Wednesday, September 11, 2024
Homeबातम्याविंग कमांडर शशिकांत ओक : ७५ वा वाढदिवस साजरा

विंग कमांडर शशिकांत ओक : ७५ वा वाढदिवस साजरा

विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ४ ऑगस्ट रोजी पुणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम ७५ दिव्यांनी श्री ओक यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर विविध ऋचांचे मंत्रपठण केल्यावर पुरोहितांनी त्याचा उद्देश आणि अर्थ ही सांगितला.

त्यानंतर जमलेल्या बालमित्रांनी, नाडी भविष्य प्रेमींनी, मिलिटरीच्या स्नेहींनी ओकांच्या आठवणी जागवल्या. ऑफिसर्स करीयर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटेतून शिवाजी महाराजांनी शाईस्ताखानावर केलेला सर्जिकल स्ट्राईक सादर केला. आणखी एका नाटिकेतून त्यांचा जीवन प्रवास सादर करण्यात आला.

या कार्यक्रमाला एयर मार्शल सुनीत सोमण, मेजर जनरल शिशिर महाजन, ब्रिगेडियर हेमंत महाजन, ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, विंग कमांडर केळकर, तोडकर, तबीब आले होते. कालीचरण महाराज, चितळेबाबा, नाडी वाचक ईश्वरन प्राचार्य अद्वयानंद गळतगे आदि अनेक मान्यवरांच्या उपस्थित चित्रफीत दाखवली गेली. यावेळी विंग कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते.

जमलेल्या आप्त, नातेवाईक, मान्यवरांनी ओक यांना विविध प्रकारे भेट वस्तू देवून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मान केला.

याप्रसंगी श्री चंद्रकांत दादा शेवाळेंकडून भालचंद्र ज्योतिर्विद्यालय संस्थेच्या वतीने सौ. पुष्पलता शेवाळे यांनी Award of Excellence मानचिन्ह भेट देवून गौरविण्यात आले. नाडीग्रंथ परिवाराच्या वतीने त्यांना शुभेछ्या देण्यात आल्या.

ईश्वरनजी, कालीचरण महाराज, जादूगार चडचणकर, मंगल व अरविंद मेहेंदळे, कौस्तुभ बुटाला, अनघा व भारवी अवधानी, मयूर व्यास, प्राचार्य अद्वयानंद गळतगे वगैरे नाडी ग्रंथ भविष्य प्रेमींनी पावसाच्या गैरसोईवर मात करून हजेरी लावली.

विंग कमांडर ओक यांना त्यांच्या ७५ व्या वाढ दिवसानिमित्त न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. विंग कमांडर ओक ह्यांच्या आठवणी फारच मनोरंजक … त्याकाळची समाज व्यवस्था, लोकांचे परस्पर संबंध, तुलनेने साधे सोपे जीवन ह्यांचे दर्शन आनंददायक.. ओक साहेबांच्या कार्य कुशलतेचे यथोचित वर्णन..

    बाकीचे भाग पण पाठवा..

    लेखन शैली उत्तम

  2. News story today ला धन्यवाद. माझ्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदनाबद्दल… अलका आणि देवेंद्र भुजबळ यांना धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments