गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक
“मंगल – दीप” या सौ मृदुला राजे यांनी आपल्या आई वर लिहिलेल्या पुस्तकाचे परीक्षण प्रसिध्द झाल्यावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१
मंगलाताईची लहान मुलगी आणि मी लहानपणापासूनच्या मैत्रिणी….
ठाण्यात पहिली मुलींची शाळा फडवीस (मंगलाताई) यांनी काढली… त्यावेळी सगळ्या कॉन्व्हेन्ट मध्ये होत्या.
— प्राची गडकरी, मुंबई.
२
वाह,
नमस्कार .
मृदुल ताई,
हे पुस्तक लिहीण्याचे फार महान कार्य तुम्ही केले आहे. पुस्तकरूपाने मंगला ताई व मदन दादा अजरामर आहेत. त्यांचे कार्य सदैव वाचकांना प्रेरणा देत राहील.
देवेन्द्रजींनी पुस्तकाचा अतिशय सखोल अभ्यास केलेला दिसतो. अत्यंत सुरेख, ओघवती भाषाशैली आणि अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केले आहे. हे पुस्तक एकदा वाचायला सुरुवात केली की खरोखरच अर्धवट वाचून खाली ठेवूच शकत नाही ह्याचा अनुभव मी ही घेतला आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या प्रत्येक मुद्द्दयाशी मी सहमत आहे. त्यांची लेखनशैली उत्तम आहे.
हा लेख माझ्यासाठी उपलब्ध करून देऊन तुम्ही मला वाचनीय असं काही वाचण्याची सुसंधी दिलीत त्याकरिता तुमचे आभार..🙏🏻🙏🏻🌹🌹
— सौ. स्वाती शृंगारपुरे
संचालिका, शब्दमोती साहित्य मंच, मुंबई.
३
सौ मृदुला राजे या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत त्यांचे मंगल दीप हे पुस्तक माझ्याकडे आहे. उत्तम शब्दांकन, ओधवती भाषा अन सुरेख जीवनपट साकारला आहे, लेखनशैली छान आहे
— सुनील चिटणीस. पनवेल
४
मृदुला राजे या अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत.त्यांनी त्यांच्या आईवर लिहिलेले पुस्तक वाचनीय असणारच. देवेंद्रजींनी पोर्टलवर या पुस्तकाचा परिचय देउन त्यांचा तर गौरव केलाच पण देवेंद्रजी! गुणांची कदर करणे,गुणी माणसे वेचणे हा तुमचा छंद उल्लेखनीय आहे.
— राधिका भांडारकर. पुणे
अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत
५
“विमल दिवस” वृत्तांत खूप आवडला. एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा परिचय झाला. संपूर्ण अंक वाचनीय आहे.
हार्दिक शुभेच्छा.🙏💐
- — सौ मृदुला राजे. जमशेदपूर
६
आजच्या अंकातील “गझलकार विजय जोशी” ह्यांच्यावर लिहिलेला लेख तर स्वानुभवाने प्रचिती देणारा आहे.
मी प्राची गडकरी ह्यांच्या आमंत्रणावरून ‘काव्य रसिक मंडळ, डोंबिवली ‘ ह्या संस्थेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रम प्राची गडकरी ह्यांच्या घरी असला, तरी इतर व्यक्ती अनोळखी असल्याने थोडी बिचकतच गेले होते; परंतु तेथे ह्या मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष श्री.विजय जोशी ह्यांनी इतकी सन्मानपूर्वक आणि आपुलकीची वागणूक दिली, की त्या दोन तासांतच मी ह्या संस्थेची अगदी निकटवर्तीय सदस्य बनून गेले. त्यांच्या कारकीर्दीत मलाही महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिकांशी भेटण्याची संधी उपलब्ध झाली.
विजय जोशी ह्यांचे “ओंजळीतील शब्दफुले” हे कार्यक्रम असोत, की “काव्यप्रेमी शिक्षक मंच” सारख्या नामवंत संस्थेचे कार्यक्रम असोत, विजो सर प्रत्येकालाच प्रगतीची संधी देतात, प्रोत्साहन देतात आणि लेखनाची प्रेरणा देतात. त्यांना अनेक हार्दिक शुभेच्छा आणि ह्या लेखाच्या लेखिका प्रतिभा ताई पिटके ह्यांना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा 🙏
७
” प्रश्न ” कविता अप्रतिम आहे.खरोखरच आयुष्यभर प्रश्न माणसाचा पाठपुरावा करीत राहतात आणि कित्येक प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि जेव्हा उत्तर गवसते तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. 👌🙏💐
-अरुणा गर्जे, नांदेड
८
टाकाऊतून टिकाऊ सदरातील ससूला एकदम छानच आहे….
पुण्याला गेल्यावर नातींसाठी करून बघेन. 👍
— सौ. सुनीती काळे. नागपूर
९
नमस्कार सर.
न्यूज स्टोरी टुडेच्या कालच्या अंकातील “वाळवी : शेतकऱ्यांची मित्र” हा प्रा. डॉ. किरण ठाकूर यांचा लेख खूप आवडला.
जनमानसात वाळवीविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास या लेखाची निश्चितच मदत होईल यात शंका नाही.
श्री मनोहर खके यांच्या कार्यास सलाम.
— उद्धव भयवाळ
ज्येष्ठ साहित्यिक, छत्रपती संभाजीनगर
१०
नमस्कार सर,
आत्ताच ‘वाळवी: शेतकऱ्यांची मित्र’ हा लेख वाचला. छान नवीन माहिती समजली.
पण माझा अनुभव सांगायचा तर आमच्याकडे लिंबाचे झाड होते. भरपूर मोठाली लिंब यायची. त्याच्या खोडाला वाळवी लागली आणि बघता बघता पूर्ण झाड वाळून गेले. घराच्या लाकडी चौकटी वाळवीने खाऊन पार पोकळ करून टाकल्या होत्या.
एक मजेशीर अनुभव सांगायचा तर आम्ही प्लॉट घेतला तेव्हा त्यावर वाळवीचे वारूळ होते. खोदकाम करताना त्या वारुळात एक मोठे चांगले नारळाच्या आकाराचे गोलाकार मातीचे गच्च ढेकुळ सापडले . काम करणारा एक जाणकार
आदीवासी भागातील माणूस होता तो म्हणाला -“साहेब, या ढेकळात बघा वाळवीची राणी असते.”असे म्हणत त्याने ढेकुळ फोडले आणि खरोखरच त्यात चांगली बोटभर लांब आणि तेवढ्याच जाडीची पांढरट रंगाची वाळवीची राणी दिसली. तेव्हा खूप आश्चर्य वाटले की दगडात ही जीवंत कशी ?
तो माणूस आदीवासी भागातील असल्याने त्याने तिचा औषधी म्हणून कसा उपयोग करतात तेही सांगितले. तो म्हणाला ह्या वाळवीच्या तोंडाकडील भाग तोंडून आतील पाण्यासारखा द्रव पदार्थ दुधात टाकून प्यायचा किंवा तसाच तोंडात टाकायचा त्यामुळे दमा, सांधेदुखी या सारखे आजार ह्याने कमी होतात आणि एका वारुळात एकच राणी वाळवी सापडते.
हे कितपत खरे ठाऊक नाही पण अनुभव मात्र खरा आहे.
आज हा लेख वाचला आणि मला हे सारे आठवले.
सहज किंवा एक माहिती म्हणून तुम्हाला हा अनुभव सांगितला. 🙏
- अरुणा गर्जे, नांदेड
टीप: उपरोक्त अनुभव ,लेखक प्रा डॉ किरण ठाकूर यांनी तज्ञ श्री मनोहर खके यांना कळविला असून त्यांच्या कडून प्रतिसाद अपेक्षित आहे. - असा असावा बाप… मस्तच 👏🙏
- मालवणी भाषा दिन 👌
- मतदान चुटकुले मस्त 👌
- पालकत्व 👍
- — राजश्री वाटे. चेंबूर
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800