Saturday, April 20, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
लेखक, नाटककार तथा निवृत्त माहिती संचालक श्री प्रल्हाद जाधव यांची 3 सविस्तर पत्रे/ अभिप्राय पुढे देत आहे.त्यांचे हे इतके सुंदर, सविस्तर अभिप्राय नक्कीच उमेद वाढविणारे आहेत.याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार.
इतरही पत्रे पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक

‘घुमटावरले पारवे’ या बा. भ. बोरकर यांच्या लघु निबंध संग्रहाचा मार्मिक परिचय विलास कुडके यांनी ‘ दुर्मीळ पुस्तके’ या सदरात करून दिला आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे हे पुस्तक आहे. एक प्रतिभाशाली कवीच्या चिंतनाचे मुद्दे कोणते होते आणि ते आपल्या विचारांची दिशा कशी पकडत असत हे या निबंधांवरून लक्षात येते. ‘सुके घालावे आम्हासी…’ या लेखाने माझे लक्ष वेधून घेतले… बोरकरांना मत्स्याहार किती प्रिय होता याचा खुसखुशीत पुरावा या लेखातून मिळतो… सरस्वती नदी गुप्त का झाली याचे बोरकरांनी जे कारण सांगितले आहे ते ऐकून ‘ज्याम भारी’
वाटले रसिकांनी तो संदर्भ मुद्दाम वाचावा; तो इथे नमूद करून मी त्यातील मजा घालवत नाही. असो कुडके, भुजबळ कुटुंबीय आणि ‘ न्युज स्टोरी टुडे’चे अभिनंदन! (मराठी- कोकणीच्या वादात बोरकरांसारख्या प्रतिभाशाली माणसाला आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊ दिले नाही ही खंत मात्र मनातून दूर होत नाही).

अमेरिका: ‘थंडीतील झाडं’ हा चित्रा मेहेंदळे यांचा लेख मनाला खूप भावला. त्यांना या विषयावर आस्थेनेआणि विस्तारपूर्वक लिहिता येईल असे लक्षात आले…(कोनिफेरस झाडांच्या आकारामुळे ती अवतीभवतीच्या वातावरणाशी जुळवून घेतात आणि त्यांची टिकून राहण्याची क्षमता वाढते.) आणि हो या निमित्ताने सर्वांना नाताळच्या शुभेच्छा🙏

 • — प्रल्हाद जाधव. नाटककार, लेखक,
 • निवृत्त माहिती संचालक. मुंबई

नमस्कार,
‘रुडॉल्फ’ या चित्रा मेहेंदळे यांच्या लेखाने खूप आनंद दिला… संवेदनशील माणसाच्या, लेखक- कलावंताच्या भावविश्वात प्राण्यांना कसे अढळ स्थान मिळते आणि एकूणच जगणे समृद्ध होण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो हे समजून घेणे हा मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. लाल नाकाच्या या रेनडिअरची गोष्ट समजून घेताना मला ‘पाडस’ मधील ‘फ्लॅग’ची आठवण झाली…

‘रातराणी’ या लघु निबंध संग्रहावर विलास कुडके यांनी नेहमीप्रमाणे छान लिहिले आहे. त्यातील किमान चार ते पाच लेख दीर्घकाळ स्मरणात रहावेत आणि आजही ताजे वाटावेत असे आहेत…

दोन्ही लेखकांचे मनापासून अभिनंदन आणि ‘न्यूज स्टोरी टुडे’ला खूप खूप शुभेच्छा !

तुमच्या पोर्टलवरील सगळाच मजकूर छान असतो पण अनेकदा अनेक लेख वाचूनही त्यावरील अभिप्राय देता येत नाही याची खंत वाटते… असो.🙏

 • — प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
  निवृत्त माहिती संचालक. मुंबई.

अन्य पत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

संजीव वेलणकर यांचा लेख आवडला. महामानवाचा चरित्र आढावा थोडक्या शब्दात मांडणे खूप कठीण. छान आहे.
डॉ शोभणे यांचे म्हणणे खरेच आहे..लेखकांनी जपून लिहावे. मार्गदर्शनपर, संस्कारशील लिहावे.
शकुंतला परांजपे…
लेख अतिशय वाचनीय.
युरोप ट्रीप आणि कविता आवडली.

 • — स्वाती वर्तक. मुंबई.

खूपच छान रचना आवडली सुधीर नागलेजी मनापासून अभिनंदन
– साईनाथ रहाटकर, नांदेड

आनंद वाटला खूप …. परत परत वाचतोय मी ही रचना…. मी फ़ोन करेन
एक दर्जेदार कविता वाचल्याचा आनंद झाला
– महेश दळवी, नांदवी

फारच सुंदर
– प्राचार्य सूर्यकांत वैद्य, पुणे

खूप सुंदर रचना
– ज्योती शिंदे, रोहा

सुधीरजी, “बोल भावनांचे ” भावपूर्ण असल्याने मनाला भावले – मृदुला राजे, मुंबई

प्रिय राजाराम जाधव साहेब,

आपली “पपोळी फाट जना” ही कविता फेसबुकवर वाचण्यात आली. मला वाटते अनेक भाषेंपैकी बंजारा बोली ही एक खूप गोड अशी अस्सल भारतीय चीज आहे.मी स्वतः ही बोली शिकण्याचा प्रयत्न केला,आमच्या गावातच मोठा तांडा असल्यामुळे मला लहानपणापासून ही भाषा(अवगत जरी नाही तरी-)बरीचशी परिचित आहे.या भाषेतील शब्द सतत कानावर पडून पडून ओळखीचे झाले आहेत.”बाटी खाल्दो काई ?”/ “कतेर छ भिया”/” कुंडसो गामेर छ?” / काई किदो? /अशी छोटी छोटी वाक्यं सतत ऐकली/बोलली! कधीं कधीं रेल्वेत सहप्रवासी बंजारी भेटले की मी त्यांचेशी असा बोलायचा प्रयत्न करत असतो….मग त्यांना मी बंजारीच आहे असे वाटते. मागील महिन्यात आंध्रातील एका कुटूंबाशी मी गोरमाटी भाषेत संवाद केला तेव्हा ते खूपच हरखून गेले ! गाडीत त्यांनी मला त्यांच्या शिदोरीत जेवणाचा प्रेमळ आग्रह केला,माझा फोन नंबर सुद्धा घेतला…ही बोली खूप गोड आणि फार सशक्त माध्यम आहे. हीची जपणूक झाली पाहिजे…बंजारा समाजातील जे लोक सुस्थापित आहेत त्यांनी या भाषेची सभा संमेलने भरवीली पाहीजे, दैनंदिन व्यवहारात वापर चालू ठेवला पाहिजे. आमचे परममित्र जाधव साहेब,हे एक उत्तम साहित्यिक असून नुकतीच त्यांची”चंद्रकला” नावाची सामाजिक व शैक्षणिक विषयावरची कादंबरी यवतमाळ येथील “केमिस्ट भवन सभागृहात प्रकाशन समारंभ पार पडला. जाधव साहेब हे गोरबंजारा – गोरमाटी भाषेचे जतन व संवर्धन करण्याबाबत पुढाकार घेत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण त्यांना सहकार्य करु या ! जाधव साहेब, आपणास खूप खूप शुभेच्छा !! संधी मिळेल तसा मी यात सहभागी होईन.
-आपला वर्गमित्र
पुरूषोत्तम गावंडे पाटील

फारच छान. 2 लाख सुनांची आई हे बिरुद ही अफलातून.
कमलाताई आणि त्यांच्या पुस्तकाबद्दल खूप वेगळी माहिती मिळाली. त्या आणि त्यांच्या पति बद्दलचा आदर दुणावला ज्यानी तिच्या talent वर विश्वास ठेवून पैसे न मागणार्‍या प्रकाशकाचा शोध घेऊन त्यास आपला मनोदय पटविला . मुलीचे हो खूप कौतुक.
लेखक श्री. चान्दे यांचे आभार ज्यानी इतकी जुनी गोष्ट सांगून वाचकांना अनमोल माहिती दिली.
… नीला बर्वे, सिंगापूर.

Wow its good n great job done by Tower commitee members n Alka tai .
पुढील वाटचालीत समजसेवे साठी शुभेच्छा अलका ताई ना खूप शुभेच्छा.

 • — संगीता सातोस्कर. मुंबई

सेवाभावी सर्वज्ञ फाउंडेशन चे काम खरोखरीच प्रेरणादायी आहे.

 • — संगीता मालकर. कोपरगाव

दुर्मीळ पुस्तके २१ घुमटावरले पारवे या लेखावरील अभिप्राय

‘घुमटावरले पारवे’ या बा. भ. बोरकर यांच्या लघु निबंध संग्रहाचा मार्मिक परिचय विलास कुडके यांनी ‘ दुर्मीळ पुस्तके’ या सदरात करून दिला आहे.
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे हे पुस्तक आहे. एक प्रतिभाशाली कवीच्या चिंतनाचे मुद्दे कोणते होते आणि ते आपल्या विचारांची दिशा कशी पकडत असत हे या निबंधांवरून लक्षात येते. ‘सुके घालावे आम्हासी…’ या लेखाने माझे लक्ष वेधून घेतले… बोरकरांना मत्स्याहार किती प्रिय होता याचा खुसखुशीत पुरावा या लेखातून मिळतो… सरस्वती नदी गुप्त का झाली याचे बोरकरांनी जे कारण सांगितले आहे ते ऐकून ‘ज्याम भारी’
वाटले रसिकांनी तो संदर्भ मुद्दाम वाचावा; तो इथे नमूद करून मी त्यातील मजा घालवत नाही. असो कुडके, भुजबळ कुटुंबीय आणि ‘ न्युज स्टोरी टुडे’चे अभिनंदन! (मराठी- कोकणीच्या वादात बोरकरांसारख्या प्रतिभाशाली माणसाला आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येऊ दिले नाही ही खंत मात्र मनातून दूर होत नाही)

 • श्री प्रल्हाद जाधव. नाटककार, लेखक,
  निवृत्त माहिती संचालक. मुंबई.

Ranjitsinh B Chandel: “Ghumatawarle Parve” is the 21st book in the series of rare books series,a collection of short stories authored by an eminent poet Ba.Bh. Borkar.most of the stories are written on the background of Goa , their culture and way of life . Along with people of Goa their temples, churches n sculptures are also the subject matter of the stories in this book . Author has presented a realistic picture of the area.
Stories like ,”Matsya Prem”, “Tambdi Bhaji”,”Gowyatil Phule”, reflect their food n fauna culture. Stories like,”Prasad Pakli”are based on the God fearing nature of the goanese. In this it is shown that how they pray God to get his verdict to solve their problems. Stories like “Ashruche wardan”,Manuskiche Aishwarya “, Jivanacha Shilalekh” are unique in themselves n give a mantra to live a happy n contented life . The author is a poet and he weaves the poetry of human life in these stories. Appreciator Vilas kudke presenting this book to readers has done a great job along with him efforts made by our honourable editor Bhujbal sir and the support extended by the team of News Story Today are worthy of praise. We must express our gratitude towards them.
Shri Ranjitsinh Chandel Yavatmal

मी मा. व ज. मध्ये येण्यापूर्वी 1983 ते 1985 तत्कालीन केंद्र शासित प्रदेश गोवा शासनात दोन वर्षे कार्यरत होतो. त्यामुळे या लेखामुळे तेथील वास्तव्याला उजाळा मिळाला.
श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

Hello,
“शरणागती तर झाली…”
India vs Pakistan war 1971… Films Division have gone Film on NEWS COVERAGE..
In those days FD News Reel Cameraman appointed in Army for coverage, by then PM.
— Bipin Chaubal. X Chief Cameraman
Flims Division. Mumbai.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ