण्याची हाव आहे. मरता मरता जगणे त्याला मान्य आहे, मात्र जगता जगता मरणे मात्र आवडत नाही. मरण आवडो कि ना आवडो ते अटळच आहे. हे सत्य कोणताही माणूस मान्य करत नाही.

  • माधव अटकोरे. नांदेड

५.
जीवनावर सखोल चिंतन करणारी अरुण पुराणिक यांची कविता आयुष्य कथा
– राधिका भांडारकर
.

६.दुर्मीळ पुस्तके १४ – पाण्यातले दिवस या लेखावरील अभिप्राय

व्वा, मस्त, प्रल्हाद जाधव साहेबांचा हा ललित लेख संग्रह मी वाचला आहे, मासे नि त्याचं जग याच लालित्यपूर्ण लेखन यात आहे. हे पुस्तक माझ्याकडे आहे …
डाॅ यशवंत भंडारे

👍🏻👌छान
डॉ संभाजी खराट

छान माहिती आहे👌
श्री अशोक दगु कुडके, माजी प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, नगरसूल

सर्व श्री भिक्कू महेंद्र कौसल, दिगंबर पालवे आणि श्रीमती अश्विनी खरात यांनी लेखास पसंती दर्शवली आहे.

७. आंबेमोहोर अनुपमा मुंजे ह्यांचा खूप खूप मस्त लेख. सगळं अनुभवल्या सारखं वाटलं फारच छान. आणि ‘कोजागिरी ‘स्वाती दामले यांची खूपच सुंदर कविता. मस्तच👍👍👍
इ..स्त्री न मोडणारी हा पूर्णिमा शेंडे ह्यांचा मस्त लेख.सगळं रिपेअर करून अगदी कडक इस्त्री सारखे राहणारी ती इ….स्त्री !! हॅट्स ऑफ अशा स्त्रियांना🫡🫡🫡🫡खूपच सुंदर लेख.

— नीता देशपांडे. पुणे

८.
वर्षा भाबळ यांचे मनापासून अभिनंदन.जीवनप्रवास हे त्यांचे पुस्तक खरोखरच वाचनीय आणि प्रेरणादायी आहेच.
राधिका भांडारकर

वर्षा तुझे पुन्हा अभिनंदन💐
सर्वच लेख अतिशय उत्तम. मी वाचलेले पुस्तक मधून गणिका महात्मा आणि इटालियन ब्राम्हण या पुस्तका बद्दल छान माहिती मिळाली. कुठे मिळाले तर अवश्य वाचेन.
धाडसी कणखर आणि आधुनिक विचारांच्या आनंदीबाई शिर्के यांची आणि त्यांच्या संजवात या आत्म चारित्रा विषयी सुंदर माहिती मिळाली.
सर्वच सदर उत्तम. दसरा काही कविता सदरातील कविता छान वाटल्या.
धन्यवाद अलका ताई , देवेंद्र भुजबळ सर आणि टीम एन एस टी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • सुप्रिया सावंत. खांदेश्वर

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments