नमस्कार मंडळी.
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आपल्या पोर्टलवरही या निवडणुकांचे प्रतिबिंब पडणे स्वाभाविक आहे. त्या दृष्टीने काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. आणखी ही होत राहतील. निवडणूक विषयीचे आपले विचार, अनुभव, उमेदवारांकडून आपल्या अपेक्षा असे आपले लेखन स्वागतार्ह आहे. असो.
गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
संपादक
देवेंद्र भुजबळ
१
“सायबर गुन्हे -महिलांनी घ्यावयाची दक्षता ” या लेखात सुनिता नाशिककर मॅडम यांनी अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. जेव्हा महिला मोबाईलवर फोटो अपडेट करतात तेव्हा काही जवळच्याच लोकांकडून त्यांना धोका असतो. त्या बद्दल काळजी कशी घेऊन महिलांनी अलर्ट राहिले पाहिजे या सर्व विषयाची गरजेची व उपयुक्त माहिती या लेखात दिली आहे. धन्यवाद मॅडम…..
— अंजली सरकाळे. गोरेगाव, मुंबई.
२
“टाकाऊतून टिकाऊ” हा सुंदर उपक्रम सुरु केलात…छान👏👏
कलेबद्दल देता येतं हे ठाऊक नव्हते. मी पेपर क्विलिंग आर्टचे पर्यावरणपूरक म्हणून सहा वर्ष क्लासेस व वस्तू बनवून दिल्या. शाळा, काँलेज, विविध क्लबमधे डेमो दिले.
बैठक खूप होत असल्याने कमी केले. नंतर व्हाटसप आले.😊
पेपर क्विलिंग, कुंदन आर्ट, पुष्परचना घरी उपलब्ध पानाफुलातून मी स्वतः करते.👍
— अरुणा दुद्दलवार, दिग्रस
३
सुनील देशपांडे यांचा मी मतदार हा लेख फारच सुंदर आहे. या लेखातला प्रत्येक शब्द म्हणजे माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या मनात मतदार म्हणून उडालेला गोंधळाचं प्रतिनिधीत्व करतो.
अप्रतीम लेख. वाचनीय, मार्मीक, प्रबोधनपर. संग्रही ठेवावा, पुन्हा पुन्हा वाचावा इतका अभ्यासपूर्ण, थेट आणि प्रामाणिक.
योग्य वेळी या लेखास प्रसिद्धी देणार्या अलकाताईंचे आणि न्युज स्टोरी टुडे चे शतश: आभार.
— राधिका भांडारकर, पुणे
४
सुनील देशपांडे जणू आपल्याच मनातला शब्द बोलत आहेत असे वाटले. खरोखरच सध्या मतदारांइतका गोंधळलेला असाहाय्य कोणी नसेल.
— वासंती वर्तक, ठाणे
५
सुरंगीचा वळेसर
छान कविता.
— सुनील चिटणीस, खेड – रत्नागिरी
६
मरियम मिर्झा ही स्टोरी आवडली.
- — अशोक डुंबरे. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे.
७
मरियम मिर्झा हिने वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून केलेली मेहनत कौतुकास्पद आहे.
— विलास प्रधान, मुंबई.
८
खूप छान लेख.
मरियमला मी सानेगुरुजींची अनेक पुस्तके, गोड गोष्टी आणि माझीही पुस्तके पाठवली आहेत. परंतु तिला भेटण्याचा योग अजून आला नाही. तिचे वडील मला भेटल्याचं आठवतंय. मी ही लींक काही ग्रंथालय चालकांना पाठवते. 🙏
— आशा कुळकर्णी, मुंबई.
९
डॉ.मीना श्रीवास्तव.. अतिशय उपयोगी, अभ्यासपूर्ण व विस्तृत माहिती. नेहमीच छान लिहितात. त्यांचे लिखाण एका साहित्यिक गृपवर बर्याचदा वाचनात येत असते.
— डॉ कल्पना भांगे, पुणे
१०
नवं मतदारांचे कर्तव्य..
खूप सुंदर लेख. युवा पिढीलाच नव्हे तर सर्वांनाच योग्य जाणीव करुन देणारा !
👌👌👍🌹👏
— सुरेश पंडित, पालघर
११
नवं मतदारांचे कर्तव्य..
खूपच मार्मिक लेख आहे आपला. विवेचन करताना हेतू योग्य पध्दतीने मांडल्यामुळे मूळ ध्येय कुठेही उद्दिष्टापासून दूर जात नाही हे विशेष. फारच छान. धन्यवाद व अभिनंदन. 👌👍👏
— गोकुळ मुळे, ठाणे.
१२
अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती ताईसाहेब !
— महेंद्र महाजन, सटाणा
१३
अरुणाताई गर्जे, नांदेड यांचा टाकाऊतून टिकाऊ हा उपक्रम मा . संपादक न्यूज स्टोरी टूडे यांनी प्रत्येक गुरुवारी प्रकाशित करणार असल्याचे सांगितले ! खरोखर हा स्तूत्य असा उपक्रम आहे. त्याबद्दल मा . संपादक साहेबांचे व अरुणाताई गर्जे यांचे हार्दिक अभिनंदन !
या उपक्रमाचा फायदा लहान मुलांना होईल. आता शाळेला सुट्या लागल्यामुळे त्यांना वेळ भरपूर आहे व आजचा उपक्रम ताई नी खूप सोपा व अल्पवेळेत मुलांना करता येण्याजोगा आहे. आणि प्रत्येक गुरुवारी मुले नविन उपक्रमाची वाट पहातील इतका छान आहे. खूप खूप अभिनंदन व धन्यवाद !
— अरविंद कुलकर्णी, पुणे
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800