Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या लेख, कविता आणि ईतर काही उपक्रम या विषयी प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला,
— संपादक

नमस्कार सर.
ठाणे येथील स्नेहमिलनाचा वृत्तान्त वाचला आणि क्षणभर असे वाटले की, मी सुद्धा त्या कार्यक्रमास उपस्थित आहे.. या स्नेहमिलनाच्या निमित्ताने आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यांचे एकत्र येणे आणि विचारांचे आदान प्रदान यामुळे हा स्नेहमिलन सोहळा खूपच आनंददायी झाला असणार यात शंकाच नाही.
या निमित्ताने कॅन्सर संशोधक डॉ. सुलोचना गवांदे मॅडम यांची मुलाखत सामान्य जनांचे कॅन्सर विषयीचे अज्ञान दूर करण्यात सहाय्यभूत ठरली असणार याची खात्री आहे.
— उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर

“रिबेल सुलतान” हे पुस्तक आकर्षक वाटतं आहे. आपण केलेल्या सखोल वर्णनानं पुस्तक वाचण्याचा मानस होतो आहे. पुढे जरुर वाचीन.
इतिहासातून दिसणारं जुन्याकाळचं वैभव आपण छान मांडलं आहे.
आपलं मनापासून अभिनंदन.
— डॉ.विनयराव भावसार, इंदूर.

प्रा.सौ.सुमतीताई पवार …यांच्या .. उपेक्षितांची दिवाळी – आपले योगदान …या लेखात ( सदरात )..हातावर पोट भरणाऱ्या उपेक्षितांची,गोर – गरीब , कष्टकऱ्यांची दुनिया त्यांचं वास्तव फार जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे …आणि …म्हणूनच त्यांचं वास्तव आपल्या लेखात ( सदरात ) अगदी पोट तिडकिने मांडलं आहे !.. मा.सौ.सुमतीताई आणि त्यांचं कुटुंब हे ह्या गोरं – गरीब आदिवासी वाड्यांवरील, पाड्यांवरील आदिवासीं बांधवांच्या..उपेक्षितांच्या भल्या करिता जे आपलं योगदान देत आहेत ते … वाखणण्याजोग तर आहेच पण प्रशंसनीय पण आहे !…कारण आम्ही देखील या गोर – गरीब आदिवासीं बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या भल्याकरिता आदिवासीं वाड्यांवर काम करत असतानां जे अनुभव आम्हाला येतात ते सुध्दा अगदी भयानक असतात तेच अनुभव … मा.सौ.सुमतीताईंनी आपल्या सदरात अगदी वास्तवात मांडलेत !. . मा.सौ.सुमतीताई पवार मॅडम .. आपल्या कार्याला लाख लाख प्रणाम !…🙏
— अनिल ज.घरत. पिरकोन, उरण,

पोलिसांची ज्येष्ठांसाठी दिवाळी किती मस्त उपक्रम👏
— शिवानी गोंडाळ. मुंबई

अरुणा ताईंची कविता खूप सुंदर, आशादायी आहे. आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई.

अरुणा ताईंची कविता म्हणजे सुंदर विचा ज्ञातर मनाला उजळणारे .फार छान रचना.
— सौ. नीलिमा सिध्दमसेट्टीवार. मुंबई

अरुणा ताईंची कविता..
खूप सुंदर
— भारती महाजन रायबागकर. चेन्नई

सुरेख
— सौ.उषा बुक्कावार. चंद्रपूर

नेहमीप्रमाणे सुंदर, सहज, सोपी,
जिव्हेवर शब्दाळणारी कविता…
— अमरसिंह पवार. यवतमाळ

जीवन असते युद्ध खरोखर
क्षणाक्षणाला लढावयाचे !

अरूणाताईंनी अतिशय सुरेख संदेश दिलेला आहे, आवडले…
— सुनंदा भावसार. नंदुरबार

आपली अर्थसंकेतची मुलाखत मी ऐकली .. खूप छान झाली.
— प्रतिभा चांदूरकर. ठाणे.

अर्थसंकेत प्रकाशन तर्फे न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली त्याबद्दल प्रथम मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. youtube वर मी त्यांची मुलाखत ऐकली आणि खरोखरच मला त्यांच्या प्रसारमाध्यम आणि पत्रकारितेद्वारे त्यांनी केलेल्या क्रियाशील कार्याची माहिती मिळाली. या मुलाखतीत त्यांनी करिअर विषयक मार्गदर्शनही केले, तसेच विविध माध्यमांविषयी बोलताना ते म्हणाले की, माध्यमांना नावे ठेवण्यापेक्षा आपणच काय बघावे आणि काय बघू नये याचा बॅलन्स राखावा. काम आणि आराम याचे वेळापत्रक नीट ठेवावे हा त्यांनी अत्यंत मोलाचा आणि सकारात्मक संदेश श्रोत्यांना दिला. एकंदरच त्यांच्या या मुलाखतीत त्यांचा जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अनुभव आला. सुंदर,संयमित मुलाखत. रचना लचके यांनी अतिशय योग्य प्रश्न विचारुन मुलाखतीत रंगत आणली. प्रत्येकानी ही मुलाखत जरूर ऐकावी. पुन्हा एकदा देवेंद्र भुजबळ यांचे अभिनंदन.💐
— राधिका भांडारकर. पुणे

अर्थसंकेत मुलाखत…
देवेंद्रजी..आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..
— सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक

अर्थसंकेत मुलाखत….
देवेंद्र भुजबळ यांचे हार्दिक अभिनंदन….
— सु अ धारव. यवतमाळ

साहेब, आपले हार्दिक अभिनंदन आणि आपणास शूभेच्छा 👍
— निरंजन राऊत. विरार

अप्रतिम.
विचारधारा चांगली असली की काव्यातहि सुविचार सुकल्पना येतात.
सकारात्मक रचना.
— सौ.मृणाल गिते. नाशिक.

खरोखर…जीवन हे एक युद्ध च आहे…धीराने टक्कर देऊन आनंदाने जीवन जगावे.. हेच उज्वल जीवन👍🏼👍🏼
पुढील अनेक कविते साठी अनेक शुभेच्छा.
— सुहासिनी जीवनकर. नागपूर

आपल्यामुळे शिवाजी फुलसुंदर साहेबांची भेट झाली.
धन्यवाद भुजबळ सर.
— सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.

शिवाजी फुलसुंदर यांचे अभिनंदन🌹
— चंद्रकांत बर्वे.
निवृत्त दूरदर्शन संचालक. मुंबई.

श्री शिवाजी फुलसुंदर यांचे अभिनंदन🌹
— डॉ दत्ता पायमोडे. नगर.

शिवाजी फुलसुंदर यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐

— संगीता मालकर. कोपरगाव.

विजया केळकर यांच्या
हिरव्या रानी…या कवितेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत
.

केतकीच्या बनी नाग सळसळले
अन् सखीचे काव्य खूपच आवडले.
तरारले रान हिरवेगार
अन् दव स्पर्शाने मन हळूवार
तुरे श्वेत जांभळे तृणपात्यातले
अन् पाहता सौंदर्य धरतीचे मन आनंदले
हिरव्यारानी बरसे मेघमाया
अन् नभांगणी सप्तरंगी किमया
— उषा देशपांडे.

सुंदर, आशयपूर्ण कविता, निसर्गाचे खुप छान वर्णन
रे– खा दामले.

खूप छान !
हार्दिक अभिनंदन
— रजनी गोडबोले.

पहाटेचे विरत जाणारे धुके, दवाने भिजलेली झाडे, भूमी आणि छान आनंदाने डोलणारी तृणपुष्पे, गायी गुरे, पावा वाजविणारा गुराखी, सगळे सगळे डोळ्यापुढे उभे राहिले अगदी. फक्त नागोबा असलेले केतकीचे बन सोडून. 😀😀 ते कधीही पाहिले नाही ना म्हणून.
— चित्रा सप्रे.

खुप छान कविता हार्दिक अभिनंदन
— भाग्यश्री आपटे.

हिरव्या रानी…सुंदर कविता..विजयाताई👏👌✍️🌹
— अरुणा दुद्दलवार.

खुप छान कविता निसर्गाचे वर्णन अप्रतिम केले आहे 👌👌
— अलका करंदीकर.

“जपानी टॅक्सिवाला”
या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत
.

मस्त लेख👌🏻👌🏻
लिहायची हातोटी उत्तम..
— केदार बाम. डोंबिवली

जपानी टॅक्सीवाला.. खूप छान 👌🏻👌🏻
— सौ मनीषा पाटील. केरळ.

“जपानी टॅक्सीवाला” उपेंद्र कुळकर्णी यानी लिहीलेला अनुभव खुप आवडला …
जपानी माणूस विनयशील तर आहेच शिवाय आपल्या देशावर मनापासून प्रेम करणारा आहे. हा लेख वाचताना प्रा.ना.य.डोळे सरांनी सागितलैला प्रसंग आठवला.

एकदा डोळे सर एका व्याखानासाठी जपानला गेले होते.
स्टैशनहून त्यानी ईच्छितस्थळी जाण्यासाठी टॅक्सी केली. सर टॅक्सीत बसले. टॅक्सी चालू झाली. सरांना भुक लागली म्हणून त्यानी टॅक्सीचालकांला थोड थांबायला सांगून, रस्त्यावर सफरचंद विकत घेतले. टॅक्सी चालू झाली. प्रवासात सफरचंद खाण्यासाठी घेतले पण एक सफरचंद नासके निघाले म्हणून ते फेकून दिले. टॅक्सीचालकाने गाडी थांबवून परत त्या सफरचंद विक्रेत्याकडे नेण्यास वळविली
आणि दुसरे सफरचंद बदलून घेत टॅक्सीचालक सुरू केली.. हे बघून सरांना नवल वाटले आणि तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये टॅक्सीचालकांना तू असा का त्रास घेतला ? एका फळाची तर गोष्ट होती…. टॅक्सीचालक नम्रपणे बोलला … सर तुम्ही आपल्या मायदेशी गेल्यावर जपानचे व्यापारी फसवे आहेत असा सन्देश दिला असता आणि माझ्या देशाची बदनामी झाली असती. मला ते सहन होणार नव्हते म्हणून मी टॅक्सीचालक परत वळविली.
हे ऐकून डोळे सर त्याच्या देशाभिमानाने अन्तरमुख झाले…
तात्पर्य जपानी माणूस आपल्या देशावर किती प्रेम करतो हेच दिसून आले…..
आपले भारतीय कसे आहेत हे सांगण्याची गरज नाही…..

खुपच बोलका अनुभव उपेंद्र सरांनी सागितला. खुपच छान.
— माधव अटकोरे. जेष्ठ पत्रकार, नांदेड

खूप छान उपेन..
— विद्या दिघे. मुंबई

खूपच छान लिहिले आहेस. अक्षरशः जपान आणि तिथला टॅक्सी ड्रायव्हर डोळ्यासमोर उभा राहिला. जपानी संस्कृती छान मांडली/ व्यक्त केली आहेस. असेच लिहित रहा. 👍🏼
— मनोज पटेल. ठाणे

Fantastic elaboration 👌👏
Even Police are polite and helpful
— Dr. Vijay Bhate. Mumbai.

खूप छान. आपण प्रकाश आमटेंची भेट घेतली. पुस्तके दिलीत.
माझे नातेवाईक तेथेच कार्यरत आहेत.
श्री चांदेजींचा लेख खूप रोचक..आवडला.

 • — स्वाती वर्तक. मुंबई.

दुर्मीळ पुस्तके १८-मनाची मुशाफिरी या लेखावरील अभिप्राय

आता आगगाडी केवळ प्रदर्शनात ठेवण्यापुरती उरली आहे.
श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

छान 👍
श्रीमती चिमोटे

ग्रेट
श्री मधुकर धाकराव

— श्रीमती सुनिता कर्णिक, श्री अभय बापट यांनी लेखास पसंती दर्शवली

वीरांगना….
शब्दच नाहीत !
फक्त सलाम🙏

 • — संगीता सातोस्कार. मुंबई.
 • वीरांगना …
  आगळीवेगळी भेट.
  एक नवीन ओळख
 • — विलास प्रधान. मुंबई.

वीरांगना….
लष्करातील कुटुंबियांचे धीरोदात्तपणाला तोड नाही.
दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर, माझे जुळती.
सलाम त्या वीरांगनेस. 🫡

 • — सुनिता नाशिककर
  निवृत्त पोलिस उप अधीक्षक. मुंबई.

प्रल्हाद जाधव यांची ३ नाटकं स्पर्धेत” या बातमीवर पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत.

आदरणीय प्रल्हाद जाधव सरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🙏

 • — शाहीर अंबादास तावरे.

मा . जाधव साहेबांचे अभिनंदन व शुभेच्छा.

 • — सदाशिव कांबळे. ठाणे

Really great n ornamental to our department. We are proud of you dear sir 🙏🌹

 • — Ranjit Chandel. Yavatmal

प्रल्हाद जाधव साहेबांनी आतापर्यंत अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांना ही देवदत्त देणगी लाभलेली आहे, ती उत्तरोत्तर अशीच वृध्दिंगत होत राहो हीच मनःपुर्वक सदिच्छा. 👍💐💐

 • — वीणा गावडे. मुंबई

टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments