Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या एम टी एन एल, मिलेनियम टॉवर्स मधील मैत्रिणी आणि न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या लेखिका, कवयित्री यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वाढदिवसाचा वृत्तांत तसेच सौ प्रतिभा पिटके यांनी लिहिलेल्या “प्रेरणेचा झरा:अलका भुजबळ” यांना वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.

काही प्रतिक्रिया वाचून तर मन भरून आले. असो… या प्रतिक्रिया तसेच अन्य प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक


नमस्कार.
माझ्याकडून अलकाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐.

 • डॉ सुलोचना गवांदे.
 • कॅन्सर संशोधक आणि लेखिका
 • न्यू जर्सी, अमेरिका.


अलका ताईंना वाढिवसानिमित्त अनेक उत्तम शुभेच्छा.

 • सुलभा गुप्ते. ईजिप्त.

  many many happy of the day.
 • Pratibha Raval, Pune.


अलकाजी, विलंबाने पाठवत असलेल्या शुभ कामना गोड मानून घ्याव्यात.

 • दिलीप चावरे. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.


अप्रतिम वाढदिवस सोहळा
सर्व वाचून मी ही तिथे उपस्थित असल्यासारखे वाटले!

 • प्रा अनिसा सिकंदर शेख, दौंड.

  अलका ताईंना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.
 • दशरथ पाटील, नगर.

  सर्वच कविता खूप छान. कवितेमधून अलकाताईंचा जीवनप्रवास छान उलगडत गेला.
  “असा रंगला वाढदिवस” मस्तच. अशी जीवाला जीव लावणारी माणसं मिळायलाही नशीब लागतं. फारच छान.
 • अरुणा गर्जे, नांदेड.


नमस्कार . सौ.अलकावहिनीच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह आपल्या समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना .

 • नंदकुमार रोपळेकर, मुंबई.


अलकाताई,
वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!
– नागेश शेवाळकर, पुणे

१०
अलका मॅडम यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा .

 • ज्योती कपिले, ठाणे
  ११
  आमच्या भगिनी सौ.अलकाताई भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला कार्यक्रमाचा वृत्तांत छान वाटला. वाढदिवसानिमित्त अलकाताईंना आमच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.
 • अनिल दस्तूरकर, नांदेड.
  १२
  Happy birthday Alkatai.
  -Pro.Sunita Pathak
  Chhatrpati Sambhajinagar.

१३
Belated happy birthday, Alka madam 💐🌹
-Varsha Bhakare.
Dy Director (Statistics). Amravti.

१४
Happy Birthday Alka Madam .

 • Amit Bagve,
 • Editor, Arthsanket, Mumbai.

१५
अलकाकाकूंचा वाढदिवस सर्व मित्र मैत्रिणी आणि नातलग यांच्या उपस्थितीत खुप छान साजरा झाला, सर्वांनी खूप आनंद लुटला. तुम्ही असा वेगळ्या पद्धतीने साजरा केल्यामुळे सर्वांच्या नेहमी लक्षात राहील.

 • अनिल गरगडे, कल्याण
  १६
  सौ. अलका मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • उध्दव भयवाळ. छ. संभाजीनगर
  १७
  अलका ताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
 • चित्रा मेहेंदळे, मुंबई.
  १८
  Happy 60 th Birthday.
 • Dilip Godse, Pune.

१९
🕉️ प्रेम आणि जिव्हाळा यांनी अतिशय भारावलेली “अलका-60″ मैफलीचा आनंद शब्द आणि प्रकाशचित्र आधारे आम्हीही अनुभवला.विशेषत:”दिलं है छोटासा,छोटीशी आशा,चांद तारों को छुने की आशा” या समयोचित अप्रतिम गीताने तर मैफलीला चार चांद लाऊन गेलेले दिसले. सौ अलका, देवेंद्र सहित सर्व मान्यवर कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन..
– सुधाकर तोरणे
परीक्षक तथा निवृत्त माहिती संचालक. नाशिक.

२०
अलका जन्म दिनाच्या अखंड स्वामिमय मोरपंखी शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
नाना संकटात
केली मोठी मात
ईश्वराचे आभार
भगवंताची साथ

उपस्थित मंडळी
आश्चर्याने पाही
दिग्विजय मिळत
दिली समाजा ग्वाही

इंडिया स्टोरी टुडेत
विश्वात काव्य कथा
चांगल्या वाईट कळती
सर्वांच्या व्यथा वा प्रथा

नव नवं दिनांची
व्हावी शुभ सुरुवात
असाच गड जिंकावा
नच घडावा प्रपात

आयुष्याचे रहस्य
कसे बरे जिंकावे
कशी करावी मात
तुज पासून शिकावे

मनोवांच्छित कामना
जावोत पूर्णत्वास
अमापशा शुभेच्छा
मिळाव्यात खास
-सौ शोभा कोठावदे, सानपाडा

२१
जय श्रीराम
सस्नेह नमस्कार .काल अलकाताईंचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या सौ अलका ताईंना आम्हा दोघांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपले न्यूज पोर्टल मी नेहमी वाचतो. त्यातील सर्व लेख, कविता आणि माहिती पर लेख देखील अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असतात. आपण घेत असलेल्या अतिशय मेहनती बद्दल आपले खरोखरच कौतुक करावे तेवढे थोडे आहे .आपणास व आपल्या सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. स्नेहांकित व परममित्र

-देवेंद्र कोळपकर. सेवानिवृत्त अवर सचिव मंत्रालय

ईतर लेखनाविषयीच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

२३
आग लागू नये, म्हणून काय कराल ? उपयुक्त माहितीपूर्ण लेख.

 • प्रिया मोडक, ठाणे.

२४
आग लागू नये म्हणून, काय कराल? या लेखात छान माहिती मिळाली.
पण बऱ्याचदा “शब्दाशब्दाने” आगी लागतात, त्या लागू नये म्हणून काय केले पाहिजे ? याचे मार्गदर्शन केल्यास बरे होईल.

 • किशोर विभुते, अकोला.

२५
माझ्या आठवणीतील सुरेश भट…
खूप छान माहिती…

 • नागेश शेवाळकर. पुणे
  २६
  “महत्तम साधारण विभाजक”
  खूप छान परिक्षण. आता हे पुस्तक मिळवून वाचणार. धन्यवाद .
 • डॉ कारभारी खरात
 • सहायक संचालक (आरोग्य विभाग)मुंबई.

२७
साने गुरुजी, सुरेश भट ह्यांच्यावरील लेख म्हणजे वाचनाची पर्वणीच ! अस्थी विसर्जनाचा विचार आवडला. एकंदर अंक खूप छान 🙏💐

 • सौ मृदुला राजे ,
 • जमशेदपूर
  २८
  वाचक लिहितात…
  मधील सर्व प्रतिक्रिया बोलक्या आहेत.सगळे लेख अप्रतिम.
 • अरुणा दुद्दुलवार, दिग्रस.
  २९
  सन्माननीय सुधाकरजी…🙏
  “जीवश्च कंठश्च “या पुस्तकाचे मी अत्यल्प शब्दात केलेले टीपण आपण “वाचक लिहितात”या सदरात प्रसिद्धीसाठी दिले व अलका भुजबळ ताईंनी प्रसिद्धी दिली,याबद्दल खूप खूप धन्यवाद !! माझ्यासारख्या व्रुद्धाला ही बाब प्रेरणादायी आहे.

” साने गुरुजी परिचित अपरिचित” भाग 6 “आंतरभारती” ….. आशाताई कुलकर्णी (हुंडा प्रतिबंधक चळवळीचे जनक कै.मामासाहेब कुलकर्णी यांची कन्या) यांनी साने गुरूजींच्या जीवनावर लिहिलेले पांच लेख व त्या लेखांवरील प्रतिक्रिया मी पूर्ण वाचल्यात.आशाताईंच्या लेखनातून साने गुरूजींच्या बहूआयामी व समर्पित जीवनाची कल्पना येते. मला सांगावयास अभिमान वाटतो की कै.मामा कुलकर्णी यांची प्रबोधनपर व्याखाने Slide Show , इ,भरगच्च कार्यक्रम रावळगांव कारखान्यातील कामगारांसाठी व मालेगाव येथील मुस्लीम महिलांसाठी आयोजित करण्याचे भाग्य मला लाभले.त्यांच्या सहवासात राहता आले.
श्री.देवेंद्र भुजबळ यांनी संपादीत केलेली पुस्तके वाचण्याचा योग आपल्यामुळे आला. मनःपूर्वक धन्यवाद !!
-अनंतराव वाणी, नासिक

३०
“विलेपार्ल्यातील दीपशिखा” या लेखमालेबाबत प्रतिक्रिया..

फार छान. documentation व्हॅल्यू असलेली मालिका आहे. निस्वार्थ समाजसेविकानी केलेली फार मोलाची कामगिरी केवळ कुणी लिहिली नाही म्हणून विस्मृतीत गेलेली आहे . तुम्ही ती उणीव भरून काढता आहात. ९० च्या दशकात हे काम अरुणा ढेरे यांनी विस्मृती चित्रे पुस्तक लिहून केले. आपलीही मालिका विस्तारली तर छान पुस्तक होईल.
मनापासून अभिनंदन.
शुभेच्छा.
-गोपाळ आवटी
निवृत्त संचालक आकाशवाणी पुणे केंद्र.

३१
गुरुजींचे असामान्य व्यक्तिमत्व,त्यांचे विविध क्षेत्रातील कर्तृत्व, भावनिक चढउतार, यशापयश ह्या सर्वांची ओळख आशाताईंच्या लेखांतून झाली.त्यांचे मानावे तितके आभार थोडेच.
आशाताई, अप्रतिम लेखमाला सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
-प्रा. रेखा नाबर
माहिम, मुंबई.

३२
“सानेगुरुजी: परिचीत अपरिचीत” ही मालिका वाचनीय आहे.
“महत्तम साधारण विभाजक” या प्रा रविंद्र शोभणे यांच्या संपादित कथासंग्रहाचा सुधाकर तोरणे यांनी फार सुंदर परिचय करुन दिला आहे.
-राधिका भांडारकर,पुणे

३३
डॉ मीना ताई सुंदर, अलंकारिक भाषेत लिहितात. चांगले असते त्यांचे लिखाण ..आजचा राम जन्माविषयीचा लेख ही सुंदर आहे.
भारतीय रेल्वे वरील लेख वाचनीय . छायाचित्रांसह छान जोड दिली आहे
सरोजिनी बाबर उत्तम लेखिका, त्यांच्याबद्दलचा लेख आवडला . पुस्तकांच्या फोटोचा कोलाज अधिक सुस्पष्ट असता तर आनंद झाला असता.
उन्हाची काळजी घेणे आवश्यक च आहे त्यावर उपाय सांगत ,चित्रांद्वारे समजाविण्याचा उपक्रम स्तुत्य
स्वाती दामले, विजया केळकर, हेमंत भिडे, डॉ अंजली सामंत, मीरा जोशी साऱ्यांना च रामनवमीच्या शुभेच्छा..कविता वाचनीय.

 • स्वाती वर्तक. मुंबई.

३४
दुर्मीळ पुस्तके ३४:निबंध-सुगंध भाग १ वरील अभिप्राय

पुस्तकं काळच्या ओघात दुर्मिळ होतात. पण काही पुस्तक काळाच्या कसोटीवर घासून ताजी राहतात. वाचकांना ती हवीहवीशी वाटतात. नेमका हाच धागा पकडून विलास कुडके यांनी दुर्मिळ पुस्तकं या विषयावर लिहायला सुरुवात केली. मी त्यांचा प्रत्येक लेख आवर्जून वाचते.
पुन्हा पुन्हा वाचावे वाटते असे हे सदर आहे. मला दहावी ला अभ्यास क्रमात असणारे स्वाधीन कीं दैवधीन हे पुस्तकं असेच अर्ध शतका नंतर भेटले
-श्रीमती श्रध्दा बेलसरे, माजी संचालक (माहिती)

३५
Nice article 👍👏👌💐
-श्री दिगंबर पालवे

३६
साहित्य माझा विषय नसला तरी आपल्या साहित्यविषयक सततच्या पोस्टमुळे थोडीफार माहिती मिळते. त्यामुळे काही कथा खरोखर प्रेरणादायी वाटतात. आपली साहित्याबद्दल ऋची वाख्यानाजोगी आहे. आपल्या लिखाणातही सातत्य असते. आपण जे लिहिणार ते योग्यच असेल.
-श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती)

३७
छान लिहिले आहे. तुमच्या लेखनातील सातत्य वाखाणण्याजोगे!
-श्री अजय भगवंत देशमुख

३८
फारच अमूल्य साहित्यिक अजरामर ठेवा !
श्री म. ना. राणे,
मा. मुख्यमंत्री यांचे माजी जनसंपर्क अधिकारी

३९
टाकावूतून टिकावू सदर फारच छान आहे.या वस्तूतूनही आपली कला जोपासता येते.अरुणाताईंनी खूप सुंदर चिमणी चेंडूपासून तयार केली.सुंदरच!
-अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ

४०
शेवग्या वरचा लेख छान आहे. 👌🏻

 • शिल्पा कुळकर्णी. अमेरिका.

४१
वाह, “न्यूजस्टोरी”च्या निर्मात्या सौ. अलका भुजबळ ह्यांचा हीरक महोत्सवी वाढदिवस कसा साजरा झाला, ह्याचे वर्णन वाचायला उत्सुकतेने आजचा वृत्तांत चाळला, आणि अचानक माझी धाकटी बहीण सौ. सोनल साटेलकर हिचा “शेवगा” हा लेख वाचायला मिळाला .आपलेच बालपण दुस-याच्या शब्दातून आणि नजरेतून वर्णन केलेले ऐकताना, वाचताना गंमत वाटली.
सौ. सोनल ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्याने मराठी वाचनाची तिला थोडीही आवड नव्हती; पण ती आता फक्त मराठी भाषेतच जास्तीत जास्त लेखन करून आपले विचार व आपले अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम प्रयत्न करत आहे, हे पाहून मला मनापासून आनंद वाटतो.
“शेवगा” हा लेख जरी वैयक्तिक अनुभवांवर आधारित असला, तरीही सर्व वाचकांना आनंद देऊन जाईल, असा सार्वत्रिक विषय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. म्हणूनच लेखिका सौ. सोनल साटेलकर हिचे मनापासून अभिनंदन.

आता मुख्य विषय म्हणजे सौ. अलका ताई भुजबळ ह्यांच्या साठाव्या वाढदिवसाचे सुरेख वर्णन! अलकाताई ह्या एक अतिशय गोड स्वभावाच्या, उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या उत्साही “तरुणी” आहेत; होय “तरुणी” शब्दच बरोबर आहे!

आज उलटली साठी, अजून चाळीस अपुल्या हाती यौवनाचा हात धरुनी, चालत राहूया जीवन-नदीच्या काठी

तर अलका ताई, तुमच्या हौशी मैत्रिणी ही तुमच्याच गोड स्वभावाने कमावलेली तुमची संपत्ती आहे ; तिला जपून ठेवा, बॅन्केतील फिक्स डिपाॅझिट सारखे दुप्पट वाढवत राहा आणि पुढचे उदंड आयुष्य अधिकाधिक आनंदाने जगत, हा मित्रपरिवार वाढवत राहा. तुमचा ७५वा वाढदिवस अधिकच थाटात संपन्न होणार आहे, ह्याची खात्री आहेच! तोपर्यंत तुम्हाला “शतायुषी भव!” ह्याच शुभेच्छा देते. जीवेत् शरदः शतम्!

-सौ. मृदुला राजे. जमशेदपूर, झारखंड.

४२
घरात renovation , काढल्यामुळे व्यस्त होते. सगळे पुर्वीचे अंक वाचून काढले. एकापेक्षा एक आहेत.
मुख्य म्हणजे अलकाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप स्नेहगंधित शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments