Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या पोर्टलवर सुरुवातीपासून लेखन करीत असलेल्या सौ रश्मी हेडे यांनी पोर्टलवर लिहिलेल्या यशकथांचे “समाजभूषण २” हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाबद्दल त्यांना सर्वद फाऊंडेशन चा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला, ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर आपणा सर्वांसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. सौ रश्मी हेडे यांचे मनःपुर्वक अभिनंदन.

तसेच महिला दिना निमित्त ७ कर्तृत्ववान महिला अधिकाऱ्यांचा परिचय करून देणारी प्रेरणादायी लेखमाला मिशन आयएएस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी वेळात वेळ काढून लिहिली, त्या बद्दल सरांचे मनःपुर्वक आभार.

गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

१.

श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे सर यांच्या सकस लेखणीतून नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी – एक तेजस्विता, हा त्यांच्या सकारात्मक विचाराचा प्रभावशाली व्यक्तिमत्त्वातील अनेक अतिशय मौलिक गुणाबद्दल सर्वकष आढावा या लेखातून घेतला आहे. कारण, नागपूर विभागातील विशेषतः आदिवासी भागात गडचिरोली, चंद्रपूर, आणि नागपूर भागात मिशन आय.ए. एस. सुरू करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेऊन विभागातील सर्व शासकीय सेवेतील अधिकारी यांच्या समवेत बोलणे व लेखी स्वरूपात आदेश देऊन पुढील काही दिवसांत ह्या मिशनच्या माध्यमातून तळागाळातील – आदिवासी, बहूजन समाजातील तरूणांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याची सुविधा जिल्हा स्तरावरील ठिकाणी उपलब्ध करून देणे. ही प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, यांच्या मनातील तळमळीतून हे आय. ए. एस मिशनचे कार्य विजयालक्ष्मी बिदरी मॅडमच्या सकारात्मक भूमिकमुळेच या मिशनच्या कार्याला मुर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कार्यतत्परतेला हॅट्स ऑफ आणि प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे साहेब यांच्या सामाजिक दृष्टिकोन आपल्या नजरेसमोर ठेवून काम करण्याच्या उद्देशासाठी व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला स्नेहांकित,
— राजाराम जाधव. नवी मुंबई.

२.

Devendrji खरंच छान initiative आहे तुमचा.
माहिती पण मस्त वास्तवाला धरून असते. रिटायरमेंट मुळे क्लिनिक मधे बसून वाचत बसतो आम्हीं. पण अगदीं मस्त वाटते. तुम्ही पण रिटायरमेंट नंतर बिझी झाला आहात. आनंद वाटतो. आपले जवळ जवळ सर्वच मित्र काही तरी कमीजास्त करत आहेत, खूप बरं वाटतं.. good. Keep it up …

  • — डॉ अरुण इंगळे. हिंगोली


कॉम्रेड मदन फडणीस यांना विनम्र अभिवादन.
लेख सुंदरच, त्यांच्या कर्तृत्वाचे लिखाण अप्रतिम. मृदुलाताई मी मंगलदीप हे मृदुला राजेंचे वाचले आहे.

  • — सुनील चिटणीस. पनवेल.

भाग्यश्री बानायात मॅडमच्या कर्तुत्वाला सलाम💐💐💐💐💐🌹

  • — प्रा अनिसा सिकंदर, दौंड.

    Agamya Stree, a best article by Sou.Rashmitai. 👍👌 I liked it.
    — Pro Dr DV Kasar. Pune


महिला दिनाचा अतिशय सुंदर आणि आशयसंपन्न, वाचनीय अंक. हार्दिक अभिनंदन आणि निर्माती ह्या नात्याने सौ.अलका ताई भुजबळ ह्यांचे महिला दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐

  • — मृदुला राजे. जमशेदपूर


सन्मा. श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या “न्यूज स्टोरी टुडेच्या वेबपोर्टलवर”१४ कवी – कवियत्रींच्या “महिलाची महती सांगणा-या काव्य रचना आणि नेहमीची सदरे खूपच छान आहेत. या आपल्या चांगल्या उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !!

  • — राजाराम जाधव. नवी मुंबई.

संघर्षातुन अधिकारी उत्तम सादर केलेत अभिनंदन.

  • — अशोक डुंबरे. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे


छान लेखन आणि विपरीत परिस्थितीत प्राजक्ता बारसे याना मिळालेले यश निश्चित उत्कृष्ट असून आदर्श घेण्या जोगा आहे.

  • — किशोर सोनवणे. नगर.

१०
नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या पोर्टलवर अनेक रणरागिणींचा धडाडीचा जीवन प्रवास प्रकाशित करून आम्हा वाचकांना एक आनंदाची पर्वणीच दिली आहे.
सर्वच रणरागिणींचे मनापासून अभिनंदन 💐🌹🌹🌹🌹
त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • — आशा दळवी. फलटण

११

‘ऐन विणीच्या हंगामात’ (पुनीत मातकर) या कवितासंग्रहाचे तृप्ती काळे यांनी केलेले परीक्षण आणि ‘न नायक’ (अमोल उदगीरकर) यांच्या पुस्तकाचे सुधाकर तोरणे यांनी केलेले परीक्षण अतिशय दर्जेदार वाटले. दोन्ही पुस्तके विकत घेऊन संग्रही ठेवावी अशी आहेत… आपण एखादे दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिक वाचत आहोत असा भाव हे दोन्ही लेख वाचताना मनात निर्माण झाला. सर्वांचेच खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !

  • — प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
    निवृत्त माहिती संचालक, मुंबई.

१२

पुस्तकांचं हॉटेल ही संकल्पनाच मुळात नवीन आहे तेथे महिला दिन यशस्वी पणे साजरा करणे कौतुकास्पद आहे

सुनीता ताईंसारख्या दीपशिखा अजून ही आहेत म्हणून च आपल्या जीवनात असा आल्हाददायक प्रसन्न प्रकाशाची ज्योत मंदपणे तेवत राहते..अशा दीपशिखांना माझे मनःपूर्वक प्रणाम

न.नायक पुस्तक परीक्षण आवडले

रमजान साठी सर्व मुस्लिम बांधवांना ..मुबारकबाद

यशवंतराव चव्हाण यांच्यावरील स्फुट वाचनीय.

  • — स्वाती वर्तक. मुंबई

१३

अग राधिकाताई, तुम्ही सगळ्या बहिणी किती सुंदर लिहिता ग ! पण कधीकधी माझ्या मोबाईल मध्ये तुमच्या लिंक खुलत नाही आणि सगळा पचका होतो मूड च्या माझ्या. 😝हौशीने वाचायला/बघायला जावं तर लिंक च नाही खुलत ! फार राग येतो पण काय करणार ?
आज सावित्रीबाईंवर लिहिलेली कविता वाचली, खूप भावली मनाला. त्यांचं व्यक्तीत्व छानच मांडलं तुम्ही कवितेत… सही ताई! वाह…

  • — विभावरी लेले.

१४

वंशांचा दिवा अतिशय भावस्पर्शी कथा. स्त्री व पुरूष यांचे भिन्न स्वभावाचे सकारात्मक व वासनांध कंगोरे उलगडणारा लेख.

  • — सुनिता नाशिककर.
  • निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई.

१४

खूप सुंदर वाचनीय अंक. महिला दिनानिमित्त दिलेली माहिती व फोटोज खूप सुंदर आहेत 🙏😊

  • — मृदुला राजे. जमशेदपूर

१५

अपूर्वा गीते यांचे मनापासून अभिनंदन.
अपूर्वासारख्या व्यक्ती म्हणजे मूर्तीमंत नारीशक्ती. अभिमानाने उर भरुन येते. अपूर्वा यांची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हीच शूभेच्छाv!!
— राधिका भांडारकर. पुणे.

१६

बालकांचे मानसिक भावनिक आरोग्य सुंदर माहिती.

  • — प्रा अनीसा सिकंदर. दौंड

१७
मनोहर पर्रिकर म्हणजे शांत,संयमी,उच्चशिक्षित, सुसंस्कृत,नेते पदाचा अजिबात गर्व नाही असे व्यक्तिमत्व होते .ते गोव्याचे मुख्यमंत्री असताना अनेक वेळा भेटलो आहे.

  • — गणेश जोशी. ठाणे

१८

अच्च्युत गोडबोले माझे अतिशय आवडते लेखक आहेत.त्यांचे मुसाफिर हे आत्मवृत्त प्रकारातलं पुस्तक अप्रतीम आहे. मा. सुधाकर तोरणे यांनी त्यांच्या बोर्डरुम या व्यवस्थापन विषयावरच्या वाचनीय पुस्तकाचा वाचकांसाठी नेहमीप्रमाणेच फार सुंदर परिचय करुन दिला आहे.
— राधिका भांडारकर. पुणे

१९

सायबर गुन्हे रोखण्यासाठी नुसती एकजूट नको. सर्वांना त्याची माहिती जाणून घेउन ” साक्षर होणे ” गरजेच आहे.

  • — राजीव रसाळ.

२०
‘चला आनंदाने जगूया’ हा लेख छान झालाय.
आपण जितके रसिक असतो तितका आनंद आपल्या झोळीत पडतो.
देवेंद्र आणि अलका भुजबळ एकदा ठाण्यात कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा त्यांना आम्ही घरी बोलावले. हेमंत साने यांचे गायन त्यांना ऐकायचे होते.
मग रात्री मैफल सुरू झाली ती रात्री 11 पर्यंत रंगली. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यामुळे आम्हालाही आनंद मिळत होता. खरे तर भुजबळ दूरदर्शनवर होते त्यामुळे त्यांनी दोग्गज कलाकारांचे गाणे प्रत्यक्ष ऐकले असणार. पण आमच्या घरी येऊन हेमंतच्या गाण्यात आनंद घेण्याची रसिकता त्यांचे कडे आहे. हे दांपत्य सतत आनंद मिळवू शकते ते याचमुळे !

  • — मेघना साने. ठाणे

२१
सुधाकाका,
अतिसुंदर समीक्षण केलं आहे. महत्त्वाचे मुद्दे वाचकांच्या ध्यानात आणून दिले आहेत.
उपस्थित होणाऱ्या गंभीर प्रश्नांविषयी केलीली चर्चा वाचकांना पुस्तक वाचण्यास निश्चितच आकृष्ट करेल.
आपले मनापासून अभिनंदन.
— डॉ विनायक भावसार, मंडी (हि.प्र.)

२२
आजच्या काळात होळीचे महत्व…
आपण मांडलेले विचार अत्यंत मार्मिक व अभ्यासपूर्ण आहेत. मूळ हेतूच बर्याच वेळेस विसरला जातो आणि अनपेक्षित गोष्टींना महत्त्व येते किंवा प्राधान्य दिले जाते. कालौघात त्यावर इतक्या विविध गोष्टींची पुटे चढतात की विचारता सोय नाही. आणि म्हणूनच खरे पाहता periodically प्रत्येक गोष्टींचे audit झाले पाहिजे. It is very much required not only for the system checks but also to review the practices that are being carried out. It helps to improve the system. कालमानानुसार सुसंगत होणारे बदल केले तरच ऊदात्त हेतू शिल्लक राहणार… असो.
जरा जास्तच लिहीलेय का ? 😔
लेख आवडला. छानच झालाय. तुमच्या लहानपणीच्या गोष्टी वाचून मजा आली. 👍👏👌🌹🪷🥳

  • — गोकुळ मुळे.

२३

स्नेहालय संस्थेचे उत्कृष्ट समाजसेवी कार्य आहे. छान माहिती दिली आहे.

  • — सुरेश गोकाणी. निवृत्त दूरदर्शन केंद्र,- मुंबई

२४
स्नेहालय, पालकत्व: एक कला लेख अतिशय उत्तम. खूप सुंदर अंक

  • — मृदुला राजे. जमशेदपूर.

२५
मी नगरची . मला खूप अभिमान आहे की नगरमधे स्नेहालय ही संस्था आहे आणि ती जगभर नाव कमावते आहे. मी औरंगाबादमधे अनामप्रेम या संस्थेशी निगडीत आहे. धन्यवाद तुम्ही स्नेहालय आणि अनामप्रेम विषयी लेख पोर्टल वर आणल्याबद्दल

  • — प्रा सुनिता पाठक. छ. संभाजीनगर

  • २६
    ख्यातनाम रशियन कादंबरीकार डोस्टोवस्की यांची व्हाईट नाईट्स ही दीर्घकथा/कादंबरी मी सुमारे ४० वर्षांपूर्वी वाचली होती. रशियन भाषेतून इंग्रजी भाषेत झालेला अनुवाद होता तो! अतिशय सुबक बांधणीचे ते पुस्तक मी विकत घेतले होते आणि बराच काळ माझ्या संग्रही होते. आपले इंग्रजी चांगले व्हावे म्हणून मुंबईतील सगळी इंग्रजी वर्तमानपत्रे तसेच इंग्रजी लिटरेचरमधील हाती लागेल ते साहित्य मी वाचत असायचो. मी तेव्हा एका वृत्तपत्रात काम करत होतो. एक दिवस ड्युटी संपवून घरी परत आलो आणि संध्याकाळी व्हाईट नाईट्स वाचायला सुरुवात केली ती थेट दुसऱ्या दिवशी सकाळी संपवली आणि बाहेर कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पिऊनच मी पुन्हा घरी परतलो हे मला पक्के आठवते. एवढे त्या कथेत आहे तरी काय, याची ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी ती वेळात वेळ काढून जरूर वाचावी. त्यांचे ते कुतूहल चळवले जावे अशी कामगिरी विलास कुडके आणि न्यूज स्टोरी टुडे यांनी केली आहे, त्यांचे अभिनंदन !
  • — प्रल्हाद जाधव.

२७
रश्मी हेडे यांना सर्वद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन.
समाजभूषण १ आणि समाजभूषण २ ही त्यांची पुस्तके वाचनीय आणि संग्रहणीय आहेतच.
— राधिका भांडारकर, पुणे

२८

💐 अभिनंदन रश्मी मॅडम.

  • — अनिल चाळके. सामाजिक कार्यकर्ता, बदलापूर

२९

रश्मीताई, साहित्याचं आकाश विशाल आहे जितकी उंच भरारी घेता येईल तितकी कमीच पण गृहिणी म्हणून विहित जबाबदारी पार पाडून करायची. त्यामुळे घरच्या सर्वांचे पाठबळ तूझ्या पाठीशी असेल.
७९ पूर्ण होईल दृष्टी कमजोर होउ लागली आहे पण रसिकता तरुण आहे म्हणून अशी दाद दिल्या शिवाय चैन पडत नाही. दमलो पुन्हा भेटू.
– प्रकाश पळशीकर. बावधन, पुणे.

३०

सन्माननीय रश्मी हेडे, आपणास सर्वज्ञ पुरस्कार घोषित झाल्याचे वाचून अत्यानंद झाला. आपण साहित्य क्षेत्रात सेवावृत्तीने काम करीत आहात. देवेंद्र भुजबळांच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर आपण सातत्याने लेखन करता. आपल्या साहित्य सेवेबद्दल पुनश्च एकदा अंत:करणपूर्वक अनेक अनेक अभिनंदन.
आपला
— शिवाजी राऊत, सातारा
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८