Wednesday, June 19, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
मी लिहिलेल्या “आम्ही अधिकारी झालो” हे विविध अधिकाऱ्यांच्या यशकथा असलेले पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकावर लिहिलेल्या, आपल्या पोर्टलच्या निर्मात्या, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी लिहिलेल्या ‘एक दृष्टीक्षेप’ हा पुस्तकातील नायक नायिकांचा संक्षिप्त परिचय खुप वाचकांना आवडला. त्यामुळे ही पत्रे आधी घेत आहे. या पुस्तकाच्या आगाऊ नोंदणीसाठी वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आपण अजूनही प्रकाशन पूर्व सवलतीचा लाभ घेतला नसल्यास कृपया अवश्य लाभ घ्यावा.

बाकी वाचकांच्या प्रतिक्रिया देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
☎️ 9869484800

१. अतिशय उत्तम माहिती देणारे आणि नव तरुण तरुणींना
अभ्यासास उपयुक्त मार्गदर्शक पुस्तक लेखक व संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “आम्ही अधिकारी झालो – एक दृष्टिटक्षेप” या पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन आणि हे सर्वांग सुंदर, आकर्षक पुस्तक सौ.अलकाताई भुजबळ यांनी प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुस्तकातील सर्व व्यक्तीरेखांना त्यांच्या उज्ज्वल सुयशाबद्दलही मन:पूर्वक कृतज्ञतेचा नमस्कार ! सलाम, !!..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन, नासिक.

२. “स्वप्नं पाहणे आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी अखंड पाठपुरावा
करत राहणे यापासून माणसाला कोणीही रोखू शकत नाही !” हा संदेश बोलक्या उदाहरणांनी घालून देणारे ‘आम्ही अधिकारी झालो’ हे पुस्तक सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील… देवेंद्र भुजबळ, अलका भुजबळ यांचे अभिनंदन आणि लेखक/प्रकाशक म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा!
— प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक, मुंबई

३. सन्मा अलकाताई भुजबळ मॅडम तथा श्री भुजबळ साहेब,
आपल्या सकस लेखणीतून सर्वंकषपणे लिहिलेल्या, “आम्ही अधिकारी झालो – एक दृष्टिक्षेप” समाजातील विविध स्तरातील व आपल्या कुटुंबाच्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत जी मुले – मुली विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून “यशवंत होऊन अजिंक्यवीर” झाले अशा विविध क्षेत्रातील ३५ जिगरबाज अधिका-यांच्या यशोगाथांचा लेखाजोखा आपल्या “आम्ही अधिकारी झालो” या मौलिक पुस्तकातून त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा प्रेरणादायी आढावा घेतला आहे.

सदर पुस्तक येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दीपस्तंभ ठरेल असा विश्वास वाटतो. आपल्या चौकस विचाराला आणि सामाजिक बांधिलकीला साष्टांग दंडवत !!
आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला स्नेहांकित,
— राजाराम जाधव
निवृत्त सह सचिव, नवी मुंबई.

४. हे खूप मोठं काम आहे सर हे तुमचं आणि अलकाताईंचं.
प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या विद्यार्थांना खूप प्रेरणा मिळणार आहे यातून. लक्षात येतं की यासाठी किती परिश्रम घेतले आहेत आपण दोघांनी ते.
आ. देवेंद्र सर, आ. अलकाताई मनःपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आणि तुमच्या धडपडीला सलाम !
— स्नेहलता झरकर -अंदुरे. धाराशिव

५. “आम्ही अधिकारी झालो” देवेंद्रजी हार्दिक अभिनंदन व
मनःपूर्वक शुभेच्छा!
— प्रा डॉ लक्ष्मण शिवणेकर, मुंबई.

६. मा. देवेंद्रजी भुजबळ सर, सर्वप्रथम तुमच्या आगामी
साहित्यकृतीसाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा.🌹काट्याकुट्यांच्या पायवाटेतून ध्येयप्राप्तीच्या दिशेनं मार्गक्रमण करताना ‘आत्मविश्वास’ हा अत्यंत महत्वाचा असतो. हा प्रवास व्यक्तिपरत्वे बदलतो. अशा जिद्दी, चिकाटी वृत्तीच्या हिरे-माणकांना तुम्ही ‘आम्ही अधिकारी झालो’ या गुंफमाळेत कौशल्यपूर्ण पद्धतीने गुंफल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा हा प्रवास आम्हा वाचकांसाठी तितकाचं प्रेयणादायी ठरेल, अशी आशा आहे. स्वबळावरती उभी केलेली इमारत कोसळून पडण्याची भिती कधीच नसते. स्वअस्तित्व स्वतःच्या मेहनतीनं निर्माण करणं, ह्यात खरा ‘सन्मान’ दडलेला आहे. सदर साहित्यकृती वाचनीय असेल यात शंका नाही. आम्हाला सातासमुद्रापारंही ती लवकरंच वाचण्याची संधी मिळो. धन्यवाद.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा.

९. नमस्कार सर.
तुमची “आम्ही अधिकारी झालो!” ही लेखनसंपत्ती हातात आली, आणि तुमच्या विषयीचा आदर अधिकच वाढला. तुम्ही स्वतः लेखन व संपादन केलेले हे पुस्तक विकत घेऊन वाचनाची अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे. तुमचा जीवनप्रवास सुद्धा त्यामधून वाचायला मिळेल, ही अधिकच आनंददायक गोष्ट आहे. पुस्तक वाचून नंतर अभिप्राय देईनच. सध्या पुस्तक विकत घेण्याची काय प्रक्रिया आहे, ते जरूर कळवावे, हीच विनंती.
— मृदुला राजे, जमशेदपूर

“माझी जडणघडण” या राधिका भांडारकर यांच्या सोमवार पासून सुरू केलेल्या आत्म कथनास छान प्रतिसाद मिळत आहे. वाचू या काही प्रतिक्रिया…

१०. “माझी जडणघडण” या आत्मचरित्रातील पहिला लेख “धोबी
गल्ली” वाचताना त्यातील प्रसंग डोळयासमोर उभे राहिले. अतिशय सुंदर साध्या, सुस्पष्ट शब्दात लेखन हे राधिका ताईंचे वैशिष्ट्य.
— सौ. मनिषा भांडारकर. अमळनेर.

११. आता आम्हाला पण आमच्या बालपणीच्या आठवणी
लिहाव्यात असे वाटतेय.
— सतीश नाचणे, ठाणे

१२. छान सुरुवात आहे. पहिला भाग वाचल्यावर पुढील भागांविषयी उत्सुकता असणे ही पहिली पावती.
— प्रमोद शृंगारपुरे, पुणे.

१३. जडणघडण खूप सुंदर
— अंजोर चाफेकर.

१४. मी राधिका ताईंबरोबर अनेक लेखक समूहांमध्ये तर आहेच,
पण त्यांची मोठी बहीण अरूणाताई मुल्हेरकर ह्यांच्याशी खास स्नेहसंबंध आहेत, त्यामुळेच राधिका ताईंनी त्यांच्या आजीच्या जीवनावर लिहिलेले “जीजी” हे पुस्तक वाचून, ह्या परिवाराचा जवळून परिचय झालेला आहे. त्यामुळेच राधिका ताईंचे आत्मचरित्र वाचण्याची अतिशय उत्कंठा आहे. पहिल्याच भागाचे शीर्षक “धोबी गल्ली ” वाचल्यावर तर ती अधिकच वाढली, कारण माझी मावशी तिथेच धोबी गल्ली मध्ये अनेक वर्षे राहिली, आणि तिच्या घरी जाता येताना धोबी गल्ली इतकी परिचयाची झालेली आहे,की मावशीच्या निधनाला अनेक वर्षे झाल्यानंतरही तिची आठवण आली की धोबी गल्ली हमखास आठवते.
राधिकाताईंचे लेखन नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर, रोचक व उत्कंठावर्धक आहे. पुढच्या भागांची प्रतिक्षा करत आहोत. मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐
आजच्या अंकात अनेक सुंदर लेख वाचतानाच “वाचक लिहितात…” ह्या सदरात माझी मुलगी प्राची राजे हिने लिहिलेल्या थॅलेसेमिया विषयावरील लेखावर वाचकांच्या उत्तम प्रतिक्रिया वाचून मनापासून आनंद झाला आणि त्यानंतर माझी स्वतःची प्रतिक्रिया छापलेली वाचायला मिळाली… दोन्ही आनंददायक गोष्टी! मनापासून धन्यवाद भुजबळ सर.
— मृदुला राजे, जमशेदपूर

१५. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बहुतेक सर्वांचेच असते. परंतू
त्यांचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही .त्यासाठी लागते एकाग्रता, मेहनत, जिद्द आणि प्रेरणा!
देवेंद्र भुजबळ यांच्या प्रकाशित होण्याऱ्या आगामी पुस्तकामुळे ही उणीव भरुन निघेल यात शंका नाही.
अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रेरणा तर मिळेलच परंतू अधिकारी झालेल्या व्यक्तीमत्व कसे आहे व होते हेही या पुस्तकातून अनुभवता येईल!
पुस्तकाच्या प्रती अपुऱ्या पडतील व अनेक आवृत्या काढव्या लागतील, भुजबळ साहेब व त्यांच्या धर्मपत्नी यांचे अभिनंदन !
— विजय पवार.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक.

१६. ‘आम्ही अधिकारी झालो’ आजच्या नवयुवकांना खूप
प्रेरणादायी. जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपली स्वप्नं नक्कीच खरे होऊ शकतात.

१७. ‘प्लेमिंगो लेक : मूक मानवी साखळी’ पर्यावरणाचे रक्षण
करण्यासाठीचा छान उपक्रम.
— अरुणा गर्जे, नांदेड

१८. जगाला प्रेरणा देणाऱ्या सामान्यातून असामान्य कतृत्व घडवणाऱ्या माणसांच्या जीवन संघर्षाचे संकलन नव्या पिढीला घडविणारा सुंदर ग्रंथ आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन
— अनंत धनसरे.
पत्रकार, कवी, साहित्यिक. मुंबई.

१९. ‘आम्ही अधिकारी झालो’ प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या
सामान्यव्यक्तीचा असामान्य जीवन प्रवास उलगडून दाखविणाऱ्या एक दृष्टीक्षेप चे मनापासून अभिनंदन.
— प्रतिभा पिटके, अमरावती.

२०. सर, “आम्ही अधिकारी झालो” excellent” यांतील पहिले दोन अधिकारी नीला सत्यनारायण आणि जी. श्रीकांत यांच्याशी विशेष परिचय आहे. नीलाताईंशी तर कौटुंबिक नातं होतं. त्या गृहखात्याच्या सचिव असतांना त्यांनी माझ्या वडिलांच्या नांवाचा प्रस्ताव पद्म पुरस्कारासाठी केंद्राकडे दोन वेळा पाठवला होता. पण त्यांना यश आले नाही. नीलाताईंची “नियती” ही लघुकथा आमच्या “शलाका” या पारितोषिक प्राप्त कथांच्या संग्रहात आहे.
दुसरे जी. श्रीकांत हे लातूरचे जिल्हाधिकारी होते तेंव्हा एका कार्यक्रमांत त्यांनी तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर या त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगितली होती.
पुस्तक खूपच छान आहे. १२ जानेवारीच्या युवा दिनाच्या कार्यक्रमात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना देता येईल. माझ्यासाठी १० कॉपी बुक करून ठेवा.
— आशा कुळकर्णी, मुंबई.

अलका ताई वढावकर म्हणजे आनंद आणि उत्साहाचे रसायन ! त्यांचे पत्र लेखन वाचून त्यांना मी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुढे देत आहे… 👇

२१. अलका ताई, नेहमीच हसतमुख राहणं, खुसखुशीत बोलणं, इतरांची तोंडभरून स्तुती करताना गोड गोड शब्द पेरणी करणं ; खरंच कसं हो जमतं हे सर्व तुम्हाला? मला नेहमीच प्रश्न पडायचा; पण आज तुमच्या ह्या पत्र लेखनातील सखीने तुमच्या स्वभावाची सुंदर उकल केली आणि समजले,हे सर्वच उत्स्फूर्त आहे, आतून उचंबळून आलेले आहे आणि मनापासून आनंद लुटणारे जीवन कसे असावे ह्याचा आदर्श दाखला देणारे आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा .
माधवी ताई ढवळे ह्यांच्या अलक रचना नेहमीच हटके असतात, आशयसंपन्न असतात. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा .
डाॅ. सुमती ताई पवार ह्यांची अहिराणी बोलीतील लाडिक कविता “लाडकोडनी मयानी” खूपच भावली.
— मृदुला राजे, जमशेदपूर.

२२. “आपुला संवाद आपुल्याशी” संवाद आवडला.
नकारात्मक विचार डिलीट आणि सकारात्मक डाऊनलोड हे आवडले.
— मेघना साने, ठाणे.

२३. आपुलाच संवाद आपुल्याशी…हा अलका वढावकर यांचा
ओघवता, रसाळ आणि प्रांजळ लेख खूपच आवडला.
— राधिका भांडारकर, पुणे.

२४. “अवयवदान चळवळीचा महामेरू” लेख आवडला
आपले हार्दिक आभार.
— माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड.

२५. Devendra Bhujbalji Avayavdaan good story,
appreciated.
— Suresh Gokani parivar

२६. अवयव दान, खूप छान महत्त्वाचा लेख !! अवयवदान
जनजागृती ही आजच्या काळाची गरज आहे.
— डॉ कारभारी खरात.
निवृत्त सहायक संचालक (आरोग्य विभाग) मुंबई.

२७. अनुपमा मुंजे यांची ‘वळीव’ ही अष्टाक्षरी रचना खूप सुंदर आणि
लयबद्ध. छानच.
दुर्मीळ पुस्तके : ३८
चोरलेल्या चवल्या
फारच खुमासदार लेखनशैली.
— अरुणा गर्जे, नांदेड

२८. ‘साहित्य तारका’ ज्योत्स्ना देवधर हा लेख वाचून मला ते दिवस
आठवले जेव्हा मी त्यांना प्रथम जोधपूर येथील एका कार्यक्रमात भेटलो होतो. धन्यवाद.
— डॉ गोविंद गुंठे.
निवृत्त दूरदर्शन संचालक, दिल्ली.

२९. तोरणे साहेब, नमस्कार.आपण परीक्षण लिहिलेले
“मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा” हे पुस्तक वाचायलाच हवं. किती छान माहिती पुरवली आहे आपण. पुस्तकात असलेला गहन अभ्यास आणि लेखकाची जिद्द पाहून अमर साळुंखेंच कौतुक करावं, ते कमीच.
पुस्तक Amazon.in वर उपलब्ध आहे का ? आपले मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.
— डॉ.विनायकराव भावसार, इंदूर.

३०. हलकं फुलकं “बाल्कनी” खूप सुंदर. जुन्या आठवणी ऐकायला, वाचायला खूप छान वाटतात. लेखनशैली मस्तच.
आयुष्य तर सुंदर आहेच आणि कविताही तेवढीच सुंदर आहे. खूप छान
— अरुणा गर्जे, नांदेड.

३१. Ayushya khup Sundar ahe is an excellent n
message giving poem Congratulations Shivani madam and Also dear editor Bhujbal sir alongwith Alkaji ur contribution in giving such lovely poetry to we readers is praiseworthy.
— Ranjit sinh Chandel. Yavatmal.

३२. कवयित्री शिवानी गोंडाळ यांची “आयुष्य खूपच सुंदर आहे” ही
कविता मनापासून आवडली.त्यांचे अभिनंदन व छान रचना केल्याबद्दल धन्यवाद.
तसेच प्रतिक्षा काळे यांचे उज्ज्वल सुयशाबद्दलही मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
— सुधाकर तोरणे,
निवृत्त माहिती संचालक, नासिक.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments