Tuesday, November 12, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

गेल्या आठवड्यात माझा वाढदिवस झाला. या निमित्ताने सौ रश्मी हेडे यांनी लिहिलेल्या लेखाला आणि आकाशवाणी चे निवृत्त सह संचालक श्री भूपेंद्र मिस्त्री यांनी आणि त्यांच्या टीम ने न्युज स्टोरी टुडे वेब पोर्टल वर बनविलेल्या माहिती पटाला वाचक, प्रेक्षकांची छान दाद मिळाली, या बद्दल सर्व वाचक, प्रेक्षक, रश्मी हेडे, भूपेंद्र मिस्त्री यांचे मनःपूर्वक आभार.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

१. माझी जडणघडण. भाग ५
वाह राधिकाताई….
क्या बात ग ! माझे पप्पा पण असेच होते. त्यांची आठवण मनात एक हुंदका निर्माण करून गेली. खरं आहे पण, या अश्या गोष्टींमुळे नं आपण खूपदा सशक्त प्रुव्ह होतो, शाबीत होतो. खूपच सुंदर गोष्ट तुझी… गणिताचा विषय असो की कुठलाही, जर आपण खरे आहोत तर आहोत ! आणि आपला प्रश्न आपण च सोडवायचा ! अभिनंदन
— विभावरी लेले.

२. राधिकाताई.. हे बाळकडू शाळेतच उपयोगी पडलं की पुढील
वाटचालीतही ? बाकी तुमची लेखनाची शैली प्रवाही आहे. प्रसंग रंगवून सांगायची हातोटी असल्याने वाचन सहज होते. अशाच लिहित राहा.
— पुरीषोत्तम रामदासी. पुणे

३. राधिका…..
तुझे जडणघडणीचे चार व पाच हे भाग वाचले.. नेहमीप्रमाणेच तुझे हे लहानपणा मधले डोकावणे मला फारच आवडले ..या वेळेला तुझा डोकावलेला बालपणाचा भाग मला थोडासा तुझ्या मॅच्युरिटीची जाणीव करून देणारा वाटला..
यातील भेटलेल्या तुझ्या मैत्रिणी या केवळ तुझ्या मैत्रिणी म्हणून नाही तर त्याच वेळेला त्यांची व्यक्तीचित्र म्हणून तुझ्या बालमनावर त्या जशा ठसल्या होत्या त्या तशा तू फार सुंदर प्रकारे व्यक्त केले आहेस.. त्यावरून तुझ्या मैत्री मागचा तुझ्या मनात फुललेला विचार सुद्धा आता जाणवायला लागतो आहे.. चौथी पाचवी चे वय असावं !! परंतु त्यावेळी मनात ठसलेली त्यांची व्यक्तिचित्र आणि आता त्याबाबत येणारे तुझे विचार कौतुकास्पद आहेत ..त्याचा अर्थ त्या तुझ्या मैत्रिणी तुझ्या मनात कुठेतरी नक्कीच एक आपली जागा घेऊन बसल्या होत्या असं जाणवतं..
यावेळच्या तुझ्या जडणघडणीत पहिल्यांदाच तुझे पप्पा डोकावले असावेत असं वाटतं .. कारण पहिले तीन भाग तितकेसे लक्षात नाहीत..
तुझ्या एकंदरच व्यक्तिमत्वावर तुझ्या वडिलांचा मोठा ठसा आहे असे मला जाणवते.. त्यामुळे ते असेच तुझ्या पुढील जडणघडणीच्या वाटेवर आम्हाला भेटत राहतील ..
— सुचेता खेर. पुणे

४. माझी जडण घडण…
छान ओघवती सहज भाषा … वनिता ठसली. Very true that…Hardship does not kill us but makes us stronger !!
— जयमती दळवी. पुणे.

५. माझी जडणघडण – ५
अगदी खरं. हा सुद्धा एक पैलूच आहे. आणि कोणाला न दुखवता भांडणं ही एक कला आहे. छान.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

६. राधिकाताई..
वडिलांची शिकवण बरोबर होती, हे तुम्ही सिद्ध केलंत 👍
— अजित महाडकर, ठाणे

६. माझी जडणघडण – ५
खूप छान लिहिलं आहे. सडेतोड 👌
— रेणुका मार्डीकर. औसा

७. आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्याला “न्युज स्टोरी टुडे”
माहितीपट स्वरूपात मिळालेली अनोखी भेट खरोखरच अनमोल आहे. आपल्या कुटुंबाविषयक तसेच पोर्टल विषयक आपण घेत असलेले एफर्ट्स माहितीपट पाहिल्यानंतर खरोखरच विशेष दाद देण्यासारखे आहेत.
पुनश्च आपले खूप खूप अभिनंदन.

  • सुधीर थोरवे.
    पर्यावरण तज्ञ, नवी मुंबई.

८. “न्युज स्टोरी टुडे” हा माहितीपट सुसूत्र, सुसंबद्ध, अप्रतिम आहे.
माहितीपट पाहिल्यावर देवेंद्र भुजबळ यांच्या कामातील आत्मियता कळते. मनःपूर्वक शुभेच्छा.
— कवयित्री शुभदा डावरे चिंधडे. ठाणे

९. किती किती नाविन्यपूर्ण उपक्रम करतात देवेंद्रजी ? नव्या
अनोख्या माहितीपटात बद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक

१०. सन्मा. श्री भुजबळ साहेब, नमस्कार.
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपले मित्र श्री भूपेंद्र मिस्त्री, यांच्या आणि सर्व सहकारी मित्रांच्या कल्पक विचारातून “न्युज स्टोरी टुडे” माहितीपट तयार करून आपल्याला अनोखी भेट दिली आहे. त्याबद्दल श्री भूपेंद्र मिस्त्री यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

सदर संक्षिप्त माहितीपटातून श्री भूपेंद्रजींनी “न्युज स्टोरी टुडे” या वेब पोर्टलची जन्मकहानी कशी झाली” यासंदर्भात विवेचन करून न्युज स्टोरी टुडे चे संचालक, संपादक श्री भुजबळ साहेब यांनी यासंदर्भात थोडक्यात माहिती देताना कोरोना काळात दैनिक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या थंडावल्या होत्या. त्यावेळी कुठे तरी एक पोकळी निर्माण झाल्याचे त्यांना वाटत. तेंव्हा त्यांची “कन्या देवश्रीने” वेब पोर्टलची कहाणी विशद केली. तेंव्हा त्यांना “आपण वेबपोर्टल सुरू करावे असे वाटले. या वेबपोर्टल संदर्भात काही दिवसाचे प्रशिक्षण सुद्धा घेतले. अशा प्रकारे ही झाली या वेबपोर्टलची जन्म कहाणी.
पुढे या पोर्टल वर भुजबळ साहेबांनी एक एक करत अनेक मान्यवर लेखक – कवी जोडत गेले. या वेबपोर्टलच्या माध्यमातून साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक, पर्यटन, याबाबत देश -विदेशातील मंडळी जोडल्या गेलेल्या आहेत.
आपल्या संयमी व शिस्तबद्ध पद्धतीने काम करत भुजबळ साहेबांनी प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करत एक उत्तम व दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक म्हणून नावारूपाला आले आहेत.
सदर माहिती पटाबद्दल काही मान्यवरांच्या मुलाखतीतून “न्युज स्टोरी टुडे” च्या संचालिका सौ अलका भुजबळ, श्रीमती वासंती वर्तक, श्री बल्लाळजी यांनी समर्पक विचार मांडले आहेत. हीच या पोर्टलची फलश्रुती आहे असे मला वाटते.
न्युज स्टोरी टुडे च्या आगामी वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद !!
आपला शुभेच्छूक…
— राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव. नवी मुंबई.

११. Best wishes to
NEWSSTORYTODAY
and thanks to Bhujbal family
Great work.
— Sukhdeve. Amravti.

१२. SIA entertainment तर्फे ‘न्यूज स्टोरी टुडे’ या पोर्टलची
माहिती देणारा माहितीपट पाहिला. अतिशय छान झाला आहे. कंटेंटची मांडणी, मुलाखती, चित्रीकरण, संपादन अशा साऱ्याच आघाड्यांवर माहितीपट उत्तम कामगिरी करतो. हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते सारे प्रयत्न करावे… सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 🙏
— प्रल्हाद जाधव.
लेखक, नाटककार, निवृत्त माहिती संचालक, मुंबई.

१३. नमस्कार सर,
छान माहितीपट झाला. आवडला.
— डॉ संभाजी खराट.
निवृत्त माहिती उपसंचालक, नवी मुंबई.

१४. माहितीपट पूर्ण बघितला.
आवडला. छान.
— स्वाती वर्तक. मुंबई.

१५. खूप सुंदर माहितीपट.
आम्हालाही बरेच काही कळले तुमच्या बद्दल.
— राधा गद्रे. कोल्हापूर

१६. सर,,, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏
सर, खरे आहे, तुम्ही माध्यम जगताची शान आहात !🙏💐
— गणेश जोशी. व्यंग चित्रकार, ठाणे

१७. “देवेंद्र भुजबळ :माध्यम जगताची शान”
आपला परिचय रश्मी हेडे यांनी थोडक्यात परंतु अतिशय परिपूर्णरित्या केला आहे. पत्रकारिकेत स्वतःबरोबरच इतरही लेखकांना प्रसिद्धी देण्याचा एक अनमोल प्रयत्न आपण करत आहात. सुंदर….
आपले खूप खूप अभिनंदन💐
आपल्या वाढदिवसानिमित्त
मी आपणास अधिक सुयश चिंतितो व आपण असेच या क्षेत्रामध्ये अधिकाधिक भरारी घेऊन इतरांनाही त्याचा आनंद जसा देत आलेले आहात तसाच देत रहा ह्या आमच्याकडून शुभेच्छा.
आपणास येणारे वर्ष आरोग्यमय आनंदाचं आणि भरभराटीचे जावो या आमच्या थोरवे कुटुंबीयांकडून सदिच्छा 💐
— सुधीर थोरवे.
पर्यावरण तज्ञ, नवी मुंबई.

१८. माध्यम जगताची शान ..वाचून संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ
यांचे कौतुक वाटते.
हार्दिक अभिनंदन. प्रकाशचित्रे अभिमानास्पद.
अमेरिकेत जसे मुलांना स्वातंत्र्यदिनाबद्दल कमीच माहिती आहे तसेच आपल्या ही देशात फार थोडी मुले व्यवस्थित सांगू शकतात.
लेख छान आहे.
खरोखर वाढदिवसाला मिळालेली ही भेट अनोखीच आहे. त्याच दिवशी माहितीपट तयार करून देणे कल्पना चांगली आहे. आमच्या तर्फे ही वाढदिन शुभेच्छा.
आम्ही अधिकारी झालो ..
याची सहा परीक्षणे आलीत त्यावरूनच त्या पुस्तकाचे महत्त्व विदित होते ..अभिनंदन.
मुरारजींची कविता मजेशीर आहे .. हसवून गेली.
— स्वाती वर्तक. मुंबई.

१९. “Anokhi Bhet” documentary produced and
written by Bhupendra Mistry and his team takes realistic review of portal, “NewsStoryToday” Mistry has unveiled the precious treasure of this portal through the interviews of eminent persons. After seeing this documentary I was amazed to know the global reach of the portal that connects it’s readers with more than 100 countries. The portal is doing the great service by giving wider exposure to the literary work of several writers those who write for the portal. It also gives justice to whatever happens good in the human society by writing on it.
As a reader of this news portal, I must congratulate Devendra Bhujbal sir, Alka vahini and though last but not the least their daughter Devashree Bhujbal who had sowed the seeds of this portal that has earned today this admirable glory and grandeur.
— Ranjitsing Chandel.
Former Dist. Information Officer, Yavatmal.

२०. आज “माध्यम जगताची शान” असलेल्या सन्माननीय देवेंद्र
भुजबळ सरांचा अप्रतिम सुंदर परिचय करून दिल्याबद्दल रश्मी हेडे ह्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏
सर, पूर्ण अंक नंतर वाचून प्रतिक्रिया कळवीनच; पण हा पहिलाच लेख मिष्टान्नाप्रमाणे जीभेची रुची वाढवून गेल्यावर लगेच पुढचे लेखन वाचायला जमेल असे वाटत नाही. फुरसतीने नक्कीच वाचणार. मनःपूर्वक धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा 🙏😊🌹
— मृदुला राजे. जमशेदपूर

२१. सन्मा. श्री भुजबळ साहेब,
नमस्कार,
आज आपला वाढदिवस, अनेक मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या बाबतीत त्यांचा वाढदिवस म्हणजे पोस्टर्स – बॅनर्स, आणि झगमगाट असतो.
आताचं “न्युज स्टोरी टुडेच्या पोर्टलवर”देवेंद्र भुजबळ: माध्यम जगताची शान” हे टायटल व मथळा वाचून माझ्या डोक्यात झटकन आपल्या वाढदिवसाबद्दल काही विचार आले.
आज भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी सकाळी शुभेच्छा देण्याचे आपण कसे विसरून गेलो ?
साहेब, आपल्या मैत्रीला सुमारे ३० वर्षे होत आहे. योगायोगाने झालेली भेट म्हणजे “कायम ऋणानुबंधाची पडलेली ही गाठ आहे असे मला वाटते.
आपण शासनाच्या सेवेत असताना अनेक जिल्ह्यांत व पदावर कार्यरत होता. ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकाणचे सहकारी मित्र परिवार व अनेक चाहते मंडळी आपल्या समवेत आजही जुळलेली आहेत.
आपण एक संयमी, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अधिकारी म्हणून परिचित आहात व होता. आपला हाच स्वभाव सेवानिवृत्त झाल्यानंतरही बदलला नाही. हीच आपल्या स्वभावाची खरी ओळख निर्माण केली आहे.
आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपणांस निरामय आरोग्यदायी आयुष्य, सुख, शांती, समाधान आणि आनंद आपणांस व परिवारातील सदस्यांना मिळो. हीच मी व माझ्या परिवाराकडून ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”
आपले शुभेच्छूक,
— राजाराम जाधव.
(निवृत्त सह सचिव) आणि परिवार

२२. सर्व प्रथम आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रश्मी
हेडे यांचा लेख वाचला, मनापासून आवडला. आपल्या अंगातील अनेक सुप्त गुणांना या लेखातून प्रकाशात आणले त्यामुळे आपल्याबद्दल असलेला आदर अधिक द्विगुणित झाला.
आपल्याला पुढील वाटचालीना, हार्दिक शुभेच्छा.
— विलास प्रधान. मुंबई.

२३. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशनचा वृतांत फोटो सह
पाहिला. वाचला. त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. आपल्या परिश्रमाचे निश्चितच कौतुक वाटते.
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक

२४. वाचकांचा प्रतिसाद हा वाढतच आहे आणि वाढतच राहणार
यात शंकाच नाही. तुम्हां दोघांना, तुमच्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ पब्लिकेशन साठी आभाळा एवढ्या शुभेच्छां. वाचक वाढतच आहेत हिच खरी आपली कमाई आहे.
— सौ पौर्णिमा शेंडे. मुंबई

२५. आयुष्य जगताना…..
खूप सुंदर पुस्तक आहे. तोरणेजींनी अतिशय छान समीक्षण केले आहे.आवडले.
सागर प्रकाश यांची “हाक चातकाची” कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

२६. न्युज स्टोरी टुडे पोर्टलचे आणि पब्लिकेशनच्या निमित्ताने
वाचकांपर्यंत उत्तम साहित्य उपलब्ध झाले. भुजबळ दांपत्याचे हार्दिक अभिनंदन.
— प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे

२७. सावित्रीच्या लेकींची अनोखी वटपौर्णिमा
स्नेहवन अमेरिका दौरा, मेरा जूता हैं जपानी, सर्व लेख खूप चांगले आहेत.
— प्रिया मोडक. ठाणे

२८. छान! नक्कीच वर्षा ठाकुर घुगे या महिलांसाठी प्रेरणास्थान
आहेत. त्यांची यशोगाथा, “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकात आहे म्हणजे त्यातली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आदर्श अधिकाऱ्याबद्दल माहिती देते.
या पुस्तकासाठी मा.देवेंद्र भुजबळ सरांचे कष्ट, त्यांची मेहनत याबद्दल त्यांचे आभार अन अभिनंदन.
— पूर्णिमा शेंडे. मुंबई

२९. सर्वच लेख सुन्दर अणि दिशा दाखविणारे.
— निरंजन राऊत. विरार

३०. आदरणीय, देवेंद्र भुजबळ
संपादक साहेब,
नमस्कार,
वि. वि.लिहीण्यास कारणकी, आपल्या चायलनचे जगभरातून वाचन करण्यात येत असलेल्या व साहित्यिकांनी गौरविलेल्या न्यूज स्टोरी टुडे या पोर्टल ला माझ्या मुलं जमिनीवरचे तारे बालकिशोर संग्रहाचे समिक्षा समावेश केल्या बद्दल मी आपले आभार न मानता ऋणात राहू इच्छितो सर.
आपण संपादीत केलेल्या कविता, कथा, समिक्षा, लेख, ललित लेख, प्रवास वर्णन सर्वत्र सर्व साहित्यिक आवर्जून वाचतात. वाचलेली प्रतिक्रिया वाचनिय देतात ते आपण वाचक लिहितात या सदरात समावेश करतात. असे वाचनीय, लोकप्रिय, गौरविण्यात आलेले आपले चायनल एकमेव आहे.
ही माझी कविता लेखनासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. आपले व निर्माती सौ.अलका ताईंचे, टिमचे मनापासून आभारी आहोत.
— गोविंद पाटील सर. जळगाव

३१. “नको पुनर्जन्म” असे म्हणत असतानाच समाजाचे ऋण फेडणे
राहिलेले असल्याचे कवयित्रीला उमगते. ते ऋण फेडण्यासाठी पदरात पुण्य नसल्याने निदान ते गोळा करण्यासाठी तरी पुनर्जन्म असावा असे तिला वाटते आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुनर्जन्म असायला हवा ही भावना अतिशय उदात्त आहे, उमदी आहे. त्यातही कवयित्रीला स्वतःच्या उरलेल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठी पुनर्जन्म नको त्यांना निव्वळ जनसेवेसाठी शितल छाया पसरवणाऱ्या विशाल वृक्षाचा जन्म हवा आहे. उन्हाने त्रासलेल्या जीवांसाठी वृक्ष होण्याची आस बाळगणे ही अतिशय उच्च कोटीची भावना आहे.
— विलास साळुंके.

३२. एवढं उत्सुफुर्त काव्य प्रतिभेच्या गर्भातून च येऊ शकत.
जीवनाकडे जगतानाचा दृष्टिक्षेप व जिवनोत्तर अकांक्षेची भरारी अप्रतिम शब्दात प्रतीत झाली आहे.
प्रभा, तुझी प्रभा अजून तेजस्वी पणे झळाळत आहे हे तुझ्या काव्य पंक्तीच्या सुंदर रचनेतून प्रतीत होतय.
खूप छान व कौतुकास्पद.
अनेक शुभ आशीर्वाद.
— सुधीर नागपूरकर.

३३. सुप्रभात
प्रभाताईची कविता आणि काव्य रचनेची संकल्पना खूप आवडली. विचारांची मांडणी सोप्या शब्दांत पण अर्थ पूर्ण मनाशी संवाद लेखन आवडले.
दोन तीन वेळा कविता वाचली.
विशेषतः चौथ आणि पाचव कडव कल्पना आवडली.
“वृक्षा सारखे जीवन” छान मागणी.
सुनंदा रानडे (सौ संगीता फाटक) हिचा प्रतिसाद. ती मला माझ्या माहेरच्या “प्रभा” नावाने ओळखते.

३४. अमेरिकेत सिलीकाॅनव्हॅलीमध्ये ‘काय बे’ संमेलन प्रसंगी ची
चित्रा मेहेंदळे यांची कविता आवडली. मराठी स्मरणरंजनाची धमाल तेथे दिसते. .पूर्ण वृतांतासाठी त्यामुळे आम्ही उत्सुक आहोत…
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक. नाशिक

३५. काय बे …कविता आवडली ..माझी सर्व भाचरे, सुना कंपनी या
बे मध्ये अतिशय हिरीरीने भाग घेत असतात.. ढोल ताशा पासून ते पाहुण्यांना घरी आणणं सोडणं …स्पर्धेत बक्षिसं मिळवणं वगैरे
त्यामुळे कविता खूपच जवळची वाटली.
खंड्या…खूपच चटका लावून गेला.. त्या मुलांचे काय झाले असेल याचे अगदी हृद्य चित्रण केले आहे.
पूर्णिमाजींनी दिलेली माहिती भारतात गरजेचीच आहे.. किमान आता काही वर्षांपासून गावागावात ही सोय करण्याचे महत्त्व विशद करून त्यासाठी सरकारने तसदी घेतली आहे ..हे ही नसे थोडके…
— स्वाती वर्तक. मुंबई.

३६. सर, नमस्कार.
एका महिन्यात दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. आपले व आपल्या टीमचे खूप खूप अभिनंदन ! शुभेच्छा !!
— नागेश शेवाळकर. पुणे

३७. 👏🏻💐
मित्रवर्य देवेंद्र चे हे पुस्तक मी वाचले.
अतिशय उत्तम माहितीचे संकलन आहे.
नीला सत्त्यनारायण सारख्या अधिकारी आपल्याला माहिती असतात, पण कित्येक अधिकारी अतिशय साधे वाटणारे काम करता करता केवळ अभ्यास आणि मेहनत करून उच्च पदावर जातात त्याची उत्तम माहिती संकलित केलेली आहे.
नवीन पिढीला स्फूर्तिदायक असे हे पुस्तक आहे.
— चंद्रकांत बर्वे.
निवृत्त दूरदर्शन संचालक. मुंबई.

३८. भारतीय न्याय संहितेसंदर्भात वाचकांना सजग केल्याबद्दल लेखक सुधाकरजी तोरणे सर यांचे आभार. अतिशय छान माहिती सादर केली.
‘आम्ही अधिकारी झालो’ या प्रेरणादायी साहित्यकृतीचं प्रा. डॉ. किरण ठाकूर सर यांनी लेखणीबद्ध केलेलं परीक्षण निश्चितंच लक्षवेधी ठरलं आहे. मुळात साहित्यकृतीचं परीक्षण करणारी व्यक्ति ही आपला अमूल्य वेळ त्या साहित्यकृतीसाठी अर्पित करत असते. सखोल वाचन, चिंतन, मनन ते थेट प्रांजळ अभिप्रायापर्यंतचा प्रवास हा विविध निकषांना अभ्यासून केला जातो. त्यामुळे भावी वाचकांसाठी अशी उपलब्ध करून दिलेली विवेचनात्मक मांडणी मार्गदर्शकाची भूमिका देखील बजावत असते. त्या दृष्टीनं हे परीक्षण अत्यंत महत्वाचं ठरलं आहे.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा

३९. सविस्तर माहिती जपानी टॉयलेट बद्दल वाचून आपण किती मागे आहोत जाणवले. अर्थात आपली इंडियन टॉयलेट शास्त्रीय दृष्ट्या Great आहे हे विसरू शकत नाही. दादांची बाटली 😜😜
माउंट फुजी वर्णन अप्रतिम.
इच्छा लिहून ठेवण्याची तेथे पद्धत वाचून माणूस इथून तिथून सारखाच याची प्रचिती येते.
आपल्या येथे याला अंधश्रद्धा मानतात. जपान सारख्या प्रगत देशात या पद्धतीला काय बरे नाव द्यावे ? विचार करायला लावणारा प्रश्न.
जपान वाचले. जपान बघितले. याची देही याची डोळा नाही बघता आले, पण दादांनी केलेले वर्णन प्रत्यक्ष बघितल्याचे अनुभूती देऊन गेले.

— मृदुला चिटणीस. नवी मुंबई.

४०. चित्रा मेहेंदळे यांच्या लेखातून
BMM समेंलन अनुभवता आले. खुप छान.
— शुभदा डावरे चिंधडे. ठाणे.

४१. एकल महिलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमासारखे इतरही
काही उपक्रम ठिकठिकाणच्या महिला मंडळांनी, सामाजिक संस्थांनी हाती घेण्याची नितांत गरज आहे. हे अगदी खरे आहे
मुळात हा उपक्रम स्तुत्य च आहे .. छान वाटले वाचून ..धन्यवाद
महिला सक्षमीकरणासाठी योग.. चांगली माहिती दिली आहे. गरज आहे.
राजू मुंबईकर यांची संकल्पना आणि ती राबविणाऱ्या सावित्रीच्या लेकी सारेच उत्तम. अभिनंदन.
— स्वाती वर्तक. मुंबई

४२. धन्य ही माता, “अर्चना” वाहते मी तुला. अर्चना फुलांची,अर्चना
स्तुतीची, तुझ्या कर्तृत्वाची.
वंदन अशा थोर मातेला. 🙏🏻
अर्चना पाटीलच्या धैर्याला मानवंदना.
देवेंद्रजी खूप प्रोत्साहित करणारी न्यूज स्टोरी दिल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद .
— वीणा गावडे.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक
(माहिती) मंत्रालय, मुंबई

४३. खरोखरच आदर्श आहेत अर्चना ताई.!त्यांच्या जिद्दीला प्रणाम.
त्यांच्या मुलांना रश्मी आणि जतिन साठी खूप खूप शुभेच्छा.
माई बालसदन बद्दल माहिती वाचून वाटते
असे लोक आहेत म्हणूनच हे जग अजूनही सुंदर आहे.
कविता छान.
— स्वाती वर्तक. मुंबई.

४४. Salute to Archanatai, the icon for parents who
have physically challenged children. Salute to this great mother n her equally great children 🙏.
Our Editor Bhujbal sir always present the stories of distinguished persons. My sincere thanks to him and madam Alkaji 🙏
— Ranjitsing Chandel.
Retd. Distt. Information Officer, Yavatmal.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments