Sunday, April 21, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 • — संपादक

सकाळ चे संपादक मुणगेकर सरांबद्दल छान लेख आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या वरील लेख आवडला

 • — अशोक डुंबरे.
  निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे.

सर, आपल्या मनोगताचा / भाषणाचा रिपोर्ट वाचला, खूप छान विचार मांडलेत. अभिनंदन 🙏

 • — आशा कुलकर्णी
  प्रमुख, हुंडा बंदी चळवळ, मुंबई.

प्रतिभा पिटके यांनी सादर केलेला माननीय रा. गो.जाधव यांचा जीवनप्रवास वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. खरोखरच अशा व्यक्ती समाजास भूषणावह असतात.
माझा नम्रतापूर्वक प्रणाम🙏

 • — राधिका भांडारकर. पुणे.

आदरणीय भुजबळ साहेब,
सप्रेम नमस्कार.
पत्रकारितेच्या क्षेत्रात आपण खूप मोठे काम करीत आहात याचा मला अंतर्मनापासून अभिमान आणि आनंद वाटतो. प्रत्येक क्षणाला मला आपली खूप खूप आठवण येते. कारण आपण या क्षेत्रात खूप मोठे काम केलेले आहे आणि करत आहात. इतिहासाला आपल्या कार्याची दखल घ्यावीच लागणार आहे आणि ती इतिहास घेणारच आहे असे मला वाटते. जनसंपर्क क्षेत्रात आपण खूप मोठी गरुड झेप घेतली आहे आणि घेत आहात. आपण कोणतीही काम अत्यंत तळमळीने आणि जागरूकपणे करत आहात. निवृत्तीनंतर देखील मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण काम करीत आहात यामुळे मला तर मनातून अभिमान वाटतो आहे. मला देखील अशाच प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे हे मी मनापासून सांगतो आहे..
पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐

 • — विलास सरोदे.
  छत्रपती संभाजीनगर

कर्मचाऱ्यांचे वृत्तपत्र हा इतिहास नागपूरने मात्र काही वर्ष निर्माण करून दाखवला.हितवाद हे सर्व्हंटस् ऑफ इंडियाचे मुखपत्र असलेले मूल्यपत्र, बंद पडले त्यावेळी व बनवारीलाल पुरोहित या अशोक वनस्पती कारखानदाराच्या हाती ते जाण्याअगोदर, ज्येष्ठ पत्रकार जी.टी.परांडे, ज्यांच्यावर मी ‘व्यक्तिविशेष’ या माझ्या पुस्तकात लिहिले आहे, त्यांच्या संपादकात्वाखाली कर्मचारी पत्रकारांनी ते पत्र चालवले. नंतर प्रोग्रेसिव्ह रायटर्स नावाने, विद्याचरण शुक्ला यांनी ते चालवले तोवर ते आजच्या भाजपाचे मुखपत्र झाले नव्हते. नंतरही बनवारीलाल पुरोहित भाजपवासी होईस्तोवर व काॅंग्रेसचे होते तोवरही ते तसे झाले नव्हते. आज हितवाद पूर्ण भाजपावासी पत्र आहे.
युगधर्म हे तरूण भारतचे हिंदी दैनिक देखील बंद पडले तेंव्हा हा विचार समोर आला होता.मात्र तो अंमलात आला नाही.
धन्यवाद हा इतिहास पुन्हा माझ्यासमोर आणल्याबद्दल माझ्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेचा इतिहास शिकवताना या गोष्टी मी सांगितल्या होत्या मी स्वतः श्रमिक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्राचा कार्यवाह होतो त्यामुळे नागपूरच्या सहकाऱ्यांशी खूप जवळचे संबंध आले होते मनोहर अंधारे टी बी गोल्हर प्रकाश देशपांडे आदींच्या बरोबर संपर्कात मी सातत्याने होतो त्या आठवणी आज जागा आहे.

 • — जोशी श्रीपाद भालचन्द्र.

सहकारी तत्त्वावर देखील नागपुरात आझाद साहू यांनी एक हिंदी सायं दैनिक चालवण्याचा ऐतिहासिक प्रयोग केलेला आहे.
अतिशय सुंदर झालाय लेख ,हृद्य वाटला मला, धन्यवाद किरण सर! 🙏🙏

मुणगेकर कुटुंबियांबरोबा माझा सुद्धा संपर्क होता. त्यांना मी बऱ्याच वेळा भेटलो होतो. त्यांची मुलगी किंवा कोणी तरी नातलग माझी विद्यार्थिनी होती माझ्या टायपिंग क्लास मधे. हत्ती गणपती मंदिरा जवळ पूर्वीच्या विशाल सह्याद्री ऑफिस समोर पावगी वाड्यात मी व माझे सहकारी यांनी स्टार्स टायपिंग इन्स्टिट्यूट चालू केली होती व जवळपास 27 वर्षे ती इन्स्टिटयूट चालवली. पुढे कॉम्प्युटर्स आल्यावर संस्था बंद झाली.
— अशोक बुधकर. पुणे

हृद्य तितकीच वेगळी आठवण. 👌
— विद्या विलास पाठक. पुणे

अत्यंत माहितीपूर्ण आणि उत्तम शैली.
— रवींद्र अनंत साठे. पुणे

मुणगेकर सरांबद्दल छान लेख आहे.

 • — अशोक डुंबरे.
  निवृत्त दूरदर्शन संचालक. पुणे.

Can imagine the personality he had and the impact he made on all of you. Thanks for sharing🙏
— किशोर भामरे. औरंगाबाद

कै.मुणगेकर सरांच्या संदर्भातील ही खूप महत्त्वाची आठवण आपण याद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवलीत याचा आनंद आहे. सकाळच्या इतिहासात नोंदवली जावी अशी ही आठवण आहे. सकाळमध्ये झालेल्या आंदोलनात मीही सहभागी होतो. त्यावेळी व्यवस्पनाविरोधांतील चौकसभांतून भाषणेही केली होती. त्यावेळी आमची बाजू व्यवस्थापनाच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाची जबाबदारी रोषाची शक्यता पत्करूनही उचलली व आंदोलकांना मारक ठरणार नाही अशी हमी घेऊन ते मिटविण्यात सरांचा पुढाकार मोलाचा होता. सकाळची मालकी हस्तांतरित झाल्यावर धोरणात कोणताही बदल होऊ न देण्यातही त्यांनी उचललेली जबाबदारीही मोठी कसोटी पाहणारी होती. या कसोटीलाही ते धीरोदात्त रीतीने उतरले होते. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे सकाळने आतापर्यंत आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती नाही हे नि:संशयपणे सांगता येईल.
— सकाळचे सेवानिवृत्त, पुणे आवृत्ती संपादक, सुरेशचंद्र पाध्ये

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments