Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या न्युज स्टोरी टुडे परिवारात कॅनडा येथील रहिवासी सौ प्रियांका शिंदे जगताप नुकत्याच सहभागी झाल्या आहेत. त्यांनी टोरांटो येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा वृत्तांत चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. या पुढेही त्या आपल्या पोर्टल साठी लेखन करत राहतील, अशी आशा आहे.

तसेच अवघे ७७ वयोमान असलेल्या अलका वढावकर यांच्या सेवन स्टार्स ग्रुपने नवी मुंबईतील साहित्य मंदिर मध्ये सादर केलेल्या “मधुबाला ते माधुरी” हा वृत्तांत आणि कार्यक्रमही ही खूप लोकांना आवडल्याचे प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येते. या दोन्ही विषयीच्या व अन्य प्रतिक्रिया पुढे देत आहे.
देवेंद्र भुजबळ
संपादक

टोरांटो संमेलन,
काही निवडक प्रतिक्रिया

१. अतिशय सुंदर वृत्तान्त लेखन. वाचताना आपणही साहित्य संमेलनाचे भाग होऊन जातो. परदेशात राहूनही माय मराठीच्या प्रेमाने, निष्ठेने आपण सारे एकत्र येऊन असा सोहळा साजरा करता, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आपले सर्वांचे अभिनंदन आणि पुढील कार्यास (मराठी भाषा, संस्कृतीच्या जागरास) खूप खूप शुभेच्छा.
— मनमोहन रोगे.
कवी, लेखक, मुक्त पत्रकार

२. खूपच छान लेख आहे प्रियांका आणि त्यात जो उत्तम उल्लेख केलाय की ‘सरस्वतीचा वरदहस्त हा सर्वांनाच प्राप्त होत नाही’; पण तोच वरदहस्त तुझ्यावर नेहमीच रहावा, हीच प्रार्थना. मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार नेण्यासाठी तुझा जो काही हातभार लागतोय, त्यासाठी आम्हाला नेहमीच तुझ्यावर सार्थ अभिमान असेल आणि राहिल.
— गणेश गागरे.

३. प्रियांका, लेखातून दिलेल्या उत्तम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपला हा लेख आम्ही संजय सरांसोबत अवश्य सामायिक करू. काही सूचना असतील तर आम्हाला अवश्य कळवाव्या. ‘साहित्य कट्टा’वरंही साहित्य पाठवत रहा. धन्यवाद.
— ऋषिकेश रानडे.
अध्यक्ष, कार्यकारी समिती २०२४
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो

४. खूप छान. अभिनंदन. सातासमुद्रापार राहून आपले मराठी प्रेम पाहून अभिमान वाटतो.
— सुनिल दिवनाळे.

५. खूप छान.. स्तुत्य उपक्रम
— प्रवीण आनंद देवरे. साहित्यिक

६. मनस्वी अभिनंदन… प्रियांका, प्रत्यक्ष तू कार्यक्रमास हजर होती, हे मराठी अभ्यासक व्यक्तिच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
— विगसा (आप्पा)
श्री. विलास गजानन सातपुते.
ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी, व्याख्याते, मुद्रक, प्रकाशक, संपादक, संत तैलचित्रकार

७. वाह, आपली मराठी भाषा किती संपन्न आहे याची प्रचिती एकूणच या संमेलनावरून कळते आहे. प्रियांका, तुझ्यामुळे या संमेलनाचे सारे इतिवृत्त समजले. Well done dear.तुझा लेख वाचला… नेहमीप्रमाणेच तुझं लिखाण अप्रतिम.
— संगीता महिरे साळवे.
उपक्रमशील शिक्षिका, हौशी कवयित्री, लेखिका

८. व्वा! खूप कौतुकास्पद!
— ज्योती हलगेकर जाधव.
कवयित्री, लेखिका

९. अतिशय सुंदर.
— दत्तात्रेय केसरकर.

१०. छान !
— प्रदीप शिंदे.
लेखक, रेखाचित्रकार, कलाकार

११. ‘मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो’ ने आयोजित केलेलं ‘साहित्य संमेलन २०२४’ हा खरंच स्तुत्य उपक्रम होता; ज्याने अनेक साहित्यिक मंडळींना परदेशात हक्काचा मंच उपलब्ध करून दिला. सर्व साहित्यिकांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. सर्वांचे साहित्य खरंच खूप दर्जेदार होते. सदर वृत्तांतलेखन प्रगल्भ व वाचनीय आहे. सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा.
— विशाल जगताप.

१२. सुंदर वर्णन! कार्यक्रमाचं छान संयोजन. शुभेच्छा.
— विजयकुमार शिंदे.

१३. अतिशय सुंदर कार्यक्रम. युट्युबवरून सदर संमेलनाचं रेकाॅर्डिंग पाहता आलं. सर्व मान्यवरांचं अभिनंदन. मराठी भाषेवरती असलेलं प्रेम असंच अबाधित राहू द्या. प्रियांका, तुझा लेख नेहमीप्रमाणे अप्रतिम.
— अलका जगताप

मधुबाला ते माधुरी… काही प्रतिक्रिया

१४. अलका तुझ्या कार्यक्रमाची क्लीप बघितली. तसेच संपादकांच्या सविस्तर आणि सुंदर परिक्षणावरुन “मधुबाला ते माधुरी” ची पताका उंच उंच भरारी घेतांना दिसली.हा नुसता नृत्यावर आधारित कार्यक्रम नाही तर त्यातून एक एक अभिनेत्रीच्या अभिनयातील वैशिष्ठ्य आणि mile stone ठरलेले चित्रपट यांचा तू किती छान अभ्यासपूर्ण परामर्श घेतलास ते कळतं. कार्यक्रम बघण्याची उत्सुकता आहे. अशीच तुझी आणि या चार मुलींची कीर्ती दिगंत पसरो! खूप खूप खूप अभिनंदन.
— सौ. सुजाता पाणसरे.

१५. मधुबाला ते माधुरी ह्या कार्यक्रमाची एक झलक video clip मुळे आम्हाला बघायला मिळाली. पण त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम बघायची खुप ओढ लागलेय. तो योग लवकरच येवो ही मनापासून इच्छा आहे. अलका आणि सेवन स्टार्स गृपचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
— सौ. रंजना गुप्ते.

१६. अलका ताई मधुबाला ते माधुरी हा कार्यक्रम कीतीही वेळा पाहिला तरी परत परत पहावा असाच आहे.
All the best and Once again congrats to our 7 Stars
— सौ. हेमा कर्णिक

१७. वयोमानाचा उल्लेख करावा की नको असा संभ्रम निर्माण करणाऱ्या हरहुन्नरी कल्पक आणि कायम एनर्जेटीक असणाऱ्या सेव्हनस्टार या संस्थेच्या प्रमुख सौ. अलकाताई वढावकर ह्यांनी नुकताच मधुबाला ते माधुरी हा प्रेम ह्या संकल्पनेवर आधारित, हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मधुबाला पासून माधुरी पर्यंतच्या तारकांचे प्रेमाविष्कार नृत्यातून सादर करण्याचा एक अप्रतिम कार्यक्रम सादर केला.
सिने तारकांच्या सुमधूर अशा एकेक गीतांनी हा कार्यक्रम खुलत गेला.
प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून डोलवणारा आणि नृत्याविष्कारानी संमोहित करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.
— आशिष चौबळ.

१८. अलकाताई तुमचे आणि तुमच्या सेव्हन स्टार गॄपचेअभिनंदन.तुमचीभरारी बघुन अभिमान वाटतो तुमचा.तुमचे निवेदन सादरीकरण आणि नृत्यांगनानि केलेली नृत्य प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.असेच यश मिळत राहो हीच सदिच्छा .
— सौ. ज्योती गुप्ते. ठाणे

१९. कसलेल्या नृत्यांगना आणि जोडीला तितकेच खिळवून टाकणार निवेदन असा हा मधुबाला ते माधुरी कार्यक्रम. प्रेम हा शब्दच जिव्हाळ्याचा. मधुबालापासून माधुरीपय॔ंत सगळ्याच तारकांची गुंफण अलकाताईनी जितकी सुंदर केली तितकीच नृत्यांगनानी साभिनय अदाकारी केली.आपल्याला प्रत्यक्ष तीच तारका नृत्य करतेय असा भास होतो. प्रत्येकाला कार्यक्रम संपूच नये असा एक अप्रतिम कार्यक्रम.
— सौ. छाया टिपणीस. ठाणे

२०. अभिनंदन अलका आणि 7 स्टारचे. घे भरारी म्हणत देश विदेशात भरारी जाहिरातीतून झाली आता लवकरच कार्यक्रमातून होईलच.
एक काळ गाजवलेल्या नायिका, तीन पिढ्यांना भूल पाडणारे सुमधूर संगीत या तेवढ्याच ताकदीने सादर केलेले अलका वढावकर यांचे निवेदन, आणि नृत्यांगनाचा साभिनय पदन्यास.
भरारी घेतलेले पंखातील बळ वाढत राहो.
— गीता सुळे.

२१. अलका, मी आताच‌ ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूट पाहीला..जेष्ठ नागरिकांच्या मनामनांतील गाणी निवडून‌‌ त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला ते आजपर्यंतच्या माधुरी दीक्षित ह्याच्या‌ प्रसिध्द गाण्यांची योग्य निवड करून केलेला‌ कार्यक्रम रसिक मनात नक्कीच घर करून राहील…आपल्या नृत्याने,अदाकारीने चारही नृत्यांगनानीं त्याला चार चांद लावले आहेत..
लेखन, दिग्दर्शन, सादरीकरण अप्रतिम.
— सौ. विनिता देशमुख. ठाणे

२२. हा कार्यक्रम मी बघितला आहे. सेव्हन स्टार्सच्या कलाकार सर्व प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करतात तास दीडतास. त्यांचं नृत्य कौशल्य , त्यांचा मुद्राभिनय , त्यांची अदाकारी मधुबाला, नूतन, वैजयंती माला ह्यांना क्षणांत नजरेसमोर आणणारी होती. आणि माधुरी दिक्षीतची गाणी सर्वात वरताण होती. अर्थात ह्या कार्यक्रमाचं मुख्य श्रेय जातं कार्यक्रमाच्या निर्मात्या, लेखिका आणि सूत्रसंचालक अलका वढावकर ह्यांना. प्रेक्षकांना प्रत्येकीचं कोणतं गाणं जास्त आवडू शकतं ह्याचा त्यांनी अचूक विचार केला आहे. अलकाताईंचं निवेदन हा कार्यक्रमाचा USP आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.उत्तम निर्मिती असलेला हा कार्यक्रम ह्यापुढेही असाच अधिकाधिक रंगतदार व्हावा, लोकप्रिय व्हावा. All the best Seven Stars.You deserve kudos.
— सौ. शुभा प्रधान. ठाणे

२३. मधुबाला ते माधुरी एक देखणा कलाविष्कार
जेव्हा या कार्यक्रमाचे आमंत्रण आले, तेव्हाच खात्री झाली की एक संध्याकाळ अतिशय आनंदात जाणार आहे. संकल्पना, लेखन, निवेदन सौ. अलका वढावकर म्हटल्यावर कार्यक्रम अप्रतिम असणारच ही खात्री होती आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर ती पक्की झाली. अलका काकींच्या हलक्या फुलक्या ओघवत्या निवेदनाने सुरवात झाली. प्रेम हा शब्द घेऊन हा कार्यक्रम गुंफला गेला होता. मधुबाला या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या आठवणी आपल्या निवेदनातून निवेदिकेने जाग्या केल्या. मधुबाला म्हणजे सौंदर्याचा मापदंड. आजही एखादी नवीन अभिनेत्री बॉलीवूड मध्ये आली की तिची तुलना मधुबाला बरोबर होते. आणि या सर्व मापदंडांना आजपर्यंत फक्त एकच अभिनेत्री उतरली ती म्हणजे माधुरी.
मधुबालाची आठवण नृत्यातून साकार करायला व्यासपीठावर आलेल्या नृत्यांगनेचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह स्वागत केले. मग पुढे वैजयंती माला, नर्गिस, आशा पारेख, नुतन, झीनता मान, हेमा मालिनी, रेखा ,श्रीदेवी अशा सर्व अभिनेत्रींच्या आठवणी आपल्या निवेदनातून अलका वढावकर यांनी आणि नृत्यातून नृत्यांगनांनी साकारल्या. माधुरी दीक्षित वर सौ. अलका वढावकर त्यांच्या खास शैलीत केलेल्या कवितेला प्रेक्षकांकडून वन्स मोर मिळाला. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या. सर्व नृत्यांगना जणू हवेत तरंगत असल्याप्रमाणे व्यासपीठावर विहरत होत्या. संपूर्ण कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. बघून जेव्हा बाहेर पडले तेव्हा मन समाधानाने भरून गेले होते. सर्व प्रेक्षकवर्ग सुद्धा कार्यक्रमाचे भरभरून कौतुक करत होता. सौ अलका वढावकर यांचे कार्यक्रम वाशीतही किती प्रसिद्ध आहेत हे भरलेल्या थेटरवरून समजत होते. लवकरच पुढील कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. सर्व टिमचे मनापासून कौतुक व शुभेच्छा.
— सौ.संपदा देशपांडे

२४. अलकाताई, वाशीच्या प्रेक्षकांनी “मधुबाला ते माधुरी” या आपल्या कार्यक्रमाचे खूपच कौतुकात्मक वर्णन केले आहे. त्यामुळे आमची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे आणि कधी हा कार्यक्रम बघतो असं झालं आहे. लवकरच हा कार्यक्रम बघण्याचा योग यावा अशी इच्छा प्रगट करते.
तुमचे खुसखुशीत निवेदन आणि कसलेल्या नृत्यांगनांची अदाकारी प्रेक्षकांना खूपच आवडली असणार यात शंकाच नाही. असेच आपल्या कार्यक्रमाला उत्तरोत्तर यश लाभो.
— सौ. विनिता सोनाळकर. ठाणे

२५. मधुबाला ते माधुरी ह्या कार्यक्रमाचं बारकाईने निरीक्षण करुन श्री देवेंद्र भुजबळांनी अतिशय सुंदर परिक्षण केले आहे. जे वाचल्यावर हा कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. सेव्हन स्टार्स ठाणे गृपचा गोष्ट एका लग्नाची हा कार्यक्रम देखील असाच प्रेक्षणीय आहे.
— आशा दोंदे.

२६. अलकाताई , तुमच्या “ मधुबाला ते माधुरी “
या कार्यक्रमाचे परिक्षण वाचले .
त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन .
— मीनल

२७. अरे वाह, आमच्या लाडक्या अलका ताई वढावकर, अगदी खास मैत्रीण, तिचे कौतुक वाचताना माझ्याच अंगावर मूठभर मांस चढले. अलका ताई एक हरहुन्नरी कलाकार आहेत आणि वय विसरून नवनवीन कलाविष्कार करण्यास तत्पर अशा मनस्वी कलाकार आहेत. त्या सुंदर कविता सादर करतात, उत्तम पोवाडा म्हणतात, अगदी उखाणे घेण्याच्या कार्यक्रमात पण बक्षीसे मिळवतात. त्यांचा पूर्ण ग्रुप खूप उत्साही आणि हौशी आहे. त्यांचा “लग्नाची गोष्ट” हा कार्यक्रम सुद्धा खूप गाजला होता, आता हा नवीन कार्यक्रम सुद्धा सर्वत्र प्रसिद्धी मिळवत आहे, हे पाहून आनंद होत आहे. आमच्या लेखक समूहातील सदस्य तर त्यांचे कौतुक करत आहेतच, पण तुमच्या लेखातून झालेले कौतुक वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि अलका ताई वढावकर व संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
— मृदुला राजे, जमशेदपूर.

२८. मधुबाला ते माधुरी ग्रेट
— शिवानी गोंडाळ – मेकप आर्टिस्ट, दूरदर्शन.

२९. “मधुबाला ते माधुरी”
सुंदर शब्दांकन !
अभिनंदन !!

  • — नागेश शेवाळकर, पुणे

३०. मधुबाला ते माधुरी ह्या लेखातून संस्थेविषयी छान माहिती मिळाली.
— यशवंत पगारे. बदलापूर.

अन्य प्रतिक्रिया
३१. सुधाकाका,
‘पाचामुखी’ पुस्तकाविषयीच विवेचन एवढं छान केलं आहे आपण की ते पुस्तक संग्रही ठेवण्याचा संकल्प लगेच मनात उतरला.
लवकरच ते पुस्तक हस्तगत करतो आणि मत बुध्दीगत करण्याचा प्रयत्न करतो.

किती मोठ्या खजिन्याची जाण करुन दिलीय आपण, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी नवीन पैलूंच्या वाचनानी त्यांच्या बद्दलचा आदर वृध्दींगत होईलच.
आपले मनापासून अभिनंदन, कौतुक आणि आपले आभारही!
— डॉ.विनायकराव भावसार, इंदौर.

३२. “विजयामुळे रामाचे वैभव” ह्या नागेश शेवाळकर लिखित लेखाचा काही अंश आज सकाळीच “सहवासाच्या चांदण्यात” ह्या पुस्तकाच्या परिचयाच्या संदर्भात वाचला होता, परंतु आत्ता विजयाताईंच्या निधनाची बातमी वाचून मन हेलावले आणि ह्या लेखनाचे महत्त्व अधिकच जाणवले. कै.विजया ताई शेवाळकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि लेखक श्री. नागेश शेवाळकर ह्यांचे इतक्या सुंदर, साक्षेपी लेखनासाठी अभिनंदन 🙏💐
“पर्यावरणप्रेमी डाॅ. मुकेश कुळकर्णी” ह्यांच्यावरील लेख सुद्धा अतिशय सुंदर व माहितीपूर्ण आहे. एकंदरीत संपूर्ण अंक खूपच छान, वाचनीय आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन 🙏💐
— सौ मृदुला राजे, जमशेदपूर.

३३. टाकाऊतून टिकाऊ…
भन्नाट कल्पना..नैसर्गिक रंगात खरंच खूप सुंदर दिसतात ही फुलं. नाजूक..आकर्षक!
— अरुणा दुद्दलवार. यवतमाळ

३४. १ मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वच कविता खूप छान.
कामगार दिन : एक चिंतन खूप छान माहितीपूर्ण लेख.
— अरुणा गर्जे, नांदेड.

३५. बार्गेनिंग पाॅवर…
१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभर मानला जातो.
या निमित्ताने आपण प्रसिध्द केलेले लेख वाचून ही आठवण झाली.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असताना आमच्या प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागातर्फे काही समाजाभिमुख उपक्रम चालवले जात असत. त्यापैकी ‘असंघटित कामगार’ या विषयाचा मी समन्वयक होतो.
असंघटित कामगारांची अनेक वैशिष्ट्ये मी अभ्यासली होती.अनेक ठिकाणी ही सांगतही होतो. त्यापैकी एकाचा नेमका अर्थ मला एका घटनेतून समजला.
नवरात्रानिमित्त बरीच खरेदी करायची होती.
सारासार करून मी मंडईत गेलो. सायंकाळची वेळ होती. मंडईचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.हे टाळण्यासाठी मी बाहेर बसलेल्या एका बाईकडं गेलो.
“बोला दादा” मला पाहून ती बाई सावरत बसत मला म्हणाली. घट, माती, फुलं वगैरे यादीतल्या बहुतेक वस्तु मला तिथं मिळाल्याने मी खुष होतो. सगळं झाल्यावर, “किती झाले ?” असं विचारल्यावर तिनं आकडा सांगितला.
“नक्की द्यायचे किती ?”
“पाच कमी द्या”.
” नाही मावशी. राऊंड फिगर देतो” असं म्हणून मी दहा रूपये वाचवले.
माझा हा आनंद पुढं टिकला नाही. मला आठवलं माझ्या मोबाईलचं कव्हर अक्षरश: फाटलं होतं. एका दुकानात गेलो.
“बोलो सर”.
मी माझा मोबाईल दाखवून नवीन कव्हर मागितलं. दुकानदारानं किंमत सांगितली.
“नक्की द्यायचे किती ?”
माझा प्रश्न ऐकताच त्यानं भिंतीवरच्या प्राईस लिस्टकडं बोट दाखवलं
“रेट फिक्स है |” हे वाक्य “घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर फुटा” अशा टोनमध्ये म्हटलं. कव्हर बसवल्यावर त्यानं सांगितलेली रक्कम देऊन मी दुकानाबाहेर पडलो.
असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून एखादी वस्तु किंवा सेवा घेताना ग्राहकांची बार्गेनिंग पाॅवर जास्त असते. संघटित क्षेत्रात मात्र अशी घासाघीस करता येत नाही हे त्या घटनेतून मला समजलं.
— प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८